लॉक डाऊन मध्ये जनतेकरिता पुनःप्रसारित करण्यात येणाऱ्या जुन्या गाजलेल्या मालिका - रामायण व महाभारत व चाणक्य

Submitted by प्राचीन on 28 March, 2020 - 01:10

आज सकाळी रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण मालिका डी डी नॅशनल वर पाहिली. तशी ती नेटवर उपलब्ध आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावर लोकांना बघायला मिळेल व टीव्हीवर अधिक चांगलं वाटतं बघताना. सुखद गोष्ट म्हणजे जाहिराती नव्हत्या. शिवाय पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत असे, तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे दूरचित्रवाणी संच नसल्याने त्यांच्यापैकी काहीजण आमच्याकडे येत मालिका बघायला. दर रविवारी सकाळी प्रसारण होई. आमच्याकडे रंगीत संच नसल्याने माझ्या मनात अजूनही कृष्णधवल रामायणाचीच स्मृती आहे. आता कदाचित बदल होईल त्यामधे.
यानिमित्ताने आणखी एक गंमतशीर आठवण झाली. माझ्या मामेभावाची मुंज नेमकी रविवारी होती. तेव्हा रामायण मालिका आमच्या नातलगांमध्ये एवढी आवडती होती, की माझ्या वडिलांनी मंगल कार्यालयात एका बाजूला घरातील दूरचित्रवाणी संच आणून ठेवला होता...
महाभारत मालिकादेखील प्रसारित होत आहे. जशी जुन्या
रामायणाचीच गोडी नंतरच्या काळात प्रसारित झालेल्या रामकथांहून अधिक वाटते, तशीच चोप्रांच्या महाभारताचीही कथा.. त्यामुळे, नेहमीच्या वेगवान जीवनमानाला सध्या जरा संथ असा जो घाट मिळू पाहत होता, त्यामध्ये वेळेची थोडी का होईना, तोशीस (urge ला शब्द सापडला नाही) निर्माण झाली आहे. आणि तत्कालीन व्यक्तिचित्रणामधील सहजता बघताना अजून गंमत वाटते आहे.
चाणक्य मालिका शाळकरी वयात तितकी समजली नव्हती, अर्थातच तेव्हा तेवढे आणि तत्संबंधी वाचनही झाले नव्हते. आता कदाचित जरा जाणून घेता येईल , असे वाटते.
चॅनल व वेळ -
रामायण : सकाळी ९.०० व रात्री ९.१५ - DD NATIONAL महाभारत : दुपारी १२.०० व रात्री ७.०० - DD BHARATI
चाणक्य :रात्री १०.०० - DD NATIONAL

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग मी स्वतःचा फोटो काढत असल्याचे आरशात दिसेल. मी मालिका पाहात असल्याचे दिसणार नाही ना

रामानंद सागर यांची मालिका पहावत नाही. महाभारत सुरवातीला जरा ठीक वाटली होती त्यावेळी.
दर्जेदार मालिका यायला हव्यात रामायण महाभारतावर.

सर्कस - शाहरूख खान
यालाही घ्या शीर्षकात
तेवढ्यासाठी मला वेगळा धागा काढायला नको

आजच्या भागात विद्यार्थीदशेत जे नियम पाळण्याचा उल्लेख केला होता तसं खरंच प्राचीन काळी पाळलं जात असे. आणि आज आमच्या मुलांना आम्ही किती शारीरिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी झटतो, फक्त अभ्यास करावा एवढीच अपेक्षा बाळगतो वगैरे काळानुसार झालेले टोकाचे बदल लक्षात आले. वसिष्ठ जो उपदेश करतात तो मला तरी आवडला. विशेषतः बाह्य प्रलोभने किमान विद्यार्थ्यांना तरी नुकसानकारक आहेत हे पटलं

अरेच्चा.. ऋन्मेषजी, शाहरुख च्या सर्कस वरही बोलता येईल हा विचारच केला नाही. आता राहूच दे. Wink
>>>>

तो बघा आला शाहरूख धाग्यात.

अवांतर - सर्कस यूट्यूबवर आहे
या निमित्ताने मी बरेच लोकांना लिंक शेअर केली.
सर्वांनी माझे लाख लाख आभार मानले.

रामायणातील संवाद आणि मूल्ये खूप छान आहेत...आजचा एपिसोड मस्त होता .घरातले सगळे रडलो आम्ही....वनवासाला निघालेत राम लक्ष्मण सीता.. कैकेई च काम केलेली नटी कोण आहे...पाहिलंय तीला पिक्चर मधे पूर्वी...

मुले ही खूप इंटरेस्ट घेऊन बघतात...शक्तिमान तर लहान असतानाची खूप आवडती सिरीयल होती...

कैकैयी ती 'सजना है मुझे सजना के लिये' सौदागरमधली, ती नटी आहेर ना? मला रामायण अंधुक आठवतय.
____
हां पद्मा खन्ना बरोबर तीच आहे कैकयि. चेक केले.

मी सह्याद्री पाहतेय. मुंबई दूरदर्शनवरचे खूप जुने कार्यक्रम दाखवताहेत. आता वृद्ध झालेले कलाकार अगदी तरुण असताना पाहून गम्मत वाटतेय.

Pages