घराला दक्षिण दरवाजा नसावा का?

Submitted by Cuty on 8 March, 2020 - 07:11

रेंटवर फ्लॅट बघत आहोत. दोन फ्लॅट पसंत पडले आहेत. मला जो जास्त आवडला तो फ्लॅट नवरोबांना नकोय. कारण त्याचा दरवाजा दक्षिणेला आहे. दोन्ही फ्लॅटचे किचन उत्तरेला आहे. कोणी मार्गदर्शन करू शकेल काय? बरं फ्लॅट अर्जंट हवा आहे. दोन्हीपैकी कोणता घ्यावा?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची वास्तूशास्त्र या प्रकारावर किती श्रद्धा आहे यावर ते अवलंबून आहे. जो उभयपक्षी सोयीचा आहे तो घ्यावा!

मी २२ वर्षे दक्षिणेकडे दार आणि उत्तरेकडे स्वयंपाकघर असलेल्या फ्लॅट मध्ये राहिलो.
अगदी आरामात राहीलो. (तसा कुठल्याही दिशेला दार / स्वयंपाकघर असले तरीही राहिलो असतो, ही गोष्ट वेगळी.)

तरी घाटपांडेंच्या सल्ल्याला अनुमोदन.

दक्षिणेला घराचं दार असेल तर दारावर आतील बाजूस गणपतीचा फोटो आणि समोरच्या बाजुस मारुतीचा फोटो लावावा असा सल्ला एका ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील एका सदस्याला दिला होता. ते त्या घरात गेली 20 वर्षे रहात आहेत आणि काही प्रॉब्लेम झाला नाही. बेसिकली दारातुन आत येणाऱ्या सो कॉल्ड नेगेटिव्हिटी / आजारपण इत्यादींना मारुतीच्या फोटोनी अटकाव होतो असा विचार त्यामागे होता. मारुतीचा फोटो मात्र तरुण आणि शक्तिमान असावा असाही उपसल्ला होता. कधीकधी वृद्ध मारुतीचा फोटो सुद्धा असतो पांढरी दाढी असलेला तो नसावा. बाकी प्रत्येकाची श्रद्धा!

दक्षिणेला दार आणि उत्तरेला स्वयंपाकघर अशा घरात मी १५ वर्षे रहात आहे. थंड प्रदेश, हिमवर्षाव या कारणास्तव आम्हाला ड्राईववे दक्षिणेला येइल असे हवे होते. मोठ्या खिडक्या दक्षिण आणि पूर्वेला जास्त असल्याने, भरपूर उन्हामुळे थंडीत घर उबदार रहाण्यासाठी मदत होते. फक्त दाराचा विचार करु नका. तुम्ही कुठे रहाता त्यावर खिडक्या कुठे येतील, उन्हाने घर कसे तापेल तेही विचारात घ्या. भारतात माझ्या आईकडे मोठ्या खिडक्या, बाल्कनी यातून फारसे ऊन येत नाही आणि उन्हाळ्यात कमी त्रास होतो, तेच समोरच्या फ्लॅटमधे खूप ऊन येते आणि त्याचा उन्हाळ्यात फारच त्रास होतो.

माझं सगळं बालपण दक्षिणमुखी दरवाजा असलेल्या असलेल्या घरात गेलं. आणि ते दिवस माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस होते. आजही ते दिवस आठवले की मन प्रसन्न होतं.

दक्षिण आणि पश्चिमेला दारे खिडक्या असल्यास वारा खूप मिळतो पण खोल्या तापतात फार.

दक्षिण आणि पूर्वेला दारे, खिडक्या बाल्कनी, खोल्या असल्यास सकाळचे ऊन मिळते आणि फ्लँटच्या बाहेर लगेच डिटीएच डिश बसवता येते. सर्व सटेलाईटस आग्नेय (दक्षिण-पूर्वैस आहेत. (अन्ड्राईड टिविला तसा फरक नाही पडत म्हणा.)

हैदराबाद साईडला फ्लाट हे बजेट आणि वास्तूप्रमाणेच विकले जातात, तुमचा विश्वास वास्तुशास्त्रावर असो वा नसो,ते फ्लाट पुन्हा विकताना अडचण येते. तुम्हाला रेंटवर फ्लॅट हवा असल्याने ती अडचण नाही। काहीही होत नाही.
कित्येकांनी दक्षिणेकडची दारे बदलून घेतल्याची उदाहरणे पाहिलीत पण लगेच त्यांच्या आयुष्यात टेकओफ झालेला दिसला नाही.

ज्या घरात चवीचा स्वयंपाक बनवता येणारे आणि कोणत्याही परिस्थितीत घराचे घरपण ढळू न देता आनंदात राहणारे लोक असतील त्या घराचा दरवाजा आणि किचन कोणत्याही दिशेला असले तरी काही फरक पडणार नाही हे वास्तव आहे.

सर्वांना मनापासून धन्यवाद.
होळीच्या दिवशी दोन्हीपैकी एक फ्लॅट फिक्स करून अॅडव्हान्स देणार आहोत. अजून पक्का निर्णय घेतला नाही.
तोपर्यंत अजून कोणाचे अनुभव, सल्ले असतील तर आवर्जून सांगा. होळीच्या दिवशी कोणता फ्लॅट घेतला ते सांगेनच.

द्क्षीण दिशा ही मृत्युशी संबंधित आहे असे समजले जाते. यमाशी संबंधित. मृतदेहाचे पाय दक्षिणे कडे ठेवतात. ह्या सर्वावर श्रद्धा असल्यास बघा. पण कोणतीच दिशा अशुद्ध नसते. पण ह्या सिलेक्षन इशू वरून रोज भांडणे होणार असल्यास घरात अशांती आपोआपच येइल . म्हणून दोघांनी विचार विनीमय करून निर्णय घ्या. अजून फ्लॅट बघा. मॅजिक ब्रिक्स वगिअरे साइट वर आपल्याला हवा तो फिल्टर लावता येतो व फोन वरून एजंटला स्पेसिफाय करता येते. मी मुंबईत दोन घरे बदलली रेंटवर पण कधीच हा विचार डोसक्यात आला नाही. मला तर सर्व पृथ्वी ग्रह व ग्रहमालाच शुभ वाट्ते . घरात शावर नीट हवा व वाय्फाय घर भर हवे दारे बंद व्हावीत इतके साधे क्रायटेरिआ आहेत माझे.

घरात चवीचा स्वयंपाक बनवता येणारे आणि कोणत्याही परिस्थितीत घराचे घरपण ढळू न देता आनंदात राहणारे लोक असतील त्या घराचा दरवाजा आणि किचन कोणत्याही दिशेला असले तरी काही फरक पडणार नाही ...+७८६

दारूचं दुकान वास्तू पाहून केल्याचं पाहिलं नाही पण चालतात भरपूर. जेव्हां पहावं तेंव्हा गर्दी असतेच.

मनात किंतु आलेला आहे. तेव्हा नका घेउ तो फ्लॅट. काही निर्णय इर-रिव्हर्सिबल असतात. फ्लॅट खरेदी हा मोठा निर्णय त्याच प्रकारचा आहे. मनात किंतु आअलेला आहे तेव्हा नका घेउ तो फ्लॅट. त्रिवार नका घेउ. काहीही फुसकट झालं तरी मग मनात येत राहील - पहा वाटलं नव्हतं!!!

Samoshi sahamat.Jar manat kintuu ala asel tar to flat rent ne ka hoina gheu naka.

जर तुमची या दक्षिण दरवाज्यावर ठाम श्रद्धा असती तर तुम्ही धागा काढलाच नसता.
म्हणजे आपण ठाम विश्वास नसणारे आहात.

आता एखाद्या अतार्किक गोष्टीवर श्रद्धा नसणारया लोकांमध्येही ढोबळमानाने तीन प्रकार असतात.

एक ज्यांना उगाच विषाची परीक्षा घ्यायची नसते.

तर एक माझ्यासारखा स्वभाव असतो की आता मी हे खोटे पाडायला मुद्दामच त्याच्या उलटे करणार.

आणि एक तिसरा प्रकार असतो जो बहुधा तुमच्या केसमध्ये असावा..
तळ्यात मळ्यात !

त्यामुळे पहिला सल्ला माझाही हाच असेल,
एकदा डोक्यात किडा आला ना.....
तर मग आता नका घेऊ तो दक्षिणदरवाजा फ्लॅट..
कारण आपल्या आयुष्यात चांगले वाईट दोन्ही घडत असते. पण एकदा का डोक्यात असला किडा आला की तुम्ही वाईटच मोजाल आणि त्या वाईटाला कळत वा नकळत या दरवाज्याला जबाबदार धरत आणखी मन:शांती घालवून बसाल.

पण आपला फ्लॅट रेण्टचा आहे. तशीच वेळ आली तर बदलू शकता. आताची नड महत्वाची आहे. आतापर्यंत आलेल्या प्रतिसादात कोणीही यामागचे फार भारी शास्त्रीय कारण सांगितलेले नाहीये. तर यावर विश्वासून आपण बिनधास्त ते घर घेऊ शकता हाच फायनल सल्ला मी देईन.

माझा फारसा विश्वास नाही. पण पुढेमागे काही बरेवाईट प्रसंग आले तर नवर्याच्या डोक्यातून तो किडा काढणं अवघड होईल.
मग त्यापेक्षा मीच थोडी गैरसोय सोसावी असा विचार करत आहे. मुलं काय कुठेही खुश असतात.

अंधश्रद्धा अशीच वाढत जाते/ चिरस्थायी होते.

उदा. ग्रहणात गरोदर बायकांनी बाहेर गेल्यास गर्भावर परिणाम होतो. कोणतीतरी भंपक बाई बोलून जाते मग मुलीची आई किंवा सासू "उगाच विषाची परीक्षा कशाला घ्या" म्हणून मुलीला बाहेर पाठवत नाही.
आणि मग ती मुलगी आपल्या मुली किंवा सुनेमध्ये हाच वाद पुढे नेते आणि अंधश्रद्धा दृढ होत जाते.

सुबोध खरे आपले म्हणने एकदम खरे आहे.
पर ये ह्युमन सायकोलॉजी बडी कुत्ती चीज होती है, अपनों को खोने के डर से तडपणेवाले ईस दिल को समझाये भी तो कैसे...
एकदा एका लंचब्रेकमध्ये आमच्या ऑफिसमधील बायका गाडीला लिंबू लावणारयांची अक्कल काढत होत्या.
मी म्हटले तुम्ही घरी मुलांची नजर नाही का काढत?
तर ईथेही त्या माझीच अक्कल काढून गेल्या Happy
आईचे काळीज आहे, कोण शिकवणार श्रद्धा अंधश्रद्धा.
आमचा दरवाजा दक्षिणेला आहे काही फरक पडत नाही असे म्हणणारयांमध्येही देव्हारा दिशा बघून स्थापन केलेले भेटतील Happy

@ धागा ऊत्तम निर्णय
ऐकावे जनाचे करावे मनाचे.. हे ईथे लागू होते !

हो पण हेच लोक उत्तरेकडे (की पूर्वेकडे?)दरवाजा असलेले घर *लाभत नसले* तरी ते मात्र बदलण्याचा विचार करत नाहीत

काही बरं वाईट झालं तरी घराची दिशा हे कारण मनात येत नाही कारण योग्य दिशा बघून घर घेतलेलं असतं.
Cuty, योग्य निर्णय! एकदा किंतु आला की मग नकोच.

रेन्ट कोण देणारे?
एकटा नवराच देणार असेल तर त्याची जी निवड असेल तो फ्लॅट घ्या.
दोघ शेअर करणार असाल आणि इतर कोणत्याच प्रकारे सहमती होत नसेल तर चिठ्ठ्या टाकून निवड करा. मुलगा 2 वर्षांचा आहे ना? त्याला उचलायला सांगा चिठ्ठी.

(अवांतर- राजसी, भेदभाव नव्हे, बाई कमावणारी नसेल किंवा खर्चात भागीदार नसेल तर तिचं मत विचारात घेऊ नये असं म्हणायचं असणार अ‍ॅमीला. टिपीकल आहे हे)
इथे अनेरिकेत सुद्धा दक्षिणमुखी घर घ्यायचं नाही हे फारच वाढत चाललं आहे. ५ पैकी तीन लोकं अशी घरं टाळतात. पर्सनली माझा विश्वास नसल्यामुळे त्याचे फायदे तोटे वगैरे कल्पना नाही.

ॲमी, राजसी यांना +१
क्यूटी, ज्या घरात गेल्यावर छान vibes येतात ते घर घ्यावे. तुम्हाला शुभेच्छा!

Pages