आंबट शौकीन

Submitted by जयश्री साळुंके on 6 April, 2020 - 22:41

सध्या माहीत नाही का ते, पण मायबोली वर बरच लिखाण हे आंबट शौकीन होत चाललंय. कदाचित हे फक्त मला वाटत असेल. गेल्या ८-९ वर्षांपासून मी मायबोली वर वाचतेय, गेल्या काही महिन्यांपासून लिहतेय, पण अगदी गेल्या काही दिवसांपासून बरच लिखाण हे अश्लिलते कडे झुकल्यासारख वाटायला लागलं आहे. एक दोन ठिकाणी मी प्रतिक्रियांमध्ये टाकलं हे. पण आता जरा जास्त व्हायला लागलं आहे.
ज्यांना कोणाला "bold" लिखाणाच्या अंतर्गत मायबोलीला शोभणार नाही असं लिहायचं असेल त्यांनी इतर ठिकाणी लिहावं अशी माफक अपेक्षा आहे. तुम्हाला तुमचं लिखाण मांडायचा पूर्ण हक्क आहे पण मायबोली वर हे लिखाण नको असं माझं स्पष्ट मत आहे.
बाकी ज्यांना हे लिखाण लिहायचं असेल त्यांनी ते इतर बऱ्याच website आहेत तिथे लिहावं, ज्यांना वाचण्यात रस असेल त्यांनी तिथे जाऊन वाचावं...

कोणाला राग आला, वाईट वाटलं तरी मी क्ष नाही...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"Oz" la jar "aambat shaukin" sarkhi dushan dili asati tar tyanni hi mothya jad & udas antkarnane ti katha /dhaga kadhala asta.
kaaran lekhakala kunalahi dukhavaych nasate. khar tar ha lekhakacha mothepana aahe, te samjayla titka mothepana hi hava mhana. Aso.
khar tar palathya ghadyavar panya sarkh aahe, tari hi sangte, kuni hi kahi hi KUTHE HI lihu shakto, jaga tharvaycha ADHIKAAR tumhala NAHI.
te management var sodun dya.

tasech aaj-kaal TV Malika & chitrapata madhye hi barech bold scenes astat. pan sensor board la kuni as objectional patr pathvun takrar kelyach mi tari aikal nahi. Te tumhala chalat mag ithe kay problem aahe?>>> आजकाल tv आणि चित्रपटात शिव्या सुध्दा "बीप" वाजवतात. आणि बोल्ड सीन्स असले तर त्या चित्रपटाला A+ चा शिक्का मिळतो. अगदीच सांगायचं झालं तर "तुंबाड" ह्या चित्रपटाला देखील A+ आहे. (हे फक्त उदाहणादाखल आहे, यावर दुसरा वाद नको)

याच सारखा नियम लावायचा झाला तर मग मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग ! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग ! (सुरेश भट) हे देखील अश्लील कॅटेगोरीत मोडेल.>>> श्रृंगार आणि अश्लीलता यात फरक आहे. ज्या सगळ्या कथांबद्दल तुम्हाला खूप वाईट वाटतंय त्यात श्रृंगार नव्हता (sorry, i am no one to judge. But that's my point of view)

शृंगाररस ठीके पण उत्तानरसाची मायबोलीवर गरज नाही. एखादी अशी कथा आली तर वेगळे पण पुन्हा त्याचेही पिक आले तर ते आम्हाला नकोय.>>>> हाच मुळ मुद्दा आहे

आता ईथे मुद्दा असा आहे की जसे प्रत्येक जण सेक्स करत असला तरी तो उघड्यावर करत नाही, समाजाचे नैतिकतेचे नियम पाळले जातात .तसेच भले आपण सारेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आंबटशौकीन असलो तरी मायबोलीवर लिखाण करताना काही नियम पाळले जाणे गरजेचे. तर ते नियम काय असावेत? एवढा साधा प्रश्न आहे... >>> धन्यवाद ऋन्मेऽऽष... मला वाटलं होतं की मायबोलीचे वाचक हे ह्या विषयावर शांततेत चर्चा करतील. मला कोणाचाही "निषेध" नव्हता करायचा पण माझ्यासाठी मात्र "निषेध" नोंदवण्यात आला आहे

ज्यांना हा धागा आवडला नाही त्यांना माझा निषेध करण्याचा पूर्ण हक्क आहे. पण फक्त एकच प्रश्न की जर अश्लिल लीहणाऱ्या व्यक्तीला ते लीहण्याचा हक्क आहे तर ते वाईट म्हणानाऱ्याला तसं स्पष्ट सांगण्याचा हक्क नाही का??

म्हणजे मी कोणत्याही एका लेखकाला उद्देशून हा धागा तयार केला नव्हताच. पण कोणत्या तरी एका लेखकाला ते स्वतःवर ओढवून घ्यावंसं वाटलं. आणि बऱ्याच सुज्ञ "लेखक - वाचकांनी" माझा निषेध केला. काहींनी तर अगदी चिखलफेक केली. म्हणजे ज्यांना अतिशयोक्ती करून लिहायचं आहे त्यांनी ते लिहावं पण ज्यांना त्यावर objection त्यांनी मात्र स्वतःच मत मांडू नये???

सर्वात जास्त धन्यवाद queen यांचे... Actually I was trying to handle this MATURELY but the thing is I never make an issue. I was being SOCIALLY RESPONSIBLE. I could have responded to that specific story in its comment section, but if there was only one story. I never mentioned about any specific story in my write up. U guys made it to specific person. As I remember I mentioned that some people are posting something that shouldn't be posted on site like "maayboli". As anyone can read those things. I know very well that even kids this days handle internet quite well, but they are actually not supposed to read things which are categorized as "18+". Cause I don't know about you, but I won't allow any kid to read such things. I am not against sexual education, it should be given to everyone, but it should be given in soft way. As kids can be easily affected by such readings.

आणि माबो वर A+ असं काही नाही ना दिसत कथा उघडण्यापूर्वी. तसा option असता तर ज्यांना ते लिखाण वाचायचं नाही त्यांना पर्याय मिळाला असता.

वाईट म्हणण्याचा , आवडलं नाही म्हणण्याचा हक्क आहे
मायबोलीवर असं लिखाण नको असं म्हणायचा हक्क नाही.

चिखलफेक, हक्क , बरंच , आंबटशौकीन या शब्दांचे अर्थ समजून घ्या.

बरंच लिखाण आंबटशौकीन होत आहे, अश्लीलतेकडे झुकत आहे असं लिहिलंंत.
असं किती लिखाण आहे?

शृंगार आणि उत्तान या सापेक्ष गोष्टी आहेत. सुरेश भटांच्या अनेक कविता काहींना शृंगारिक तर काहींना अश्लील वाटतात.

फार तर तुम्ही लेखकाला शीर्षकात (प्रौढ कथा) असं नोंदवायला किंवा प्रशासकांना त्यासाठी वेगळा भाग उघडायला सांगू शकता‌.
लक्षात घ्या, अंतिम निर्णय वेबमासतरांचा असेल.

प्रशासकांना त्यासाठी वेगळा भाग उघडायला सांगू शकता‌.
>>>

विचार करतोय आंबटशौकीन असा एक वेगळा विभाग उघडला तर किती सभासद त्याचे सदस्यत्व घेतील Happy

प्रशासकांना त्यासाठी वेगळा भाग उघडायला सांगू शकता‌.
>>>

विचार करतोय आंबटशौकीन असा एक वेगळा विभाग उघडला तर किती सभासद त्याचे सदस्यत्व घेतील 

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 April, 2020 - 12:58

>>>
नवीन डू आयडींचे जन्म स्थान. Wink

विचार करतोय आंबटशौकीन असा एक वेगळा विभाग उघडला तर किती सभासद त्याचे सदस्यत्व घेतील >>>> मला असं वाटायला लागलं आहे की हे आधी मीच घेईल ; )

मायबोलीवर असं लिखाण नको असं म्हणायचा हक्क नाही.>>> तुम्हाला माझा निषेध करायचा हक्क आहे???

Dhanyawad jayashri/jayashree (choose the right one)
at last we r face to face.
tumchya shill-ashlil techya Kalpana farach veglya aahet tyamule pudhe charcha karnyala kahi arthch nahi raahat.
Aso.
tumchya vicharanche, matanche swagat aahe, (fakt te mandatana kuni char-chaughat dukhavl jau naye itakch vatat, didn't wanted to hurt you, was trying to free you & change your mindset ). jya kathani tumcha divas kharab zala & jyanni prerit houn tumhi ha dhaga lihilat, tya kathancha sandarbh yen sahjikch aahe.
Anyway as I said, there is nothing to discuss so let's just agree to disagree.
And about 18+ Movies, r u sure about the fact that, only people who are aged 18+ watch those movies?
I don't think so.
And about kids & sex education, I would like to suggest you to watch marathi movie "balak-palak".
I hope you know that we are talking about TODAY'S kids.
As there is nothing else to talk let's wind up, be happy, if possible try and take things lightly, keep writing & God bless you all.
keep smiling always.....
P. S. - I hv already suggested the writer to mention 18+ on his upcoming stories if required, so that it won't spoil anyone's day & mood again.

जयश्री, अज्ञातवासी, ऋन्मेष उर्फ कटप्पा उर्फ अर्चना उर्फ अभिषेक उर्फ भन्नाट भास्कर उर्फ वर्चुअल शिझोफ्रेनियामुळे ज्या कोणत्या रूपात आता असाल ते, मुद्दा अजूनही लक्षात आलेला दिसत नाही. त्या तीन कथा वाचल्या, आक्षेपार्ह नक्कीच नव्हत्या, मला आवडल्या न आवडल्या हा देखील इथे मुद्दा नाही. मी त्या कथांवर देखील प्रतिसाद दिलेला नाही, त्या बाबतीत मी बराच कंजूस आहे, पण ह्या धाग्यावर मात्र चौथा किंवा पाचवा प्रतिसाद देतोय त्याला कारण हेच कि मायबोलीवर काय लिहावे अगर लिहू नये हे सांगण्याचा हक्क इथं कुणालाही नाही. त्यातल्या त्यात तुम्ही लोकांनी मत नव्हे तर निर्णय देण्याचा, "इथे लिहू नका" असं सांगण्याचा जो मालकी अभिनिवेश दाखवला त्याला माझा आक्षेप आणि निषेध आहे. एखाद्या धाग्यावर, प्रतिसादावर तुमचा आक्षेप असेल तर तसे तुम्ही संपादक मंडळाला कळवू शकता. ते योग्य तो निर्णय घेतील. @ऋन्मेष, हो हैदोस कथाही इथे लिहिता येऊ शकते, तुम्हीच तुमच्या एखाद्या वेगळ्या रूपाने लिहून बघा. त्यावर आक्षेप असेल तर संपादक मंडळ ती कथा उडवेल, किंवा ठेवेल देखील.
हजार धागे लिहिणारा लेखक असो, अथवा वाचनमात्र असणारा दुर्लक्षित आयडी असो; इथे कुणीच कुणावर कोणतेही बंधन लादु शकत नाही. आपले उपद्रवमूल्य फार मोठे आहे, आपल्यामागे मोठा कंपू आहे म्हणून मायबोलीचे मालक असल्यागत वागणे अयोग्य आहे. असो. (आजवर कधीच न वापरलेले वाक्य इथे वापरतो) हा माझा शेवटचा प्रतिसाद!

हा माझा शेवटचा प्रतिसाद!
नवीन Submitted by अजिंक्यराव पाटील on 10 April, 2020 - 11:48
>>>>>>

शेवटचा का? एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मायबोली का सोडायची?

आता तुमच्याच प्रतिसादात तुम्ही माझे फेक ओळखता हे दखवायच्या नादात काही अश्या आयडींचे नावही घेतले जे फेक नाहीयेत. किंबहुना त्यातील एखादा आयडी मुळातच कोणाचाच डु आयडी नसेल ओरिजिनल असेल.. ज्याचे नाव तुम्ही माझ्याशी जोडत त्याचा अपमान करत आहात..

हा अधिकार तुम्हाला कोणी दिला Happy

@ धागा मी कुठे कोणाला लिहू नका बोललो. फक्त चौकशी करतोय. मला तुम्हाला आपल्याला कोणालाच हक्क नाही की मायबोलीवर कोणी काय लिहावे आणि काय नाही हे ठरवण्याचा..
त्याचवेळी कोणी किती आयडी काढावे हे ठरवण्याचाही अधिकार नाही.. तरी तुम्हाला त्यावर चर्चा टिप्पणी करावीशी वाटतेच ना .. तसेच आहे हे.. करू द्या की लोकांना चर्चा. काय वाईट आहे चर्चा करण्यात?

मायबोली आंबट शौकिन वाटावे असे काही गेल्या काही दिवसात लिहिले गेले आहे असे मलातरी वाटत नाही. काही कथा १८ + गटात मोडणार्‍या आहेत पण मुद्दाम अश्लील लिहायचेच असे ठरवून मग ओढून ताणून कथा असे काही त्यात नाही. कथांचे विषय बघता त्यात काहींना बोल्ड वाटावे असे काही ओघाने आले आहे.
'मुलांनी या कथा वाचल्या तर ' वगैरे आक्षेप आहे तर जालावरच्या मुलांच्या वावराकडे लक्ष देण्याचे काम त्यांच्या पालकांचे आहे असे मला वाटते. 'मायबोली' हे संस्थळ आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे आहे आणि त्याचा दर्जा चांगला रहावा असे वाटणे मी समजू शकते. मात्र आक्षेप घेतलेल्या कथांमुळे संस्थळाचा दर्जा घसरलाय वगैरे काही झालेय का? तर याचे उत्तर 'नाही'.
मायबोलीचा वाचक वर्ग प्रगल्भ आहे. या संस्थळावर वेगवेगळ्या १८+ विषयावर उत्तम चर्चा होतात, मात्र सवंग, गल्लाभरु असे काही मायबोलीवर आले तर ते वाचक नाकारतात. एखाद्या सदस्याला इथल्या लेखनाबद्दल आक्षेप असेल तर संबंधीत धाग्यावर तसे लिहावे आणि अ‍ॅडमिन यांच्याशी संपर्क करावा. मायबोली हे खाजगी संस्थळ आहे. लेखन मायबोलीच्या धोरणात बसत नसेल तर अ‍ॅडमिन ते अप्रकाशित करतील. सदस्याने वेगळा धागा काढून लेखन आंबटशौकिन ठरवणे, मायबोलीवर अमुकच प्रकारचे लेखन असावे असा आग्रह धरणे , मला पटले नाही.

मी कटप्पा यांचा ड्यू आयडी असतो तर दारूचा धागा उघडला नसता क्यून्की सारा मायबोली जानता हैं - ऋन्मेष दारू को छुता तक नहीं Happy

मी कटप्पा यांचा ड्यू आयडी असतो तर दारूचा धागा उघडला नसता क्यून्की सारा मायबोली जानता हैं - ऋन्मेष दारू को छुता तक नहीं Happy

नवीन Submitted by कटप्पा on 10 April, 2020 - 20:11

समजले नाही
कटप्पाच कटप्पाचा ड्यू कसे असणार जर इकडे मी असा उल्लेख खुद्द कटप्पा करतायेत तर !!

<<ऋन्मेष उर्फ कटप्पा उर्फ अर्चना उर्फ अभिषेक उर्फ भन्नाट भास्कर उर्फ वर्चुअल शिझोफ्रेनियामुळे ज्या कोणत्या रूपात आता असाल ते,>> अभिषेकराव, तुमची स्तुती एवढीच आहे. अज्ञातवासी आणि जयश्री वेगळे आहेत. कृ.गै.न.

कटप्पा delete करायचं राहिलं खरं..

मी कटप्पा यांचा ड्यू आयडी असतो तर दारूचा धागा उघडला नसता क्यून्की सारा मायबोली जानता हैं - ऋन्मेष दारू को छुता तक नहीं Happy

नवीन Submitted by कटप्पा on 10 April, 2020 - 20:11

समजले नाही
कटप्पाच कटप्पाचा ड्यू कसे असणार जर इकडे मी असा उल्लेख खुद्द कटप्पा करतायेत तर !!

Submitted by अज्ञानी on 10 April, 2020 - 20:16

आता इथे इग्नोरास्त्र आणी भूमिगत अस्त्राचा वापर होणार, ही माझी भविष्यवाणी.

गंमत केली ऋन्मेष ची. गैरसमज आणखी वाढावा म्हणून .
नवीन Submitted by कटप्पा on 10 April, 2020 - 20:39
>>>>

पण तुम्ही माझे डु आयडी खरेच आहात.
माझा आक्षेप अर्चना सरकार यांच्यावर होता. मी कधी म्हटलेय त्या मी आहेत किंवा त्यांनी कधी असे म्हटलेय का?

आता इथे इग्नोरास्त्र आणी भूमिगत अस्त्राचा वापर होणार, ही माझी भविष्यवाणी.
>>>>

का बरं?
कटप्पा आणि मी एकच असा कोणाचा समज / गैरसमज / अगैरसमज होत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही.

उलट एका आयडीने दारूला विरोध करतानाच दुसरया आयडीने दारू कशी प्यावी असा धागा काढून त्यावर शतकी प्रतिसाद खेचणारी व्यक्ती एकच असेल तर शास्त्रांमध्ये तिलाच तर बाजीगर म्हटले आहे.

Pages