मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ- पुस्तकिडा

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2020 - 02:04

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!

या खेळांमधला दुसरा खेळ सुरू करूया.
मायबोलीवर अनेक वाचनप्रेमी सदस्य आहेत. अशा वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मायबोलीकरांसाठी खास आजचा खेळ! खेळ तसा सोपा आहे. आपण तो पूर्वी खेळलोही आहोत.
मराठी भाषेतील कुठल्याही पुस्तकाबद्दल तुम्ही कोडं घालायचं. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखून दाखवेल, त्याने/ तिने पुढचं कोडं घालायचं.

उदा.
'दक्षिणेकडच्या एका जंगलात वर्षभर राहून अस्सल अनुभव घेऊन लिहिलेलं पुस्तक'

येवू द्या उत्तरं पटापट!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी नताशा आणि निलाक्षी, उत्तर बरोबर आहे.

लाडीक खगोलीय नाव असलेलं पण खगोलाशी संबंध नसलेलं वाचनसाधन. - चांदोबा

मी नताशा, पुढचा प्रश्न विचारू शकतेस.

'गुन्हा नाकबूल... युवर आनेष्टी..'
'स्काल्सनापोली? कोण म्हणतंय स्काल्सनापोली?'
'मोटारकारखाना? ...मोटारकारखाना!!!'
'ह्या अमेरिकन मुली बोजट बाळगतात'
'.. तिथं राक्षस मरायला येऊन पडत होते.'
'मेलुस्केला आणि मिस्टर फॉक्स..'

नाही.

आणि ही सगळी वाक्ये एकाच पुस्तकातील आहेत.

Pages