आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?

Submitted by Parichit on 11 May, 2020 - 04:52

थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.

मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"

मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"

तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"

मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"

"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"

"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"

मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"

मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,

"काय दादा काय झालं?"

मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"

त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,

"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला

आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.

"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"

असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,

"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."

"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.

"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"

"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.

मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."

"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो

अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.

कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्ता, फोटो व इतर माहिती मी कुठूनही उचलून देऊ शकतो. बाल्कनीचा फोटो असे शोधले तर ढीगभर फोटो गुगलवर मिळतात. इतकेच काय वेगवेगळ्या शहरातल्या बाल्कनीचे पण स्पेसिफिक फोटो सुद्धा मिळतील. पण मी तसे करणार नाही कारण मला असे खोटे काही करायला आवडत नाही. आणि खरे फोटो टाकले तर ते व्हेरीफाय करायला कोणताही मार्ग नाही. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तर नाहीच नाही. सबब: पत्ता, फोटो हि मागणी मदत करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी असल्याने सविनय फेटाळण्यात येत आहे. याउलट मला हि मागणी संशयास्पद वाटत आहे. छज्जातील बंडीहीन ढेरपोट्या बाबांनी तर यापुढे जाऊन समोरच्या बाल्कनीचा सुद्धा फोटो मागितला आहे. म्हणजे सकाळी त्या म्याडम बाल्कनीत आल्या कि व्यायाम करायचे सोडून मी त्यांचा फोटो काढावा काय? मला तर यांचे इरादे नेक दिसत नाहीत.

Screenshot_20200513-101945_Samsung Internet.jpg

स्वत: स्वतःचा डू आयडी? हे कुछ जादा नही हूवा?

मला तर बुवा असं वाटायला लागलंय कि मायबोलीवर फक्त दोनच व्यक्तींचे आयडी आहेत. एक माझा आणि बाकी सगळे त्या दुसऱ्या व्यक्तीचे.

पत्ता, फोटो व इतर माहिती मी कुठूनही उचलून देऊ शकतो. बाल्कनीचा फोटो असे शोधले तर ढीगभर फोटो गुगलवर मिळतात. इतकेच काय वेगवेगळ्या शहरातल्या बाल्कनीचे पण स्पेसिफिक फोटो सुद्धा मिळतील >>>> म्हणजेच तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण नकोय. त्यासाठी तुम्ही गंभीर नाही आहात. जर तुम्ही अचूक माहिती पुरवलीत तर अचूक सोल्युशन मिळेल. खोटी माहिती दिलीत तर उत्तर पण तसेच मिळेल. हा कॉमन सेन्स असतानाही तुम्हाला खोटी माहिती द्यावी किंवा मी तसे करू शकतो असे सांगायचे असेल तर मग समस्यांचं काय ?

माझ्या घरातून आमचाच कबूतरखाना आणि पोल्ट्री दिसते. नाहीतर मी समोरच्या पार्टीचे आणि स्वतःचेही फोटो टाकले असते. जर मला प्रॉन्ब्लेम आला असता तर. पण समस्या नाही काही मला हे एक. आणि दुसरं म्हणजे मी हा फोटो कधी तरी नेटवर टाकलाच आहे. मला लाज नाही आपल्या घराची. कसंही असलं तरी माझं घर आहे ते. मला आसरा देतं. वासुदेव , पोल्ट्री या स्ट्रिंग्जचा वापर करा. शोध घ्या. सापडेल.

मलाच तो फोटो आता सापडत नाही कुठे अपलोड केला ते. थाप मारली असे वाटेल (वाटलं तर वाटलं).
पण फोन मधे आहे. इथे अपलोड केला तर त्यावरून सर्च करता येतो. नाहीतरी इथे दिलाच आहे.

43232500_403_0.jpg43232500_403_0.jpg

पाथफाईंडर +४४०
ढेरपोट्या, तुम्ही जग्गी वासुदेव आहात ? त्यांचा हाच व्यवसाय होता आधी.

जग्गी वासुदेव हे खरंच मला माहीत नाहीत. अचूक ओळखले असते तर मग आढेवेढे घेत बसलो नसतो. कबूल झालो असतो. पण मी नाही ते.

ढेरपोटे साहेब तुमच्या बाल्कनी मधून चिकन दिसते तर माझ्या बाल्कनीमधून चिकणी. हाच तर फरक आहे. म्हणून तुम्हाला परवडते ढेरपोटे राहणे आणि फोटो टाकणे. मला दोन्ही नाही परवडणार.

हे मी न लाजता आपल्या घराचा फोटो कसा टाकावा याचे उदाहरण म्हणून दिले आहे. विषय माझा नाही तुमचा चालला आहे, जो तुम्हीच काढला आहे. तुमची जेन्युईन अडचण असेल तर सांगा. पण विषयांतर करू नका ना गडे !

आणि मला हे

एक महल हो सपनों का
माबो पे धागा विणनेका

ढेरपोट्या, तुमचा फोटो ह्या वासुदेव श्रीधरन नामक लेखकाने टाकलाय त्याचा म्हणून या लेखात
https://www.dw.com/en/pigeon-racing-season-reaches-a-high-point-in-india...

सोर्स - गुगल रिव्हर्स इमेज

२०० Happy

आता धागा थांबवायला हरकत नाही.

अर्थात धागा माझा नाहीये
संबंधितांनी निर्णय घ्या ...

पण विषयांतर करू नका ना गडे !
Submitted by छज्जातील बंडीही... on 13 May, 2020 - 11:37

ते फक्त अल्पवस्त्रांकित आहेत. अगदीच काही नागडे नाहीत.

>नक्की काढा कटप्पा. मात्र मीच तुमचा ड्यू आयडी आहे असे कोणाला कळता कामा नये. टाईमपास धागे काढण्याचे कंत्राट माझ्याकडे आहे असे लोकांना वाटते Happy
Submitted by कटप्पा on 13 May, 2020 - 10:09

>>> ओह हो. चुकून ब्राउजर बदलायला विसरले वाटते.

तुम्ही पानांचा स्कर्ट घालून व्यायाम करा परिचित
कोणी आक्षेप घेतला तर सांगा म्हणावं आदिमानव काळापासून ही संस्कृती सुरू आहे
तेव्हा कोणी आदीमनविणीने आक्षेप नाही घेतला तर आता काय घेताय?

बॉडी पेंटिंग केले तर ते ओळखु येणार नाहीत म्हणजेच ते परिचित न राहता अपरिचित बनतील तर मग एवढा व्यायाम करून उपयोग काय जर समोरच्या बाल्कनीसाठीही ओळखु नाही आले तर ?

वाटशोधे तुम्ही क्विक आहात हे मान्य करावेच लागेल पण विचार करा मी इतका वेळ प्रतिसाद संपादित का केला नसावा Happy
चाल आपकी थी पर प्लॅन मेरा था .

Pages