रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिराम, दत्ताचा मुलगा आणि माधवाच्या मुलामधे वयाचं फार काही अंतर नसावं असं पहिल्या सेझनमधे वाटत होतं.

अभिराम नाही आणि नाना पण नाहीत. आहेत ना ते की गेले बिले ?>> आहेत आहेत. ते त्यांच्या खोलीत झोपलेले असतात त्यामुळे त्यांना दाखवत नाहीत. अभिरामाच्या लग्नात आण्णाचं मरण आधी नानांनाच कळतं त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. काळजी नसावी Proud

& tv वर 'रात का है खेल सारा' बघतेय त्यात या राखेचा २ चा आणि १ चा काहीच मेळ नाहीये।
१) सुषमा हि शेवंताची मुलगी आहे हे माधवला हि नव्यानेच कळताना दाखवले आहे - २ मध्ये सुशल्याला माधव चांगलाच ओळखतो, पत्रापत्री करतो, ती त्याला दादा बोलतेय.
२)घरातील सर्वांनाच सुषमा कोण हे माहित नाही - २ मध्ये अगदी सरिताही सुष्मावर दात खाऊन आहे.
३) माई अगदीच बुळी, कजाग, आणि दयामाया नसलेली वाटतेय - २ मध्ये माई हि जणू कर्णाची स्त्री अवतार च जणू.
४) नेने वकील मालमत्तेचे वाटप करतात तेव्हा तेही जणू काही सुषमा हि त्या नोकराची मुलगी आहे असेच वागत आहेत। - २ मध्ये नेने शेवंताकडून बिनसाखरेची चहा पितात आणि तिच्या विरुद्ध कट रचतात.
५) शेवंता गावातील एक स्त्री होती जिने अन्नाला नादाला लावले अशी काही स्टोरी माई विल वाचताना सांगते - २ मध्ये अक्खे गाव शेवंताला ओळखते आणि नाईक वाड्याच्या बाजूलाच तिचे नवीन घर दाखवले आहे।

@ अमा : असं काहीही होणार नाही. Bw

तेरवाचा भाग हा या मालिकेचा टर्निंग पॉईंट ठरला. पाटणकरीण आणि वच्छी यांनी हा भाग अक्षरश: खाऊन टाकला. दोन तलवारींचा खणाखणाट जसा असतो तसा तो पहायला मिळाला.

पाटणकरीण जेव्हा परवा रात्री नाईकांना सुषमाच्या वागणुकीचा जाब विचारायला जाते तेव्हा ती माई, दत्ता, सरिता, छाया या सर्वांना खुप बोलते. इतर वेळी वचावचा करणारी सरिता गपगुमान पाटणकरणीचं अद्वातद्वा बोलणं ऐकुन कशी घेते याचं खरंतर नवल वाटलं Uhoh . सर्वांना पाटणकरणीचा राग आलेला असतो पण कुणी काहीच बोलत नाही. माधव पण "हो..हो.." करत बसतो. शेवटी आण्णाला उद्देशुन पाटणकरीण सुषमाला त्याच्या संपत्तीत दत्ता, माधव, छाया इतकाच वाटा हवाय असं म्हणते (अभिराम ला कशी विसरते काय माहीत Proud ) तेव्हा आण्णा तिची हवाच काढतो. आण्णा म्हणतो की असं किती जणांना तो वाटा देत बसणार. हे ऐकुन पाटणकरणीला जबर झटका बसतो. दत्ता, सरिता, छाया सुटकेचा नि:श्वास टाकतात आणि माई 'हिची आता कशी जिरली' या सुखात मागे फिरते. सर्वजण घरात जातात आणि माई दरवाजा बन्द करते. पाटणकरणीचा थिजुन बर्फ होतो.

नंतर पाटणकरीण संतापाच्या भरात वच्छीचं घर गाठते तेव्हा वच्छी तांदुळ निसत बसलेली असते (रात्री कोण तांतुळ निवडेल का..? :आओ: ). पाटणकरीण बाहेरुन हाक मारते आणि वच्छी "कोण हा..?" म्हणुन विचारते. पाटणकरीण तिला बहेर बोलवते आणि सुषमाची ती अशी का वागली म्हणुन वच्छीला जाब विचारते. मग अंगणात दोघिंचे वाग्युद्ध सुरु होते. शब्दांचा नुसता खणखणाट ऐकु येत रहातो. बाहेरचं पब्लिक गोळा होतं आणि सर्वांसमोर तमाशा होऊन खजील झालेली पाटणकरीण माघारी फिरते. जाताना तिला अंधारात लोक तिच्याबद्दल वाईट साईट बोललेले ऐकु येतात तशी ती पुन्हा मागे फिरुन वच्छीच्या घरी पोचते आणि धाडकन दार उघडुन वच्छी+आबाला सांगते की काशी अन शोभाचा खून आण्णाने केलाय. ते ऐकुन आबा+वच्छीच्या पायाखालची जमीन हादरते.पाटणकरीण जेव्हा पुन्हा घरी पोचते तेव्हा तिने काय चुक केली हे तिच्या लक्षात येतं पण आता उशीर झालेला असतो.

परवाच्या भागात आबाला रात्री काशी घरात आल्याचा भास होतो आणि त्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्या असं सांगतो. आबा वच्छीला घेऊन पोलिस स्तेशन मधे जातो अणि इन्स्पेक्टरला सांगतो की काशी+शोभाचा खून आण्णाने केलाय. पण वच्छी सांगते की शोभा जिवंत आहे. इथे येऊन बसली आहे. मग कोणताही पुरावा नाही अन वच्छीच्या डोक्यावर परिणाअम आहे असं सांगत इन्स्पेक्टर त्यांना घरी पाठवतो. घरी येता येता वच्छी रस्त्यात खाली कोसळते अन आबा तिला जागे करायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात चोंट्या तिथं पोचतो अन वच्छीला उठवुन ते तिघं मांगरात येतात. वच्छी बोलते की आण्णाने असं का केलं शोभा अन काशीचा खून करुन त्याला काय मिळालं वगैरे वगैरे. ते ऐकुन चोंट्या चांगलाच चपापतो अन हे या दोघांना कुणी सांगितलं ते विचारतो तेव्हा आबा पाटणकरणीचं नाव सांगतो.

चोंट्या जेव्हा पाटणकरणीच्या घरी पोचतो तेव्हा ती त्याला ती कशी बरोबर आहे हे सांगत सुटते. आण्णाचा बदला घेणाअर असं बोलते तेव्हा चोंट्या तिच्या एक एक चुका तिला दाखवुन देतो आणि शोभाच्या खुनात तिच्यासहित स्वतः तोही कसा सामिल होता हे ऐकवतो. ते ऐकुन पाटणकरणीला आपण काय चूक करुन बसलो याचा साक्षातकार होतो.

प्रेकॅप मधे काय होतं हे मी विसरलो. कुणाला माहित असेल तर सांगा Bw

बाकी कोरोनामुळे सर्व मालिकांचे शुटींग ३१ तारखेपर्यंत बंद रहाणार आहे तोपर्यंत चित्रित झालेले भाग बघायला मिळतील अशी आशा आहे. (तसेही आकेरीत कोरोना पोहोचण्याची शक्यता कमीच आहे म्हणा.. फक्त टीम मधलं कोणी मुंबई-पुणे वारी करु नये म्हणजे मिळवली..!)

कालच्या एपीत मांगरातले घर आण्णाने जाळले, आबा आणि वच्छी बेघर झाले. वच्छीला मानसिक धक्का बसल्याने तिला चक्कर आली आणि आबा 'ए भाय कोई पाणी देदो..... कोई रोटी देदो.....' करत होते.

हो.. फार वाईट झालं आबा अन वच्छीचं. Uhoh

आबाने वाड्यात येऊन शाप दिला की या वाड्याचं कधी भलं होणार नाही आणि त्याच वेळी त्याचं मांगर पेटलं. शापाने चिडलेली माई आबा अन वच्छीला निक्षुन सांगते की पुन्हा वाड्यात पाऊल ठेवायचे नाही तरी मांगर पेटलेली बातमी ऐकताच आबा वच्छीच्या काळजीने दत्ता अन माधवला घेऊन ती मांगराकडे पळत जाते. माईची ही पोटतिडीक काळजाला भिडते.

आता पाटणकरणीला आबा लग्नास नकार देतो.. तेव्हा पाटणकरीण आण्णाला त्याची सारी बिंगं पोर्णिमेच्या आत फोडुन टाकेन अशी धमकी देते. आता आज काय होतं ते बघणं औत्सुक्याचं ठरेल.. बादवे पौर्णिमा कधी आहे बरे..?? ह्या कोरोनामुळे काहीच लक्षात रहात नाही हल्ली Uhoh

>>तेव्हा पाटणकरीण आण्णाला त्याची सारी बिंगं पोर्णिमेच्या आत फोडुन टाकेन अशी धमकी देते<< होय, पाहिला एपि. झी५ वर, मला तर वाटतयं म्हणुनच अण्णुकल्यानेच पाटणकरिस लटकवले असेल झाडावर, आणि आत्महत्येचा बनाव उभा केला असेल. लयं आतल्या गाठीचं हाये त्ये बेणं

याचा अर्थ सीरियल अन्तिम टप्प्यात आहे असा मानावा का? तसे असेल तर दिग्दर्शकाचे बेफाट कौतुक .
कारण कथेचा फ्लो खूप छान ठेवलाय ! शेवट गुन्डाळण्याचा प्रकार अज्जिबात नाहीये!

याचा अर्थ सीरियल अन्तिम टप्प्यात आहे असा मानावा का? तसे असेल तर दिग्दर्शकाचे बेफाट कौतुक .>>> शक्य नाही कारण झी वर शिरेल संपायच्या दोन दोन महिने आधीपासून त्या जागी येणाऱ्या नविन सिरीयलची जाहिरात सुरू होते आणि सध्या तरी कोणत्या नविन सिरियलची जाहिरात पाहण्यात नाही.

काल आणी परवा अण्णुकल्याच्या पेकाटात दोन्ही लाथा घालाव्या असे मला प्रकर्षाने वाटले, Angry Ass Kicking

भुक्कड अण्णा आणी जाडी ढोली पाटणकरीण Firing Cat

आता पाटणकरणीला आबा लग्नास नकार देतो..>>> इथे अण्णा असं हवय का?

वाईट वाटल हा एपिसोड बघून ...सुषमा सापडली का शेवंता ला.... शेवंता बद्दल वाईट वाटत नेहमी...चुकलेली वाट.....

आबांची कालची दयनीय परिस्थिती बघून डोळे ओलावले। बिचारे, ते केळ्याच्या पानातील अन्न घेऊन जसे धावत होते ते बघून माणूस परिस्थितीपुढे कसा हतबल होतो आणि जगण्यासाठी किती धडपडतो ते पाहायला मिळाले।

२२ मार्च नन्तर लॉकडाऊन मुळे मालिकेचे शुटिंग मधेच कुठेतरी थांबले आणि त्यानंतर एप्रिल मधे झी युवा वर राखेचा सिझन १ सुरु झाला... तो मी पुन्हा पाहत आहे.

आता ह्या दुसर्‍या पर्वाचा निकाल केव्हा आणि कसा लागात ते त्या रवळनाथाक ठाऊक व्हयो.

नाही म्हणायला टाईमपास म्हणुन इन्स्टावर वच्छी अन माईशी थोडं बोलणं झालं पण काहिहि बोललं/विचारलं तर माई नुसती हसतच बसते Proud वच्छी मात्र छान बोलते.. कदाचित तिला प्रत्यक्ष भेटलो असल्याने थोडी आपुलकी असावी किंवा स्वभाव मिळुन-मिसळुन वागण्यातला असावा. बाकी शेवंता भारी भारी फोटॉ अपलोड करत असते.. कहितरी स्वयपाक करत असते नाहीतर गेला बाजार फेसबुक लाईव तरी असतोच असतो. पांडबाचं काहितरी ऑनलाईन कार्यक्रम सुरु असतात तर शोभा पण फोटॉ टाकत असते अधुन मधुन.. एकंदर सगळं बरं चालु आहे त्या सर्वांच. आण्णांची काही खबर नाही..

अण्णा सावन्तवाडीकच र्‍हवले असंत फुल्ल लॉकडाउन मधे ..... स्वतः जेवान बनवुन खल्ल्यानी !

मागे फेस्बुकावर पोस्ट टाकलानी व्हती अण्णानी

@ मंदार : अरे वा हो का... आण्णांचा लॉकडाऊन सर्वात भारी झाला म्हणायचा Bw
@ सुलु_८२ - वैनी, ती सेरियल मी नाही बघत. ती सिरियल पण राखेचा च्याच प्रॉड्युसरची - सुनिल वसंत भोसलेंची आहे. गेल्या ऑक्टोम्बरात आम्ही आकेरीला नाईक वाड्यात गेलेलो तेव्हा तिथल्या सेक्रेटरी कृष्णाने त्यावेळीच या नवीन सिरियल बद्दल सांगितलं होतं.. फक्त नाव काय ते माहित नव्हतं. या सिरियल च शुटिंग तेव्हा रत्नागिरि भागात सुरु होणार आहे असं त्याने सांगितलं होतं आम्हाला.

खरं तर तेच तेच चेहरे आणि त्यांचा ठराविकाच्यातला अभिनय बघण्याचा कंटाळा आला अगदी Uhoh

राखेचा१ आणि २ मधले कलाकार कोणीही या आधी पाहिलेले नव्हते (निदान झीम वर तरी..!)

@ स्वप्ना_राज : अहो आण्णा, माई अन शेवंता हे तिघे काल चला हवा येऊ द्या (नव्याने सुरु) मधे आलेले.. आजहि येणार आहेत.

काल पासुन झीम च्या सर्व सिरियल्स पुन्हा नव्याने सुरु झाल्या. राखेचा२ ची प्रचंड उत्सुकता असल्यामुळे मी ते बघितलं. ३ महिन्यानंतरचा राखेचा२ चा नवीन एपिसोड कसा असेल? या उत्सुकतेला शमविणारा कालचा भाग अत्यंत प्रभावी असाच झाला.

कालच्या भागाची सुरुवातच आकेरी परिसर, नदी, कौलारु घरं, भात खाचरं आणि नाईकांचा वाडा यांच्या ड्रोन कॅमेर्‍याने अतिशय सफाईदार्पणे केलेल्या चित्रणाने झाली. वाड्याचा कोपरान कोपरा आणि विहिरिच्या आत बसुन वर आकाश दाखवणारा अँगल अगदी अप्रतीम..!! भागाचा पुर्ण वॄत्तांत माईने कथन केला. अगदी पहिल्या एपिसोडपासुनचा लेखाजोखा माईने तिच्या मालवणी भाषेत इत्यंभुत सांगितला. स्वतःचं लग्न, नाईकांचा वाडा, नाईक कुटूंबिय, नवरा, मुलं-बाळं, सुन यांच्यापासुन ते पाटणकरीण बाईपर्यंत सगळा प्रवास माईने सांगितला. स्वत: केलेल्या चुका आणि त्या कशामुळे झाल्या यांचा लेखाजोखा मांडला. रात्रीस खेळ चाले२ ची खरी नायीका कदाचित माईच ठरु शकते असं वाटावं एवढे पुर्ण एपिसोड चे फुटेज (अजुन आण्णा, पाटणकरीण आणि मुलांची कथनी झाली नाही म्हणा अजुन..!) काल माईने खाऊन टाकले.

आज छाया, दत्ता, माधव यांच्या मनातील घुसमट दाखवली जाणार आहे. एकेक पात्र आपापली चित्तरकथा कथन करुन मग पुढे कथानकाला सुरुवात होइल असं वाटतंय. एकंदरीत सुरुवात तर एकदम जोरकस झालेली आहे. पुढे काय होतंय याची उत्सुकता अजुन २-३ एपिसोड तरी अशीच घुटमळत राहणार यात शंकाच नाही.

कालच्या भागात अपेक्षेप्रमाणे छया, दत्ता अन माधवाचं गुर्‍हाळ लागलं. माईने ज्या खर्जात स्वत:ची आणि आत्तापर्यंत वाड्यात घडलेल्या घटनांची चित्तर्कथा उभी केली तशी ती या तिघांना जमली नाही. कदाचीत सर्वांना एक एक प्रसंग आळिपाळीने सांगायला लावल्यामुळे कधी कोण बोलतोय हेच कळत नव्हतं. परवाच्या भागात माईने जसं सफाईदारपणे सर्व चित्र डोळ्यांसमोर उभं केलं तसं या तिघांना जमलं नाही. कदाचित रेकोर्डिंग माई प्रमाणे सफाईदार नसेल अथवा तिघांच्या रेकोर्डींगचं संकलन प्रभावीपणे झालेलं नव्ह्तं.

आता आज आबांच्या तोंडुन त्यांच्या कुटूंबाची चित्तरकथा ऐकावी लागणार.. वच्छीचा आवाज काही ऐकु आला नाही म्हणजे ती काही स्वतःची चित्तर्कथा सांगणार नाही बहुतेक..!

या सर्वांनी आपापल्या कथा सांगुन झाल्यावर शेवटी पाटणकरीण तिची बाजु मांडेल आणि मग सिरियल पुढे सुरु होइल अशी आशा आहे.

मला सांगा की राखेचा 2 , अणि एक गाव भुताचा ह्या दोन्ही सिरीयल कुठे आणि किती वाजता चालू आहेत, सध्या टाटा स्काय बंद आहे त्यामुळे विचारले

@ अश्विनि दिक्षीत : राखेचा२ झीम वर सुरु आहे रात्री १०.३० वाजता. एक गाव भुताचा पण झीम वरच सुरु आहे बहुतेक..

काल ठरल्याप्रमाणे आबा अन वच्छि काकीने त्यांच्या घरातील घटनाक्रम इत्यंभुत वर्णन केला.
शेवटचा सीन आबा अन वच्छी काकी कड्यावरुन नदीत उडी मारतात आणि नदीत उडी मारत असतानाही त्यांच्या मागे बंदुक घेऊन आलेल्या आण्णाला वच्छी काकी जीव खाऊन निक्षुन सांगते "माझ्या जल्माचं जरी वाट्टोळं झालं असला तरी मी तुझ्या जल्माची राखरांगोळी बघुक पुन्हा येईन..!!" याचा अर्थ पुन्हा एकदा वच्छी काकीचं पात्र आपल्याला भेटायला येणाअर असं वाटतंय. तसाही पहिल्या एपिसोड मधे आण्णा मेलेला दाखवला दाखवला आहे पण एवढी सगळी दुष्कृत्यं करुन असा सुखा सुखी भरल्या घरात फक्त हार्ट अ‍ॅटॅक ने तो मरेल असं वाटत नाही.. त्याचा वच्छीने सुड घेतलेलाच असावा हा कयास कदाचित खरा ठरावा.

आता आजच्या भागात नेने वकील अन रघुकाका गजाली गाणार आहेत.. बघु आज ते काय काय सांगतात ते. आजच्या भागात बरीच गुपितं बाहेर निघतील अशी आशा आहे.

Pages