रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल नेने वकील अन रघुकाकांनी त्यांदृष्टीकोणातुन संपुर्ण कथा सांगितली. शेवटी शेवटी नेने काकांनी जात्याच हुशार असलेल्यापाटणाकरणीचा वापर आण्णाविरोधात करुन स्वत:चा फायदा कसा करुन घेतो ते बघाच असं आवताण दिलं.

आजच्या भागात पाटणकरीण तिच्या भाषेत अन तिच्या दृष्टीकोणातुन कथा ऐकवणार आहे.. बहुतेक आज सगळ्यांच्या दृष्टीने कथा ऐकवण्याचा शेवट असेल अशी आशा करायला काही हरकत नसावी.

मालिकेचे शुटिंग सुरु झाले असावे कारण पांडबा अन दत्ताचा मोती तलावा समोर मास्क घातलेला फोटॉ इन्स्टा वर दिसतोय... म्हणजे मालिका पुढे नक्कीच सरकणार यात शंका नाही. फक्त नाना, आण्णा, माई, रघुकाका अन नेने वकिल वयाच्या अटीत बसतात का अन त्यांचं शुटिंग सुरु आहे का ते माहित नाही,

आण्णांच्या आवाजात एकदा सम्पुर्ण इश्टोरी पुन्हा ऐकल्यावर आणि नेने-रघु काकांचा 'पाळलेली कुत्री' असा उल्लेख ऐकल्यावर काल पासुन ओरिजिनल कथानक पुढे सुरु झालं.

कथानक मार्च मधे जिथे थांबलं होतं तिथुन सुरु झालं. आण्णा माईचे दागिन्यांचे कपाट उघडून दागिन्यांचा डबा उचलायला जातात तर त्यावर नागोबा फणा काढुन बसलेला असतो. आण्णाची जाम टरकते पण शेवटी आण्णाच तो. झटकन हातानेच नागोबाला बाजुला लांब फेकुन देतो (म्हणजे कॅमेर्‍याच्या दिशेने.. आपल्याच अंगावर नाग पडला की काय असं वाटुन सर्वजण आधि दचकुन अन मग सावरुन पुढे काय होतं ते बघु लागतात..!). मग आण्णा दागिन्यांचा डबा घेऊन पाटणकरणीकडे जातात. ती दागिने बघुन हरकून जाते. तेवढ्यात आण्णाला डोळे पांढरे करुन आलेली भिवरी दिसते.. तिच्याकडे बघुन आपण दचकलेलो असतो तेवढ्यात पाटणकर देखील पांढर्‍या डोळ्यांसोबत खरवडलेला गाल घेऊन येतो.. तोही आपणाला जाम टरकवतो मग आण्णा पण गोंधळतो आणि पाटणकरणीच्या हातुन दागिन्यांचा डबा हिसकावुन मागे फिरतो तर दाराबाहेर पांढर्‍या डोळ्यांसहीत रक्ताळलेल्या तोंडाने शोभा उभी...!! तिचे तोंड वेंगाडणे थोडेफार बरे वाटते आणि त्या तिघांना आण्णा -पाटणकरणीच्या मधे पाहुन बरं वाटतं. निदान माईचे दागिने तरी वाचले.

नंतर भेलकांडत आण्णा वाड्यात जायला लागतो अन तिथे पायरिशी अडखळुन पडतो. दागिन्यांचा डबा दणकन जमीनीवर उपडा होतो अन सगळे दागिने विखुरतात. लगोलग दत्ता अन मागोमाग माई तिथं येतात अन दत्ता आण्णाला घेऊन घरात जातो अन माई सगळा मुद्देमाल हातात घेऊन दारात उभा असलेल्या पाटणकरणीला दातओठ खात शिव्याशाप देत फणकारत आत निघुन जाते. त्यानंतर दत्ताकडुन तिजोरीचे अण्णाने उचकटलेले दार नीट करुन घेताना माई दत्तास काही कळाजी करु नको दागिने कुठेही जाणार नाहीत असे ऐकवते. इथपर्यंत वर्णन केलेले संपुर्ण सीन मार्च मधेच चित्रित केलेले वाटले. कारण सगळे कलाकार पहिल्यासारखेच वाटले अन वाड्यासमोरच्या अंगणात आजिबात चिखल नव्हता. Wink

त्यानंतरच्या शॉट मधे पाटणकरीण तिच्या घरात तांदुळ निवडत बसलेली असते. चोंट्या तिच्यासाठी मेंदीची पुडी आणातो. ती पण लगेच उंटावरुन शेळ्या राखत चोंट्यालाच ती भिजवायलाही लावते आणि तिच्या हातावर काढायलाही लावते. काल घडलेला प्रसंग सुद्धा ती चोंट्याला ऐकवते. आण्णा असे का वागले ते तिला कळत नाही. हे सर्व ऐकुन चोंट्या सांगितल्याबरहुकुम सर्व काम करुन निघुन जातो.

त्यानंतर आण्णा नेने वकिला कडे जाऊन जमीन विक्रीचे पैसे घेऊन येतो. आण्णा गेल्यावर नेने वकिल मनातल्या मनात खाल्लेल्या मांड्याचे गणित सोडवत बसतो. इकडे पाटणकरीण बाई मेंदी रंगलेल्या हाताने स्वतःच स्वत:ला हळद लावत बसलेली असते. आण्णाचा सुड घेण्याचे इरादे पक्के करत असते. आण्णा येतो अन थैलीत तिच्या साठी आणलेले दागिने (जमीन विकुन आलेल्या पैशांतुन..!) तिच्याकडे सोपवतो. ते पाहुन पाटणकरीण जाम हरकते. इथपर्यंत सुद्धा सर्वकाही मार्च मधेच चित्रित झालेलं वाटलं.

त्यानंतर आजच्या भागात काय होणार याचा प्रीकॅप दाखवला. टम्म फुगलेली पाटणकरीण Uhoh हिरव्या काठाची पिवळी धम्मक साडी घालुन बाहेर उभि असते. (पाटणकरणीचे हे असे रुप पाहुन हे नवीन चित्रीकरण आहे असे लगेच लक्षात येते.. ३ महिन्यत होत्याचे नव्हते कसे होते त्याचा हा पहिला अनुभव.. आज अजुन नवे अनुभव मिळतील..!!) तिकडे देवळात नेने वकिल, पुजारी अन पाटणकरीण आण्णाची वाट बघत उभे असतात. आण्णा काही येत नाही तेव्हा कसनुसं तोंड केलेल्या पाटणाकरणीला नेने वकील चार समजुतीच्या गोष्टी ऐकवतो. आता आजच्या भागात काय काय नवीन शुटिंग झाले ते दिसेल.. ६५ वर्षांच्या वर वय असेल तर आण्णा, माई, नाना, रघुकाका कसे शुटिंगला येणार ही शंका आहेच म्हणा.

टम्म फुगलेली पाटणकरीण
Hahaha
मराठी actors आपल्या फिगर्स ची काळजी घेत नाही याचा पुनःप्रत्यय आला

हो.. आज पाटणकरीण आणि आण्णाचे लगीन होणार...!! Uhoh

कालच्या भागात पाटणकरीण सगळा जामानिमा करुन स्वतःच्या लग्नासाठी घरातुन बाहेर पडते अन घराला कुलुप लावुन वाड्याकडे पहात, "पुन्हा परत येईन तेव्हा वाड्यात नाईकांची सुन म्हणुन येईन..!" असं पुटपुटते. नेमका त्याच वेळी पोटाचा नगारा झालेला अनं चहु बाजुंनी मांदं चढलेला पांडु नटुन थटुन हातात ४ पिशव्या घेतलेल्या पाटाणकरणीला बघतो. ती कुठं गावाला चालली का असं विचारल्यावर पाटणकरीण त्याला सांगते की लग्नाला निघाली आहे. त्यावर नेहमीप्रमाणे पांडबा पुढचा गुगली टाकतो की ती कुणाच्या लग्नाला निघाली आहे? त्यावर चौका मारत पाटणकरीण अवखळपणे सांगते की ती स्वत:च्या आणि आण्णाच्या लग्नाला निघाली आहे. एवढं सांगुन ती निघुन जाते अन पांडाबा नेहमी प्रमाणे घोळ घालत माझा, तिचा, आण्णांचा लगीन असं काहीबाही बडबडत ओसरीत येतो. (ह्या शॉट मधे आजिबात पाऊस नसतो.. उलट छान ऊन वगैरे असतं..!)

इकडे वाड्यात ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. गाल टम्म फुगलेला दत्ता त्यांच्या दिवाणखाण्यात जमीनीवर अंथरलेल्या गादीवर नवीन बेडशीट (गादीचं भाग्य खुललं म्हणाय्चं..!) घालत असतो, माई दोन पाट आणुन लक्ष्मी+गणेश्+सरस्वती च्या चित्राखाली मांडते, पोटुशी सरीता (हिला लॉक्डाउनचे धरुन १३ महिने झालेत बरं का..! Uhoh ) उगीच इकडं तिकडं करत असते, छाया येऊन जमीनीवर रांगोळी काढायला बसणार तेवढ्यात रांगोळी काढायला बसलेली बघुन कावरीबावरी झालेली माई तिला हटकते अन रांगोळी ती स्वत: काढेल असे सांगुन छायाला स्वयपाकाचं बघायला आत जा म्हणुन सांगते. हे ऐकुन छायाला वाईट वाटते अन सरिता पण कसनुशी तोंड करत असहाय्यपणे ते बघत बसते. तेवढ्यात तिथं पांडबा पोचतो आणि लग्नाची बातमी सांगताना घोळ घालुन सांगतो. कामाच्या नादात माई, दत्ता त्याचं बोलणं मनावर न घेता त्याला ओसरीत पाठवतात (तेंव्हा धुवांधार पाऊस पडात असतो..! Proud ) तेवढ्यात सरिताचे आई-वडील येतात.( पाटणकरीण, दत्ता अन पांडबा लॉकडाऊन नंतर पायलीभर वजन वाढवुन बसलेले असताना रघुकाका, नेने वकील, चोंट्या, माई, सरिता, छाया, सरिताची आए मात्र जशाच्या तशाच असताना सरिताचे वडील मात्र निम्म्याने कमी झालेत हे बघुन चमत्कारीक वाटतं..! Uhoh )

सरिता, दत्ता त्यांचं स्वागत करतात अन सरिता आईला घरात घेऊन जाते अन दत्ता सासर्‍याला पांडबा सोबत ओसरीत बाकावर भर पावसात बसवतो Wink . मग दत्ताच्या सासर्‍याच्या आणि पांडबाच्या गप्पा सुरु होतात अन मग गप्पांच्या ओघात पांडबा आज आण्णा अन पाटणकरीण बाईंचं लगीन आहे ही खबर देतो.. दत्ताच्या सासर्‍याला करंट बसतो पण नाईकांच्या फंदात तो बिचारा कितपत पडणार त्यात पांडबाच्या बतावणीचं कितपत मनावर घ्यायचं असा प्रश्न त्याच्या चेहर्‍यावर उभा राहतो.

तिकडे मंदीरात पाटणकरीण, नेने वकील, रघुकाका, चोंट्या अन मंदीराचा पुजारी अशी सारीजण लग्नाची तयारी करुन आण्णाची वाट बघत असतात. नेने वकील अन रघुकाका चोंट्याची 'माहेरचा माणुस' म्हणुन चांगलीच खेचाखेची करतात.

बराच वेळ झाला तरी आण्णा काही येत नाही मग नेने काका पाट्णकरणीला समजुतीच्या गोष्टी सांगतात अन ह्या नादाला लागु नका असे सुनावत असतात पण तेवढ्यात आण्णा येतो अन पाटणकरणीचा जीव भांड्यात पडतो.

प्रीकॅप मधे आज पाटणकरीण आण्णाला स्वतःच्या गळ्यात मंगळसुत्र बांधण्यासाठी आण्णापुढे उभी राहते. आण्णा आणि पाटणकरणीच्या लग्नाच्या अक्षता ऐकु येतात. आता आज नाईकवाड्यात काय ड्रामा होणार ते बघायचं..!

शेवंता पण एकदम सुरेख दिसत होती. दागिने पण छान. साडी पण महागाची. तिची छोटी मुलगी वण वण फिरून उपाशी झोपून चिट्ठी लिहून परत गेली पण हिला फिकीर नाही

तिची छोटी मुलगी वण वण फिरून उपाशी झोपून चिट्ठी लिहून परत गेली पण हिला फिकीर नाही>> फिकीर नाही कशी..? अहो तिच्या साठीच तर चाललंय ना हे सर्व Proud

बाकी सुषमा उपाशी झोपुन चिठ्ठी ठेऊन निघुन गेल्यावर पाटणकर बाईने समस्त नाईक परिवाराची खरडपट्टी काढली होती की मार्च महिन्यात. सरितासारखी बोलायला भारी असणारी बाई पण मूग गिळुन गप्प राहिली होती तेव्हा.. माईने सुद्धा निमुटपणे सर्व ऐकुन घेतलं होतं.. आणि छाया तर अक्षरशः कानकोंडी झालेली त्यावेळेस..

कालचा भाग तुफान झाला.

पाटणकरीण आणि आण्णाचं लग्न लागल्यावर दोघांनी उखाणे घेऊन एकमेकांना पेढा भरवला. पाटणकरणीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधत असताना आण्णाला माईने दिलेली धमकी आठवते पण तरिही तो ते मंगळसुत्र पाटणकरणीच्या गळ्यात घालतोच. नेने वकिलाने मुंबैला जायचं कारण सांगुन तिथुन काढता पाय घ्याय्च्या तयारीत असताना पाटणकरणीने वाकुन त्याला नमस्कार केला. वकिलाने देखील तोंडभरुन नव्या "वहिनी"ला आशिर्वाद दिला आणि तिथुन निघुन गेला (आता मुंबईत जाऊन माधवला चुगली कर्तो की काय जाणॅ..! Uhoh )

इकडे वाड्यात सवाष्ण मंडळ ओटी भरायला आलं तेव्हा ते पुर्ण नवीन मंडळ आहे के लक्षात आलं. त्यांच्या कलकलाटात माई देवघरात बसुन देवीची खणाअ नारळाने ओटी भरत असते. दिवाणखाण्यातील बायांचा कलकलाट असह्य होऊन छाया कटकटत माईकडे येऊन तक्रार करते अन तिला लवकर बाहेर जाऊन बायांना कटव आता असं सांगते. त्यावर माई छायालाच गप गुमान आत बसायला सांगत बाहेर जाते. बाहेर सवाष्ण मंडळ माईला ओटी भरण्या आधी उखाणा घ्यायला सांगतात. माई पण चांगला ठसठशीत उखाणा घेते अन उपस्थित सवाष्ण मंडळ तिला दाद देतं. त्यातील एक डँबिस सवाष्ण बसल्या बसल्या दारात उभा राहुन बाहेरील मौज बघणार्‍या छायाला लागेलंसं बोलतं अन त्यामुळॅ छयाच्या वर्मी घाव बसुन ती स्फुंदत देव्हार्‍यापुढे बसते. हे पाहुन सरिता लगबगीने आत जाऊन छायाला विचारते की तिने बाहेर त्या बाईला जाब का विचारला नाही..? तिला भावजईचा पुर्ण पाठिंबा असताना ती अशी मुळुमुळु रडात का बसली आहे..? आता आयुष्यभर रडत न बसता पुढील आयुष्य सुखाने जगण्यासाठी दुसरं लग्न करायल सुचवते.. त्यासाठी तिला लागेल ती मदत करायलाही तयार होते.

तिकडे आण्णा-पाटणकरणीच्या लग्नाचे फोटॉ काढणार्‍या चोंट्याला सोबत घेऊन आण्णा अन रघुकाका गुत्त्यावर जायला निघतात अन आण्णा पाटणरकरणीला एकटीलाच घरी जायला सांग्तो. नंतर गुत्त्यावर गेल्यावर हसी मजाक करत रघुकाका अन आण्णा चोंट्याला त्यांचे फोटो काढायला सांगतात. तोही लटपटत दोघांचे फोटो काढतो. आण्णा चोंट्याच्या घशात आक्खी ताकाची बाटली रिकामी करतात. बहुतेक आज चोंट्याचं तिकिट क्न्फर्म होतंय की काय असं वाटुन गेलं. Uhoh

इकडे वाड्यात सरिताची आई अन वडील निघण्याची तयारी करु लागतात अन माई त्यांना आग्रहाने जेवण करुन जा असं सांगत असते. सरिताचे वडील आता बारशालाच जेवायला येईन असं सांगत बाहेर जायला निघतात अन तिथं पांडु येतो. सगळे दिवाणखान्यात उभाच असतो तर पांडबा त्यांना सांगतो की आता वरात येईल. त्याचं बोलणं ऐकुन सरिताचे वडील चांगलेच चपापतात अन दत्ताकडे पहतात. पण लॉकडाऊन मुळे गोल गोबर्‍या झालेल्या गालात किलोभर हसु घेऊन दत्ता त्याचं बोलणं मनावर घेऊ नका असं सासर्‍यांना सांगत असतो त्याच वेळी दमदार पावले टाकत पाटणकरीण ओसरीतुन दरवाजापर्यंत येत " आत कोणी आहे का..??" असं मानभावीपणे विचारते अन तिच्या अनपेक्षीत आणि सौभाग्य अलंकारांनी नटुन थटुन येण्याने सर्वजणांना एकदम ४४० व्हॉल्ट्चा करंट लागतो. त्या जबर करंटमुळे माईच्या हातातलं तांब्या-भांडं जमीनिवर पडतं तर दत्ताच्या गोबर्‍या गालातलं किलोभर हसु क्षणात विरुन त्याजागी प्रचंड राग दिसु लागतो. सरिता छायाची तर बोलतीच बंद होते अन "थोडं लवकर निघालो असतो तर ह्या असल्या अवघड क्षणाचे साक्षीदार होण्याची वेळ आली नसती" असे भाव सरिताच्या जागच्या जागी थिजलेल्या आई-वडीलांच्या चेहर्‍यावर स्पष्ट पणे दिसतात. Proud

नाईकांची वळालेली बोबडी पहात पाटणकरीण माईकडे बघत विचारते, "हे काय..? माझ्या स्वागताला दारात माप ओलांडायची तयारी नाही का करणार??" अन त्या सर्वांना तिच्या गळ्यात आण्णांनी घातलेलं मंगळासुत्र दाखवते. ते बघुन सगळे चांटंचाट पडतात. Proud

नाईकांची झालेली ससेहोलपट बघताना आता आजच्या भागात काय होणार आहे ते प्रीकॅप मधे बघायचं राहुनच गेलं Biggrin

पण लॉकडाऊन मुळे गोल गोबर्‍या झालेल्या गालात किलोभर हसु घेऊन दत्ता त्याचं बोलणं मनावर घेऊ नका असं सासर्‍यांना सांगत असतो >>>>> Lol

रघु, नेने, चोंगट्या हे कोरसमध्ये....: अण्णा ! अण्णा ! अण्णा ! अण्णा ! अण्णा ! अण्णा !

अण्णा पार्टी दे दे, अण्णा पार्टी दे दे अण्णा

गुत्तेपे किया तुने पार्टीका वादा
लॉकडाऊन में तोड दिया तुने वो वादा

ले आ गया रे फिर चोंगट्या, अण्णा पार्टी दे दे
अण्णा पार्टी दे दे अण्णा ...

शेवंता : - अण्णा ! अण्णा ! अण्णा ! अण्णा ! अण्णा !

अण्णा, शादी कर ले ! मुझसे शादी कर ले अण्णा !

अण्णाने किया मुझसे शादी का वादा
देगा वो मुझे माल भी आधा
वादा न तोडो मेरे अण्णा
अण्णा, शादी कर ले

माई :- उसवलं लुगडं माझं, दिलं होते बाबाने
फाटकी ही शेवंता आली मागल्या दाराने
हो निघनां हो माझे प्राण, रडु कशी आता
पांडु खातो पेढे आणी रडतो हा दत्ता
ह्यांच्या संगे जिणं मला जगवेना
कुर्‍हाड मी घेईन हाती आता

खेळ संपला, संपला संपला

पांडु : - अण्णांची वरात निघाली, जाऊन नाचतो आता
अण्णांची वरात निघाली, जाऊन नाचतो आता

अण्णांना ह्या चळ हो लागला, म्हातारं अवलादी कसला
लगीन माझे लाविन म्हणून, स्वतःच घुसला ह्यो बाबा
माई याला हाणणार बघा, हातात घेऊन सोटा

अण्णांची वरात निघाली....

अरे वा रश्मी.. वैनी. Bw
कित्ती दिवसांनी तुम्ही आलात आणि कसली भारी खुमासदार गाणी तयार केलीत Biggrin Biggrin Biggrin

कालचा भाग देखिल प्रचंड उलथापालथ घडवणारा ठरला..!

नाईकवाड्याच्या दरवाजात आलेली पाटणकरीण माई सहीत सर्वांना ललकारते. आण्णा नाईकाने तिच्या गळ्यात घातलेलं मंगळसुत्र नाचवत ती या घरात अर्धं राज्य करणार हे सर्वांना ठणकावुन सांगते. माईने तिला याआधी जसे लहान बहिणेप्रमाणे वागवलं तसंच आताही सवत म्हणुन न वागवता स्वतःची लहान बहीण म्हणुनच वागवावं अशी अपेक्षा धरते अन माईच्या ठसठशीत कुंकवाला आजन्म असेच भाळी टिकवण्याची अर्धी जबाबदारी आता तिचीही आहे असंही ऐकवते. तिचा तोरा बघुन परवच्या भागात ४४० व्हॉल्टचा करंट बसलेली माई पुरती थिजुन बर्फ होते. छाया, सरिता, दत्ता, दत्ताचे सासु-सासरे अन उगीच मागे घुटमळत राहिलेल्या दोन सवाष्ण यांच्या देखत माईला ती ललकारते. लक्ष्मी-गणपती-सरोसती चित्राच्या पुढे असलेल्या टेबलावरील वाण म्हणुन ताटात ठेवलेल्या रुपश्रुंगार कुंकवाच्या डब्यांपैकी एक डबी उचलत माईपुढे धरत - "तिन्हीसांजेच्या वेळी नाईकांच्या वाड्यात लक्ष्मी स्वत:हुन चालत आली आहे तेव्हा तिचा स्विकार नाही करणार..? वाड्यात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरु असताना तिला हळदी-कुंकु नाही लावणार..??" असले माईला वश करणारे अवघड प्रश्न विचारते Proud . ते ऐकुन बर्फ झालेली माई आता कुंकवाच्या डबीतुन कुंकवाचा टिळा लाऊन हिची खणा-नारळाने सर्वांसमक्ष ओटी भरेल अन वर अष्ट्पुत्र सौभाग्यवती भवः असा पोटभर आशिर्वादही देईल की काय असं आपल्याला वाटत असतानाच तशी भिती नेमकी छायालाही वाटते अन मग माईसमोर रुपश्रुंगार कुंकवाची उघडी डबी हातात घेऊन उभ्या असलेल्या पाटणकरणीच्या हातावर ती खालुन जोरात फटका ठेऊन देते. त्या सरशी ती डबी उंच उडुन खाली जमिनीवर सांडते अन कुंकु खाली पसरतं. आपल्यावर आलेली आफत टळली यातुन सावरलेली माई लगेच दत्ताच्या सासु-सासर्‍यांना अन चुकारीच्या राहिलेल्या दोन सवाष्णांना हात जोडुन विनंती करते की ते कार्यक्रमाला आले त्याबद्दल धन्यवाद पण आता तुम्हाला निघायला हवं (फुकट तमाशा बघत काय उभे आहात..? चला फुटा..!! असा त्याचा दुसरा अर्थ Biggrin ).

माईचं बोलणं ऐकुन दोन सवाष्णं लगेच तुरुतुरु निघुन जातात तर सरिता तिच्या आई-वडिलांना निरोप द्यायला ओसरीत येते. बाहेर अंधार पडालेला असतो आणि जोरदार पाऊस सुरुच असतो. लेकीची अवस्था आई-बापाला बघवत नाही अन तिला नाईकांच्या घरातील प्रश्नात ते आजिबात लक्ष घालणार नाहीत आणि सरितानेही आता घरातील गोष्टी बाहेर येउ नयेत याची दक्षता घ्यायला हवी तसेच या संकटाच्या काळात सासुच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हव असं ऐकवत काढता पाय घेतात.

त्याचवेळी इकडे आत छायाच्या अनपेक्षीत फटक्याने धक्का बसलेली पाटणकरीण पुन्हा एकदा सर्वांना निक्षुन सांगते की जरी त्यांनी नव्या नवरीचे स्वागत केले नसले तरी आता ती त्या घरावर निम्मे राज्य करणार. मग देवाचे आशिर्वाद घ्यायला देवघरात जाते अन देवाला म्हणते की या घरातील कोणीहि तिच्या मागे उभा रहणार नाहीत पण देवाने मात्र उभं रहावं Uhoh (म्हणजे माईने आयुष्यभर देवाला पाणी घातलं अन आता तो हिच्या मागे उभा रहाणार तर.. कायतरीच...! Proud ) . इकडे दिवाणखान्यात सरिता माईची उलट साक्ष घेत तिच्या चांगुलपणाचा काय फायदा झाला वगैरे ठिणगीदार प्रश्न विचारुन फटाक्याची वात पेटवते. सर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र्कन वात पेटावी तसे माईच्यात बदल होतात अन ती दात ओठ खात राणा भिमादेवी थाटात माजघरात जाते अन देवापुढे बसलेल्या पाटणकरणीच्या बखोटीला धरुन उभी करत गदागदा हलवते तशी पायापासुन केसापर्यंत हेंदकळलेल्या पाटणकरणीला माईने दोन्ही हातांनी गच्च धरल्यामुळे १० बोटांचे १० पंक्चर नक्कीच झाले असणार असा पक्का विश्वास तो सीन बघणार्‍यांना येतो. तिला तशी बखोटीला धरुन ओढत ओढत माई थेट दरवाजातुन थेट ओसरीत अन तिथुन चिखल झालेल्या अंगणात भर पावसात ढकलुन देते. एवढे मोठे धुड फराफरा ओढत माजघरातुन दिवाणखान्यात अन तिथुन ओसरीत अन तिथुन थेट अंगणात आणुन टाकताना माईने जो अभिनय केलाय अन जो आवाज लावलाय त्याला कशाचीही तोड नाही..! Biggrin Biggrin

भयंकर अपमानाने पेटलेली पाटणकरीण वारंवार मंगळसुत्र अन कुंकु अन घर अन हिस्सा करत रहाते तसा दत्ता तिला माईच्या संस्काराचे वेसण वगैरेचा दाखला देत गप्प बसलोय नाहितर तिची काही खैर नाही असं सांगत असतानाच आण्णा भेलकांडत येतो. त्याच्या समोर पुन्हा एकदा मंगळसुत्र नाचवत पाटणकरीण आण्णाला सांगते की या लोकांना सांगा की तिचे कसे आण्णाशी लग्न झाले वगैरे वगैरे.. मग आण्णा देखील तिच्या हो ला हो करत त्याने पाटणकरणीवर इतके वर्षं दागिने, साड्या, पैसे कसे उधळले हे ऐकवत आज त्याने तिच्याशी लग्न वगैरे केले असं ऐकवतो तसे सर्वांचे चेहरे फर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्फर्र्कन उतरतात अन पाटणकरणीच्या चेहर्‍यावर १० टन सोन्याची झळाळी येते Light 1 पण पुढच्याच क्षणी आण्णा पाटणकरणीचं नरडं गच्च पकडत तिने त्याला कसं वापरुन घेतलं, तिने सगळी संपत्ती कशी ओढली, तिने जाळं विणुन आण्णाला त्यात अडकवण्याचा कसा प्रयत्न केला अन या वाड्यात शिरण्यासाठी काय काय नाही केले याचा पाढा वाचतो . आण्णा पाटणकरणीला सांगतो की त्याला जाळ्यात अडकवणारा अजुन जन्माला आलेला नाही. तिच्याशी आण्णाने लग्न केलं याचा पुरावा आणुन दाखव मग या वाड्यासहीत सगळा जमिन जुमला तिच्या नावावर करुन देतो. तसे ओसरित उभे असलेल्या सर्वांचे फर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्फर्र्कन उतरलेले चेहरे सर्रर्रर्रर्रर्रर्सर्र्कन उजळतात अन जीव जात असलेल्या पाटणकरणीबद्दल त्यांना क्षणाभर काळजीही वाटुन जाते. (काय जमलाय हा प्रसंग...व्वा..!) असं ऐकवल्यावर आण्णा घरात जातो अन पाटणकरीण आण्णावर जोरात जीव खाऊन ओरडत शिव्या शाप देते तशी रागाने फुरफुरणार्‍या माहिष्मती सारखी माई अंगावर पहाड यावा तशी स्लो मोशन मधे पाटणकरणीच्या अंगावर चाल करुन येते अन स्वतःच्या नवर्‍यावर कुणी ओरडलेलं खपवुन घेणार नाही असं सांगत हात उचलते (आता पाटणकरणीचं इकडचं गालफाड तिकडं होणार या भितीत आपण असतो... पण...!) अन पाटणकरणीच्या गळ्यातलं मंगळसुत्र खस्सकन ओढुन चिखलात फेकते अन तिच्या कपाळावरचं कुंकु अंगठ्याने फिसकटवत माघारी ओसरीत जाते..

बाजु पलटल्याने पुर्णपणे कोसळलेली पाटणकरीण माईला इन्दु नाईक वगैरे अगं तुगं करत दम देते की नाही सगळे पुरावे आणुन कुंकवाचा मळवट भरुन वाड्याची निम्मी मालकीण झाले तर नावाची शेवंता नाही.

Screenshot_20200724-094049_Instagram.jpg

प्रीकॅप मधे आण्णा अन नेने ताक पीत असतात अन लग्नाचा साक्षीदार चोंट्या आहे हे त्यांच्या लक्षात येते. बहुतेक आजच्या भागात चोंट्याचं तिकिट तात्काळ कोट्यातुन कन्फर्म होणार असंच वाटतंय. Uhoh

मस्तच वृत्तांत. आजच सकाळी बघितला हा भाग. शेवंताच्या मानाने बघितलेत तर माईचे खांदे किती सुरेख आहेत व ती किती रुबाबदार आहे खरेतर. अण्णा पलटी खातो तेव्हा छाया अभिनय एक नंबर.

हो आमा.. माईच खरेतर आखीव-रेखीव आहे. राखेचा१ पेक्षा राखेचा२ मधे माईला करण्याजोग्या बर्‍याच गोष्टी मिळाल्या अन तिने त्याचा पुरेपुर फायदाही उठवला. छाया देखील कसलेली अभिनेत्री आहे पण दोन्ही सिजन मधे तिला वाव तसा कमीच. झी गौरव मधे छाया, वच्छी, आण्णा, पाटणकरीण अन चोंट्या या सर्वांना पुरस्कार मिळाले होते (माईचे २ हक्काचे पुरस्कार निजो ने कंपुगिरी करत चोरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..!). एकंदर भारी आहे सिरियल.

निजो ने कंपुगिरी>> अगदी अगदी. माई आई म्हणून बेस्ट आहे. मला कधी कधी ती माझीच आई वाटते. युनिवर्सल मदर असे ते पात्र झाले आहे. व सफरिन्ग फॉर द सेक ऑफ किड्स. इथे एक कंपनीचे बटर मिळते तेव्हा मी हपिसातुन आल्यावर चाय बटर खाते तेव्हा माई चा वाआईच चाय
बटर खा आवाज अगदी डोक्यात येतो. तुलनेत निजो गेंगाणे बोलते व ते पात्र अगदीच मेंगळ ट आहे.

@ अमा : इथे एक कंपनीचे बटर मिळते तेव्हा मी हपिसातुन आल्यावर चाय बटर खाते तेव्हा माई चा वाआईच चाय बटर खा आवाज अगदी डोक्यात येतो>> अगदी अगदी मनातलं बोललात Bw

माई आई म्हणुन तर बेस्ट आहेच पण सासु म्हणुन सुद्धा खंबिर आसंय म्हणुन मी तिचे २ हक्काचे बेस्ट आई अन बेस्ट सासु हे पुरस्कार निजो ने चोरले असं म्हणालो.. Proud

पण सासु म्हणुन सुद्धा खंबिर आसंय>> त्या दोन्ही कलकलाट कर णार्‍या सासवांचे गळाभर दागिने बघताना मला तेच आठवले. सरिताला एकदम बारकुशी चेन एका दिवसा पुरती घाला यला दिलेली. पण तिचे लाड पण करते. लाडू बनवून खायला दिले कोण करते इतके?१

मोठ्ठा सुरा घेऊन शेवंता अण्णाचा पाठलाग करत असते. अण्णा तिला सहज पकडतो आणि तिलाच धमकी देतो. रघु मदत करेल असे शेवंताला का बरे वाटले असेल. कॅमेरा मधला रोल जाळून टाकला आणि चोंत्याला नुसती धमकी दिली तरी चाललं असतं. बिचाऱ्याला ते भाताचं पाणीही पीऊ दिलं नाही. शेवंता आलीये पोलीस घेऊन पण नेहेमीप्रमाणे अण्णाचे कोणी काही बिघडवू शकणार नाही.

Dj
खूप मस्त अपडेट देता तुम्ही,
मी बघत नाही पण फक्त तुमचे रोजचे अपडेट वाचायला येते इथे
Plz रोजचे रोज टाकत चला Happy

रश्मी भारी कविता

@ चंपा, अहो तुम्ही दिलेच की अपडेट. हेच तर झालं ना कालच्या भागात. आता मला जरा जास्तच भारी वाटते ही सिरियल म्हणुन मी थोडं इंटरेस्टिंग लिखाणाचा प्रयत्न करतो इतकंच.

@ आदु, अहो काय हे.. मी काय एवढं चांगलं लिहितो का हो...? आता तुम्ही एवढी स्तुती केली म्हणुन लिहितो माझ्या भाषेत. पण तुम्ही बघत चला ही सिरियल... खुप मस्त आहे.

कालचा भाग सुरु झाला तोच चोंट्या दु:खी अंतकरणाने पावले टाकतानाचा. पाटणकरीण कशी चुकली आणि तिने या सर्व लग्नाच्या भानगडीत न पडता सुषमाचा विचार करुन आण्णापासुन दुर व्हायला हवं होतं असं पुटपुटत तो त्याच्या घरी जातो.

इकडे पाटणकरीण घुश्श्यात तिच्या घरात घुसते. लॉकडाउनच्या ३ महिन्यात त्या घरात कोणीच गेलेलं नाही आणि त्यात तुफान पावसाने त्या परिसराची दाणादाण उडालेली दिसते आहेच त्यामुळे पाटणकरणीच्या घराची बरीच वाताहत झालेली दिसली. भिंतींवर पाण्याचे ओघळ वाहुन ती ओलीचिंब झालेली जमीन पुर्णतः भिजुन लपथप झालेली दिसली. अशा घरात ती व्यवस्थीत मांडलेल्या कॉटवर धप्प्कन बसते (आपल्याला कॉटची भिती. निर्जीव कॉटवर काय तो अत्याचार.. मोडते बिडते का काय..!! Wink ) अन आण्णाने फसवल्यामुळे आपण आज वाड्यात असण्याऐवजी या घरात आलो या दु:खातिरेकाने आधी कॉटवरच्या उश्या, पांघरुणं जमिनीवर भिरकावु लागते. मग नेहमीप्रमाणे अंग झिंजाडत गळ्यातला सोन्याचा ऐवज सर्वांसमोर मिरवला जाईल अशा आवेशात टेबलावरील सामान, ड्रॉवर मधील कसलीशी पत्रे (आण्णाने हिला कधी पाठवलेली बघितली नाही.. उलट हिनेच पोष्ट्याकरवी आण्णाला बरीच पत्रे पोहोच केलेली.. Uhoh ) अशी दिसेल ती वस्तु जमीनीवर भिरकावत बसते. शेवटी ती दमल्यावर पुन्हा एकदा कॉटवर अत्याचार होतो अन ती असणारं माईने तोडलेलं मंगळसुत्र हातात घेत आण्णाचा अन नाईकांचा बदला घेईन, लग्नाचे पुरावे सादर करुन अन आण्णाची सारी पापे समोर आणुन त्याला फासावर लटकवेल असं बोलते तसा पाटणकर दात काढत तिथं येतो (लॉकडाऊन मधे बराच कमी झालाय बरं का पाटणकर..! मांदं उतरल्याचं क्रेडीट द्यायलाच हवं..!). त्याच्या हसण्याचं कारण ती त्याला विचारते तर तो समजावणीच्या स्वरात तिला जाणीव करुन देतो की तिच्यावर झालेल्या अन्यायाला ती सुध्धा जबाबदार आहे. आता तरी तिने सुड वगैरे घेण्याचा विचार सोडुन द्यावा आणि चांगले आयुष्य जगावे असंही सुचवतो पण पाटणकरणीचं आपलं पहिले पाढे पंचवन्नच..! मग काय धाडकन दार उघडतं अन पाटणकर गायब Uhoh

तिकडे वाड्यात माडीवरच्या खोलीत माई अन आण्णा Wink . आता ह्यांचा रोमांस वगैरे बघायला मिळतो की काय या भितीत असतानाच माई एक फुल्टोस टाकत झिंगलेल्या आण्णाला प्रश्न विचारते की त्याने घरासाठी खुप काही केलेलं आहे म्हणुन ती खाली झालेल्या तमाशात मघाशी सर्वांसमोर काही बोलली नाही पण जर त्याने खरच पाटणकरणीशी लग्न केलं नसेल तर त्याने कुंकवाचा टिळा माईच्या माथी लावावा अन असं बोलुन ती वाणातली कुंकवाची डबी उघडुन आण्णासमोर धरते. आण्णा किती महाडँबीस. तो माईच्या हातातली कुंकवाची डबी घेतो अन स्वतःच्या हातावर उपडी करतो अन गप्प्कन माईचं डोकं धरुन तिचं कपाळ त्याच्या हातातील कुंकवावर दबलं जाईल असं आदळवतो. आपली माई जेव्हा डोकं वर करते तेव्हा त्याच्या हातातल्या कुंकवाचा मळवट हिच्या माथी लागलेला असतो Biggrin Biggrin अन त्याही अवस्थेत पतिव्रता माई सगळं विसरुन समाधानाने कॅमेर्‍याकडं बघत बसते (काय म्हणावं हिला आता Uhoh ) असल्या देवभोळ्या बायकोकडे बघत गालात हसत आण्णा भेलकांडत जिन्यातुन खाली जातो.

इकडे पाटणकरीण दरवाज्यातुन बाहेर येऊन पाटणकर कुठं गेला ते बघत असते अन स्वतःच्या संसाराची झालेली राखरांगोळी आठवत तिच्या घराच्या ओसरीतल्या खांबाला बिलगुन रडत असते. तेव्हाच माईला कुंकवाचा मळवट भरुन ताकाच्या गुत्त्यात दुसर्‍या फेरीसाठी निघालेला आण्णा तिला भरपावसात चप्पल घालताना दिसतो. तोही तिला बघतो पण दुर्लक्ष करुन रस्ता नापु लागतो. बरेच अंतर पुढं गेल्यावर आण्णाला कोणीतरी जवळ येत असल्याचा भास होतो अन तो झप्पकन मागे वळतो तर त्याच्यावर भल्या मोठ्या सुर्‍याचा वार होत असतानाच तो वार करणार्‍या व्यक्तीचा हात पकडतो. तर ती व्यक्ती पाटणकरीण असते Uhoh . तो तिचा हात पिरगाळत सुरा काढुन घेतो अन तिच्या मानेला लावत सांगतो की तो या क्षणी तिचा जीव घेऊ शकतो पण त्याला ती रोज थोडी थोडी मरताना पहाण्यात मजा वाटेल म्हणुन सोडुन देतो. नवरा मेलेला असताना कसे का होईना पण स्वत:च्या वाड्याजवळ तिला घर मिळालेले असते, खर्चाला पैसे, दाग दागिने, काय हवं नको ते सर्व तिला मिळत असताना वाड्यात घुसण्याच्या हव्यासापोटी ती आज आण्णाचा जीव घेऊ पहाते यावरुन तो तिची चांगलीच खरडपट्टी काढतो अन आता तिला तिच्या सौंदर्‍यावर जो गर्व होता तेच सौंदर्य रोज थोडे थोडे कमी कसे होत जाते ते अनुभव असंही सांगतो अन गुत्त्यावर जातो.

पाटणकरीण पुन्हा एकदा ढुस्स होऊन घरी परतत असते अन लग्नाचे पुरावे कसे गोळा करता येतील याचा विचार करत असते. नेने वकील तर मुंबईला गेलेत मग कदाचित रघुकाका मदत करतील म्हणुन त्यांच्या घरी जाते (लॉकडाऊन आधी रघुकाकांचे घर वेगळेच होते.!) तर कोणीतरी म्हातारी दरवाजा उघडते जी रघुकाकाची बायको असते. पाटणकरीण रघुकाकांना भेटायचे आहे असं सांगते तर म्हातारी म्हणे ते गावाला गेलेत उद्या रात्री येतील (पण रघुकाका घरातच असतो.. पाटणकरीण गेल्यावर म्हातारीला सांगतो बरी आफत घालवलीस). मग पाटणकरीण दु:खी अंतकरणाने रस्ता नापु लागते तर तिला चोंट्याची आठवण येते. तिच्या लग्नात तोच फोटोग्राफर असतो. मग काय अत्यानंदाने ती चोंट्याच्या घरी जाऊ लागते.

तिकडे गुत्त्यात आण्णा अन नेने वकील पुढचा डाव आखत असतात. चोंट्याचं तिकीट तत्काळ कोट्यातून कन्फर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही हे आण्णाच्या लक्षात येते. चोंट्या त्याच्या घरात भाताची पेज बनवत असतो. मागे त्याचं जे फाटकं घर होतं त्यापेक्षा हे आताचं घर चांगलं असतं (लॉकडाऊन नंतर ह्यांची घरं कशी बदलली हे त्या रवळनाथाकच ठाउक व्हयो..! Light 1 ). पाटणकरीण पळतच चोंट्याच्या घरी येत असते अन आण्णाही लगबगीने तिकडेच जात असतो. आता दोघांपैकी कोण आधी पोहोचणार या विचाराने आपल्या जिवाची घालमेल होत असतानाच चोंट्या चुलीवर रटरटत असलेल्या भाताची पेज ओतुन ताटलीत घेतो अन ती ताटली तोंडाला लावणार इतक्यात आण्णा त्याच्या समोर Uhoh . आण्णाचे पाय गरिबाच्या घराला कसे लागले असं विचारत तोंडाला लावलेली ताटली खाली ठेवतो अन आण्णापुढे उभा रहतो.

प्रीकॅप मधे आण्णा त्याला सांगतो की त्याच्या लग्नाचा साक्षीदार चोंट्या आहे अन त्याच्याकडे असलेल्या कॅमेर्‍यात रीळ आहे. मग घाबरत घाबरत चोंट्या आण्णाकडे कॅमेरा देतो. कॅमेर्‍यातली रीळ काढत त्यातले फोटॉ बघत आण्णा बेसावध असलेल्या चोंट्याच्या गळ्याभोवती गुंडाळातो अन जोरात दाबतो.. Uhoh तेवढ्यात पाटणकरीण तिथं पोचते तोवर आण्णा गायब झालेला अन चोंट्या दिगंतरीच्या प्रवासाला गेलेला असतो. पाटणक्रीण किंकाळी फोडते अन एपिसोड संपतो.आण्णाच्या वाड्यासमोर पोलिसगाडी येते अन त्यातुन इन्स्पेक्टर आणि पाटणकरीण उतरतात. वाड्यात बसलेली माई आता ही बाई पोलिसांना घेऊन वाड्यावर कशाला आली असं दत्ताला विचारते.

Pages