Submitted by Cuty on 8 March, 2020 - 07:11
रेंटवर फ्लॅट बघत आहोत. दोन फ्लॅट पसंत पडले आहेत. मला जो जास्त आवडला तो फ्लॅट नवरोबांना नकोय. कारण त्याचा दरवाजा दक्षिणेला आहे. दोन्ही फ्लॅटचे किचन उत्तरेला आहे. कोणी मार्गदर्शन करू शकेल काय? बरं फ्लॅट अर्जंट हवा आहे. दोन्हीपैकी कोणता घ्यावा?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
अभिनंदन!
अभिनंदन!
Hearty congratulations
Hearty congratulations
अशावेळी दर प्रसंगाने माणसाचे
अशावेळी दर प्रसंगाने माणसाचे मनोधैर्य कमी होत राहते. मग कधीतरी कुतूहल म्हणून अशा शास्त्राकडे माणूस आकर्षित होतो आणि दर प्रसंगाने वाढत त्याचा प्रवास अंधश्रद्धेपर्यंत होतो. >>
अभिनंदन.
अरे वा! उत्तम!!
अरे वा! उत्तम!!
घराचे आरक्षण केल्याबद्दल अभिनंदन.
हा दक्षिणमुखी फ्लॅट आपल्याला लाभेलच याची खात्री आहे मला
जाता जाता- आपला लेख वाचून सहज विचार केला असता माझा दवाखाना दक्षिणमुखी आहे हे पहिल्यांदा मला जाणवले (आतापर्यंत मी तसा विचारच केला नव्हता). पण गेली 10 वर्षे माझा व्यवसाय उत्तम चालला आहे.
उत्तम आणि समंजस निर्णय
उत्तम आणि समंजस निर्णय
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा,
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा, क्यूटी.
माझं घरही दक्षिणाभिमुखच आहे.
उत्तम निर्णय आणि त्यासाठी
उत्तम निर्णय आणि त्यासाठी अभिनंदन क्यूटी! नवीन घरासाठी शुभेच्छा..
अभिनंदन cuty जी
अभिनंदन cuty जी
स्वतःचं घर घेताना दक्षिणमुखी
स्वतःचं घर घेताना दक्षिणमुखी घेऊ नये - जरी आपला विश्वास नसला तरी उद्या ते विकायला काढलं तर अर्धे लोक दक्षिणमुखी घर आहे हे ऐकून लांबूनच (म्हणजे फोनवरूनच) टाटा करतात. स्वानुभव आहे.
छान क्युटि
छान क्युटि
घर तुम्हाला उत्तम लाभो.आणि अगदी छोट्या मोठ्या अडचणी(दक्षिणमुखी दरवाज्यामुळे नव्हे) आल्या तरी तुम्ही त्यातून खंबीरपणे पुढे यावं ही शुभेच्छा.
अभिनंदन व शुभेच्छा.
अभिनंदन व शुभेच्छा.
क्युटी, अभिनंदन आणि शुभेच्छा!
क्युटी, अभिनंदन आणि शुभेच्छा!
सावली, प्रतिसाद आवडला.
चांगला निर्णय, आणि निर्णयाची
चांगला निर्णय, आणि निर्णयाची पोस्ट सुद्धा निर्धार दर्शविते.
ऑल द बेस्ट.
आपणा सर्वांचेच पुन्हा खूप
आपणां सर्वांचेच पुन्हा खूप आभार !!
Submitted by Cuty on 10 March
Submitted by Cuty on 10 March, 2020 - 16:26>>> छान निर्णय आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
चांगला निर्णय... Enjoy the
चांगला निर्णय... Enjoy the house
स्वतःचं घर घेताना दक्षिणमुखी
स्वतःचं घर घेताना दक्षिणमुखी घेऊ नये - जरी आपला विश्वास नसला तरी उद्या ते विकायला काढलं तर अर्धे लोक दक्षिणमुखी घर आहे हे ऐकून लांबूनच (म्हणजे फोनवरूनच) टाटा करतात. स्वानुभव आहे.
नवीन Submitted by Bagz on 10 March, 2020 - 18:57
>>>
+७८६
आम्हीही असेच लांबूनच टाटा बायबाय करून झाले आहे. ते देखील भाड्याच्या घरांबाबतही हा नियम फॉलो करायचो.. विकतच्या घराबाबत तर प्रश्नच नव्हता. फायनली आता जिथे विकतचे घर घेतले आहे तिथे एकही घर दक्षिणमुखी नाही. बिल्डींगचे प्रवेशद्वार किंवा मेन गेटही नाही. ईतकेच नाही तर लिफ्ट दरवाजाही नाही
ही सगळी चर्चा वाचुन मी आणि
ही सगळी चर्चा वाचुन मी आणि माझी दोन्ही कुटुंब ह्या वास्तुशास्त्र विषयात अज्ञानी आहोत ते किती किती चांगलं आहे हे जाणवलं.
आधीच रहात असलेल्या घरांबद्दल किंवा नवी घरं घेताना हे विचार मनात आलेही नाहीत.
हैद्राबादला काहीही प्रॉब्लेम
हैद्राबादला काहीही प्रॉब्लेम नाही दक्षिणमुखीदार असलेले घर विकायला.
मी आधी लिहिले की आधी दक्षिणमुखी दार असलेल्या घरात राहायचो. तिथे रो हाऊस टाईप फ्लॅट्स होते एका रांगेत भूमाळा आणि पहिला माळा असणारे १४ फ्लॅट्स सगळेच दक्षिणमुखी. आमचे काही शेजारी दुसरीकडे गेले त्यांचे फ्लॅट्स सहज विकल्या गेले, काहींनी भाड्याने दिलेत त्यांना सहज भाडेकरू मिळतात.
मला अद्याप तो फ्लॅट विकायचा / भाड्याने द्यायचा नव्हता तरी ब्रोकर / गिऱ्हाईकांची अधुन मधून विचारणा सुरू असते.
हैदराबादेत वास्तूचे प्रस्थ खूप आहे. इथल्या वास्तूपंडितां नुसार दक्षिणमुखी घर असायला काहीच हरकत नाही.
पण इथे तेवढ्यावर थांबत नाही.
स्वयंपाकघर कुठे असावे ते तर आलेच, पण पिण्याचे पाणी कुठे ठेवायचे, पाण्याची टाकी कुठल्या कोपऱ्यात असावी, ओट्याने डावीकडच्या (आपण ओट्याकडे तोंड करून उभे असताना) भिंतीला स्पर्श करता कामा नये, मास्टर बेडरूम कुठे असावी, प्रत्येक खोलीचे दार कुठल्या दिशेलाच नव्हे तर त्या दिशेलाही कुठल्या बाजूला असावे, आणि आतच उघडावे, प्रत्येक खोलीत कपाट कुठल्या बाजूच्या भिंतीला असावे, कमोडसुद्धा दिशा बघून बसवले जाते. हे सगळे तो वास्तूपंडीत सांगेल त्या प्रमाणे, आपल्या सोय / गैरसोयीला विशेष किंमत नसते.
आणि बदल करायला बिल्डर / गवंडी सुद्धा पटकन तयार होत नाहीत, म्हणतात आमची बदनामी होते. कधी भांडुन / कधी चुचकारून खंबीरपणे तगादा लावून आपल्या सोयीप्रमाणे करून घ्यावे लागते.
होय मानवजी. या विषयात जितके
होय मानवजी. या विषयात जितके खोलात शिरू तितके कमीच. म्हणूनच मी हा विषय पूर्णपणे डोक्यातून काढला आणि फक्त घरातल्यांची सोय पाहून फ्लॅटची निवड केली. रेंटवर घेतल्याने विकायचाही प्रश्न नाही.
सर्वांचे आभार !!
डोक्यातुन दिशांचे खूळ
डोक्यातुन दिशांचे खूळ निघाल्याबद्दल अभिनंदन..!!
नवीन घरी सर्वान्नी आनंदात आणि सुखासमाधानात रहा या शुभेच्छा..!!
Pages