रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खऱ्या चिट्ठीमुळे अण्णा आत गेला असता आणि नेने खोत झाला असता. आता नेने खोत कसा होणार. शेवंतीचं हस्ताक्षर पडताळून नाही बघणार का कारण शेवंताने तर एकच चिट्ठी लिहिली होती ज्यात अण्णा दोषी होता. रघु नेहमी लपून का बघत असतो.

रघुकाकाला आता उगिच ह्या भनगडीत अडकायला नको असं वाटत असेल म्हणुन लपुन रहतोय.

तसेही नेने वकिलांचा खुन राखेचा१ मधे निलिमाने केला आहे त्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा झालेलीच आहे. रघुकाका मागे राहिल्यामुळे वाचला असावा Proud

हायला, शेवंता लटकल्यावर ती फांदी आपोआपच तुटली असती की. फांदीच काय अख्खं झाडही पडलं असतं. ती फांदी तोडायला कशाला कोणी हवं? त्या झाडावर बाकी अन्यायच झाला. वृक्षमित्र इथे लक्ष देतील काय? मला वाटतं आता ओरिजिनल चिट्ठी दाखवून नेने अण्णाकडून जमीन, पैसा वगैरे उकळेल. किंवा डीएनए टेस्टची भीती दाखवेल. सिरियल लवकर गुंडाळतील असं मलाही वाटतंय.

बाकी सरिता आणि छायाचं एव्हढं सख्य दाखवलंय ह्या सिझनमध्ये पण आधीच्या सीझनमध्ये सरिता कर्कशा दाखवलेय एकदम.छायाही तशीच दाखवलेय. हा बदल कशामुळे? सरिताला दत्ता माईचा मुलगा नाहिये हे सत्य कळतं काय?

शेवंताचा मृत्यू अगदीच अ‍ॅंटीक्लाय्मॅटीक झाला. तिला ती सगळी भुतं कशी दिसली बुवा? ती तर अण्णाला गिल्टी कॉन्शन्समुळे दिसत होती ना? मग शेवतंला त्यांचा सबसेट दिसायला हवा. त्यात भिवरी, पांडूचा बाप वगैरे नकोत. पोस्टमन, चोंगट्या, शोभा वगैरेठीक आहेत.

शेवंता वकिलाची मुलगी ना? मग आपलं लग्न अवैध आहे हे तिला कळू नये? आपण लिहिलेल्या पत्राचा गैरवापर होऊ शकतो हे कळू नये? अण्णाने घरातून बाहेर काढल्यावर पोलिसांकडे का नाही गेली ती? रच्याकने, एव्हढ्या पिशव्या घेऊन तुफान वेगाने धावत गेली त्यावरून त्या रिकाम्या असणार हे कळत होतं. Happy

>>त्या घरातल्या आजोबांना भुतं दिसतात का. ते म्हणत होते ती आलीये आत वगैरे.

हो बहुतेक. तरी ह्या सिझनमध्ये कमीच आहे. पहिल्या सिझनमध्ये अगदी काव आणला होता त्यांनी Sad वर त्यांचा क्लोजअप मारून कॅमेरामनने प्रेक्षकांचा अगदी अंत पाहिला होता.

नीलिमाने नेनेला का मारलं होतं. मी पूर्ण बघितला नव्हता सीजन पहिला, आता चालू आहे युवावर पण नाही बघत. अण्णाला आज शेवंताचं भूत दिसलं तर भुताशीही लगट करायला जात होता, किती तो हपापलेपणा. दागिने कसे अण्णाला परत मिळाले, शेवंता लिहून गेली ना सुशमासाठी वापरा म्हणून. छोटी सुषमा गोड आहे, आज पहिल्यांदा बघितली तिला.
वडील वकील असण्याबद्दल, हा सगळा मनःस्तिथीचा भाग आहे. मग तुम्ही स्वतः वकील असलात पण तुमची मनःस्थिती चांगली नसेल तरी चुका होतात.

नीलिमाने नेनेला का मारलं होतं. >> ते तिच्या रस्त्यातला काटा बनले होते. सर्व जमीन स्वतः हडपण्याची जिद्द निलिमाला होती त्यातुन नेने वकिलांचा खून होतो.

दागिने कसे अण्णाला परत मिळाले, शेवंता लिहून गेली ना सुशमासाठी वापरा म्हणून >> नेने चिठ्ठी बदलु शकतो तर दागिने का नाही? Wink

छोटी सुषमा गोड आहे, आज पहिल्यांदा बघितली तिला.>> हो आहे तशी गोड पण नुसत्या गोडावर जाऊ नका... चांगल्या मऊशार, लुसलुशीत, वाफाळलेल्या गोड शिर्‍यात कचकन खडा लागावा तसं प्रकरण आहे ते... तुम्ही पहिल्यांदाच बघितलं म्हणुन तसं वाटणं सहाजिकच आहे म्हणा..!

हो आहे तशी गोड पण नुसत्या गोडावर जाऊ नका... चांगल्या मऊशार, लुसलुशीत, वाफाळलेल्या गोड शिर्‍यात कचकन खडा लागावा तसं प्रकरण आहे ते..>> म्हणजे ?

सुसल्या मोठी झाली काय? >> नाही.
-----------------------------------------------------------------

कालचा भाग तसा बर्‍यापैकी फास्ट होता... मागच्या सिझन मधल्या प्रश्नाचे उत्तर पण मिळाले.

भाग सुरु होतो तेच आण्णा पाटणकरणीच्या ओसरीवर (दिवस डोक्यावर येईपर्यंत..! Uhoh ) उताणा पडलेला असतो अन छोटी सुषमा त्याला "आण्णा उठा.. आण्णा उठा" म्हणत उठवत असते (तरी वाड्यातल्या कुणालाच याची भुणभुण लागत नै.. Wink ). मग आण्णोबा उठतात आणि सुषमा लाकडी खांबामागे दडायचा प्रयत्न करते. आपण ओसरीवर कसं हे बघुन आण्णा जाम गोंधळतो अन वाड्यात जातो. सुषमा पण त्याच्या मागोमाग वाड्यात जाऊ लागते पण पायरी वर पाय ठेवणार तेवढ्यात तिला भुतकाळ आठवतो अन सरिता तिला गेल्या टायमाला कशी घालुन-पाडुन बोललेली असते ते आठवतं अन ती पायरीवर पडणारा पाय मागे घेते अन पाटणकरणीने ज्या झाडाला टांगुन घेतलेलं असतं त्या झाडाच्या पारावर जाऊन बसते. आण्णोबा माडीवर कपाटाचं दार उघडुन तीर्थ प्राशन करुन खाटेवर आडवे होतात अन त्यांना पाटणकरीण आठवु लागते. ते तिरमिरत उठुन गॅलरीकडे जातात तर खाली पारावर सुषमा एक पाय हलवत बसलेली असते. दोघांची नजरानजर होताच ती पाय मागे घेत आण्णावर नजर रोखत बसुन रहाते. (तेवढ्यात २-३ मिनिटांसाठी आमच्या इथे लाईट जाते Uhoh )

आमच्या इथे लाईट येते तेंव्हा तिकडे तिन्हीसांज झालेली असते अन दत्ता अंगणात नाथाला काहीतरी काम सांगुन पिटाळत असतो. त्यावेळेस सुषमा झाडामागे लपुन बसते. दत्ता घरात गेल्यावर तो थेट माजघरात जातो अन सुषमा त्याच्या मागोमाग घरात घुसुन दिवाणाखान्यातल्या खिडकीत लपुन बसते (हे शुटींग जिन्याच्या कोपर्‍यातुन घेतलंय त्यामुळे वाचकांना अंदाज यावा की नेमकं कोणत्या खिडकीत लपली ते Wink ). दत्ता आत बाहेर करुन पुन्हा माजघरात जातो तरी त्याला सुषमा दिसत नाही. (कुठल्या तंद्रीत असतो काय माहीत म्हणुनच सरिताची उठता बसता बोलणी खात असतो.. Proud ). डोळा चुकवुन सुषमा माडीवर पळते. (तेव्हा तिचा कोपर्‍यात ठेवलेल्या कॅमेर्‍याला थोडासा धक्का लागतो अन फ्रेम हलते Bw ).

आण्णा माडीवर झोपलेला असतो अन त्याला स्वप्नात पाटणकरीण दिसु लागते. रंगात आलेल्या आण्णाला पाटणकरणीच्या जागी अचानक भूत दिसु लागतं अन ते त्याच्या मानगुटीवरच बसतं (एवढं मोठं धूड आण्णाच्या खाटेवर त्याच्या शेजारीच बसलेलं अस्तं अन ते आण्णाचं नरडं दाबत असतं ते बघुन आता ही खाट काय जगत नाही असंच वाटुन जातं... Biggrin ) आण्णा तिच्या तावडीतुन सुटायला बघतो पण शक्य होत नाही. कसातरी तो तिला बाजुला करतो तर ती पाटणकरीण नसुन सुषमा आहे हे त्याच्या लक्षात येतं (अन आपल्याही.. Wink ). सुषमा आण्णाला विचारु लागते की तिची आई कुठं आहे तर तो तिला सांगतो - "मेली"..! Uhoh ते ऐकुन चिडलेली सुषमा पुन्हा आण्णोबाचं नरडं पकडायला जाते तर उलट आण्णाच तिची मानगुट पकडुन तिला गदागदा हलवतो. Uhoh ती त्याला "सोडा.. सोडा.." म्हणत ओरडु लागते अन तो आरडा-ओरडा ऐकुन सगळी गँग वर येते.. (इथे सरिता हॉस्पिटल मधे बाळंतपणासाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी. दत्ता-माई-छाया तर इथंच आहेत मग सरितापाशी कोण आहे..? असले प्रश्न आपल्या डोक्यात नक्कीच येणार म्हणा.. पण सरिताचे आई-वडील गेले असतील तिथं हॉस्पिटलात असं मनाला समजावत पुढं काय होतं ते बघत रहावं..! Proud ).

एवढी सगळी गँग असतानाही कुणीही त्या पोरीला सोडवायला पुढं होत नाही.. नुसतं "आण्णा.. आण्णा.." आणि " अहो.. अहो... सोडा तिका.." एवढंच बोलुन कसनुशी तोंडं करतात. आण्णा कपाटातुन दोरखंड काढतो अन सुषमाच्या गळ्यात अडकवुन तिला तिच्या आईकडे पाठवायच्या तयारीत ओढत ओढत खाली नेतो.. बाकी त्रीकुटाचं लटांबर पण मागोमाग खाली अंगणात येतं अन तेवढ्यात नाथा अन नेने वकील तिथं पोचतात (आधीचे नेने वकील जाऊन हे नवीन आलेत पण भुमिकेत चांगलेच चपखल बसलेत.. आजिबात कमतरता जाणवली नाही. आता ही स्टोरीची कमाल आहे की अजुन काही ते कळायला मार्ग नाही..!)

नेने वकील आण्णाला समजाऊन संगतो अन घरात पाठवतो. तो गेल्यावर नेने वकील माईला पण ४ गोष्टी सुनावतो.
सुषमाला काही झालं तरी अण्णासोबत माईलाही पोलिस पकडुन नेतील असं सांगतो. सुषमाला इथेच घरात ठेऊन घ्यायला सांगतो पण माई तिची व्यवस्था नाथाच्या घरी करते (अन पहिल्या सिझनच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं.. की पाटणकरांच्या सुषमाचा सुसल्या कसा काय झाला अन असा मालवणी कसा काय बोलु लागला बरे..! Biggrin ). नेने वकील आल्या पावली अंगणातुनच परत फिरतो, नाथा पोरीला घेऊन घरी जातो, छाया अन दत्ताही घरात जातात अन माई सावकाश पायर्‍या चढुन ओसरीत येते तसं तिला घुंगरांचा आवाज येतो. सर्रर्र्कन अंगावर काटा येत ती फर्रर्रर्र्कन मागे वळुन बघते तर मळवट भरलेली, दागिने घातलेली बया झाडाला लटकलेली दिसते अन घाबरुन माई घरात जाऊन दरवाजा लाऊन घेते.

प्रीकॅप मधे काय झालं कळालंच नाही.. कुणी पाहिलं असल्यास सांगाल का..?

माईने दत्ताला स्वीकारलं मग सुसल्याला का नाही स्वीकारत?>> असं प्रत्येकाला स्विकारत बसली असती तर ती जगन्माता झाली असती. Proud

खरं तर माईला अभिरामाच्या आधी एक मुलगा होतो पण तो जन्मतःच मेलेला असतो.. ज्याच नाव तिने दत्ताराम असं ठरवलेलं असतं. त्याच्या मृत्युमुळे ती खुप कासावीस झालेली असते अन नेमकी त्याच दिवशी भिवरी दत्ताला घेऊन वाड्यात येते अन तिचं कलम लागताना माई पहाते Uhoh . तिच्या सोबत आलेल्या काळुरामचं पण कलम लागेल या भितीने माई जिवावर उदार होऊन काळुरामला पोटाशी धरते अन आण्णाला सांगते की ह्या पॉर माझा आसां.. त्येका मारुक व्हया तं आधी माझो गळो कापुक लागात.. Uhoh त्यामुळे आण्णा काळुरामला बक्षतो.

मग त्या काळुरामला आपल्या गेलेल्या मुलाच नाव 'दत्ता' असं ठेवते.. अन छाया-माधवला तो दत्ता त्यांचा भाऊ आहे असं सांगुन त्यावर पोटच्या पोराप्रमाणेच माया लावते.

बारक्या छायाला मात्र लगेच पहिला प्रश्न पडतो की ती स्वतः आणि माधव पण आण्णा-माईची मुलं आहेत तर ती दोघं गोरी कशी अन हा दत्ता काळा कसा? Proud छाया तर लहानपणी दत्ताला "काळो तवो" म्हणुनच चिडवायची Biggrin Biggrin Biggrin

फार सुरेख चित्तारला होता त्यांच्या लहाणपणीचा काळ.. इतक्या लवकर का गुंडाळला काय माहीत.

हो अमा.. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं Bw

पोरं लहान होती तोवर घातली तिने खणाची चोळी पण आता थोडा लुक बदलुन नॉर्मल पिस वाले झंपरच वापरते ती...

Screenshot_20200805-112511_Instagram.jpg

डिजे Proud तुम्ही तुफान लिहीता. एवढे छान बारकावे लिहीता की मालिका पहायची पण गरज उरणार नाही. शक्य असेल तर एक करा, पांडु किंवा वच्छीचा नंबर तुमच्या कडे असेल तर त्यांना हे लिखाण what's app वर पाठवा. पांडु बरोबर लिखाण किंवा प्रुफ रिडींग तरी करु शकाल. काही सांगता येत नाही माणसाचे नशीब त्याला कुठे घेऊन जाईल. नोकरीच्या बरोबरीने हौस म्हणून करु शकता का त्याचा विचार करा. आधी पांडु कडे हे पोहोचले पाहीजे म्हणा. त्याने इथे येऊन हे सर्व वाचले तर तो हसून लोळुन अर्धमेला होईल. Proud

रश्मी.. वैनी, अहो बास बास... मला हरभर्‍याच्या झाडावर किती चढवाल Rofl

मला ही सिरियल जाम आवडते म्हणुन मी एवढं बारकाईने लिहित आहे... आता मला नाही वाटत या सिरियल मधे पाणी घालुन वाढवण्यासारखं काही उरलं असेल त्यामुळॅ तुम्ही म्हणता तसं पांडबाने इथं येऊन काही वाचलं अन त्याला ते आवडलं तरिही हे सर्व ४ दिवसाची दिवाळी ठरण्याचीच शक्यता.

बाकी पांडबा अन वच्छी इंस्टा वर कनेक्ट होतो अधे मधे पण नंबर नाहीत. जाऊद्या... त्यांच्या कडुन खरेच कमाल घडली अन ही सिरियल दोन सिझन मधे तुफान चालली. मला माबो वरील प्रतिसादांतुनच शुटींग चालु असलेल्या आकेरी गावाबद्दल समजलं काय आणि मी आक्ख्या कुटूंबासोबत तिथं जाऊन आलो काय.. नाईकांचा वाडा अन वच्छीचं मांगरातलं घर बघायला मिळालं काय.. खरंच सगळं स्वप्नवत घडलं. या सर्वाचा परिपाक म्हणुन माझ्याकडुन असं बारकाव्यांसहित लिहिलं जात असावं.

बाकी तुम्ही म्हणता तसं कुणाचं नशीब कुठं चमकेल खरंच सांगता येत नाही Wink

पांडू काल पोटोबा दिसत होता..लाडू हातात घेऊन फिरत होता तेव्हा..>> हो ना... लॉकडाऊन मुळे कसाच्या काय सुटलाय.. Uhoh

@ श्रवु, आमच्या इथे लाईट गेली तेंव्हा नेमकं काय झालं हो..? प्रीकॅप मधे काय दाखवलं आणि..??

पांडू बघतो तिला.. आणि विचारतो भूक लागली.. आणि भूक भूक करत असताना माई बघते त्याला आणि २ लाडू देते.. जेव्हा तो लाडू दयायला येतो तेव्हा ती नसते तिथे..सुषमा ला शोधात असताना सॉलिड पोट दिसत होते त्यांचं.. आमच्या नशिबी एका जागी बसून सिरीयल बघणे नाही..जेवणाची वेळ.. आणि नवरोबा भाजी वाढ.. किती पाऊस पडतोय..आज जेवणात बटाटयाची भजी असती तर मजा आली असती..
Angry

धन्स श्रवु Bw

आमच्या नशिबी एका जागी बसून सिरीयल बघणे नाही..जेवणाची वेळ.. आणि नवरोबा भाजी वाढ.. किती पाऊस पडतोय..आज जेवणात बटाटयाची भजी असती तर मजा आली असती..>> चालायचंच हो.. संसार म्हटलं की हे सर्व आलंच Proud .

आता नुसती भुताटकी दाखवणे चालू आहे. मला एक कळत नाही, ती छाया बिचारी नुसती बघत उभी होती तर तिच्या मागे ते लाकूड पाडायचं काय प्रयोजन आणि वरून बिचारी बेशुद्द, ती शेवंता येऊन आता तिला काय गोष्टी सांगणार. त्या अणुकल्याने फसवलं ना तिला आणि तोच गेला ना मारे झाड तोडायला मग त्याच्या डोक्यावर पाडायची ना एखादी फांदी. चोर सोडून संन्याशाला सुळी Angry

कालचा भाग सुरु झाला तोच आकेरीचं नयनरम्य दर्शन ड्रोनने घडवत आणि कोंबड्याची बांग ऐकवत. पांडबा झाडांना पाणी घालत असतो अन जवळच कुठेतरी कोंबडा कोकत असतो (पण आजवर एकदाही जिवंत कोंबडा काही दिसला नाही तिथं..!). पाटणकरीण लटकलेल्या झाडाला तो पाणी घालायला जाणार तेवढ्यात माई ओसरीत येते अन तो पावसाळ्यात झाडांना पाणी का घालतो असं विचारते. मोठ्या झाडांना पाणी न घालता तुळशीला पाणी घालायला लावते. बादलीतलं पाणी घालु नको असं सुचवून ती बादली अंगणात ठेवायला लावते अन घरात जाऊन तांब्यात पाणी घेऊन येते (तिला स्वतःला तुळशीला पाणी घालायला काय झालं होतं असं आपल्याला वाटुन जातं पण बहुतेक ती जमीनीवर पाय ठेवायला घाबरत असावी असं वाटतंय.. पण मग आण्णा झाड तोडायला गेला तेव्हा काय ही माई थेट ओसरीतुन ढ्यांग मारुन पारावर गेली होती का असाही प्रश्न पडतो Uhoh पण बहुदा पाटणकरीण लटकलेल्या झाडाला पांडबाने पाणी घालु नये असा तिचा सुप्त हेतु असावा Wink असो..!). पांडबा तिने दिलेल्या तांब्यातलं पाणी तुळाशीला घालतो अन पुन्हा पाटणकरणीने टांगुन घेतलेल्या झाडाला पाणी घालायला जाऊ लागतो तशी माईची पुन्हा चिडचीड होऊन ती त्याला तिथुन पिटाळते. Proud . मग झाडाच्या दिशेला विजा चमकल्याचा भास होतो अन वाराही सुसाट वाहु लागतो तशी पांडबाने ठेवलेली पाण्याची बादली आपोआपच कलंडते ते बघुन घाबरीघुबरी झालेली माई पुन्हा घरात पळते. Uhoh

त्यानंतर ती माडीवर आण्णाला चहा नेऊन देते अन ह्या घरावर पाटणकरणीची सावली आहे तेंव्हा रघुकाकांना उपाय विचारायला हवा असं सुचवते. त्यावर आण्णा भडकतो अन माईला त्या पाटणकरणीची सावली नेमकी कुठं दिसते हे विचारुन तिच्या बखोटीला धरुन फराफरा ओढत थेट गॅलरीत नेतो अन पाराकडे बोट दाखवुन विचारतो की दिसते का कुठे तिला पाटणकरणीची सावली..?? तर माईचं आपलं पालुपद सुरुच "ती हयच असा.. अन थंयच असा" Biggrin . त्यावर आण्णा जाम चिडतो अन नाथाला कुर्‍हाड आणायला सांगत तिरमिरत जिन्यावरुन खाली अंगणात जायला निघतो. त्याच्या मागे माई पण आरडत-ओरडत खाली येते. त्यांचा आवाज ऐकुन दिवाणखान्यात छाया येते अन माईलाच सांगते की आण्णा कुणाचं ऐकतील का?. कशाला आडवतेस वगैरे पण आण्णा ओसरीवर जायला लागतो तसा माई त्याचा हात पकडते अन " आयेने झाड लावला असा.. त्येका तोडु नका" असला सरपटी टाकते. आण्णा असले सरपटी आजिबात टोलवत नाही त्यामुळे तो "आऊस मेली असा" असं म्हणात दुर्लक्ष करुन नाथाला झाड तोडायची आज्ञा देतो. नाथाला मग पाटणकरीण दिसु लागते अन तो झाड तोडायला असमर्थ होतो तसा आण्णा पुढे होऊन कुर्‍हाड स्वतःच्या हातात घेतो अन् झाड तोडण्यासाठी उचलतो तेवढ्यात भयंकर वारं सुटतं अन त्याला झाडावर घावच घालता येईनासा होतो. तिकडे ओसरीत उभा राहुन हे सर्व पहाणार्‍या छायाच्या बरोब्बर मागे छताचा वासा दाण्कन जमीनीवर आदळतो. ते बघुन घाबरलेली छाया मुर्छीत होते. Uhoh

मग माई अन नाथा धावत तिथं पोचतात अन छायाला जागे करण्याचा प्रयत्न करत तिच्या खोलियेत नेतात. मग काळुराम आय मीन दत्ता तिथं पोचतो अन वासा प्रकरणाचा आढावा घेतो. माईपण त्याच्या पोराची खबरबात घेऊन तिरमिरत उठते अन देवघरात जाते अन धाय मोकलुन गार्‍हाणं घालते (तिचं ते नेहमीचं भेसुर गार्‍हाणं ऐकायला नको म्हणुन देव पण अंगावर पांघरुण ओढुन बसले की काय असं वाटतं..! Biggrin ). तेवढ्यात देवघरात चक्रीवादळ घुसतं अन गार्‍हाणं ऐकत निपचीत पडलेल्या देवांच्या उरावरचं पांघरुण अस्ताव्यस्त होत त्यातले काही देव गडगडतात. ते बघुन माईचं अवसानच गळुन पडतं (माईचं गळुन पडणारं अवसान बघणं ही एक पर्वणीच असते..! Proud ).

मगे रघुकाका येतात अन दिवाणखान्यातल्या गादीवर बसुन दत्ताला अन माईला भिती घालु लागतात. दत्ताला अमुशा कधी आहे असं विचारुन ती आठ दिवसांवर आली असं कळाल्यावर (आणि खरंच की वास्तवीक जीवनात पण पिठोरी अमावस्या ८ च दिवसांवर आलिये Uhoh ... (अरे वा..! श्रावण संपतोय म्हणायचा Light 1 (कुणाचं काय तर कुणाचं काय Uhoh ))) अजुनच घाबरवुन टाकतात तेवढ्यात सोसाट्याच्या वार्‍याने दिवाणखान्याच्या खिडक्या खाडकन उघडतात अन रघुकाकांच्या टकलावरचे उरलेले थोडे-थोडके केस पण बेभानपणे चान्स पे डान्स करुन घेतात..! Rofl .

मग रघुकाका गेल्यावर माई दत्ताला बजावत असते की अमुशेच्या आत घरातली व्यक्ती घरात यायला हवी म्हणजे दत्ताने त्याच्या बायको-पोराला लवकरात लवकर घरात आणायला हवं. (जाऊ दे ना त्या सरिताला जरा माहेरपणाला.. तेवढाच घरातला आक्रस्ताळेपणा कमी होऊन मनःशांती तरी लाभेल हे कुठं कळतंय त्या माईला..! Angry )

प्रीकॅप मधे रात्री छाया झोपलेली असताना तिला घुंगरांचे आवाज आणि कुणाचं तरी बोलणं ऐकु येऊ लागतं अन ती भितीने डोळे उघडते.. आता ती नेमकी पाटणकरीण असते की तिचं भूत हे आज कळेल. (भूत नसावं अशी आपली आशा..!)

कालच्या भागाची सुरुवात होते ते माई छायाच्या खोलीत तिच्या शेजारी बसुन काहीतरी विचार करत असताना. तेवढ्यात तिथं दत्ता येतो अन कशाची काळजी करते असं विचारतो. माई त्याच्या पोराची अन सरिताची चौकशी करुन त्यांना डोक्टरांना विचारुन १-२ दिवसात घरी घेऊन यायला सांगते अन दत्ता मागोमाग तीपण तिथुन उठते. छायाच्या खोलीयोचं दार लावत स्वयपाक घरात काहीतरी बनवण्यासाठी जाते (दार बंद झाल्यावर सगळीकडे अंधार अन फक्त झोपलेल्या छायाच्या अंगावर मंद प्रकाश पडलेला दाखवला आहे). स्वयपाक घरात ती गॅसवर काहीतरी बनवत असते त्याच वेळेस तिला मांजराचं म्यांव म्यांव ऐकु येतं अन ती थोडी चपापते.

त्याचवेळी छाया झोपलेली असताना तिला कोणीतरी हाका मारत असतं. पाटणकरीणच असावी असं परवा वाटलं होतं पण छायाने डोळे उघडल्यावर तिथं कोणीच नसतं. तरिही छाया अंगात भुत शिरल्याप्रमाणे मोकळे केस सोडुन अंधार-उजेड यांच्या खेळात मस्त पोजेस देत फोटोसेशन उरकते अन खाटेवर आक्राळविक्राळ स्वरुपात ठाण मांडुन बसते.

तोपर्यंत इकडे स्वयपाक घरात माई दत्ताला डबा भरुन देते अन एक सुरा पण त्याच्या पिशवीत घालते अन सांगते की सरिताक सांग ह्या सुरा उशीखाली ठेव म्हणजे वाईट स्वप्न पडुची नाय. मग दत्ता हॉस्पिटल कडे निघुन जातो तेव्हाच माडीवर आण्णोबा कपाटातील तीर्थाचे २ घुटके घेऊन खाटेवर आडवा होत असतो अन त्याला झोपाळ्याचा आवाज येतो - "कर्रर्रर्रर्रर्र... कर्रर्रर्रर्रर्र... कर्रर्रर्रर्रर्र..... कर्रर्रर्रर्रर्र". ते ऐकुन त्याचं मस्तक उठतं. आपल्या शिवाय दुसरं कोण झोपाळ्यावर बसलं या विचाराने तो सैरभैर होतो अन गॅलरीत येऊन विचारतो की कोण आसां..? कुणाचा जीव वरती इलंय म्हणान असा झोपाळ्यावर बसुची हिम्मत झाली. Proud . कुणीच उत्तर देत नाही अन झोपाळा पण करकरायचा थांबत नाही हे बघुन संतापाची तिडीक त्याच्या डोक्यात जाते अन भेलकांडत तो खाली येऊन माईला विचारतो की झोपाळ्यावर बसुची कुणाची हिंमत झाली आसा. पण माई त्याबद्दल अगदी अनभिज्ञता दाखवते अन ते दोघेहे बाहेर ओसरीत येतात अन बघतात तर झोपाळा जसाच्या तसा. Uhoh

मग त्यांना पांडु बाहेर चकरा मारताना दिसतो. माई त्याला विचारते की झोपाळ्यावर कोणी बसलं होतं का पण तो नाही म्हणतो अन तिचं लक्ष पाटणकरणीने टांगुन घेतलेल्या झाडावर पडतं अन ती चपापुन पांडुला सांगते की पटकन आत ये अन परसदारी जाऊन झोप आता. आण्णा पण आल्यापावली माडीवर जातो पांडबा घराचं मुख्य दार बंद करण्यासाठी दार लावू लागतो तेव्हा झोपाळा स्थिर असतो पण दरवाजा बंद केल्या केल्या तो पुन्हा हलु लागतो Proud . नेमकं त्याच वेळी माई पुन्हा स्वयपाक घरात जाऊन छायासाठी बनवलेली पेज गरम करुन ती पेल्यात भरुन छायाच्या खोलीकडे जात असते अन मागे स्वयंपाक घरात बटाट्याचं घमेलं खाली पडतं (बहुतेक मांजराचा धक्का लागला असावा..!). माई छायाच्या खोलीत येऊन बघते तर छायाच्या खोलीत कोणीच नसते ते बघुन ती भारी काळजीत पडते अन छायाला हाका मारु लागते.

इकडे वर माडीवर आण्णा खाटेवर झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला पुन्हा घुंगरांचा आवाज येऊ लागतो अन तो तिरमिरत उठुन गॅलरीत जातो. खाली बघतो तर छाया मोकळे केस सोडुन पाटणकरणीने टांगुन घेतलेल्या झाडाकडे जात असते. तो तिला हाका मारतो पण ती काही मागे बघत नाही. तो तिला थांबवायला म्हणुन गॅलरीतुन मागे फिरतो तर तिथं दारात गळाभर दागिने घालुन लालभडक अन माल कडक उभा असतो (बहुतेक आता इथुन पुढे पाटणकरीण याच वेषात बघायला मिळणार..! Uhoh ). लाडात येऊन पाटणकरीण आण्णाला सांगते की बघा त्यांनी हिला सन्मानाने वाड्यात आणलं नाही तरिही ती इथे आलीच. आता ती कायमच इथे येत राहणार वगैरे तर आण्णा तिला बाजुला व्हायला सांगतो तर तिथं पाटणकरणीच्या जागी माई उभी असते अन ती त्याला काळजीच्या स्वरात सांगते की छाया खोलीत नाय हां. मग आण्णा तिला सांगतो ती बघ छाया खाली आहे अन ते दोघे गॅलरीतुन खाली झाडाकडे बघतात तर छाया पाठमोरी उभी राहुन गळ्यात फासाचा दोर लावत असते (पोलिसांनी बहुतेक झाडावरुन फक्त मेलेल्या पाटणकरणीलाच उतरवुन नेले अन फास तसाच ठेवला की काय असा प्रश्न पडतो..! Wink ). छायाला फासाचा दोर गळ्यात घालताना बघुन माईच्या पायाखालची गॅलरी सरकते अन ती छाया.. छाया.. छाया करत तिथुन खाली पळते.. तिच्या मागुन आण्णा पण खाली येतो.

मग खाली वाड्याचे दार उघडुन माई स्लो मोशन मधे झाडाकडे पळु लागते तो सीन भारीच जमलाय (आपल्याला वाटतं छायाचा अवतार संपला.. पण सिझन १ पाहिलेले प्रेक्षक निर्धास्त असतात..! Wink ). तिच्या मागुन आण्णा पण येतो. ते दोघे छायाच्या मागे पोचतात तर छाया पाटणकरणीसारखीच केस मोकळे सोडुन मळवट भरुन फासावर लटकण्यासाठी गळ्यात दोर बांधुन दगडावर उभीच असते. त्या दोघांना छाया पाठमोरी असल्याने हे कळत नाही अन ते झटकन तिच्या गळ्यातुन दोर काढुन तिला दगडावरुन खाली उतरवतात अन तिचा मळवट बघतात आणि चांगलेच चपापतात. माई तिला घेऊन विहिरीकडे जाते अन तिचा मळवट पाण्याने धुवुन काढते. खोलियेत आल्यावर छाया माईला विचारते की तिला काय झालं होतं म्हणुन. (मला तरी हा सर्व प्रकार म्हणजे छायाने वाहत्या गंगेत धुतलेले हात वाटतो आहे.. पाटणकरणीच्या मृत्युचं भांडवल करत विधवा असतानाही कपाळावर मळवट भरण्याची हौस तिने भागवुन घेतली असावी असं तिचा एकंदर इतिहास पाहता वाटतंय Uhoh )

प्रीकॅप मधे आक्रस्ताळी सरिता माजघरातल्या खाटेवर झोपलेली असते अन उठुन बघते तर तिचं पोरगं गायब (ही बया घरात आली की घरात नुसता आरडा-ओरडा सुरु होतो.. तरी माईला सांगितलं होतं की बाई तिला माहेरपणाला पाठव जरा २-३ महिने.. Angry ). मग तिचं आराडणं ऐकुन माई खोलीत येते अन त्यांना कळतं की पोरगं नाहीय तिथं. (मला तरी वाटतं की ते पोरगं छायाने खेळवायला नेलं असेल किंवा वच्छीची पुन्हा मालिकेत एंट्री होणार असेल तर तिनेच ते गायब केलं असेल आता बघु आज नेमकं काय होतंय ते..!)

डीजे महाराज आहात कुठे ?

बहुतेक सिरीयल अंतिम वळणावर आली

आज अण्णा पोलिसांसमोर सगळ्या गुन्ह्यांची कबुली देणार

मग बहुतेक अण्णा ला जन्मठेप होणार

आणि मग अभिराम च्या लग्नापर्यंत अण्णा जन्मठेप भोगून सुटणार आणि लग्नाला घरी येणार जिथे पहिला सीझन सुरु झाला

डीजे अपडेट द्या कि !

२९ ऑगस्ट ला सम्पतेय राखेचा २ .

३१ ऑगस्ट पासून "देवमाणूस " ही सीरियल येतेय . बहुतेक वाई किंवा तत्सम शहरात गाजलेल्या हत्याकांडावर आधारित आहे जिथे डॉक्टरच खुनी होता !
https://www.firstpost.com/india/sataras-dr-death-killed-6-people-in-13-y...

३१ ऑगस्ट पासून "देवमाणूस " ही सीरियल येतेय . बहुतेक वाई किंवा तत्सम शहरात गाजलेल्या हत्याकांडावर आधारित आहे जिथे डॉक्टरच खुनी होता !>>>> हो मलाही तसेच वाटतेय.

समजा राखेचा ३ पार्ट आला ..तर काय असेल त्यात ?

माधव , छाया , दत्ता आणि पाण्डू च्या लहानपणचा काळ परत विस्तॄत पणे दाखवला तरी चालेल . खूप आवडलेली ती मुले आणि तरुण अण्णा आणि माई !

Pages