रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरलीतुभी, सरिता उभी :खिक: धन्यवाद डीजे, परत एकदा सगळं नीट सांगितलंत. माईकडून काही अपेक्षा नाहीत, ती आयत्या वेळी कोयता लावून म्हणेल, नुसता साज काय, सगळे दागिने घेऊन जा, माझा नवरा, वाडा आणि माझी मुलं हाच माझा दागिना.

@ चंपा : माईकडून काही अपेक्षा नाहीत, ती आयत्या वेळी कोयता लावून म्हणेल, नुसता साज काय, सगळे दागिने घेऊन जा, माझा नवरा, वाडा आणि माझी मुलं हाच माझा दागिना. >> :बरोबर आहे.. मला पण हीच भिती वाटतेय अवसानघातकी माईची Biggrin

@ सस्मित : असं कसं करेल माई..? ज्याच्या हातुन गळा दाबुन घ्यायला तयार झाली त्याच्या गळ्याला ती कोयता कशी काय लावेल..? Proud

त्याच्या गळ्याला कोयता लावला तर अहेवपणी मरण नाही ना येणार तिला. मला माई-अण्णाच्या मुलांची दया येते, किती वाईट वातावरण घरात, काय उपयोगाचा तो वाडा आणि दागिने जर घरात शांतता नाही. नशीब माई तरी चांगली आहे.

नशीब माई तरी चांगली आहे.>> अगदी खरंय.. जर माई पाटणकरणी सारखी असती तर चारी पोरं उकीरड्यावर फेकावी लागली असती अन नानाला सावंतवाडीच्या स्टँडवर 'दे ग माय' करत बसावं लागलं असतं.

नाना खय आसत सध्या?>> तां पांडुक इचारुक व्हया.. Proud
पांडु, नानाचो डायलाग लिवुचा इसारला असात असां माका वाटताहा..? लय दिवस झाला वच्छी अन आबा पन वाड्यार नाय येतले.. खंय जातले काय माहित..!

नाना कोण. अण्णाचे भाऊ का.>> नाही. वडील आहेत ते.

कालचा भाग पुन्हा एकदा धुमशान झाला. रात्री निजानीज करण्याच्या टायमाला सरिताने पाटणकरणीला माईचा साज घालुन बावीकडे जाताना पाहिले होते. घरात येऊन तिने ते सारे तिखटमीठ लाऊन झोपण्याच्या तयारीत असणार्‍या माईला सांगितले तशी माई ताडकन उठुन बावीकडे गेली. पाटणकरीण पाण्याने भरलेली कळशी शेंदत असताना नाईकांच्या वाड्याची वाताहत करण्याबद्दल विचार करत असते. शेंदलेली कळशी हंड्यात ओतण्यासाठी ती मागे वळणार तोच माई तिच्या हातातली शेंदलेली कळशी पुन्हा बावीत टाकते आणि खस्सकन कोयता तिच्या गळ्याला लावते. यावेळेस माईने रुद्रावतार एकदम झक्कास जमवलाय. शेंदलेली कळशी पाण्यात धप्पकन पडते आणि रहाट जोरात उलटा फिरतो तेव्हा रहाटाचा भिजलेला दोर गर्रगर्र फिरताना त्यावरील पाण्याचे थेंब वर्तुळाकार उडताना लाईटच्या उजेडात असे भारी चमकलेत ना की त्याला तोड नाही. माईच्या हातातील कोयता गळ्यावर फिरतो की काय या विचाराने पाटणकरणीची भंबेरी उडते. "ताई-ताई" म्हणत "हे असं काय करता?" वगैरे विचारत पाटणकरीण माईला चुचकारण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र माई हातातला कोयता नाचवत तिला तिची जागा दाखवुन देते. "तुका काय व्हया..? साज व्हया..? मोहनमाळ व्हयी..? नथ व्हयी..? पाटल्या व्हया..?? काय व्हया तुका माका सांग.. माझ्या संसाराक नजर लावशान तर (कोयता पाटणाकरणीच्या डोळ्यासमोर टोकत) हे डोळे फोडुक ठेवीन. (नंतर तिच्या गळ्यावर कोयता ठेवत) परत माझ्या बावीत पाणी भरुक येशीन तर तुझ्या गळ्यात्सुन रक्ताचो पाट व्हातील...!" असं सांगुन तिला पाणे भरण्यास आजन्म बंदी घालते.

घाबरलेली पाटणकरीण तिथुन निसटुन घरी येते आणि आण्णाच्या चपलाचा आवाज येताच रडण्याचं नाटक करु लगते. आण्णा लगेच तिची विचारपुस करायला तिच्या घरी हजर. माईचं गार्‍हाणं गाऊन तिनं आण्णाला सगळे दागदागिने तिच्यासमोर आणुन ठेवण्याची तजवीज करुन ठेवते. आण्णा रागावैतागात घरी जाऊन तिजोरी उघडुन बघतो तर ती रिकामी Proud (माईने ती आधिच रिकामी करुन सगळा मुद्देमाल स्वतःच्या कपाटात कुलुपबंद केलेला असतो Proud ). रिकामी तिजोरी बघुन आण्णा "इंदो... इंदो.." करुन आण्णा घर डोक्यावर घेतो तेव्हा माई जसं काही घडलंच नाहीच्या अविर्भावात तिला काही माहीत नाही असं दाखवते. पण तिच्या मगोमाग आण्णा खाली येतो आणि कपाटाचं कुलुप नीट बसलं आहे का हे बघणार्‍या माईच्या कृतीवरुन सगळ मुद्दीमाल तिथं आहे जाणतो. माई मात्र त्याला तिचा हक्क आणि कर्तव्य काय आहे ते अजुन एकदा ऐकवते आणि घरातल्या इतरांना इथुन पुढे पैशाची/दागदागिन्याची सर्व जबाबदारी तिने घेतली असल्याचे सांगत तिच्या परवानगीने सर्व व्यवहार चालतील हे सांगते.

नंतर आण्णा झोपलेला असतो. रात्री त्याला घुंगरांच्या आवाजाने जाग येते. उठुन पहातो तर तिजोरीच्या दाराच्या फटीतुन उजेड येतोय. म्हणुन तो भेलकांडत तिजोरीजवळ जातो आणि तिजोरी उघडातो तर सगळा मुद्देमाल तिथे असतो आणि तिथं एक बाईचं मुडकं ठेवलेलं असतं जिचा चेहरा दुसर्‍या बाजुला असतो.. आण्णा ते मुंडकं हातात घेतो आणि बघतो तर काय ते पाटणकरणीचं असतं Uhoh (ते खोटं मुंडकं पाटणकरणीचं आहे असं दाखवता आलेलं नाही.. त्यापेक्षा जरा जास्त कष्ट घेऊन खर्‍या पाटणकरणीचं दाखवायला हवं होतं...!) बहुतेक माईने पाटणकरणीचं मुंडकं धडावेगळं केलं असं आण्णास स्वप्न पडलं असावं असं वाटतंय.. आज काय ते नक्की कळेल.

प्री़कॅप मधे पोष्टेकाका पाटणकरणीच्या घरात चहा पीत असतना आण्णा पाण्याची कळशी घेऊन तिथं आलेला दाखवला आहे. पाटणकरणीच्या घरी आण्णा पाणी भरतो हे बघुन त्याला जाम आश्चर्य वाटतं. गावात हे कुणाला कळु नये म्हणुन आता आण्णा पोष्टे काकाला मारतो का हे आज कळेल.

डीजे तुम्ही किती तपशिलात लिहिलंय, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. नशीब माईला दागिने हवेत आणि तिने आयत्या वेळी कच न खाता आणि आदर्शपणाच्या गोष्टी न करता काहीतरी धमकी दिली. कुलूप तपासून माती खाल्ली शेवटी पण ते ठीके, काहीतरी ड्रामा हवाच.

नशीब माईला दागिने हवेत आणि तिने आयत्या वेळी कच न खाता आणि आदर्शपणाच्या गोष्टी न करता काहीतरी धमकी दिली.>> अहो पण अंगात राग भरला असताना, हातात कोयता असताना, शरिरात २-४ जणांना लोळवायची शक्ती असतानाही माईने फक्त ४ गोष्टी सुनावत पाटणकरणीला सोडुन दिले.. तिच्या गळ्यात असलेला साज पर्त घ्यायची सुद्धा बुद्धी आपल्या माईस झाली नाही : ३-४ तोळ्याचा तरी सहज असेल बघा तो साज Uhoh

मी काल म्हटल्याप्रमाणं आण्णाला स्वप्न पडलं होतं की पाटणकरणीचं मुंडकं त्याच्या तिजोरीत आहे. म्हणुन पाटणकरीण ठीक आहे का ते बघायला तो तिच्या घरी जातो आणि ती त्याचा यथेच्छ अपमान करते. बाहेर दत्ता लाकडं फोडत असताना बापाचा अपमान ऐकतो आणि पाटणकरणीला दम टाकतो पण आण्णा दत्तालाच गप्प करतो त्यामुळे व्यथित होऊन दत्ता घरात जातो तर माधव त्याला 'हो...हो..' करुन समजावतो. त्यानंतर पाटणकरणीने सांगितले म्हणुन आण्णा २ कळशा घेऊन बावीवर पाणी भरण्यासाठी जातो व कुणी पाहत तर नाही ना असं बघुन चोरुन पाणी भरायला लागतो. नेमका हा प्रकार माई परसदाराच्या फटीतुन पहाते आणि कसनुसं तोंड करत धिक्कार असल्याचा अभिनय करते (कालच्या भागात एवढंच काम होतं माईला..!)

कालच्या भागात पोष्टेकाका अचानक रोडसाईड वेट लिस्टेड तिकिट कन्फर्म होऊन गेले सुद्धा..! Uhoh (खुप दिवसापासुनची इच्छा अचानक पुर्ण झाली Proud ). ते पाटणकरणीला सुषमाचं पत्र देऊन तिच्या घरी पाणी भरण्यास आलेल्या आण्णाच्या हातुन पाणी पितात. वर मानभावीपणे आण्णाबद्दल गावात काय बोललं जातं पण आण्णा कसे शेजार्‍यांना पाणी भरुन मदत करतात अशी स्तुती करतात (ही स्तुतीच पोष्टेकाकांना मृत्युच्या कराल दाढेत घेऊन जाते.. आण्णाने पाटणकरणीच्या घरी पोष्टेकाकांदेखत झालेल्या अवहेलनेचा वचपा काढुन अक्षरशः कुत्र्याच्या मौतीने त्यांना मारले..). जाण्याआधी पोष्टेकाका यथेच्छ फुटेज खाऊन गेले. गावातील सर्वांना त्यांची त्यांची पत्रे पोचवली. याची पत्रे त्याला अन त्याची पत्रे याला झालेला घोळ निस्तरला. शेवटी आण्णाने त्यांना सुनसान जागी गाठुन जंगलात नेले. स्वतःची कुत्र्यासरखी झालेली अवहेलना पोष्टेकाकाने पाहिली म्हणुन पोष्टेकाकाला कुत्र्यासारखे उकिडवे बसवुन रुमालाच्या वळीने गळा आवळुन त्यांचा खून केला Uhoh

प्रीकॅप मधे आण्णाने पोष्टेकाकाचं कलम परसदारी लावलंय आणि कुणालाही त्याचा थांगपत्ता नाही. पांडु मात्र ते कलम बघतो आणि माईस सांगतो मग माई आण्णाला जाब विचारते की आता कुणाचं कलम लावलं ते तिका कळुकच व्हया. पण आण्णा तिला दरडावुन बोलतो की तिच्या कुणा सग्यासोयर्‍यांचं तर लागलं नाही ना.. ? मग तिने गप्प बसावं..! Uhoh

नेमका हा प्रकार माई परसदाराच्या फटीतुन पहाते आणि कसनुसं तोंड करत धिक्कार असल्याचा अभिनय करते (कालच्या भागात एवढंच काम होतं माईला..!)>>>>>>> Rofl

पोस्टमन काका गेले? Sad हे होणारच होते. कारण कर्ता करविता पांडु व निर्माता. पहिल्याच भागात भुतां मध्ये पोस्टमन काका होते का? कारण पहिला भाग आठवत नाही. पाहीन नंतर.

धन्यवाद डिजे, तुमच्या मुळे समग्र माहिती कळते, अकरण आजकाल सिरीयल पहायला अजीबात वेळ नाही.

पहिल्याच भागात भुतां मध्ये पोस्टमन काका होते का? >> हो रश्मी.. वैनी. पोष्टेकाका होते. आता चोंट्याचा नंबर.

पण पोष्टे काका आता लवकरच निवृत्त झाले असते आणि अण्णाला दिसलेही नसते. लाज वाटावी अशी कामं करतोच कशाला तो अण्णा Angry

डीजे तुम्ही छान लिहीता रोज.. मालिका पाहिली नाही तरी चालतेय त्यामुळे Happy धन्यवाद!

लाज वाटावी अशी कामं करतोच कशाला तो अण्णा Angry
>> त्यांच्या निर्लज्जपणामुळे २ सिझन झालेत सिरियलचे Lol

मालिका पाहिली नाही तरी चालतेय त्यामुळे Happy धन्यवाद!>> अहो नीलाक्षी, असं पहाणच बंद कराल तर टी आर पी कमी होऊन मालिका बंद पडेल. Uhoh

लाज वाटावी अशी कामं करतोच कशाला तो अण्णा Angry
>> त्यांच्या निर्लज्जपणामुळे २ सिझन झालेत सिरियलचे Lol >>>> Biggrin

अण्णाचा राग आला काल . वड्याचं तेल वांग्यावर काढलं अण्णानं ...
अपमान करत होती शेवन्ता आणि निष्कारण बळी मात्र गेला पोस्टमन काकाण्चा !

जाऊद्या ना... बरंच झालं एकदाचा गेला ते. वात आणला होता त्याने माईला. कितीतरी दिवसांपासून पोष्ट्याच तिकीट वेट लिस्टेड होतं. गेला ते बरंच झालं... लोचट. याची पत्रे त्याला अन् त्याची याला करून फुकट चहापाणी करत होता. Biggrin

नुसतं चहा पाणी नाही, खायलाही देत होते लोक थालीपीठ वगैरे Wink बघायला त्यावेळेस घरी असलो तर, रिपीट तर दाखवतच नाहीत Angry

नुसतं चहा पाणी नाही, खायलाही देत होते लोक थालीपीठ वगैरे >> हो तर. पाटणकरणीने जळक्या थालीपीठ सोबत चहा दिला होता एकदा. बाकी माईकडून किती लिटर चहा उकळवला असेल ते रवळनाथाला ठाऊक. अधेमधे लाडू काय चिवडा काय आणि परवा तर सोन्याचं वेढणं Uhoh

अहो चंपा, रिपीट टेलिकास्ट नाही म्हणून तर पहिल्या पाचात टी आर पी आहे.

मी तर पहिले डि. जें चा प्रतिसाद / आढावा वाचतो आणि मग निवांत झी५ वर बघतो. Wink
>>प्रीकॅप मधे आण्णाने पोष्टेकाकाचं कलम परसदारी लावलंय .......................... गप्प बसावं..!<< हे वाचताना काल प्रीकॅप मधे हे मी वाचलचं नाही आणि एपिसोड पाहिला, आणि पोष्टे काका गेलेत मग एपिसोड च संपला.... मी मनात म्हण्टलं अरे माई, पांडु तर दिसलेच नाही, डि जें ना काय भविष्य कळला काय, रवळनाथास ठाउक !!! Lol

मी मनात म्हण्टलं अरे माई, पांडु तर दिसलेच नाही, डि जें ना काय भविष्य कळला काय, रवळनाथास ठाउक !!!>> Biggrin हो ना.. झी ५ वर प्रीकॅप दिसत नाही ना. Bw
***********
कालचा भाग पोष्टेकाकाच्या भुताने खाऊन टाकला. आण्णा पोष्टेकाकाला दिगंतरी एक्स्प्रेसचे कन्फर्मड तिकिट देऊन रात्री घरी येतो तेव्हा बाहेर उभा राहुनच पाटणकरणीच्या घराकडे बघतो. नेमकी त्याच्वेळी पाटणकरीण बाहेर येते आणि आण्णाला बोलावते. आण्णा मात्र तिच्या बोलावण्याकडे दुर्लक्ष करुन नाथाला हाका मारतो तशी पाटणकरीण फणकार्‍याने पिछेपमुड करुन दणकन दरवाजा बंद करते (कालच्या भागात पाटणकरणीला एवढंच काम होतं..!) आण्णाचा नाथाला हाका मारण्याचा आवाज ऐकुन माई ओसरीत येते पण आण्णाचं तिच्याकडे लक्ष जात नाही कारण त्याचवेळेस नाथापण घरामागुन येतो. आण्णा नाथाला कुणालाही ऐकु जाणार नाही अशा आवाजात काहीतरी सांगतात (पोष्टेकाकाला दिगंतरी एक्स्प्रेस मधे व्यवस्थीत बसवुन दे वगैरे वगैरे असं काहिसं असेल..!) तसा नाथा चांगलाच चपापलेला दिसतो. माईला काही ऐकु जात नाही पण नाथाला काय सांगितलं असेल असा विचार करत ती घरात जाते.

सगळे जेवायला बसलेले असतात. छाया माईला जेवायला सांगते पण ती म्हणते तुम्ही घ्या जेऊन मी नंतर बसते. मग माईने आण्णासाठी जेवायला का थांबु नये याची कारणे छाया, सरिता, दत्ता सारेच ऐकवतात तेवढ्यात आण्णा झुलत तिथं पोचतो. माई त्याला ताट वाढुन देते (काल फक्त भात्+आमटी+दुधी भोपळ्याची सुकी भाजी एवढाच स्वयपाक..! Uhoh ) आणि आण्णाला पोष्ट्याला मारलेलं आठवुन जेवण नीट जात नाही. कसेबसे ४ घास नरड्याखाली उतरवुन ताटात भदंभर खरकटं टाकुन आण्णा उठुन जातो आणि ते बघुन सर्वांना (आपल्यासहीत) शिसारी येते.

त्यानंतर आण्णा माडीवर झोपलेला असतो आणि कॅमेरा चालत चालत त्याच्या चेहर्‍यापर्यंत येतो. कसल्याशा आवाजाने आण्णा दचकुन उठतो आणि खाटेखाली बघओ तर तिथे पोष्ट्या पडलेला असतो. रात्रीस खेळ चाले२ चं पेटंट म्युझिक वाजतं आणि आण्णा पोष्ट्याला ओढत ओढत परसदारी घेऊन जातो आणि पुन्हा माडीवर येऊन झोपतो. पुन्हा ते रात्रीस खेळ चाले२ चं पेटंट म्युझिक वाजतं आणि आण्णा पोष्ट्याला ओढत ओढत परसदारी घेऊन जातो आणि पुन्हा माडीवर येऊन झोपतो. असं २-३ वेळा होतं आणि मग सकाळ होते.

सकाळी सकाळी परसदारी पांडुला आंब्याची ३-४ कलमं लागलेली दिसतात. ती बघुन तो माईला हाक मारतो. ती कलमं बघुन माई चपापते आणि दत्ताला बोलावते. मग कलमं कुणी लावली यावर खल होतो. दत्ता पांडुची जुगलबंदी जाम हसवते. मग माई दत्ताला सगळी कलमं उपटायला लावते पण त्याखाली काहीच सापडत नाही. हे सर्व माडीवरुन आण्णा पहात असतानाच माई मागे येऊन उभी राहते आणि कुणाचं कलम लावलं हे तिका कळुकच व्हया असं विचारते. तेव्हा आण्णा तिला तिच्या नात्यातलं कोणी गायब झालंय का..? नाही ना..? मग गप्प बस असं सुनावतो.

त्यानंतर सरिता तिच्या खोलीत डोक्यावर मूठ आपटत बसलेली असते. दत्ता येऊन विचारपुस करतो तेव्हा ती नेहमीच्या शैलीत आक्रस्ताळेपणा करत वाद घालते. मग दत्ता तिला म्हणतो की चल बाहेर जाऊ. ते दोघं रस्त्याने चालत असतात त्याच रस्त्यावर काही अंतर पुढे २ बायका चालत असतात. त्यातील एकीला १ नंबर लागते म्हणुन ती थोडी झाडीत बाजुला जाते तर तिथे झाडाखाली पोष्ट्या बसलेला असतो. त्याला पाहुन ती बाई चिडते आणि तिथुन निघुन जायला सांगते. पोष्ट्या काही जागचा हालत नाही. मग ती बाई त्याला दगड मारते तसा पोष्ट्या कलंडतो. मेलेला पोष्ट्या बघुन त्या बाईची १ जिथल्या तिथे थिजते आणि ती ओरडत मुख्य वाटेला येऊन सोबतच्या बाईला 'चल लवकर' म्हणुन पळत निघुन जाते. मग आपले दत्ता सरिता ती बाई का पळाली म्हणुन झाडीत जाऊन बघतात तर त्यांना मेलेला पोष्ट्या दिसतो. ते बघुन सरिता जोरात बोंब ठोकते (ही सरिता मोकळी कधी होणार कुणास ठाऊक...! Uhoh )

प्रीकॅप मधे चोंट्या आणि पाटणाकरीण पोष्ट्याला कुणी मारलं असं विचार करत असतात आणि त्यांना आण्णानेच असं केलं असावं यावर पक्का विश्वास असतो. तेवढ्यात पोलिस आण्णाच्या घरापुढे येतात आणि पोष्ट्याच्या खुनाची बतावणी करतात.

>> मेलेला पोष्ट्या बघुन त्या बाईची १ जिथल्या तिथे थिजते आणि ती ओरडत मुख्य वटेला येऊन सोबतच्या बाईला 'चल लवकर' म्हणुन पळत निघुन जाते<< डि जे तुम्हल साष्टांग नमस्कार आहे राव Lol हसुन हसुन मेलंय मी.

Biggrin

मला वाटतं हाच या मालिकेचा यु एस पी आहे. जसं आहे तसं जीवन दाखवण्याचं धाडस फक्त या मालिकेत आहे. माईला परातीत भाकरीचं पीठ मळताना दाखवलेलं म्हणा किंवा वच्छीला मासे कापुन तळताना दखवलेलं म्हणा किंवा सरिताला रोज नवनवीन भाज्या निवडताना दाखवलेलं म्हणा किंवा सरिता+दत्ताला एस.टी. मधे प्रवास करताना दाखवलेलं म्हणा किंवा पाटणकरणीला आंघोळ करताना दाखवलेलं म्हणा किंवा काल त्या बाईला १ ला बसताना दाखवलेलं म्हणा सगळं कसं रीअल वाटतं. पात्रांच्या तोंडची भाषा आणि त्यात तो भला मोठा वाडा. किती खरेपणा आहे या मालिकेत.

हाच खरेपणा मिसेस मुख्यमंत्री मधे पण डोकावतो. बाकी मानबा, अग्गंबाई, माहोका, तुजीरं निव्वळ फालतुपणा वाटतो. होक्की नाही..??

अगदी बरोबर डि जे !!! बाकी पोष्टेकाका तिकिट confirm झाल्यावर ही भारी चेहरा करुन होते की... खरोखर त्या बाई कडे लोचटासारखे बघ्ताहेत असं वाटलं Lol Lol Lol

लोचटच होता पोष्ट्या. म्हणुन तर मला जाम राग यायचा. काम गेलं तेल लावत पण सगळ्यांच्या घरी चहापाण्याला हजर. वर पर्स्नल चौकशा करुन वात आणायचा. अ‍ॅक्टिंग तर चार चांद. पोस्तमन आहोत तर त्याच्या प्रमाणे वागावं ना.. पण नाही. आता तुम्हीच सांगा, कुत्र्याच्या मौतीने मेल्यावर देखील कोण हसरा चेहरा करुन वावरेल..?? अगदी मेल्यावर देखिल ओव्हरॅक्टिंग सुटली नाही बिचार्‍याची Angry

मला तर हे सर्व एपिसोड बघून खूपच किळस वाटली. ती सरिता पण दागिन्याच्या दागिन्यासाठी कोयत्याने गळाचिरून दागि ना घेउन आली असती म्हणते. कोकणची माणसं साधी भोळी, गळ्यात त्यांच्या भरली शहाळी वगैरे फक्त कवि कल्पना आहे हे समज ले. आता कोणी कोकणी दिसला तर मी रस्ता बदलून निघून जाते.

कोक णात ला माल पण खायला आता कसे तरी वाटू लागले आहे. कोणत्या शेतात कोणत्या कलमाखाली कोणाला पुरले असेल असे वाटून कसे तरी होते. युपी च्या वरताण क्रिमिनॅलिटी आहे.

Pages