अस्साच जळत राहिलास तर , जाताना पाणी पण महाग होईल

Submitted by सिद्धेश्वर विला... on 3 March, 2020 - 01:50

(वळू) मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि

स्वतःच्या बुडाचीच आग होईल

अस्साच जळत राहिलास तर

जाताना पाणी पण महाग होईल

काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो

दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो

वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे

नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे

हताश होऊ नको इतक्यात

कि पाठीला बाक येईल

कवन जरा नीट कर

नाहीतर प्रतिभेला डाग येईल

विझलेयत निखारे कधीच ,

लाव्हाहि निद्रिस्त तो

नको फुंकर मारू आता

जळून सारे राख होईल

मारू नको टिचकी कधी

इशाराही नको मजला

मी सुखात या जागी

जरी असे मी एकला

आशा करतो काव्यदेवते

आता तरी त्याला जाग येईल

मित्रा हे नाही समजलं जर तुला

तर पुढे दुर्दैव तुझा भाग होईल

दुर्दैव तुझा भाग होईल...........

---> सिद्धेश्वर विलास पाटणकर ---->

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद ... त्रिवार धन्यवाद

===================

ठरवलं बघावं कधीतरी हसून

लागलो हसायला

हसतच गेलो हसतच गेलो

लोकांना पाहिलं तपासून

बाकी सारे ठीक होते

येगळा होता त्यात वळू

कुठंही बसून दुगाण्या झाडतुया

जणू मेंदूला लागलंय जळू

गर्दभ तरीही ठीक म्हणूया

ह्या उ ह्या उ करते

या वळूला कुणीही विचारत नाही

तरी उगाच घाण सोडते

वयोवृध्दांसि नमन सोडून

उगा करतोय कुणाचा बी त्रागा

तुझी माउलीही पूज्य असे वळू

नको सोडू पातळीची जागा

खरे रूप जर आम्हा दावशील

तर थोर उपकार होतील

कसा वळू हा उपजला पोटी

अरे नरकातही ना जाशील

अरे किती तुझी रूपं

आणि किती ते रंग

खरा कोण आहेस तू रे

मातंग कि मलंग ?

येऊनिया स्थळी

उतशी मातशी

नको खेळू वळू पुन्हा

कधी कुणाच्या मातेशी

प्रसव वेदना ती झेली

नऊ महिने राखून

तुला कमी दिस झालेत

या स्थळावर येऊन

त्या माऊलीचा महिमा

असे थोर अन दिगंत

जिने झेलला रं पोटी

तुझ्यावाणी किडावंत

वेद बोलुनी गेला कधीतरी

ज्ञानियांचा हेला

आज पढवितो पाठ वळू मज

पण इथे वदविणाराही हेला

शंका येते मला जराशी

तू नक्कीच जुना असणार

पत्ता नाही इस्पितळाचा

मग कशी रे ओळख पटणार

फुले फुलवितो बाग बनवुनी

काटे असणे आले

काट्यामधुनी गोंडस लोभस

फुल तरीही उमलले

असेच असते आयुष्य आपुले

उगा कुंथत बैसूं नये

तुला तर बाबा रान मोकळे

मलाही वळू समजू नये

खूप छान कविता मला आवडली खरं तर तुमच्या कवितेची रिक्षा मला माझ्या धाग्यावर द्यायची होती पण मला ते जमत नाही आहे

कविता आवडली. निदान संस्कार दाखवले नाही हे बरं क्येलं. दुसऱ्या च्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणारांच्या अकलेची नेहमीच कीव येते. म्हशीसंगं निजणारा कोन व्हता त्येवढं नाही सांगातलं.

धन्यवाद ,,

आपल्या प्रतिसादाने न्हाऊन गेलो

अध्येमध्ये इथे डोकावून गेलो

असेच प्रेम लाभू देत आपले

मी आपलाच आहे , जरी वंगाळ लिहीत असलो