Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2020 - 02:04
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!
या खेळांमधला दुसरा खेळ सुरू करूया.
मायबोलीवर अनेक वाचनप्रेमी सदस्य आहेत. अशा वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मायबोलीकरांसाठी खास आजचा खेळ! खेळ तसा सोपा आहे. आपण तो पूर्वी खेळलोही आहोत.
मराठी भाषेतील कुठल्याही पुस्तकाबद्दल तुम्ही कोडं घालायचं. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखून दाखवेल, त्याने/ तिने पुढचं कोडं घालायचं.
उदा.
'दक्षिणेकडच्या एका जंगलात वर्षभर राहून अस्सल अनुभव घेऊन लिहिलेलं पुस्तक'
येवू द्या उत्तरं पटापट!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कोणी देत नसल्यास:
कोणी देत नसल्यास:
एकाच कल्पनेवर आधारित लेखसंग्रह.
त्यात बिल क्लींटन, निळू फुले आणि ना सं इनामदार यांच्यावर लेख आहेत.
क्लू द्या
क्लू द्या
अजूनही काही लोकांवर त्याच
अजूनही काही लोकांवर त्याच धर्तीवर लेख आहेत.
पुस्तकाला लेखक नसून संपादक आहे.
वरील तिघांत समान धागा काय ते शोधा !
ना सं इनामदार की ना सी फडके?
ना सं इनामदार की ना सी फडके?
ना सं इनामदार.
ना सं इनामदार.
लेख असलेल्या व्यक्तींत अजून एक आहेत ते 'आपले ' दिग्गज राजकारणी !
'एकच मुलगी'
'एकच मुलगी'
एक असाच चटकन गेस. 'यांनी
एक असाच चटकन गेस. 'यांनी घडवलं सहस्रक' का?
नाही श्र, माझं बरोबर आहे :p
नाही श्र, माझं बरोबर आहे :p
येस. तो गेस केल्यावर तुझं
येस. तो गेस केल्यावर तुझं उत्तर वाचलं. मग ती एका मुलीची लिंक लागली.
'एकच मुलगी' !!
'एकच मुलगी' !!
मी प्रश्न विचारते.
मी प्रश्न विचारते.
अकाली मृत्यू पावलेल्या लेखकाचे पुस्तक, ज्याच्या नावात त्याच्या स्वतःच्या नावाचा संबंध आहे.
झुंबर - प्रकाश नारायण संत?
झुंबर - प्रकाश नारायण संत?
झुंबराचा प्रकाश असतो म्हणून हा तर्क.
मोहन गोखलेंचे असावे
मोहन गोखलेंचे असावे
शिवाजी सावंत? पण त्यांचं
शिवाजी सावंत? पण त्यांचं मृत्युंजयच मला ठाऊक आहे.
पहिल्या फटक्यात बरोब्बर श्र!
पहिल्या फटक्यात बरोब्बर श्र!
फ्रेंड्स या अमेरिकन सीटकॉम
फ्रेंड्स या अमेरिकन सीटकॉम मध्ये 6 प्रमुख पात्रे आहेत. एका प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीतील एका प्रमुख पात्राचे नाव पण या सहा नावांपैकी एक आहे (मालिकेतील नाव, खरे कलाकाराचे नाही). तर या इंग्रजी कादंबरीशी साधर्म्य असलेली मराठी कादंबरी कोणती?
कोसला? पण फ्रेंड्स मध्ये
कोसला? पण फ्रेंड्स मध्ये कोणाचं नाव होल्डन नाहीये
ओह सॉरी, कुणीही पात्र, फिबी!
ओह सॉरी, कुणीही पात्र, फिबी!
कोसला? पण फ्रेंड्स मध्ये
कोसला? पण फ्रेंड्स मध्ये कोणाचं नाव होल्डन नाहीये
>>>
रिवर्स इंजिनिअरिंग नॉट आलाउड
द्या पुढचे कोडे आता
गोड नावाच्या लेखकाच्या
गोड नावाच्या लेखकाच्या प्रसिद्ध पुस्तकाचं नाव मात्र चांगलंच खारट आहे
माहीमची खाडी - मधू मंगेश
माहीमची खाडी - मधू मंगेश कर्णिक
टण्या - लिटल वीमेन का? "जो"?
टण्या - लिटल वीमेन का? "जो"? - "चौघीजणी"?
बरोबर श्रद्धा.
बरोबर श्रद्धा.
फार एन्ड वर मॅगीने दिले ना
फार एन्ड वर मॅगीने दिले ना उत्तर "कोसला"
Pages