कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपण , तुम्ही आम्ही काय करू शकतो

Submitted by विक्रमसिंह on 29 March, 2020 - 03:54

आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात पारंपारीक युद्ध कधी वेशीवर आले नव्हते. आता हे जैवीक तर उंबरठ्यावर आले आहे. एकत्रपणे लढूया.

आताच एक राष्ट्रीय स्तरावरची वेबीनार ऐकली. सरकारच्या सर्व संस्था, संरक्षण यंत्रणा अगदी युद्धपातळीवर सर्व्शक्तिनिशी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उतरली आहेत याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपण सरकारच्या सर्व आदेशाचे तंतोतंत पालन करून आपले कर्तव्य बजावून आपण आजारी पडून आणखी एक भार बनत नाही ना हे पाहिले पाहिजे..

पंतप्रधान निधीला मदत तर करू शकतोच. ती सर्वांनी करावी. अगदी फूल ना फुलाची पाकळी. खारीचा वाटा का होईना.

पण या पलिकडे जाउन आपण सर्व या परिस्थितीत काय करू शकतो हे बघणे जरूर आहे. यासाठी मायबोलीकरांना काही उपक्रम, प्रकल्प्, कार्यक्रम माहित असल्यास ते आपणा सर्वांना माहित व्हावे व काहितरी करता यावे यासाठी हा धागा.
आपणा सर्वांना विनंती. आपल्याला वेगवेगळ्या गावातील आपल्या भागातील सामाजीक संस्था काही उपक्रमांची माहिती असेल व त्यांना मदत लागणार असेल तर इथे लिहावे. म्हणजे तेथील मायबोलीकर मदत करू शकतील.

कृपया आपल्या कडील माहिती वा कल्पना आवर्जून येथे लिहावी ही नम्र विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैशाने तर मदत करणारच आहोत पण आता ह्या घडीला प्रत्यक्ष मदत करता आली तर करायची आहे. काल बर्याच ठिकाणी संपर्क करायचा प्रयत्न केला पण अजून कुठून उत्तर आलं नाही. घरबसल्या कणिक आणून दिली तर पोळ्या नक्कीच करून देऊ शकते.

मुख्यमंत्री निधी ला काल मदत केली.
आपण जवळपास च्या सिक्युरिटी वाल्याना खाणं पिणं आहे का, नसल्यास व्यवस्था करू शकतो.आमच्या सोसायटीत सिक्युरिटी गेट जवळ राहणारे कुटुंब सिक्युरिटी टीम ला चहा नाश्ता पुरवते.
सध्या तरी आपापल्या जवळच्या एरिया ची आपण मदत करू शकतो.स्वतःला सुरक्षित ठेवून.

प्रबोधन करून. घराजवळील काही जण परवापर्यंत मशिदीत नमाजसाठी जात होते. त्याना त्यातील धोका समजून सांगितला. बराच फरक पडलाय.

१. पंप्र निधीला मदत (फुल न फुलाची पाकळी.. आपापल्या कुवतीप्रमाणे)

२. आजूबाजूला कोणी वृद्ध रहात असतील तर त्यांना हवं नको ते विचारणे. आणि पॅनिक होत असतील तर त्यांना जमेल तसा धीर देणे. (आपणही कधी ना कधी म्हातारे होणार आहोत हे लक्षात ठेवा)

३. आपल्या डोमेस्टिक हेल्पर्सचा पगार न कापणे (यात खरं तर बाई टिकवणे हा स्वार्थही आहेच).

४. आजूबाजूला कोणी हातावर शिक्का असलेले मोकळे /
गर्दीत फिरतेय असे जाणवले तर पोलिसांना कळवणे. (यासाठी मुद्दाम बाहेर पडायची गरज नाही. भाजी वगैरे घेण्यासाठी बाहेर पडलो आणि लक्षात आले तरच).

५. आयुष्यात यापुढे कधीच खायला मिळणार नाही अश्या आविर्भावात भाज्या, फळे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या साठा करत न सुटणे. (यात सॅनिटायझर सुद्धा आले).

६. घरात राहणे. बाहेर पडायचे कितीही खाज आली तरी तिला जीवापेक्षा जास्त समजू नये.

७. सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक न्यूज ना पसरवणे ना पसरू देणे. शक्य असतील तिथे ही बातमी खोटी आहे हे सांगणे.

८. पोलिसांना शक्य तितके सहकार्य करणे. सहज शक्य असेल तर त्यांना चहा / पाणी / सरबत विचारणे. कोणी महिला कॉन्स्टेबल असेल तर त्यांना गरज पडल्यास सॅनिटरी नॅपकिन्स किंवा प्रसाधगृह उपलब्ध करून देणे.

९. शक्य तिथे प्रबोधन करणे.

१०. घरी सलोखा ठेवणे. पॅनिक, भीती, अडकल्याची भावना, घरात राहण्याची सवय नसणे, मुलांचे tantrums, सासू सासऱ्यांची कटकट (सरसकट नाही. काही ठिकाणी ज्येना कटकटे असू शकतात नी पूर्णवेळ घरात असल्याने अजूनच ठिणग्या पडू शकतात) अश्या गोष्टींमुळे डोक्याचा भुगा होणे स्वाभाविक आहे. पण शक्य तितके डोके शांत ठेवून सगळ्यांशी त्यांच्या कलाने घेत जुळवून घेऊ शकला नाहीत तर मग तुमचा quarantine फार अवघड जाईल. (निदान कोरोना संपेपर्यंत तरी) आपल्याला यांच्याशिवाय पर्यायच नाहीये हे आधी स्वीकारा. आणि घरात आपला प्रेझेंस इतरांसाठी सुखद नसला तरी इरिटेटिंग होणार नाही याची काळजी घ्या.

सध्या तरी एवढेच आठवतेय.

सध्याच्या घडीला, घरात बसणे हीच खरी देशसेवा ठरेल. आणि दूसरे आर्थिक मदत करणार असाल तर CM ऐवजी PM Corona virus relief funds साठी करा. नाहीतर तुम्ही दिलेले पैसे आमदारांना गाड्या व त्यात पेट्रोल भरण्यासाठी जाण्याची शक्यता अधिक आहे.

सध्याच्या घडीला, घरात बसणे हीच खरी देशसेवा ठरेल. आणि दूसरे आर्थिक मदत करणार असाल तर CM ऐवजी PM Corona virus relief funds साठी करा. नाहीतर तुम्ही दिलेले पैसे आमदारांना गाड्या व त्यात पेट्रोल भरण्यासाठी जाण्याची शक्यता अधिक आहे.>> काय अब्यास आहे.

पियू, पोस्ट आवडली.

>>दूसरे आर्थिक मदत करणार असाल तर CM ऐवजी PM Corona virus relief funds साठी करा. नाहीतर तुम्ही दिलेले पैसे आमदारांना गाड्या व त्यात पेट्रोल भरण्यासाठी जाण्याची शक्यता अधिक आहे.>>
शक्यता आहे हे भोंगळ विधान झाले. असे का म्हणत आहात? सीएम फंड आणि पीएम फंड याच्या वापराचे नियम, मार्गदर्शक तत्वे वेगवेगळे आहेत का? पूर्वी आलेल्या आपत्तीत नीधीचा वापर कसा केला गेला याचा तौलनिक अभ्यास करुन हे म्हणणे मांडत असाल तर इथे त्याबद्दल सविस्तर पोस्ट द्यावी म्हणजे मदत करताना त्यानुसार योग्य निर्णय घेता येइल.

आमच्या माझगावच्या बिल्डींगमधील माझे मित्र तिथे रोज रस्त्यावरच्यांना फूड पॅकेटस वाटत आहेत. खिचडी, पुलाव, छोलेपुरी, भाजी चपाती वगैरे. तब्बल १५० लोकांचे जेवण बनवून वाटतात. लॉकडाऊनचा पुर्ण काळ हे करणार आहेत.. यात आर्थिक मदत प्लस श्रमदान दोन्ही करत आहेत.

आमच्या माझगावच्या बिल्डींगमधील माझे मित्र तिथे रोज रस्त्यावरच्यांना फूड पॅकेटस वाटत आहेत. खिचडी, पुलाव, छोलेपुरी, भाजी चपाती वगैरे. तब्बल १५० लोकांचे जेवण बनवून वाटतात. लॉकडाऊनचा पुर्ण काळ हे करणार आहेत.. यात आर्थिक मदत प्लस श्रमदान दोन्ही करत आहेत.>>

छान उपक्रम . सध्या मायग्रंट लेबर ची भुक ही मोठी समस्या आहे. सरकारी लाल फिती आणि लॉकडाऊन मुळे ह्या लोकाना अन्न मिळणे अवघड आहे.

चांगले मुद्दे पियू.
अजून काही घरबसल्या करू शकले तर करायचं आहे.(ऑफिस चं काम सांभाळून.)

मुख्यमंत्री मदत निधी ला डोनेशन आता गुगल पे वरूनही करता येईल

तसेच इच्छा असल्यास डोनेटकार्ट ला डोनेशन करा.रोजंदारीवर जगणाऱ्याना काही बेसिक वस्तूंचे किट देणार आहेत.मी डोनेट केलं तेव्हा 54 वर आलं होतं.आता 56% वर आलं आहे.आपले योगदान देऊन हे 100% वर आणायला मदत करा.
https://www.donatekart.com/DWLH/Help-Labourer/

अमेझॉन फ्लिपकार्ट आपल्या असोसिएटेड डिलिव्हरी बॉईज ना पैसे देत नाहीये असं ऐकलं.त्यांना 13 रुपये पर डिलिव्हरी मिळतात.
आपण चेंज.ऑर्ग वर पिटीशन देऊन सरकार ला या कंपन्यांना या डिलिव्हरी बॉईज ना भरपाई द्यायला लावू शकतो का? ते अमेझॉन फ्लिपकार्ट च्या डायरेक्ट पेरोल वर नाहीत.पण त्यांच्यावर भारतातलं खूप मोठं डिलिव्हरी नेटवर्क अवलंबून आहे.
तसंच स्विगी, सुपरडेली, दंझो या ऍप च्या डिलिव्हरी बॉईज ना सध्या जगण्या पुरता मोबदला मिळतो आहे का हे कोणी तपासू शकेल का?
तसेच सरकार मधले कोणी इथे आहे का जे याबाबत मदत करू शकेल?