सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग चौदा

Submitted by मुक्ता.... on 6 March, 2020 - 05:41

शांता सांगत होती.

"मावशी...मी मूळची मुंबईची...मी एक स्वच्छंदी मुलगी..कॉलेज बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला होते. पण मी आणि माझा ग्रुप अर्चिओलॉजित इंटरेस्ट होता म्हणून नेहमीच वेगवेगळ्या पुरातन ठिकाणांना भेट द्यायचो. त्यावर माहिती गोळा करायचो. पिरॅमिड्स सारखीच काही विशिष्ट कन्स्ट्रक्शन आपल्या महाराष्ट्रात आहेत हे आम्हाला कळलं होत. अशा काही ठिकाणांना आम्ही भेट दिली, त्याचा अभ्यास केला. काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी कळल्या. काही विचित्र लिपी आम्ही डिकोड करू शकलो. आई बाबानी कधी विरोध केला नाही. अशाच एका साईट विषयी कळलं. एका लिपीला डिकोड करताना. कुणाला माहित होतं कि इथे आयुष्य उध्वस्त होणार आहे. आम्ही पाच जण त्या साईट वर म्हणजे पारगाव ला पोचलो. म्हणजे मावशी तुमचं गाव. तिथे चौकशी केली. तर गावकऱ्यानी तिथे असं काही नाही सांगितलं. पण आम्ही जी लिपी डिकोड केली त्यातून मिळालेला मॅप आम्हाला पारगावच्या जंगलाचं लोकेशन दाखवत होता. आम्ही त्या सगळ्यांच्या नकळत तिथे निघालो. रात्रीचा मिट्ट काळोख..आमचे मोबाईलचे टॉर्च..तेव्हढाच काय तो उजेड. जंगलात जसे आत जात होतो तसे प्राण्यांचे आवाज आणि जीवसृष्टीच्या सर्व खाणाखुणा पुसट होत होत्या..आम्हीच काय ते जिवंत. आणि एक मोठा डोंगर लागला. त्याच्या भोवती फक्त रानवनस्पती ,त्याही सुकलेल्या. जणू हजारो वर्ष तिथे कुणी गेलं नसावं. आमच्या पैकी एकाच्या पायाला काहीतरी लागलं. पाहिलं तर ठिकठिकाणी माणसं आणि प्राणी यांची हाड होती. आम्ही कुठल्यातरी भयानक जागी आलोय याची आम्हाला जाणीव झाली.पण आता परत जायचं नाही इथली मिशन पूर्ण केल्याशिवाय,असं ठरवलं.आम्ही पुढे निघालो. वातावरणात विचित्र लहरी होत्या. आधीच्या साईट गूढ होत्या पण इतक्या डेंजर नव्हत्या मावशी. पुढे पुढे जाताना एक भग्न अवस्थेतली वास्तू लागली. तिथे प्रवेश केल्यावर काही शॉक बसला म्हणा किंवा अजून काही विचित्र आम्हाला गुदमरल्यासारखे झाले. त्यानंतर डायरेक्ट सकाळी जाग आली. दिवसाच्या प्रकाशात त्या जागेची भयाणता अधिक लक्षात आली. आम्हाला वाटलं आम्ही आता सुटणार. म्हणून त्या जागेचे खूप फोटो काढले. तिथेही काही विचित्र लिपीत बरच लिहिलेलं दिसली. त्या वास्तूच्या वरच्या छताच्या भागात शिरलो. कळ्ळसासारखं काही होत. पण त्याच्या चार बाजुंना काही विशिष्ट रचना लाल आणि हिरव्या रंगात रंगवली होती. आणि मध्यभागी काहीशी गोलाकार रचना. त्याच्या वरून माझ्या मित्राने हात फिरवला. अगदी सहज. आम्हाला सवय होती. तर त्याच्या तोंडाला फेस आला आणि त्याला आकडी येऊन तो बेशुद्ध झाला. मला आणि इतर तिघांना काय झालं तेच कळलं नाही.त्याला झटके येतच होते. त्याला कसाबसा खाली आणला. त्या पूर्ण भग्न वास्तूचे आम्ही फोटो घेतले. थोड्या वेळाने माझ्या मित्राला शुद्ध आली. आम्ही पुढे गेलो. एका गुहेतून त्या मंदिरच्या पाठीमागे छोटे भुयार होते.एक माणूस जाईल इतपत.काही विचित्र प्रकाश आणि आवाज आले. मांजर गुरगुरण्याचा. आम्ही आत गेलो. तर .......तिथे एक भयंकर बाई केस मोकळं सोडलेली आणि दोन मांजरांची शरीर...आणि तिच्याभोवती ते हिरवे आणि लाल प्रकाश झोत नाचत होते....आम्ही घोडचूक केली होती...पण माहितीची आणि तारुण्याची खुमखुमी आम्हाला पुढे घेऊन गेली. तिला आम्ही हाक मारली. तशी तिने मागे वळून जोरात आरोळी ठोकली.....माझ्या दोन मित्रांना आणि एका मैत्रिणीला तिने पकडले. मी आणि अजून एक मित्र तिथून बाहेर आलो. आणि वाट फुटेल तिथे पळत सुटलो. माझ्या त्या मित्रांना तिने अतिशय क्रूरपणे मारले. माझ्या बरोबर पळालेला मित्र त्यालाही ओढून नेलं.पण मी कशी बाहेर आले मलाच माहित नाही. नंतर लक्षात आलं. माझ्या गळ्यात असलेली स्फटिकांची माळ. जी डॉक्टरांच्या गळ्यात होती. म्हणून तेव्हा वाचले. पण नंतरही त्यांनी माझा पिच्छा सोडला नाही. आणि एका बेसावध क्षणी जेव्हा ती माळ मी काढून ठेवली तेव्हा त्यांनी माझ्या घरावर हल्ला चढवला. माझ्या आई वडिलांना माझ्या डोळ्यादेखत मारले. आणि मी घाबरलेली बघून मला आपल्या जाळ्यात ओढले.आणि माझा प्यादं म्हणून वापर सुरु केला. तुम्हला देवकी म्हणून भेटले. नवीनला डिस्टरब मीच केलं. हे त्या शक्तीच्या माझ्यावरच्या हुकुमतीवरून केलं. मी त्यांच्या कैदेत असले की प्रभाव मुक्त असते.त्यांची कैक रहस्य मला समजली आहेत. आणि मी तुम्हाला ती सांगणार आहे.....माझी बहीण....त्यांच्या रडारवर आहे. ते माझ्यावरही लक्ष ठेवून आहेत. मावशी माझ्यापासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धोकाही आहे. तीन दिवसांनी. मी माणूस म्हणून जगण्याची शक्यता कमी आहे.आता मला जाऊ दे. परत भेटू उद्या याच वेळेला उद्या. आता ते इथे येतील पुन्हा. मावशी तुम्ही आत्मरूपानेही तिथे जाऊ नका. खूप मोठा धोका आहे. मला काही झालं तर गोदाजी तुम्हाला सांगतील. त्यांना या लोकांनी जायबंदी केल.मी जाते मावशी....परत मूळ अवस्थेत...आणि माझं शरीर स्फोटकापेक्षा कमी नाही......."

शांताच आत्म नाहीस झालं. आणि दुसराच क्षणी खिडकी बाहेर बकुळा होती.

समदं शांत न्हाई हूणार 

समदं राख राख हुणार 

बेडरूमचा दरवाजा उघडला. देवकी आत आली. तिने शांताकडे पाहिलं.एक तीव्र नाराजीची लहर तिच्या चेहऱ्यावर पसरली.पण ती काही बोलली नाही. तिचा वत्सल वर विश्वास होता. हो नाराजी केवळ इतकं होऊन सगळे सहन करत राहिले आपल्याला त्रास होऊ दिला नाही म्ह्णून होती. देवकीला गंगाने सगळं सांगितलं. आणि वत्सल आत्याच्या गायत्री ध्यानाबद्दलही सांगितलं. 

देवकीने पुढचे चार दिवस रजा घ्यायची ठरवली.आणि आपल्या घरात आपली गरज असल्याचे जाणले. आता शेवटच्या लढ्याची तयारी जणू सुरु झाली होती. वत्सल आत्या ध्यान करतच राहणार होत्या. विजय सर येईपर्यंत पुढचा सगळा फ्रंट डॉक्टर , देवकी आणि नवीन हेच सांभाळणार होते. गंगाने तिचे पाण्याचे प्रयोगाचे बॉटल काढले.आणि त्याचे सूक्ष्म निरीक्षण करायचे ठरवले, आता त्या बाटल्या वत्सल आत्या च्या जवळ नेऊन ठेवायचे ठरले.

माहित नाही आता नक्की काय डाव साधणार होत्या त्या शक्ती. शांता आणखीन काय सांगणार होती? शांता का आणि कुणी या कारस्थानाचे बळी होते? मोहरे होते? गंगा आणि डॉक्टर दोघेही विचारात बुडाले होते. इकडे जेवण झाल्यावर नवीन आणि देवकी कौच वर बाजू बाजूला शांत बसले होते, हातात हात घेऊन. नकळत देवकीने नविनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिला जरा हलकं वाटलं.पण मनातली वादळं शांत बसेनात. नविनला संकटात टाकणाऱ्या, बकुळाची सहकारी असणाऱ्या शांताला घरी ठेवल्यामुळे, तसच एका दिवसात एवढ्या वादळी घटना पुन्हा घडल्यामुळे जरा देवकी अस्वस्थ होती. इतक्यात डॉक्टर त्या दोघांजवळ आले. भरल्या डोळ्यांनी एकमेकांजवळ बसलेल्या त्या प्रेमळ जोडीला पहात राहिले. एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेले होते. घराच्या बाहेर बकुळा, हिरवी शक्ती आणि लाल शक्ती यांच्या घिरट्या सुरु झाल्या अगदी शांता म्हणाली अगदी तशाच प्रकारे. डॉक्टर टंडन प्रथमच हा थरार पाहत होते. देवकी आणि नवीन मात्र याकडे आता निर्विकार पणे पाहत होते. तशी म्हणायला त्यांना आता सवय झाली होती. भीतीची आणि त्या सावटाखाली जगण्याची सवय होते. किंबहुना त्याच्याशी लढण्या ऐवजी माणूस त्याला आयुष्याचा भाग मानून पुढे आयुष्य रेटत राहतो. लढणे देवकी आणि नवीनच्या स्वभावात मूलतः नव्हते. तिथेच खरी मेख होती. आणि इथेच आता डॉक्टर टंडन यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरणार होते. 

  वत्सला आत्यानी देवकीचे आणि नवीनचे योगाचे शिक्षण बेसिक ,आवश्यक तेव्हढे पूर्ण केले होते. पण अजून बरीच प्रगती होणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक होते ते आणखीन कुशल गुरु जे निर्विकार पाने तटस्थ होऊन त्यांचं मार्गदर्शन करू शकणार होते. एव्हाना सोसायटीच्या लोकांमध्ये नवीनच्या घरात घडणाऱ्या अतर्क्य घटनांविषयी चर्चा सुरु झाली होती. जिवाच्या भीतीने कुणी काही बोलत आणि विचारत नव्हतं इतकंच. पण कुणीही कधीही याची तक्रार करेल सांगू शकत नव्हतं. त्याआधी काही योग्य निर्णय घेणे आवश्यक होते. नवीनचे घर दहाव्या मजल्यावर होते. बारा माळ्याच्या त्या इमारतीत वरचे मजले रिकामे होते. आलेली लोक या विचित्र घटनांनी निघून गेली. काहीही वाच्यता न करता. लढायचे नाही,प्रश्न विचारायचे नाहीत, सहन करायचे हा मूळ पांढरपेशा लोकांचा स्वभावच झालेला. आपल्याला काय करायचंय. जीवाची भीती वैगरे वैगरे.असो. त्यामुळं असल्या शक्तींचा संचार अधिक ताकदीने होतो हे नक्की. 

नवीन आणि देवकीशी अगदी बरोबर याच विषयावर डॉक्टरनी बोलायचे ठरवले. पण आणि काही वेळा नंतर. कारण इतक्या शांतपणे ते दोघे एकमेकांबरोबर बसले होते की त्यांना डिस्टरब करण्याचं धाडस डॉक्टरना झाले नाही. तशीही त्यांना बसल्या बसल्या झोप लागली. गंगाही खूप थकली होती. तिलाही डुलकी लागली. डॉक्टर मात्र जागेच होते. बाहेर काही काळ हालचाल दिसली नाही. तेव्हा डॉक्टर आतल्या खोलीत जिथे वत्सल आत्या आणि शांता होत्या तिथे डोकावले. रात्रीचे दोन वाजले होते. हॉल मध्ये येऊन डॉक्टर अगदी सहज खिडकी जवळ गेले. आणि धडाड धाड......एकदम काचेवर मोठी धडक बसली. गंगा, देवकी, नवीन सगळेच घाबरून जागे झाले. डॉक्टर एकदम मागे  फेकले गेल्यासारखे झाले. पुन्हा आतल्या खोलीत तसाच आवाज आला. धडाड धडाम धाड.........सगळेच धावत आत गेले. मात्र देवकीने काचेजवळ जाण्यापासून सगळ्यांना मनाई केली. " काचेजवळ लाल रंगाचा उजेड नाचत होता. वत्सल आत्यानी गायत्रीचा जप वाढवला होता आणि काचेच्या त्या सील बंद बाटल्या जोरजोरात हलत होत्या. गंगा धावत तिथं पोचली. त्या काचेच्या बाटल्यांमधलं पाणी वेगवेगळ्या तीव्रतेनी गोल गोल फिरत होत. आणि त्यात कोलॉइडस दिसत होते. आणि त्यांच्या आकारमानात बरीच वाढ झाली होती.  सगळ्यात पहिली बाटली जिच्यावर वत्सल आत्यानी पहिला प्रयोग केला होता..तिच्यातले पाणी आता गोल फिरत नव्हते. मोठे मोठे प्रकाशमान हिरवे गोळे बाटलीच्या कडेला आणि मधल्या भागात मोठे प्रकाशमान लाल गोळे...भयंकर आणि बाकीच्या दोन बाटल्या त्यातील गंगाने केलेले प्रयोग...त्यातील पाणी गोल गोल गोल फिरत होते. अगदी सावध पणे गंगाने त्या बाटल्या पुन्हा सिलसहित त्या बॉक्स मध्ये होत्या तशा ठेवल्या. " ओह माय गॉड, डॉक्टर पुटपुटले...गंगा हमें येह सब, इथं नाही ठेवता येणार गंगा...." डॉक्टर म्हणाले.गंगा त्यांच्याकडं पाहत राहिली. काही क्षण शांततेत गेले.

आता पुढचे दोन दिवस घरातून कुणीच बाहेर जाणार नव्हतं. ऍटलीस्ट विजय आणि अविनाश येईपर्यंत तरी. 

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग लहान होता की मीच लवकर वाचून काढला काही कळत नाही.
टाका लवकर लवकर पुढचे भाग
आणि हो, थरारक तर आहेच.

मास्टरमाइंड, हा भाग नेहमीपेक्षा लहान आहे थोडा, आप सही पकडे हो...कंटेंट तितकंच ठेवायचं होत याचं...धन्यवाद : <)