पाटील v/s पाटील - भाग २१

Submitted by अज्ञातवासी on 2 June, 2019 - 09:23

हा भाग छोटा झालाय, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण फार दिवसापासून कथा पुढे सरकत नाहीये. यापुढील भाग मोठा येईल.
धन्यवाद!!!

पाटील v/s पाटील - भाग २०

https://www.maayboli.com/node/69942

"सोनी घाबरू नकोस. सगळं नीट होईल."
सोनी देवाजवळ बसून होती. वत्सलाबाई तिला आधार देत म्हणाल्या.
इकडे आयसीयु मध्ये तोंडाला ऑक्सिजन लावलेल्या मोहनकडे काचेतून बघत, कृष्णराव सुन्नपणे बसून होते.
अण्णाना वाचवताना त्याने अंगावर होणाऱ्या वारांची पर्वा केली नव्हती. त्यातला एक वार वर्मी बसला होता.
आनंदीबाई सगळ्यांची काळजी घेत होत्या, सगळ्यांना धीर देत होत्या.
अण्णांच्या अंगावरही बऱ्याच जखमा झाल्या होत्या, पण ते आता हिंडू फिरू शकत होते.
चिंताग्रस्त कृष्णरावांकडे बघून त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं.
अण्णा कृष्णरावांसमोर गेले, कृष्णरावांच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं...
...अण्णांनी कृष्णरावांचे पाय धरले.
कृष्णराव गडबडून गेले. "अण्णा काय करतोय हे, उठ."
"नाही कृष्णा नाही, भावाची ओळख पटली नाही या अण्णाला. शाळेत असताना दोन दोन महिने राहायचो तुझ्याकडे. किती जीव लवायचा तू, जगन आणि वसंतदादा. किती प्रेम दिलंत रे तुम्ही आम्हाला, आणि एक दिवस अचानक राधामावशी वसंतदादाबरोबर बाहेर गेल्याची बातमी आईने सांगितली. कृष्णा, खरं सांगतोय, दोन दिवस माझा डोळ्याला डोळा नव्हता. कृष्णा सारखी आठवण यायची रे, पण खोटं नाही सांगणार, तुम्हाला आता पूर्णपणे विसरलो होतो मी. पण आज कळालं, तुम्हाला देशोधडीला कुणी लावलं ते."
"अण्णा, नको जुने विषय. हा माझा मूर्ख मुलगा, आजीवर खूप जीव. फक्त आजीने सांगितलं म्हणून हा इथे आला, तुझ्याकडे ड्रायवर म्हणून राहिला. पण एक सांगतो अण्णा, याने प्रत्येक संकट झेलल तुझ्यावरच. मूर्खच आहे रे तो!!! चांगला परत निघाला होता, पण नाही, सोनीचा फोन आला, आणि तुला वाचवायला धावला...शेवटी घातलाच ना जीव धोक्या...."
कृष्णरावांचे शब्द पूर्ण झाले नाही, ते ओक्साबोक्शी रडू लागले.
"शांत व्हा सर," शेजारी असलेले व्यास त्यांना धीर देत म्हणाले.
---------------------
अंबा वाड्यावर सुन्नपणे बसून होती.
प्रत्येक गोष्टीत हरल्यासारखी तिची अवस्था झाली होती. अण्णांनी तर तिच्याशी बोलणं सोडलंच होतं, पण वत्सलाबाई सोडल्या तर घरात कुणीही तिच्याशी बोलत नव्हतं.
शामराव एकदा येऊन तिची यथेच्छ निर्भत्सना करून गेला होता.
"बाई चला जेवून घ्या," वत्सलाबाई म्हणाल्या.
अंबा सुन्नपणे उठली, आणि जेवायला निघाली.
जेवणाच्या टेबलावर कुणी कुणाशी बोलत नव्हतं.
"अण्णा, कशी आहे मोहनची तब्येत." अंबाने विचारलं.
"सोनी, जरा पोळी दे इकडे."
सोनीने पोळीच भांड सरकवल.
"तुम्ही कुणीही माझ्याशी बोलणार नाहीत का?"
अंबाने आवाज चढवला.
"आजी, ओरडू नकोस. जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय, समजलं?"
"सोने गप्प राहा," वत्सलाबाईनी आवाज चढवला.
"आई, एवढं सगळं ऐकूनही मी गप्प राहू? हे सगळं आपलं ऐश्वर्य, आपली सत्ता, आपला अभिमान, तो एका विधवा बाईच्या कष्टाच्या पुंजीवर मारलेल्या डल्ल्यावर..."
"अण्णा तू तरी काही बोल."
"चल वत्सला, निघतो मी. कृष्णाचा डबा झाला."
"देते."
अंबाच्या डोळ्यात नकळत एक अश्रू ओघळला.
"बाई," वत्सलाबाई म्हणाल्या.
"अचानक सगळी नाती समोर आलीत, तीही अनपेक्षितरित्या. जरा वेळ द्या सगळ्यांना, होईल सगळं नीट."
"अंबा हरलीये वत्सला," अंबा सगळं हरलीये. अंबाने सुस्कारा टाकला.
-----------------------------
कृष्णराव डबा खात होते. तेवढ्यात बाहेर हेलिकॉप्टरचा आवाज आला.
कृष्णरावांचा घास घशातच अटकला.
"व्यास!!!"
"मोठे सर," व्यासचाही चेहरा पांढराफटक पडला.
वसंतराव आले होते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय अज्ञातवासी, उर्फ आयर्नमॅन.
खूप दिवसांनी परत आले मायबोलीवर, आणि आज सगळ्या कथा वाचून काढल्या.
खूप छान लिहायला लागला आहेस. उंबरठा तर खूपच सुंदर.
लिहित रहा.
=महाश्वेता

@मन्या - हो, आज्ञाच होती.... Wink
@महाश्वेता - प्रतिसाद वाचला, मात्र खालचं नाव वाचून omg अशी फिलिंग आली. काय बोलावं नाहीये सुचत, फक्त आता थांब, जाऊ नकोस...
Happy

?

As vatat vasant rav yayla jevdhi varsh lagli tevdhich story pudhe jayla lagnar... Lihi na patpt