जेव्हा मूर्ख ट्रेकिंगला जातात ! - २

Submitted by शक्तिमान on 16 April, 2020 - 15:45

पहाटेच्या प्रकरणाने आता भाऊश्या निमूटपणे येणार हे आम्हाला माहितीच होते. त्यामुळे आम्ही दोघेही बिनधास्त होतो. त्याला काय आणायचे आहे आणि काय नाही आणायचे हे ब्रिफ करून हितेश पुन्हा झोपी गेला. दुपारी १ ला निघायचा असल्यामुळे सगळे निवांत होते. दुपारी १:०० ला मी आणि हितेश स्टॅन्ड वर भेटलो
पण भाऊश्याचा अजूनही पत्ता नव्हता. खूप वेळानंतर भाऊश्या एका हाडकुळ्या पोरासोबत आमच्याकडे येतांना दिसला. ते पोरगं जसं जवळ आलं तसं मला tmkocच्या सुंदरचा दोस्त बका जो तीनदाच "केम पालटी ? " असा बोलतो त्याची आठवण झाली. तो मुलगा भाऊश्याचा मामेभाऊ सागर होता.मी वळून हितेश कडे बघितले तर तो "हे पोरगं नक्की कळसुबाई चढेल का " ह्या विचारात होता. सगळे आल्यामुळे आता प्रवास सुरूच करावा लागणार होता.
मी आधीच मॅप वरून सगळ्यात जवळचा रूट काढून ठेवला होता.
सिन्नरची बस लागताच आम्ही बस मध्ये चढलो. गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही आत गेलो पण आत बसायला जागाच नव्हती. थोडा वेळ उभे राहिल्यावर एका म्हाताऱ्याला सागरची दया आली असावी. त्यांनी त्याला बसायला जागा दिली. १ तासानंतर आम्ही सिन्नर स्टॅन्ड वर होतो.कसं जायचंय हे नेमकी मलाच माहित असल्यामुळे सगळे मलाच follow करत होते. आता linkedin च्या profile वर leadership quality टाकता येईल याचा विचार करून मी भलताच सुखावलो.
पिंपळगाव मोर वरून बारी गावाला जायचे असते हे मला ठाऊक होते. पिंपळगाव मोरला जाण्यासाठी घोटी बस पकडावी लागेल हे सुद्धा मला माहीत होते. पण घोटी बस केव्हा असते हे मला ठाऊक नव्हते. बसस्टॅन्डच्या चौकशीच्या ठिकाणी आम्ही चौघेजण ताटकळत उभे होतो. माझा नंबर आल्यावर जेव्हा मी घोटी गाडीची चौकशी केली तेव्हा त्याने मला असा लुक दिला जसा काय मी त्याला त्याच्या पोरीचाच हात माघितलाय. त्याने फक्त नाही असे उत्तर देऊन दुसरीकडे बघून घेतलं.त्याचा चेहरा बघितल्यावर तो आज नक्की त्याच्या बायको बरोबर भांडून आलाय हे clearly दिसत होते. तितक्यात हितेश तिथे असलेल्या पोलिसदादाकडे गेला. हितेश त्याला तोडक्या मोडक्या मराठीत घोटी च्या बस बद्दल विचारात होता आणि पोलिसदादा त्याला अगदी कौतुकाने बघत होता. तितक्यात आम्ही तिथे गेल्यावर त्याने आम्हाला "बेलू " नावाची पाटी असलेल्या बसमध्ये बसा असं सांगितलं.
जातांना मला जाणवले कि आमच्यातला एक जण गायब होता. भाऊश्या मिसळ हाणायला नाश्ता सेन्टर मध्ये घुसला होता. त्याला बळजबरी बाहेर आणत आम्ही "बेलू" बस मध्ये चढलो.बेलू बस मध्ये चढल्यावर एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखा मला वाटले. त्यात बस मध्ये एकाच युनिफॉर्मचे २०-२५ मुलं मुली बसलेले होते. हे बस नेमकी महामंडळाची आहे कि शाळेची हे सांगण्याची पंचायत होत होती पण एकंदरीत बसचा कलर आणि आतली अवस्था बघून खात्री पटली. आम्ही उभेच होतो. कंडक्टर आल्यावर त्यांच्याकडे आम्ही पिंपळगाव मोर बद्दल विचारले. कंडक्टर ने एक्दम हसतमुखाने आम्हाला पुढचा रस्ता सांगितला.बस कंडक्टर एका मुलाकडे बघून हसतांना मी पहिल्यांदाच पाहत होतो.इतक्यात बस थांबली आणि सगळे विद्यार्थी एक्दम शिस्तेत खाली उतरले. त्यांची शिस्त बघून आम्हाला आमचीच लाज वाटली.बस शेवटच्या स्टॉप वर उतरल्यावर आम्ही रोड वर उभे राहून लिफ्ट साठी टेम्पो बघू लागलो.
५:०० वाजत आले होते. आम्ही आधी टेम्पो वाल्यांना हात करत होतो आणि जेव्हा ते पुढे जात तेव्हा त्यांना शिव्या देत होतो. हितेश भलताच बोर झाला होता हे त्याच्या तोंडाकडे पाहून शेम्बडा पोरगाही बोलला असता. त्याला मी "मै हूं ना " असं हातानेच खूण करून धीर दिला. शेवटी एक देवमाणूस आमच्यासाठी थांबला. आम्ही पळत टेम्पोत बसून घेतले. टेम्पो मध्ये एक आज्जीबाई आठवडे बाजार करून आली होती. भाऊश्या आज्जीबाईच्या पिशवीकडे असा काही बघत होता जसा काय हा बोक्या आहे आणि त्या पिशवीत बोंबील. टेम्पो वाल्याला दुसरीकडे जायचं असल्याने त्याने आम्हाला मध्ये एका गावात सोडले. कसं माहीत नाही पण पाठीमागून लगेच एक घोटी पाटी असलेली बस आली .आणि आम्ही तिच्यात बसलो. त्या बस मधल्या लेडी कंडक्टर ला जेव्हा आम्ही बारी गाव बद्दल विचारले तेव्हा तिने इतक्या sincerely उत्तर दिले जसेकाय तिचा HR राऊंड चालू आहे. finally आम्ही पिंपळगाव मोर ला पोहोचलो. उतरल्या उतरल्या अकोला गाडी लागली जी बारी गावातून जाते. त्या गाडीत बसल्यावर मला हितेश बोलला "भाई हमे सारी बसेस एक के पीछे एक मिल गयी , लागता हे वहा कोई हमारी राह देख राहा हे".
माझी नजर जागा नसल्यामुळे पोत्यावर बसलेल्या भाऊश्याकडे गेली जो माज्याकडे दाताड काढून हसत होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> कथा हॉरर वळण घेणार असे दिसतेय. >>>

म्हणजे काय, घ्यायलाच पाहिजे. अजून तीन मेपर्यंत दिवस काढायचेत.

भाऊश्या आज्जीबाईच्या पिशवीकडे असा काही बघत होता जसा काय हा बोक्या आहे आणि त्या पिशवीत बोंबील.
>> काय त्या उपमा. एक से बढकर एक. लई भारी.