पाटील v/s पाटील - भाग २०

Submitted by अज्ञातवासी on 13 May, 2019 - 14:38

पाटील v/s पाटील - भाग १९

https://www.maayboli.com/node/69804

"एवढ्या मोठ्या बंगल्यात, एक ड्रायवर राहतोय."
"अं..."
"अं काय, बोलती बंद झाली तुझी?"
"काय सोनीबाई, सांगितलं ना, आम्ही इथे केयरटेकर म्हणून काम करतो. आम्हाला कुठं परवडायचे असे चोचले," कृष्णराव आत येत म्हणाले.
"बाबा,"
"बघा, हे मोहनराव बाबा म्हणतात, लई जीवाला बरं वाटतं. शेवटी विदेशात जाऊन आलेला माणूस, थोडंफार भारीतल्या चहा कॉफीची सवय असणारच की. तुम्हाला कवापासून समजावतोय, ऐकतच नाही. आम्ही गरीब माणसं ओ, श्रीमंती कधी स्वप्नातही बघितली नाही, मग आता काय? नका समजू आम्हाला श्रीमंत, आम्हाला तुमच्या छत्रछायेखाली राहू द्या!"
"मोहन, हे म्हणताय ते खरंय?"
"अं... हो... मी जरा फ्रेश होऊन येतो, बाबा, जरा टॉवेल काढून द्या की. चला, चला..."
मोहन कृष्णरावाना ओढतच बाहेर घेऊन गेला.
"बाबा काय चाललंय? ही कशाला आलीये इथे."
"मला काय माहित? पण हिला कळता कामा नये, आपण कोण आहोत ते."
"बाबा पुढच्या तीन तासात इथे चॉपर पोहोचेल, आणि काय समजायचं बाकी राहीन?"
"वेट, मी व्यासला फोन करतो."
मोहनने पटापट अंघोळ उरकली.
तेवढ्यात बाहेर हेलिकॉप्टरचा आवाज आला.
"बाबा,"
"व्यास लवकर आलाय? देवा..."
सोनी बाजूलाच उभी होती.
"मालक आलेत वाटतं," कृष्णराव म्हणाले आणि लगबगीने दरवाजाजवळ धावले.
"अरे, तुम्हां दोघांचं चाललंय काय?" सोनी दारातच उभी होती.
"मालक आले, मालक आले," म्हणत मोहनही कृष्णरावांबरोबर धावला.
"बाबा, व्यासला बाहेरच कटवायला हवं."
"सर, हेलिकॉप्टर आलंय सर," व्यास दरवाजा उघडून मध्ये शिरले.
कृष्णराव दरवाजात... त्यांच्या मागे मोहन... त्याच्या मागे सोनी...
"मालक, आम्हाला का सर म्हणतायेत, असं करू नका, काही चूक झाली का माझ्या हातून?" असं म्हणत कृष्णराव व्यासजवळ गेले.
व्यास सोनीला बघून आधीच चक्रावले होते.
"नका करु असं मालक," म्हणून मोहनही त्याच्याजवळ गेला.
"अरे बाळांनो, विनोद केला. तुम्ही मालक होय, शक्यच नाही. शोभता तरी का तुम्ही मालक कसा हवा, माझ्यासारखा... ही मुलगी कोण?"
"मी सोनी पाटील, अण्णा पाटलांची मुलगी." सोनी तोऱ्यात म्हणाली.
"असूदे, मोहन तुला आम्ही दुबईला पाठवायचं ठरवलंय, तयारी कर बघू."
"मालक?"
"हो, जा पटकन, प्लेन पकडायचंय."
सोनी मोहनजवळ आली, "तू खरंच जाणार आहेस?"
"जावं लागेल,"
"जायचं तर जा, पण मीसुद्धा येईन."
"सोनी?"
"काहीही बोलू नकोस. मी नाचताना दरवाज्याआडून कोण बघत बसायचं माहितीये मला. मी क्लासला निघायचे, तेव्हा स्कुटीची चावी लपवून कोण गाडी पुढे करायचं माहितीये मला. प्रत्येक क्षणी मला बघताना डोळ्यात दिसणारं प्रेम माहितीये मला. आणि चोरलेला घुंगरू सुद्धा..."
मोहन हसला.
"येऊ दे मला. "
"सोनी, एक सांगू?"
"बोल?"
"ती मिने अण्णांच्या इभ्रतीसाठी आयुष्य पणाला लावायला निघाली, आणि आपण पळून जायचं?"
"मोहन..."
"सोनी मी थांबतोय. सगळं विचारून तुला घेऊन जाईन, पण पळून नाही जायचं?"
"प्रॉमिस?"
"हो. जा घरी आता."
सोनी हळूच दरवाजाकडे निघाली, आणि काही पावले जाऊन...
...पळत येऊन घट्ट मोहनला बिलगली.
"जा आता," तिचा चेहरा हातात घेऊन मोहन म्हणाला.
"प्लिज जाऊ नकोस."
"नाही जाणार, जा आता घरी."
"मी जाते, पण तू मला कायम माझ्याजवळ हवा आहेस."
मोहन तिच्याकडे बघतच राहिला.
सोनी गेली.
"थँक गॉड व्यास, तुम्ही आज माझी मदत केलीत आणि सगळे समजून घेतलं."
"ते तर माझं कर्तव्य होतं सर."
"मोहन आता पुढे काय करायचंय...अजूनही जायचं आहे?"
"बाबा आता वचन दिलं थांबव तर लागेलच."
"वचन की प्रेम?"
"तुम्हाला जे हवं ते समजा बाबा, पण आता माघार नाही."
"सर, चला काहीतरी मार्ग काढून आता सुखांत करूयात..." व्यास म्हणाले.
----------------------------------
अण्णा सोफ्यावर विचार करत बसले होते. त्यांची तंद्री भंगली...
समोर सोनी उभी होती...
"अण्णा, तुमच्या निष्ठेची हीच शिक्षा असते का?"
"सोनी, आता मला काही ऐकायचं नाहीये," अण्णा सुन्नपणे म्हणाले.
" पण मला बोलायचय"
"आपण नंतर बोलूयात."
तेवढ्यात जाधव पळत आत आले...
"अण्णा कारखान्यावर राडा झालाय."
"काय झालं?"
"अण्णा, काकासाहेबांनी माणसे पाठवली आहेत. त्यांना कारखाना फोडायचा आहे"
"जाधव गाडी काढा, आज तो राहील, नाहीतर मी राहील" अण्णा निघाले.
"सोनी," अंबेनी आवाज दिला. "मला लक्षण ठीक दिसत नाहीये. अण्णाच्या बरोबर कोणालातरी पाठवायला हवं. तू श्यामला फोन लाव."
सोनीने फोन लावलं मात्र फोन कुणीही उचलला नाही.
"या क्षणात आपली मदत एकच माणूस करू शकतो आजी"
"कोण?"
"मोहन"
सोनीने मोहनला फोन लावला आणि सगळी परिस्थिती समजावून सांगितली.
"सोनी तू काळजी करू नकोस, मी निघतोय..."
कारखान्याच्या आवारात दंगल माजली होती. सगळीकडे नुसती तोडफोड चालू होती.
अण्णा कारखान्याच्या आत गेले, सोबत दहा बारा माणसे होती.
"या अण्णासाहेब या," काकासाहेब म्हणाले.
"त्याच दिवशी तुला मारायला हवं होतं."
"का नाही मारलं मग, अण्णा? आज तुझं मरण बघायला जिवंत ठेवलं होय मला."
तेवढ्यात आजूबाजूने मी प्रचंड मोठा जमाव चालून आला आणि त्याबरोबर शामराव आले...
"दादा, वेळेवर आलास." अण्णा म्हणाले.
...आणि पुढच्याच क्षणी काठीचा एक तडाखा अण्णांच्या कपाळावर बसला.
अण्णांनी मटकन बसकन मारली.
"अण्णा, घरातूनबाहेर काढतांना लाज वाटली नाही? दिनकररावाचा पोरगा आहे मीही... एक पैसा कधी सोडला नाहीस, आता बघ, कसं सगळं घेतो ते."
"दादा..."
"दादा म्हणू नकोस. कधी दादासारखी वागणूक दिली नाहीस. सगळी प्रॉपर्टी अण्णांची. सगळा दरारा अण्णांचा. सगळे व्यवसाय अणांचे... आणि दादाला काय? अण्णांनी दिलेला तुकडा...? अण्णा जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत सगळी सत्ता माझ्या हातात येणार नाही... आणि त्यासाठी मी तुला ठेवणार नाही..."
हातात कोयते आणि भाले घेऊन अनेक लोक अण्णांच्या मागे लागले.अण्णा जीव घेऊन पळू लागले.
तेवढ्यात एका माणसाने कोयता फेकला...
कोयता अण्णांच्या पाठीत घुसणार, तेवढ्यात...
...मोहनने तो पकडला...
"मोहन तू इथे कसा काय?"
"अण्णा, निघा इथून, प्रचंड धोका आहे..."
"मोहन तू?"
"मला काहीही होणार नाही, निघा तुम्ही... बाबा, घेऊन जा यांना."
समोर प्रचंड मोठा जमाव होता...
कोयता, भाले, काठ्या, तलवारी इत्यादी शस्त्र घेऊन तो जमाव उभा होता.
'आज तुझी शेवटची परीक्षा मोहन...'
....आणि मोहन त्या जमवावर चालून गेला...
सुरुवातीला त्याने उचलून फेकता येणारे लोक धरून, गुडघ्यावर आदळून पाठीचा कणा मोडायचा सपाटा लावला, अनेक लोक त्यातच जायबंदी झाले.
नंतर एक पडलेला कोयता घेऊन तो बाकीच्या लोकांच्या पायावर वार करू लागला. अनेक लोक रक्ताच्या थारोळ्यात पडत होते, पण मोहनला त्याची पर्वा नव्हती.
मोहनमध्ये आज राक्षस संचारला होता...
संधी साधून शामराव अण्णांच्या मागे गेले आणि त्यांनी हातातल्या काठीने अण्णांच्या डोक्यावर पुन्हा वार केला...
"दादा..." अण्णा शामराववर चालून गेले.
तुंबळ मारामारी चालू झाली...दोन्हीही रक्तबंबाळ झाले...
मोहनचा रुद्रावतार बघून जमाव केव्हाच पळून गेला होता. काकासाहेब आणि सर्वेशही केव्हाच पळून गेले होते... उरलेले निष्ठावंत लोक कुणाची बाजू घ्यावी हे न समजल्याने अण्णा आणि शामराव यांची मारामारी सुन्नपणे बघत होते...
"थांबा..."
दोघांनी चमकून बघितले.
गाडीत सोनी आणि अंबा आल्या होत्या.
अंबा उतरली आणि जाऊन दोघांच्या गालफडात सटासट लगावल्या...
"पैसा हवा ना, विका मला, घ्या पैसा! अरे एकच रक्त ना? तुमच्यासाठी पैसाइतका महत्त्वाचा झाला? सत्ता तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची झाली? बोला ना?"
अंबाला बोलता बोलता प्रचंड दम लागला, सोनीने तिला आधार दिला.
"श्यामा पैशासाठी तू जीव घ्यायला निघालास. आणि अण्णा तू सुद्धा वार केला..."
कृष्णराव आणि मोहन निमूट बघत होते.
"मोहन हीच वेळ आहे गौप्यस्फोट करण्याची, " कृष्णराव म्हणाले.
"नाही बाबा अजून नाही. "
अंबा पुढे म्हणाली, "अरे माणसं महत्त्वाचे असतात. नाती महत्वाची असतात. अंबा नाक लावत होती. कारण काय? तर तिच्या पुढे जाण्याची पोरांची टाप नाही. आंबाच्या घरची एकी कोणी तोडू शकत नाही आणि आज...?"
"मोहन बोलू दे मला"
"बाबा अजून नाही"
अंबाचा दम वाढत चालला होता, तरीही ती थांबायला तयार नव्हती.
"पोरं जन्माला घातली, चांगलं वाढवलं, आणि आज माझ्यासमोरच एकमेकांचा जीव घेऊ दे. अण्णा अरे मोठ्या भावासाठी त्या भरताने १४ वर्ष सिंहासनावर पादुका ठेवून राज्य केलं. श्यामा लहान भावासाठी तो राम वनवासात गेला. फक्त नात्यांसाठी! आणि आज तुम्ही जीव घ्यायला निघालात... तुम्हाला दोघांनाही जगण्याचा अधिकार नाही, आणि मलाही नाही..."
अंबा मटकन खाली बसली.
"आता बोला बाबा," मोहन म्हणाला.
आणि कृष्णराव ज्वालामुखीसारखे उसळले...
"अंबा मावशी तुला जगण्याचा हक्क आहे? अंबा मावशी सांग ना, तुला जगण्याचा हक्क आहे?"
सगळे अचंबित होऊन कृष्णरावांकडे बघू लागले.
"तू पोरांना नात्याची शिकवण देतेस. तू कधी नातं पाळलंस? माझी आई नातं पाळायला गेली ना, तर तू सापासारखी उलटलीस. आमची शेती गेली, आमचं घर गेले, फक्त नातीगोती पाळण्यासाठी!!! तिचे दागिने लुबाडलेस, तेव्हा कुठे गेली होती नात्यागोत्याची आठवण."
सोनी डोळे विस्फारून मोहन कडे बघत होती...
"जे पेरलं मावशी तेच उगवल... तू तुझ्या बहिणीला धोका दिलास, आज पैशासाठी तुझ्या तुझ्या मुलांनी एकमेकांच्या माना दाबल्या. हिशेब बरोबर झालं मावशी... हिशेब बरोबर झाला..."
अंबा कृष्णरावांकडे डोळे विस्फारून बघत होती...
"हिशोब बरोबर झाला बाबा," मोहन म्हणाला आणि हसून जमिनीवर कोसळला!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

As usual भारी जमलाय हा भाग सुद्धा..
माझ्या आवडत्या लेखकाने लिहीलेली माझी सर्वात आवडती कथा...

Mohan koslala... Mhanje???? To anandane koslala ki tyala Kuni marale????
Story taking nice turns....
Next part please

मी पहिली..आता वाचते! ..मिस्ड बाय २ मिन्स Sad

Submitted by अथेना on 14 May, 2019 - 00:21
>>>>
अथेना प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचा प्रतिसाद नेहमीच माझा हुरूप वाढवतो...

As usual भारी जमलाय हा भाग सुद्धा..
माझ्या आवडत्या लेखकाने लिहीलेली माझी सर्वात आवडती कथा...
>>>>>
काहीही हं श्रद्धा, पण थँक यु सो मच!
आणि थोडंसं वाईट वाटतंय, मी लिहिलेली ही पहिली कादंबरी, पण लवकरच संपेन Sad

जबरदस्त Happy
विपु बघ.

Submitted by मन्या ऽ on 14 May, 2019 - 07:27
>>>>>
बघितली, थँक्स मन्या

Mohan koslala... Mhanje???? To anandane koslala ki tyala Kuni marale????
Story taking nice turns....
Next part please

Submitted by Rosh on 14 May, 2019 - 11:24
>>>>
रोश ते पुढच्या भागातच कळेल.

छान

Submitted by Rajsmi on 14 May, 2019 - 12:22
>>>
थँक यु rajsmi

छान चालूय!

नवीन Submitted by ॲमी on 15 May, 2019 - 16:16
>>>>
थँक्स ॲमी