Submitted by Cuty on 8 March, 2020 - 07:11
रेंटवर फ्लॅट बघत आहोत. दोन फ्लॅट पसंत पडले आहेत. मला जो जास्त आवडला तो फ्लॅट नवरोबांना नकोय. कारण त्याचा दरवाजा दक्षिणेला आहे. दोन्ही फ्लॅटचे किचन उत्तरेला आहे. कोणी मार्गदर्शन करू शकेल काय? बरं फ्लॅट अर्जंट हवा आहे. दोन्हीपैकी कोणता घ्यावा?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
VB >>क्या घुमाके सिक्स मारा
VB >>क्या घुमाके सिक्स मारा है।
क्युटी, तुम्हाला शुभेच्छा
क्युटी, तुम्हाला शुभेच्छा घरासाठी आणी निर्णय झाला असेल तर अभिनंदन.
हेच झाले होते काही वर्षापूर्वी; जेव्हा माझ्या सासुबाईंना बुक केलेल्या घरामध्ये काही बदल करायचे होते तेव्हा. सासर्यांनी बुक केलेल्या घराकडे बायकोला ( सासुबाई ) फिरकु पण दिले नाही. परीणामी, घर लहान ( चार खोल्या असल्या तरी ), सामान भरपूर. पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणून ( आणी वरचेवर घरात हेच होत असल्याने) साबा गप्प बसल्या. पण इथे एक स्त्री देखील स्त्रीला किंमत देत नाहीये हे बघुन आश्चर्य वाटले.
>> बाई कमावणारी नसेल किंवा
>> बाई कमावणारी नसेल किंवा खर्चात भागीदार नसेल तर तिचं मत विचारात घेऊ नये असं म्हणायचं असणार अॅमीला. > हो हेच म्हणायचं आहे.>>
अॅमी,
सहजीवनात प्रत्येक गोष्ट पैशात मोजणार असाल तर त्याला सहजीवन म्हणूच नका. पण पैशात मोजायचा अट्टाहस असेलच तर -
मी न कमावणार्या फारच कमी स्त्रीया बघितल्या, न कमावणारे पुरुष मात्र बरेच बघितले. योग्य आर्थिक मोबदला दिला जात नाही या वर्गात स्त्रीयांची संख्या खूप आहे. यात होममेकर आणि घराबाहेर पडून नोकरी करणार्या अशा दोन्ही स्त्रीया येतील.
सॉरी क्युटी! तुमच्या धाग्यावर थोडे अवांतर झाले.
स्वाती हरकत नाही, एखाद्या
स्वाती हरकत नाही, एखाद्या विषयावर सकारात्मक चर्चा होत असेल तर. माहितीसाठी- या विषयावर चर्चेसाठी ऋन्मेषनी नुकताच नविन धागा काढला आहे.
धन्यवाद क्यूटी. एकदा दिशा
धन्यवाद क्यूटी. जवळ कंपास नसले तरी फोनवर कंपास अॅप डाऊनलोड करता येते. उजवीकडच्या बाल्कनीत सूर्य होता इ ठोकताळे चुकतात. कंपास बेश्ट!
एकदा दिशा तपासून घेतली की मग जो काही निर्णय घ्याल त्याला खूप शुभेच्छा!
धन्यवाद सिमंतिनी.
धन्यवाद सिमंतिनी.
एक फुकट सल्ला.
एक फुकट सल्ला.
दक्षिणमुखी घर घ्या. दरवाजा दक्षिणेला असलेला अधिक उत्तम.
फ्लॅट सिस्टीम आहे म्हणजे तुमच्या "वास्तू"चे मुख्य द्वार दक्षिणेला आहे का? असले तरी याने खरं तर काहीच फरक पडत नाही. घरातल्या एकाद्या खोलीचे दार दक्षिणेला उघडते म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतो का?
दक्षिण दिशा मृत्यूची म्हटलेली आहे, म्हणून दक्षिणेला पाय करून झोपले तर मृत्यू ओढून घेऊन जाईल अशी (अंध्)श्रद्धा आहे. हे या सगळ्या बावळटपणाचे मूळ आहे.
मुद्दा हा, की दक्षिणमुखी फ्लॅट आहे, असं एजंटला नाक उडवून सांगा. "इस फ्लॅट का इतना भाडा तो देंगे नही. वैसे भी सादेसाती चल रैली हय, तो कुच दिनो क लिये ले लेन्गे मगर इन्ना पैसा तो नय देंगे"
मुद्दा काय,
स्वस्तात मिळेल
एंजॉय. अँड हॅपी होली.
(माझ्या घराचे, दुकानाचे, सगळे मुख्य दर्वाजे दक्षिणेला उघडतात.)
आ रा रा. चांगली आईडिया. तसेही
आ रा रा. चांगली आईडिया! तसेही त्या बिल्डिंगचे पहिल्या मजल्यावरचे त्याच साईडचे दोनतीन फ्लॅट खाली दिसले. वाॅचमन म्हटला ते सेलसाठी आहेत. बहुदा याच कारणासाठी अजून गेले नसावेत. मग तुमची आईडियाही वापरून पाहू.
आणि हो ! सर्वांना हॅपी होली!!!
व्हाइट हाउस आणि १० डाउनिंग
व्हाइट हाउस आणि १० डाउनिंग स्ट्रीट दोन्ही दक्षिणामुखी आहेत . तिथे रहाणार्यांचं काही बिघडतंय का ?
बिल गेट्सचे घरही दक्षिणमुखी
बिल गेट्सचे घरही दक्षिणमुखी असल्याचे कुठेतरी वाचले होते.
दक्षिण गोलार्धात
दक्षिण गोलार्धात राहणाऱ्यांनाही हाच नियम असतो का?
नाही. फक्त उत्तर गोलार्धात
नाही. फक्त उत्तर गोलार्धात राहणाऱ्यांसाठी. दक्षिण गोलार्धात राहणाऱ्यांना उत्तरेकडे खिडक्या दरवाजे असणं चांगलं असतं.
यावरचा एक छान व्हिडिओ - https://youtu.be/ly8orBNiNQM
व्हाइट हाउस आणि १० डाउनिंग
व्हाइट हाउस आणि १० डाउनिंग स्ट्रीट दोन्ही दक्षिणामुखी आहेत .>>> दोन्ही पछाडलेल्या वास्तू आहेत.
https://www.google.com/amp/s/www.washingtonpost.com/news/retropolis/wp/2...
दक्षिण गोलार्ध सोडा.
दक्षिण गोलार्ध सोडा.
वास्तूचे नको तेवढे वेड असणाऱ्या दक्षिण भारतीयांना (असा माझा समज होता) सुद्धा दक्षिणेकडे दार असण्याचे विशेष वावडे नाही.
निदान हैदराबादेत तरी दक्षिणेकडे द्वार आणि त्यात वास्तव्य असणारी असंख्य घरे सापडतात.
गेट वे ऑफ ईंडिया सुद्धा
गेट वे ऑफ ईंडिया सुद्धा आमच्या दक्षिण मुंबईला आहे.. आता बोला !
इकडे अमेरिकेत देखील आपली
इकडे अमेरिकेत देखील आपली मंडळी दक्षिणमुखी घर नको म्हणतात. त्याचा फायदा इथल्या बिल्डर ने उचलायला सुरुवात केली आहे. तुम्ही जर पूर्वाभिमुख किंवा उत्तरे कडील दरवाजा हवा असे सांगितले तर १५००० डॉलर्स पर्यंत प्रीमियम चार्जेस भरावे लागतात. आता बोला.
खरंच असू नये का दक्षिणमुखी घर ... अगदी अमेरिकेत देखील ?? मी घर घेण्याचा विचार करतोय इकडे म्हणून हि विचारपूस
कसले काय. इथे अमेरिकेत जर
कसले काय. इथे अमेरिकेत जर स्कूल डिस्ट्रिक्ट चांगला असेल, एखादे डिझायरेबल नेबरहूड असेल तर देशी माणसं दक्षिणेकडची, उत्तरेकडची, दुप्पट टॅक्स असलेली, २ तास कम्यूट असलेली, खाली छप्पर वर बेसमेन्ट एक ना दोन कोणतीही घरं चढाओढीने किमती वाढवून घेतात.
दरवाजे खिडक्या यांच्या दिशा
दरवाजे खिडक्या यांच्या दिशा का बघितल्या जातात आणि वास्तू शास्त्रात काय आहे वगैरे मला माहिती नाही आणि इंटरेस्ट नाही पण काय बघायला हवं ते थोडं लिहू शकते.
)
पूर्वी घराचे दरवाजे सतत उघडेच असायचे त्यामुळे ऊन वर पाऊस थंडी जे काय असेल ते आत यायचं. योग्य सिझनला योग्य ते तापमान राहावं , आडवा तिडवा पाऊस आत येऊ नये म्हणून काही मार्गदर्शक गोष्टी आहेत. आणि त्या अर्थातच देश, आजूबाजूला असलेले मोठे पर्वत , पृथ्वीचा गोलार्ध यानुसार बदलतात.
पण आता मुख्य दरवाजा कायम बंद असतो, शिवाय अपार्टमेंट मध्ये मुख्य दारावर डायरेक्ट पाऊस वगैरे येण्याची शक्यता नाही त्यामुळे तो कसाही असेल तरी चालावा..त्यापेक्षा खिडक्या, बाल्कनी इत्यादींच्या दिशा पाहायला हव्यात.
भारतात पाऊस नैऋत्य दिशेकडून येतो त्यामुळे , दक्षिण , पश्चिम दिशेला असणाऱ्या खिडकीत व बाल्कनीत खूप आडवा तिडवा पाऊस येतो. बाल्कनी तिन्ही दिशातून उघडी असेल तर हे फार जाणवते. दक्षिणेला असलेल्या खिडक्यातून उन्हाळ्याच्या शेवटी थोडा वारा येतो. हिवाळ्यात जास्त प्रकाश येतो , ( आणि फोटोग्राफीसाठी तो छान वाटतो
तसंच पश्चिमेला खिडक्या , काचा असतील तर दुपारनंतर फार उन्हं येतात , काचामुळे ऊष्णता ट्रॅप होते, घर रात्रभर गरम राहाते. पण सकाळी दुपारी वारा छान येतो.
पूर्वेला खिडक्या असतील तर दुपार नंतर घर थोडे थंड होते , पण वारा कमी येतो घरात. किचनमध्ये सकाळी गरम होते पण उन्हं असल्याने किचन सकाळी प्रकाशमान वाटते,काम लवकर उरकतात.
उत्तरेकडे असलेल्या खिडक्यातून हिवाळ्यात थंड वारा येतो त्यामुळे त्या बंद ठेवाव्या लागतात पण मुंबईसारख्या गरम शहरात हे चांगलेच वाटेल..
सगळ्याच दिशांचे फायदे तोटे आहेत त्यामुळे किमान दोन दिशांना खिडक्या असतील असे घर घ्यावे तरच व्हेंटिलेशन चांगले होते. आणि दुहेरी फायदे मिळतील.
हे वरचे सगळे भारतात कारण इथे मौसमी पाऊस आहे. उत्तरेला हिमालय आहे.
जर दुसऱ्या देशात असाल तर त्या देशाच्या भौगोलीक परिस्थितीप्रमाणे वरच्या गोष्टी बदलतात. तिथे पाऊस कुठून येतो, पर्वत कुठल्या दिशेला आहेत त्यानुसार गोष्टी बदलतील. दक्षिण गोलार्धातील देशांकरता अजून वेगळेच काही असेल. त्यामुळे तिथली परिस्थिती अभ्यासून घर घेतले तर पुरेसा उजेड, हवेसे ऊन पाऊस मिळेल.
( हा दिशेचा विचार जपानमध्ये हौस म्हणून इंटेरिअर शिकताना केला गेला होता, त्यानुसार मी भारताचा लिहिला आहे)
इति पुराण समाप्त
सावली, उत्तम विवेचन!
सावली, उत्तम विवेचन!
@सावली
@सावली
असं शास्त्रीय विवेचन बऱ्याच लोकांच्या पोटावर पाय आणेल की!
सावली, छान पोस्ट.
सावली, छान पोस्ट.
पश्चिमेला मोठी बाल्कनी/टेरेस, मोठी खिडकी असली की दुपारपासून फार ऊन येतं. उन्हाळ्यात तर असह्य होतं.
सावली, उत्तम विवेचन!++१
सावली, उत्तम विवेचन!++१
सिंगापुर /मलेशियामध्ये पूर्वेला खिडक्या / दारे असलेले घर बघतात. १२ महिने उन्हाळा असल्याने दुपार नंतर घर थोडे थंड होते. तेच जर पश्चिमेला खिडक्या असल्या तर मात्र घर खुप गरम होते.
सावली, उत्तम प्रतिसाद. एक
सावली, उत्तम प्रतिसाद. एक गंमत म्हणजे तुमचं नाव सावली असूनदेखील तुम्ही 'ऊन' कुठून कुठून येईल याबद्दल लिहिलं आहे.
सावली, प्रतिसाद आवडला.
सावली, प्रतिसाद आवडला.
घर घेताना, पूर्व- पश्चिम घ्यायचे डोक्यात होते.त्यामागे भरपूर उजेड आणि खेळती हवा हे दोन फॅक्टर्स होते.घर मिळाले ते पश्चिम-पूर्व(खरंतर साउथवेस्ट). पण त्यावेली इतका उजेड असणारे घर छान वाटले की दिशा विसरले होते.३ -४ वर्षांनी दिशा कळ्ल्या.
पश्चिमेला खिडक्या , काचा असतील तर दुपारनंतर फार उन्हं येतात , काचामुळे ऊष्णता ट्रॅप होते, >>>>>> हे बाकी खरंय.
सावली, मस्त माहिती.
सावली, मस्त माहिती.
एक गंमत म्हणजे तुमचं नाव
एक गंमत म्हणजे तुमचं नाव सावली असूनदेखील तुम्ही 'ऊन' कुठून कुठून येईल याबद्दल लिहिलं आहे.>> ऊन कुठून येईल हे माहीत असणं सावलीचा धर्म असावा
छान विवेचन सावली.
(No subject)
उत्तम माहिती आणि विवेचन
उत्तम माहिती आणि विवेचन सावलीताई.धन्यवाद. सर्वांनाच उपयोगी पडेल.
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
आज सकाळी जाऊन पुन्हा दोन्ही फ्लॅट सकाळच्या प्रकाशात पाहिले आणि दक्षिणमुखी फ्लॅटच दोघांना पसंत पडला. माझ्या दृष्टीनेही सोयीचा वाटला. मुलाला तर पहिल्यांदा बघतानाच आवडला होता. शेवटी तोच फिक्स केला. दक्षिण दरवाजा वगैरे नवराही काही बोलला नाही आणि मी पण डोक्यातून काढून टाकला.
ईथले सर्व प्रतिसाद वाचून शांतपणे विचार केल्यावर लक्षात आले आजपर्यंत वास्तूशास्त्रानुसार असलेल्या घरात राहिलो तरी बरेवाईट प्रसंग येतच राहिले आणि आपणच त्यावर प्रयत्नांनी मात केली आहे. वास्तू चांगली म्हणून काही अगदी विनासायास लाभ किंवा लाॅटरी लागली नाही. सर्व कष्टानेच मिळवले आणि इथून पुढेही आपल्याच कष्टाने मिळणार आहे.
मागील एकदोन वर्षात आम्हाला बरेच अडचणीचे प्रसंग आले आहेत. अशावेळी दर प्रसंगाने माणसाचे मनोधैर्य कमी होत राहते. मग कधीतरी कुतूहल म्हणून अशा शास्त्राकडे माणूस आकर्षित होतो आणि दर प्रसंगाने वाढत त्याचा प्रवास अंधश्रद्धेपर्यंत होतो. वरती एक असाच प्रतिसाद वाचून लक्षात आले, हे दुष्टचक्र तयारच होता कामा नये. शिवाय नवर्याचा स्वभाव आधीच श्रद्धाळू. त्यात मला पटत नसले तरी नवर्याच्या मनाचा विचार करून मी पण अशा अंधश्रद्धेकडे झुकले तर मुलांपर्यंत ही अंधश्रद्धा वाढत जाणार आणि पक्की होणार. हेदेखील एका प्रतिसादावरून पटले. शिवाय नवर्याने तर आधीच मला पूर्ण निर्णयस्वातंत्र्य दिले होते. मग मीच माझ्या मनात कुठेतरी असलेल्या भितीवर मात केली. दक्षिण दरवाजाबद्दल चकार चर्चा आमच्यात झाली नाही. मी सांगितलेला फ्लॅट नवर्याने लगेच बुक केला. मला खरंच खूप मोकळं, हलकं वाटलं. खरं सांगते मला माझ्याच कथेचं 'जब I मेट मी ' शिर्षक आठवलं. मी मनात पक्कं ठरंवलय आता जे काही मिळणार ते आपल्याच कष्टाने मिळणार असून जे कमी आहे त्याचा संबंध इतर कोणत्याच गोष्टीशी जोडायचा प्रयत्नच करायचा नाही. आपली मुले आपल्याकडे बघूनच मोठी होत असतात. माझ्या विचारांना सकारात्मक दिशा मिळण्यात येथील चर्चेचा खूप मोठा वाटा आहे. याबद्दल सर्व माबोकरांचे आभार !!
अभिनंदन Cuty!
अभिनंदन Cuty!
Pages