मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ- पुस्तकिडा

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2020 - 02:04

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!

या खेळांमधला दुसरा खेळ सुरू करूया.
मायबोलीवर अनेक वाचनप्रेमी सदस्य आहेत. अशा वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मायबोलीकरांसाठी खास आजचा खेळ! खेळ तसा सोपा आहे. आपण तो पूर्वी खेळलोही आहोत.
मराठी भाषेतील कुठल्याही पुस्तकाबद्दल तुम्ही कोडं घालायचं. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखून दाखवेल, त्याने/ तिने पुढचं कोडं घालायचं.

उदा.
'दक्षिणेकडच्या एका जंगलात वर्षभर राहून अस्सल अनुभव घेऊन लिहिलेलं पुस्तक'

येवू द्या उत्तरं पटापट!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कोणी देत नसल्यास:

एकाच कल्पनेवर आधारित लेखसंग्रह.
त्यात बिल क्लींटन, निळू फुले आणि ना सं इनामदार यांच्यावर लेख आहेत.

अजूनही काही लोकांवर त्याच धर्तीवर लेख आहेत.
पुस्तकाला लेखक नसून संपादक आहे.

वरील तिघांत समान धागा काय ते शोधा !

ना सं इनामदार.
लेख असलेल्या व्यक्तींत अजून एक आहेत ते 'आपले ' दिग्गज राजकारणी !

मी प्रश्न विचारते.
अकाली मृत्यू पावलेल्या लेखकाचे पुस्तक, ज्याच्या नावात त्याच्या स्वतःच्या नावाचा संबंध आहे.

फ्रेंड्स या अमेरिकन सीटकॉम मध्ये 6 प्रमुख पात्रे आहेत. एका प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीतील एका प्रमुख पात्राचे नाव पण या सहा नावांपैकी एक आहे (मालिकेतील नाव, खरे कलाकाराचे नाही). तर या इंग्रजी कादंबरीशी साधर्म्य असलेली मराठी कादंबरी कोणती?

कोसला? पण फ्रेंड्स मध्ये कोणाचं नाव होल्डन नाहीये
>>>
रिवर्स इंजिनिअरिंग नॉट आलाउड Happy

द्या पुढचे कोडे आता

Pages