बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 24 February, 2020 - 04:23

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

जीव माझ्झा कासावीस झाला

असलीस जरी तू तोंडाने फाटकी

तुझी अम्ब्रेला मात्र नीटनेटकी

रंगबिरंगी चांदण्या त्यावरी

झेलण्या ओघळण्या पाऊस सरी

कापड ऐसे तरल मुलायम

पिळवटते हे हृदय ते कायम

सडपातळ ती नाजूक दांडी

बघणार्यांच्या उडती झुंडी

बटनावरती नक्षीदार दांडा

देती सलामी बघणाऱ्या सोंडा

काय असे ते गुपित न कळले

त्या अम्ब्रेलातच सर्व अडकले

मीही नसे अपवाद त्याला

मलाही आवडली तिचीच अम्ब्रेला

===========================
सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults