आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?

Submitted by Parichit on 11 May, 2020 - 04:52

थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.

मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"

मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"

तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"

मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"

"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"

"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"

मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"

मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,

"काय दादा काय झालं?"

मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"

त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,

"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला

आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.

"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"

असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,

"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."

"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.

"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"

"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.

मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."

"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो

अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.

कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायदा काही असू ध्या.
सोसायटी मध्ये तर आपल्या मुळे कोणाला त्रास होवू नये एवढी काळजी घ्या.
कायदा कपड्या न विषयी काही ही भाष्य करत नाही नाही
फक्त नागडे फिरणे, आशिल हरकर्ती करणे( ह्या हरकती कोणत्या त्या विषयी काही स्पष्ट नाही)हा गुन्हा आहे.
समाजात राहता तर कमीत कमी शेजारी पाजारी ह्यांना त्रास होवू नये हे तरी बघा.

हे बघा, कायदा काय आहे ते सांगणे म्हणजे सल्ला नव्हे. नुसते कायद्याच्या पुस्तकात वाचून सांगायचे आहे त्याला सल्ला कसे म्हणता?
कायदा अमुक अमुक आहे असे सांगितल्यानंतर जर पुढे केस होऊ शकत असेल तर त्यासाठी जी चर्चा व्हायची त्याला सल्ला म्हणता येईल.

माझ्या मते तात्त्विकदृष्ट्या विचार करता टेरेसमध्ये अर्धे कपडे घालणे कायदेशीर असायलाच हवे.
>>>>

मग कोणी कंबरेच्या वरच्या भागातच कपडे घातले आणि कंबरेपासून खालती घातलेच नाही तर ते तात्विकदृष्ट्या योग्य ठरेल का Happy

Why only considering horizontal half to cover the body parts ?
वर्टिकल अर्ध्यात पुढे काही नाही आणि मागे झकले असे किंवा वाइसवर्सा सुद्धा चालतंय ना

डावेऊजवेही चालेल... किंवा ऑब्लिक प्लेनमध्येही दोन भाग करू शकतो.
कायद्यात अर्धनग्नतेची व्याख्या काय लिहिली आहे हे ईथे कोणी पैसे न आकारता सांगू शकेल का?

धागा ज्याचा आहे त्यानेच हा प्रश्न विचारणे योग्य. इतरांनी प्रश्न विचारला आणि त्यांना ते मान्य नसेल तर सगळेच मुसळ केरात.

वाटत नव्हतं पण आता खात्री झाली आहे. स्कोअर सेटल करण्यासाठी एक डू आयडी, विचित्र मानसिकता समोर येऊन प्रतिमाभंजन होऊ नये म्हणून पांचट विकृत धागे काढण्यासाठी एक डू आयडी, धाग्यावेताळ म्हणून मिरवण्यासाठी एक डू आयडी.. आणि स्वतःची लाल करायला इतर अनेक डू आयडी.. बरं, दुर्लक्ष करतो म्हणावं तर प्रत्येक धाग्यावर मी मी करत हजेरी आहेच. उपचार घ्या अभिषेक.. तुमच्या विकृतीची कल्पना होती, पण हादेखील तुमचा आयडी नसावा अशी इच्छा होती. फोल गेली. असो. आता इच्छा नाही मायबोलीवर फार सक्रिय राहायची. फक्त तुमच्या विकृतीमुळेच.

>>कायद्यात अर्धनग्नतेची व्याख्या काय...<<
परिचित यांचा आजचा प्रतिसाद पहाता, त्या मॅडम रिवर्स सायकॉलजीचा प्रयोग करत असुन या सगळ्या झमेल्यात इंडिसेंट एक्स्पोजरचा काडिचाहि संबंध नाहि असं वाटतंय... Wink

> मग कोणी कंबरेच्या वरच्या भागातच कपडे घातले आणि कंबरेपासून खालती घातलेच नाही तर ते तात्विकदृष्ट्या योग्य ठरेल का

>>> तात्त्विकदृष्ट्या तेच योग्य आहे कारण टेरेस अर्ध्या भावाने आपण खरेदी केलेला असतो. त्याचा खालचा भाग आपला खाजगी असतो वरती मात्र बांधकाम किंवा कव्हर करायला परवनगी नसते. म्हणजे वरचा भाग सार्वजनिक.

> त्या मॅडम रिवर्स सायकॉलजीचा प्रयोग करत असुन

>>> हो. तिचे मानसिक प्रयोग सुरु आहेत. एकीकडे खिडकीत येऊन बघायचे पण आणि दुसरीकडे त्याला नक्की काय सांगते काय माहित

> आता इच्छा नाही मायबोलीवर फार सक्रिय राहायची. फक्त तुमच्या विकृतीमुळेच.

>>> कुणाची इच्छा नाही राहिली? अलहमदुलिल्लाह या आयडीची कि त्या मागच्या व्यक्तीची?

मी काय म्हणतो तुम्ही भोकं भोकं असलेले कपडे घाला
म्हणजे घातल्याचे समाधान त्यांना
आणि न घातल्याचे तुम्हाला Happy

विन विन सिच्युएशन आहे

मी काय म्हणतो तुम्ही भोकं भोकं असलेले कपडे घाला >>> आता हे कायद्यात बसतं का हा प्रश्न येईल.

मी काय म्हणतो तुम्ही भोकं भोकं असलेले कपडे घाला
>>>

भोक कुठे असावे कुठे नसावे यावर कायदा काही भाष्य करतो का?
भोकांची संख्या आणि आकार याबद्दल कुठे नमूद् केले आहे का? अर्थात ते टेरेस वा बाल्कनीच्या संदर्भाने हवे.

Submitted by अलहमदुलिल्लाह on 12 May, 2020 - 19:50
>>>>>

तुमची हि माझ्याविरोधात असलेली पोस्ट तुम्ही ऋन्मेषचे डुआयडी आहात या संशयातून तुम्हाला मुक्त करेल असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे.

मी स्वत:च डु आयडी काढून स्वत:वरच टिका करतोय आणि स्वत:च्याच एका आयडीचा धागा चालवतोय हा विचार ऊलट संशय बळकट करण्याची शक्यता आहे Happy

हा काय प्रकार आहे....

अलहमदुलिल्लाह यांचे आवडते लेखक / लेखिका / मायबोलीकर
ऋन्मेऽऽष

आणि

आता इच्छा नाही मायबोलीवर फार सक्रिय राहायची. फक्त तुमच्या विकृतीमुळेच.
Submitted by अलहमदुलिल्लाह on 12 May, 2020 - 19:50

एकच व्यक्ती दोन आयडी वरून एकाच वेळी लिहू शकत नाही म्हणून आपण दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे सिद्ध झाले.
>>> किंवा एकाच वेळी दोन ब्रॉवसर मध्ये टायपून एकामागून एक save बटन दाबले अशी शक्यता निर्माण होतेय....

किंवा एकाच वेळी दोन ब्रॉवसर मध्ये टायपून एकामागून एक save बटन दाबले अशी शक्यता निर्माण होतेय....
>>>>

हो. हे मी ऑर्कुटवर बरेचदा केलेय.

हा काय प्रकार आहे....
अलहमदुलिल्लाह यांचे आवडते लेखक / लेखिका / मायबोलीकर
ऋन्मेऽऽष

>>>>

परिचित.
आपण अहमदमियांचे माझ्याबाबतचे हे सिक्रेट ओपन केले म्हणजे आपण माझेच आयडी असल्यच्या आरोपातून सुटलात या भ्रमात राहू नका.
एकदा लोकांच्या मनात संशय आला की तो कधीच पुर्ण नाहीसा होत नाही.

पण सर, तक्रार करणारी ती म्याडमच आहे असं तुम्ही छातीठोक पणे कसं सांगु शकता?
तक्रारदार दुसराच (किंवा दुसरीच) असला तर.

तिचाच बॉयफ्रेण्ड भांडायला आला. केस क्लीअर आहे.
आणि तसेही तक्रार कोणाची हा मुद्दा गौण आहे. तक्रार रास्त आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे.

तिचाच बॉयफ्रेण्ड भांडायला आला. केस क्लीअर आहे.
आणि तसेही तक्रार कोणाची हा मुद्दा गौण आहे. तक्रार रास्त आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष
>> नाही हो तक्रारदार महत्वाचा घटक आहे या प्रकरणात. तक्रारदार दुसरा (किंवा दुसरी) असेल तर बॉयफ्रेंड जास्त भाग घेणार नाही.
अवांतर : प्रश्न सरांना विचारला आणि उत्तर भाऊंनी दिले. याचा अर्थ 'गंगाधरही शक्तीमान है' असा काढता येईल का?

अवांतर : प्रश्न सरांना विचारला आणि उत्तर भाऊंनी दिले. याचा अर्थ 'गंगाधरही शक्तीमान है' असा काढता येईल का?
>>>

बिन्धास्त काढा
जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो
या ऊक्तीला अनुसरून ज्या आयडीची खरी ओळख नसते त्याची जबाबदारी मी घ्यायचे ठरवलेय आता.

मला ही केसच क्लिअर होत नाही.
जर सोसायटीचे नाव सांगितले तर भेट देऊ. घटनास्थळाची पाहणी करू मगच काहीतरी ठरवता येईल. किमान आपल्या बाल्कनीचा फोटो, समोरच्या बाल्कनीचा फोटो हे येणे आवश्यक आहे.

काहीही असो. जोवर घटनास्थळी भेट देणे / व्हिडीओ / फोटो पाहिले जात नाहीत तोपर्यंत कुणीच मत देऊ नये.

आपण अहमदमियांचे माझ्याबाबतचे हे सिक्रेट ओपन>>
१. माझ्या या आयडीचे नाव अलहमदुलिल्लाह असे आहे, ज्याचा अर्थ अल्लाहची कृपा, किंवा thank god असा होतो. अहमद वगैरे अपभ्रंश करू नका.
२. खोटं काय सांगावं, अभिषेकवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी म्हणून आयडी घेतला होता, पण त्याचं ऋन्मेष हे रूप इरिटेटिंग असलं तरी क्युट आहे. त्याचा मी किती छान हा आटापिटा मनोरंजक वाटतो, म्हणून चाहता झालो.
३. यातून नेमकं सिद्ध काय करायचं आहे हा देखील एक प्रश्न आहे.

यातून नेमकं सिद्ध काय करायचं आहे हा देखील एक प्रश्न आहे. >>>> उजाड झालेल्या गावात एखादं नॉस्टॉल्जिक म्हातारं असतं. ते चुकून नवीन येणा-या वाटसरूंना गावाचे नवे रहिवासी समजून काही ना काही सांगू पाहत असतं त्याला काहीही सिद्ध करायचं नसतं. या गावात त्याला मान मिळावा इतकंच.

नक्की काढा कटप्पा. मात्र मीच तुमचा ड्यू आयडी आहे असे कोणाला कळता कामा नये. टाईमपास धागे काढण्याचे कंत्राट माझ्याकडे आहे असे लोकांना वाटते Happy

Pages