निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

Submitted by तैमूर on 24 March, 2020 - 23:08

संत एकनाथ एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक विकृत माणूस त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. विकृत परत थुंकला, नाथांनी परत बुडी मारली. अस १०८ वेळा घडलं. नाथांनी ना त्याला शिव्या दिल्या, ना शाप दिले, न काही बोलले.

शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?
असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिली:

१. नाथ किती महान होते ते कळत.
२. नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते.
३. माणसाने कसे वागावं ते ही गोष्ट शिकवते.
४. एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
५. रागावून त्रास तुम्हालाच होतो.
६. शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वराचे.
७. दुसर्याला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे.

अशी एकसो एक उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले, तू काही उत्तर देत नाही, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला,

नाथांची ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं ते असं….

“की समाज तेव्हाही निद्रिस्त होता आणि आज ही आहे"
शिक्षक म्हणाले, काय बोलतोस तू? नाथांना चूक ठरवतोस?
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण? नाथ जे काही वागले ते त्यांच्या संन्यस्त वृत्तीला साजेसच होत. या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…

तो विकृत माणूस जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी घाटावर हजर असणारा बाकीचा समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही. नाथ संत असले तरी तो समाज संत नव्हता. जर वेळीच चोप दिला असता तर तो विकृत नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता. नाथांनी जसं त्यांचं काम
केल तस समाजाने त्याचं काम करण योग्य होत, न की, नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवणे.
येत्या नविन वर्षात ‘विकृतांमुळे १०८ वेळा स्नानाचे पुण्य मिळवायचे की थुंकणाऱ्याचे थोबाड फोडायचे’ हा निर्णय प्रत्येकाला घेता यायची बुध्दी मिळो.

नव-वर्षाच्या खुप शुभेच्छा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘विकृतांमुळे १०८ वेळा स्नानाचे पुण्य मिळवायचे की थुंकणाऱ्याचे थोबाड फोडायचे’ >>> म्हणजे १०८ वेळा इग्नोर करायचे की ट्रोलगिरी करायची हे आपण ठरवायचे? असेच ना!

तैमूर तू आता कितीही लिहीलं तरी आता हद्द झाली आहे. लोक कंटाळलेत शीवीगाळीला. तू आतापर्यंत जे केलं ते माफ करणार नाहीत कुणीही. डॅमेज कंट्रोल अशक्य आहे तूला.

Sad एकनाथांनी अंतर्दॄष्टीने हे जाणले असणार की त्या माणसात सुधारणेचे पोटेन्शिअल आहे. ज्या आय डींमध्ये सुधारणेचेच पोटेन्शिअल नसते, त्यांच्याशी कोण वाद घालणार Sad
जोवर आय पी अ‍ॅड्रेस ब्लॉक होण्याचे कोडिंग होत नाही तोवर 'दुर्लक्ष' हाच उत्तम उपाय आहे.

शक्तिवान, शक्तिराम तुम्ही सच्चे व्यक्ति आहात. पण केवळ असंसदीय भाषा वापरल्याने तुम्हाला वेळोवेळी इकडून हाकलून दिले होते. पण तुम्ही चिवटपणे परत परत येत राहिले. ऑफलाईन शिव्या द्यायच्या ते तुम्ही ऑनलाईन देत होते. पण खरं सांगते तुमचा आम्हाला खूप आधार वाटत होता. तुमच्या झंझावाती वादळानं इथले अनेक ट्रोल बिळात लपून बसले. अज्ञात ठिकाणी जाऊन कंपूतील एकेक जनानं अज्ञातवास स्विकारला. तबरेज अन्सारीचा फोटो डिपीवर लावणारे बरेच दिवस तोंड काळं करून गायब झाले. जमीनीपासून वीस अंगुळे वर ज्यांचा रथ चालत होता असे शाली न आयडी पराभूत होऊन मैदानातून पळून गेले. आपटे बिपटे हवेत उडून कुणीकडे आपटले हे त्यांना कळलं नाही. तुम्हाला विकृती म्हणून हिनवनारे तुम्हाला इकडं पाहिलं की शेपूट घालून पळ काढत होते. राव पाटलाला हागवन लागली. कूणी तीन दिवस आजारी पडले. माझ्या सारख्या आयडींची तुम्ही पाठराखण केली. तुम्हाला अनेक विषयांवर लिहिता येते. तुमच्या धाग्यावर लोक प्रतिसाद देत आहेत हे तसल्या आयडींना सहन होत नव्हतं. बिचारे पोटात मुरडा देऊ देऊ कण्हत असत. तुमच्या मुळे इथली धर्मजात कार्ड खेळनारांला वचक बसला होता. आता लगेच धुळवड करायला बाहेर पडले आहेत. तूम्ही परत या पन रागावर नियंत्रण ठेवा.

काही कारणाने का होईना हा नाठाळ आयडी वठणीवर आला आहे.
त्याने जर पुन्हा ताळ सोडला तर हवेच आहे आणि संयम ठेवला तर ते उत्तमच आहे. Lol
बाकी स्वत:च्या प्रेमात पडून स्वत:चेच कितीही पोवाडे गायले तरी त्याला कुणाचा विरोध असायचे काही कारण नाही. Proud

बाकी तैमूर मध्ये खरी ओळख देण्याची हिम्मत नाही म्हणून हेच महाराज शक्तिराम असणार. काय शक्तिराम यावेळी खरं रूप द्यायला घाबरता वाटतं. भिऊ नका मी आहे तूमच्या पाठीशी तैमूर उर्फ शक्तिराम.

तैमूर तुम्ही जर ते नसाल तर मला क्षमा करा. त्यांच्या मुळं तुमच्या बुडाला आग लागली असेल तर खरे साहेब औषध सुचवा. नैतर दूसरे बरीच डॉक्टर मंडळी इकडे आहेत. तात्पुरता बरनॉल मलम लावून घरात बसा. बाहेर पडलासा तर पोलिस दुखणं वाढविणार हो.

पण एकूण या गुढी पाडव्यापासून उटपटांग प्रतिसादांपासून मायबोली लेख मुक्त होणार असं दिसतं आहे.
ओफिसातली रिकामटेकडे आइडीच हे उद्योग करत असावेत. आता सर्वजण घरी बसल्याने ते घरून वेळ वाया घालवणार नाहीत.

Srd दादा असं नाहीये. ते भरत परत आलेत. काहींनी त्यांचं स्वागत केले आहे. आता परत धुळवडीचा बेत आखला आहे त्यांनी. सूज्ञ लोकांनी इग्नोरास्र वापरावे ही इच्च्या आहे.

तप कुटलं हो करतात हे. तिकडं मोदींविरोधात बोलू बोलून बिर्याणी हादडून तय्यार झाले असतील नवीन इनिंग इथे सुरू करायला.