आंबट शौकीन

Submitted by जयश्री साळुंके on 6 April, 2020 - 22:41

सध्या माहीत नाही का ते, पण मायबोली वर बरच लिखाण हे आंबट शौकीन होत चाललंय. कदाचित हे फक्त मला वाटत असेल. गेल्या ८-९ वर्षांपासून मी मायबोली वर वाचतेय, गेल्या काही महिन्यांपासून लिहतेय, पण अगदी गेल्या काही दिवसांपासून बरच लिखाण हे अश्लिलते कडे झुकल्यासारख वाटायला लागलं आहे. एक दोन ठिकाणी मी प्रतिक्रियांमध्ये टाकलं हे. पण आता जरा जास्त व्हायला लागलं आहे.
ज्यांना कोणाला "bold" लिखाणाच्या अंतर्गत मायबोलीला शोभणार नाही असं लिहायचं असेल त्यांनी इतर ठिकाणी लिहावं अशी माफक अपेक्षा आहे. तुम्हाला तुमचं लिखाण मांडायचा पूर्ण हक्क आहे पण मायबोली वर हे लिखाण नको असं माझं स्पष्ट मत आहे.
बाकी ज्यांना हे लिखाण लिहायचं असेल त्यांनी ते इतर बऱ्याच website आहेत तिथे लिहावं, ज्यांना वाचण्यात रस असेल त्यांनी तिथे जाऊन वाचावं...

कोणाला राग आला, वाईट वाटलं तरी मी क्ष नाही...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांना कोणाला "bold" लिखाणाच्या अंतर्गत मायबोलीला शोभणार नाही असं लिहायचं असेल त्यांनी इतर ठिकाणी लिहावं अशी माफक अपेक्षा आहे>>111

यथोचित मुद्दा!
किंबहुना अशाच एका धाग्यावर मी विरोधदेखील दर्शवला.
आता काही मंडळी, मायबोली ही एक प्रगल्भ वेबसाईट असून, इथला वाचकवर्ग पुरेसा प्रगल्भ आहे इत्यादी इत्यादी मुद्दे मांडून या धाग्यावर येण्याची शक्यता आहेच,
पण धाग्यातील मतांशी पूर्णपणे सहमत!

जयश्री, तुमचा ओझं कथेवरचा प्रतिसाद पाहून तुमचा आक्षेप लक्षात आला होता.
मी तुमच्या या मताशी अगदी सहमत आहे.
प्रेमाच्या नात्यांतला गोडवा अश्या लिखाणांमुळे घालवला जातो!

म्हणजे माझा मुद्दा अगदीच चुकीचा नाही...
@पद्म ओझं तरी जरा बरं होतं... नवीन एका व्यक्तीने ३ कथा टाकल्या आहेत. आणि नेमक्या मी सकाळी उठल्या उठल्या रोजच्या सवयीने मायबोली सुरू केलं तर ते सगळं वाचायला मिळालं.. मी अस नाही म्हणत की त्यात चुकीचं काही आहे. पण मायबोली ह्या लिखाणासाठी नाही...

कोणी सांगू शकेल का दुसरा धागा कसा delete करू?

प्रत्येक संस्थळाचा एक बाज असतो. त्या त्या संस्थळाची बलस्थाने असतात. मला वाटतं माबोचे बलस्थान हे 'होमली', घरगुती, अनौपचारीक वातावरण आहे. त्याला धक्का लागेल असे लिखाण खरे तर टाळावे असे माझेदेखील मत आहे.

धाग्यावर प्रतिसाद देणार्यांचे आभार

मला कोणालाही दुखवायचं नव्हतं खरं तर. पण कदाचित ह्या धाग्यामुळे काही लोकं दुखावली गेली असं म्हणायला हरकत नाही.
कदाचित माझ्या धाग्याच्या नावात चूक असेल पण मायबोलीवर अश्लीलता नको हा एकच हेतू त्यामागे आहे.

आणि मी मायबोलीवर इतक्या level चं अश्लील लिखाण आजपर्यंत वाचलेलं नव्हतं...
जर अजुन कोणाचं लिखाण, कोणालाही वाटत असेल की मायबोली वर नको तर त्याबद्दल सांगा..
जेणे करून मायबोलीवर दर्जेदार लिखाण"च" वाचायला मिळेल...

जेणे करून मायबोलीवर दर्जेदार लिखाण"च" वाचायला मिळेल...
दर्जेदार ह्या ह्या ह्या ह्या,
थोडफार अहे म्हणा दर्जेदार, नाहितर चिखल फेकच चालु असते.

Hi

tumhi khup sundar lihitat. tumche vichar hi khup sundar aahet.
pan kunala kaay lihaych aahe he jyach-tyala tharvu dya. tumhi itaka vichar naka na karu. Aaplya deshat sagalyanna aapapale vichar vyakt karanyache swatantrya aahe. Tyanna te karu dya. tumhi ugach swatala tras karun ghet aahat.

aapan he Sagal Jara openly pahu na. Yahi pexa shringarik lihitat kahi lok, tya manane he khup kami aahe.
mala vatat shringar thoda naajuk padhatine fulwata aala asta. aso. fakt ek katha mhanun vachun sodun dyayla kahi harakat nahi.
ya aadhi hi khup shrugarik katha yeun gelya aahet maybolivar. tashich hi ek.

तुम्हाला तुमचं लिखाण मांडायचा पूर्ण हक्क आहे पण मायबोली वर हे लिखाण नको असं माझं स्पष्ट मत आहे.>>
असहमत. साहित्यातल्या नऊ रसांपैकी एक असलेला हा शृंगाररस, आणि त्यावरच मायबोली homely वगैरे संकेतस्थळ आहे म्हणत बहिष्कार टाकणे अनुचित ठरेल. तुमच्या कोट केलेल्या वाक्याबद्दल माझा आक्षेप आहे, आणि याचा अर्थ अश्लील लिखाणाला माझा पाठिंबा आहे असा अर्थ काढून कृपया गैरसमज करून घेऊ नये.
सध्या भूमिगत झालेल्या एका कवीमहोदयांनी मायबोलीवर उच्छाद मांडला होता, त्यांच्या कविता शृंगारिक नव्हत्या, मी तर म्हणेन कि अश्लील हि नव्हत्या तर विकृत होत्या. तसे काही लिखाण मायबोलीवर असले तर त्यावर नक्कीच विरोध व्हायला हवा.

वरच्या प्रतिसादात ज्या ४ कथांचा उल्लेख आहे त्या बोल्ड आहेत खऱ्या, कदाचित लेखकाला योग्य शब्द सापडले नसावेत.. पण म्हणून लिहूच नये असे म्हणणे चूक आहे. ललितच नव्हे तर अगदी २०-२२ भागांची कादंबरी असली तरी सुरुवातीच्या काही मिनिटात/ ओळीत लिखाण काय दर्जाचे असेल, विषय काय असेल याचा अंदाज येतो. या चारही कथांचे कथाबीज अगदी पहिल्या ३,४ ओळीत स्पष्ट होत होते. त्यापुढे वाचायचे कि नाही हा सर्वस्वी वाचकाचा प्रश्न असतो.

आता बिपीन सांगळे यांची कथा, शृंगाररसाचं एक चांगलं उदाहरण! त्यावर देखील तुमची प्रतिक्रिया वाचनात आली ती अशी "ही साधी बाब सांगण्यासाठी मला नाही वाटत की कथेत इतक्या जास्त प्रमाणात sexuality दाखवायला पाहिजे होती" मुळात शृंगार म्हटल्यावर ओझं हि कथा खूप subtly लिहिल्या गेली असं मला तरी वाटतं. असो, व्यक्त होण्याचा अधिकार जसा तुम्हाला आणि लेखकाला आहे, तसा इग्नोर करण्याचा देखील आहेच! ह्याउपरही तुम्हाला कोणतेही लिखाण मायबोलीवर असू नये असे वाटत असेल तर तुम्ही admin ला विपू करून त्यासंदर्भात कळवू शकता. मायबोलीवर काय नसावे ते ठरवून व्यवस्थापक मंडळ नक्कीच मायबोलीचा दर्जा अबाधित ठेवतील..

आठ रसातील एक रस म्हणून श्रृंगार रसाला नकार नाहीच आहे आणि श्रृंगार असलेलं लिखाण माबो वर असण्याला पण आक्षेप नाही. पण श्रृंगार आणि उगाच नको असतांनाही वाढवलेल्या details ला आक्षेप आहे.
राहिला प्रश्न कोणी काय लिहावं याला भारतात स्वातंत्र्य आहे याचा. मी हे नाही म्हणत की त्यांनी लीहुच नये. लिहा फक्त माबो वर नको..
उदा. ग्रंथालयात जाऊन आपण जोरात भाषण नाही देऊ का, फक्त बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणून???

व्यवस्थापन नक्की काही तरी करेल पण आपण वाचक म्हणून काहीच करायला नको हे कोणी सांगितलं?
बऱ्याच लेखकांना प्रतिक्रिया वाईट येतात, पण म्हणून वाचकांचा हेतू वाईट नसतो. आपण आपल्या लेखनात बदल केले की पुरेस असतं.

kadachit maza mudda tumchya laxat nahi aala. kaaran granthalay hi bhashan denyachi jaga Kashi asu shakte?
aso. mayboli sarvanchi aahe. jashi ekhadi bhasha tichya veg-veglya rasanni, alankaranni, prayoganni samrudh hot jate tasech mayboli che hi asu dya.
sarv prakarche lekhan, ras, alankar, prayog, vyakaran, shaili tyat asu dya tyashivay ti samrudh kashi honar?
kuni kay lihav tasech kuni kay vachav he jyala tyala tharvu dya.
mayboli var bhay, rahasya, sahas, vinodi, gudh, Lalit, prem ya pramane shringarik sahityala hi tyachi yogya jaga & olakh asu dya.
aapan aaple vichar swachh thevu, Sagal sundar disel.

अजिंक्यराव + 1

तुमची ओझं वरची आलेली प्रतिक्रिया बिल्कुल आवडली नव्हती... तुमचे म्हणणे होते डोळ्यातलं रोमान्स दाखवायला पाहिजे होता.
फक्त तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही तो सेक्शुलिटी चा मुद्दा अधोरेखित केलात.. तो कोणाच्याही डोक्यात आला देखील नसता इतकी ती तरल कथा होती... तुम्ही बाकीचे इग्नोर मारलेत आणि केवळ तेच पाहिलेत...
---------------------//----///-------/-/--------////-------
मायबोली वर हे लिखाण नको असं माझं स्पष्ट मत आहे.
बाकी ज्यांना हे लिखाण लिहायचं असेल त्यांनी ते इतर बऱ्याच website आहेत तिथे लिहावं, ज्यांना वाचण्यात रस असेल त्यांनी तिथे जाऊन वाचावं...
>>>€

आपल्याला काय वाटते तसे होत असते तर मज्जा असती... पण असे होत नाही... मायबोलीवर तुम्हाला हवे तसेच लिखाण व्हायला पाहिजे नाहीतर दुसरीकडे लिहा हे तुमचे म्हणणे हास्यास्पद आहे...

खरं सांगायला गेलं तर कुणी कुठे काय लिहावं हा टोटली त्याचाच अधिकार आहे असं म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक संस्थळाचा एक बाज असतो, आब असतो. वैविध्यपूर्ण कितीही लिखाण आलं, कितीही बोल्ड लिखाण आलं, तरीही आजपर्यंत ते संस्थळाच्या फीलनुसारच येत गेलं. हो, बऱ्याच कथांमध्ये भडक चित्रीकरणही आहे, अगदी अश्लील वाटावं असंही असेल, परंतु सरळ सेक्स स्टोरी वाटेल, असं कुणीही लिहिलं नाही.
शृंगार रस, येस, हासुद्धा नवरसांमधील खूप महत्वाचा रस आहे, पण तो खुलवता येणं, आणि शृंगाराने बीभत्सतेची पातळी न ओलांडण हे तितकंच महत्वाचं. मात्र हा रस तर दूरच, सरळ पॉर्न पुस्तकांसारखी अथवा साईटसारखी वर्णने येत असतील, तर त्यासाठी वेगळ्या साईट आहेत. हे संस्थळ ते लिहायची जागा नव्हे.
अजून एक, लेखक स्वतः जेव्हा म्हणतो, आवडत असेल किंवा नसेल तरीही स्पष्ट सांगा, आणि त्यानंतर त्या कथा काढून त्रागा करत असेल, आणि आडून बोलत असेल, तर त्याला आपण काय लिहिलं होतं याची स्पष्ट जाणीव आहे असं मलातरी वाटत.

जिथे तुम्ही दारू कशी पिता असा धागा चालू शकतो तिथे तुम्ही सेक्स कसे करता हा धागाही चालायला हवा असे माझे रोख ठोक मत आहे !

असो,
ओझे कथा आधी वाचतो,
मग त्यात शृंगाररस किती आहे आणि बीभत्सता किती आहे हे ठरवून ईथे मत देतो.

पण एक जनरल मत सांगायचे तर मी लेखकाचा हेतू काय आहे हे ताडायचा प्रयत्न करतो. जर लेखकाचा हेतू कथेची वातावरणनिर्मिती असेल तर माझे मत त्याच्या पारड्यात. पण जर त्याचा हेतू वाचकाच्या लैंगिक भावना चाळवणे हा असेल तर मायबोली ही जागा नाही.

च्रप्स
हा धागा ओझं कथेसाठी नाही हे माझं एव्हाना ३-४ वेळा सांगून झालं आहे... ह्या धाग्यावर सुध्दा आणि ओझंच्या प्रतिक्रियांमध्ये सुध्दा... जर शक्य असेल तर त्या प्रतिक्रिया पुन्हा वाचा...
हा धागा ज्या कथांसाठी होता, त्या लेखकाने स्वतः आधी सांगितलं होतं की तुम्ही वाईट प्रतिक्रिया देऊ शकता आणि जेव्हा तशा प्रतिक्रिया दिल्या तेव्हा त्यांनी ते धागे edit करून तिथे हे लिहल की "ही कथा आंबट होती"
ओझं विषयी माझं मत स्पष्ट होतं की त्यात sexuality सोबत इतर पैलू खुलवता आले असते

जयश्री, तुमचा ओझं कथेवरचा प्रतिसाद पाहून तुमचा आक्षेप लक्षात आला होता.>>>> माझीच चुक झाली! मी माझ्या आधीच्या प्रतिसादात ओझं कथेवरील जयश्री यांच्या प्रतिसादाचा रेफरन्स घेतला...
कुणीच ओझं कथेला अश्लिल बोललेलं नाही!

हा धागा ज्या कथांसाठी होता, त्या लेखकाने स्वतः आधी सांगितलं होतं की तुम्ही वाईट प्रतिक्रिया देऊ शकता आणि जेव्हा तशा प्रतिक्रिया दिल्या तेव्हा त्यांनी ते धागे edit करून तिथे हे लिहल की "ही कथा आंबट होती"
>>> त्या आयडी ने वाईट प्रतिक्रिया बघून धागा एडिट केलेला नसून तुम्ही असा सेपरेट धागा काढून त्यांचा आंबट शौकीन असा उल्लेख केला त्यामुळे एडिट केलेला स्पष्ट दिसत आहे.
तो नवीन आयडी नसून त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे.
जेंव्हा असा सेपरेट धागा काढून एखाद्या व्यक्ती ला टार्गेट केले जाते त्याला त्रास होणे साहजिक आहे.
कथेला वाईट म्हणा पण लेखकाला नको...

पण श्रृंगार आणि उगाच नको असतांनाही वाढवलेल्या details ला आक्षेप आहे.>> हे खुप सब्जेक्टिव्ह आहे ना पण. नको असे तुमचे मत आहे. पण
तसे बघितले तर फार काही डिटेल मध्ये लिहिलेले नाही. ( ओझं कथे चा संदर्भ) पूर्वी असे लेखन झालेले आहे माबो वर. पण नव्या नव्या लेखनाचा इतका मारा असतो की वादंग होउन मग काही दिवसांनी सगळे मागच्या पानावर जाते. बाकी इथे सर्व अ‍ॅडल्ट आहेत. पटले नाही तर वाचू नये बिनधास्त.

पण एक जनरल मत सांगायचे तर मी लेखकाचा हेतू काय आहे हे ताडायचा प्रयत्न करतो. जर लेखकाचा हेतू कथेची वातावरणनिर्मिती असेल तर माझे मत त्याच्या पारड्यात. पण जर त्याचा हेतू वाचकाच्या लैंगिक भावना चाळवणे हा असेल तर मायबोली ही जागा नाही.

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 April, 2020 - 03:22>>>>>>>>>> अगदी बरोबर!!! पुराणांमधल्या अनेक कथांमध्ये देखील शृंगार तपशिलवार असतो. पण वाचकाने त्याचा मुळ हेतू लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे.
वरवर वाचून कुणी पुराणांना देखील अश्लील म्हणू शकतात!! Happy

we should hv some broad prospective, we all r matured enough to understand this. I feel pity for people with narrow mindset. it's disgusting how you judge someone with a piece of writing and avoid all his earlier work.
He has written very beautiful stories & even if he handles some sensitive issues we should at least try & understand his intentions.
categorizing someone & publishing generalized statements online is also offensive. It may hurt dignity of that person. maintaining social responsibility plays a major as one single comment can spoil someone's entire career as well as affect his private life.

Pages