आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?

Submitted by Parichit on 11 May, 2020 - 04:52

थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.

मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"

मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"

तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"

मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"

"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"

"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"

मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"

मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,

"काय दादा काय झालं?"

मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"

त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,

"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला

आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.

"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"

असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,

"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."

"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.

"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"

"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.

मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."

"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो

अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.

कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही रे बाबा आता तू तोच असल्याने ते टाकत नाहीयेत. नाहीतर लोंकाना कळेल कि अरे हा तर ऋन्मेष किव्वा चेहरा ब्लर करून टाकतील सुद्धा . आता सुद्धा या परिचितच्या धाग्यावर ऋन्मेष चेच प्रतिसाद जास्त आहेत . किव्वा याला उत्तर दे. त्याला उत्तर दे असं चाललंय . त्यामुळे माझी शंका जास्तच दृढ (कन्फर्म ) होत आहे . स्वताच्याच वेगळ्या आयडीचा धागा वाहता ठेवायचा दुसरं काय ?
>>

सुंदर विश्लेषण

पॉईंट आहे लोकहो
परीचित माझा आयडी असू शकतो याची नोंद घ्या Happy

पण तो माझा नाहीये हे सुद्धा लक्षात ठेवा Happy

कारण ते बाल्कनीत व्यायाम करतात आणि मी खिडकीच्या आत बसून वर्क फ्रॉम होम करतो.

ऋन्मेषने त्याच्या घराचा फोटो टाकावा.
किंवा
परिचितने त्याच्या बाल्कनीचा फोटो टाकावा
नाहीतर
रागारागाने अभिषेक नाईक थ्री इन वन घराचा फोटो टाकतील बरं का !
मग
मला दोष देऊ नका.

दिली.

गुप्तांग व गुह्यांग सोडता बाकी शरीर टेरेसवर कुठल्याही बाह्य आवरणाशिवाय ठेवून व्यक्तिगत टेरेसवर वावरणे हा गुन्हा नाही. विटॅमिन डी मिळविणे हा आपला हक्क आहे. फार तर एक दीड महिना त्यानंतर सूर्यप्रकाश मिळणेही कठीण होऊन जाईल. तेव्हा १५ ते २२ जून पर्यंत भरपूर विटॅमिन डी मिळवा.

एक मनुष्य किती आयडी चालवु शकतो?
नवीन Submitted by अग्निपंख on 12 May, 2020 - 15:52
>>>

ईतरांचे माहीत नाही ऑर्कुटवर माझे ८०+ होते Happy

ईतरांचे माहीत नाही ऑर्कुटवर माझे ८०+ होते >>> भारी आयडिया. एक आयडी सापडला की एकदम मोठा आकडा ठोकून द्यायचा. मग एक दोन तीन चार पाच हे क्षुल्लक वाटतातच, शिवाय आपण नेमकं काय विचारत होतो हे प्रश्नकर्त्याला समजत नाही.

छ्ज्जा म्हणतात की सज्जा ? ऐतिहासिक कादंबरीत सज्जा वाचल्यासारखं वाटतं आहे.
फारच गमतीदार आयडी घेतला आहे. Lol

हिंदी त छज्जा
छज्जे उपर लडकी नाचे लडका है दिवाना इचकदाना

> गुप्तांग व गुह्यांग सोडता बाकी शरीर टेरेसवर कुठल्याही बाह्य आवरणाशिवाय ठेवून व्यक्तिगत टेरेसवर वावरणे हा गुन्हा नाही. विटॅमिन डी मिळविणे हा आपला हक्क आहे.

>>> आपण म्हणताय त्याला कायद्याच्या काही आधार आहे का? आणि ते दोन का सोडायचे? ते पण आपलेच त्यांचा पण हक्क आहे ना विटॅमिन डी वर? (जेन्युईनली विचारत आहे. टाईमपास म्हणून नाही. ते एक किरणुद्दीन साहेब होते त्यांनी मला एकदा फटकारले होते कोतबोवर टाईमपास करतो का रे म्हणून)

वा वा, परिचित लै भारी !
तुम्हाला म्हटल वकील देतो, नंबर द्या तर ते नको. आणि फुकटात सल्ला मिळाला तर कायदेशीर आहे का विचारता.
म्हणाजे तुम्हाला समाधान नको म्हणा की.
कायदेशीर समाधान हवं असेल तर ऑफर खुल्ली आहे.

नक्की कायदा काय ते सांगा. केस लढवण्यासाठी पैसे घेतात वकील. कायदा काय ते सांगायला पैसे घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे.

छज्जा म्हणजे खिडकीच्यावर ऊनपावसापासून रक्षण करायला बाहेर काढलेली कॅण्टीलीव्हर स्लॅब
Chhajja असे ईंग्लिश टायपून गूगल करा
तिथे फक्त कचरा साफ करायला अणि क्रिकेट खेळताना बॉल अडकला तर चढतात लोकं
तिथे उघड्याने व्यायाम करणे टू मच.

परिचित दोघांनी छज्जाबद्दल एकत्र लिहिले आणि बरोबर लिहिले.
आता अवघड आहे लोकांना आपण वेगळे आहोत हे पटवून देणे.
मला आता नाईलाजाने त्यासाठी स्वतंत्र धागा काढण्याशिवाय पर्याय ऊरला नाही.

ऋन्मेऽऽष भौ, जे झाले ते योग्यच झाले.
एकच व्यक्ती दोन आयडी वरून एकाच वेळी लिहू शकत नाही म्हणून आपण दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे सिद्ध झाले.

नक्की कायदा काय ते सांगा. केस लढवण्यासाठी पैसे घेतात वकील. कायदा काय ते सांगायला पैसे घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. >>> मग कायदा माहीत आहे कि तुम्हाला ! मग कशाला त्रास लोकांना ?

अहो दोनशे चौऱ्याण्णव टेरेस साठी लागू पडते का याबाबत कायदा काय सांगतो ते विचारतोय. कारण टेरेस अर्धा सार्वजनिक आणि अर्धा खाजगी असतो म्हणे. त्यामुळे माझ्या मते तात्त्विकदृष्ट्या विचार करता टेरेसमध्ये अर्धे कपडे घालणे कायदेशीर असायलाच हवे. पण नक्की कायदा काय माहित नाही.

बाय द वे कालच्या प्रकारानंतर मी आज सकाळी सुद्धा टेरेसमध्ये नेहमीप्रमाणे व्यायाम केला. म्याडम खिडकीत आल्या होत्या काही काळासाठी. पण आपण नाय घाबरत आता कुणाला.

पण मी कुठल्याच प्रतिसादात ऋन्मेष आणि परोचित या दोन व्यक्ती एकच आहेत असे म्हटलेले नाही.

Pages