चेहऱ्यावर लोचट भाव कसे आणायचे?

Submitted by सखा on 5 January, 2020 - 23:10

images (34).jpeg
(नाट्य शास्त्राचा वर्ग चालू आहे)
प्रश्न: सर, चेहऱ्यावर लोचट भाव कसे आणायचे?
उत्तर: लोचट भाव आणण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लोचट चेहऱ्यांचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी सर्वात उत्तम जागा म्हणजे अमेरिकेतील इम्मिग्रेशन हॉल. अमेरिकेत उतरल्यावर जेव्हा तुम्ही इमिग्रेशन साठी रांगेत उभे असता तेव्हा शांतपणे आजुबाजुला बघा. आता त्या व्यक्तीला बघा जिने तुमच्याच विमानात प्रवास केलाय. हो तीच ती व्यक्ती जीने भारतात सिग्नल तोडलेले असतात. जागोजागी पचापचा थूकलेला असतो. भाऊ नेत्यांमध्ये ज्याची उठबस असते. एअरपोर्ट वरती ज्यांनी रांग तोडलेली असते. आते टाइम कोई कस्टम मे पहचान है क्या? अशी त्यांनी चौकशी केली असते. मुंबईत कस्टम फॉर्म भरताना पेन नाही म्हणून दुसऱ्याचा पेन घेऊन सराईतपणे आपल्याच खिशात ठेवून दिलेला असतो. पॉपकॉर्न खाऊन प्लास्टिक हळुच सीट खाली फेकून दिलं असतं आणि विमानांमध्ये तर विचारूच नका, कॅबिनेट मधल्या इतरांच्या बॅगा काढून तिथं आपले सामान ठेवलेले असते. नको तेवढी फुकट दारू पिलेली असते. छोटे-छोटे वाईन चे सॅम्पल्स आपल्या बॅगेत अलगद टाकलेले असतात. बाथरूम मध्ये गेल्यावर फ्लश करायचं असतं यावर विश्वास नसतो. बाथरूम मधल्या टॉयलेटरीज खिशात भरून आणलेली असतात. एअर होस्टेस ती जर गोरी असेल तर तिच्याबद्दल आपल्या मातृभाषेत ओन्ली फॉर adults कमेंट्स केलेले असतात. सगळे झोपलेले असताना मोठ्यांनी शेअर्स वर बडबड केलेली असते. असे हे कोणालाच न जुमानणारे, ज्याचे निवडणुकीस उभे राहिल्यास चिन्ह 'रान डुक्कर' असू शकते असे हे महाशय जेव्हा अमेरिकेत इमिग्रेशन ऑफिसरच्या समोर दीन पणें उभे राहतात तेव्हा त्यांच्यातली सगळी गुर्मी मस्ती फुग्यातली हवा गेल्यासारखे गेलेली असते. भारतात लायसन नाही म्हणून पोलिसांनी पकडल्यावर याच माणसांनी तिथूनच आमदार-खासदाराना फोन केला असतो पण इथे मात्र त्यांच्या लक्षात येतं की आपलं इकड काहीच चालणार नाहीये आपण अमेरिकेच्या अध्यक्षाला जर फोन केला तर तोही आपल्याला मदत करु शकणार नाहीये.
images (32)_0.jpeg
तेव्हा हा अंगभूत बदमाशी असलेला मनुष्य त्यांच्या परीने एक विशिष्ट विनम्र, पापभिरू, सज्जन वजा गुळमिट चेहरा करण्याचा प्रयत्न करतो कारण त्यांचा एक गैरसमज असतो की पासपोर्ट नसला तरी चालेल पण केवळ या चेहऱ्यावरती कदाचित अमेरिकेत इमिग्रेशन मिळेल.
तर माझ्या अभिनयाच्या विद्यार्थ्यांनो नीट लक्षात घ्या, त्यावेळी या गृहस्थाच्या चेहऱ्यावरती जे अद्भुत भाव असतात त्याला लोचट भाव असे म्हणतात. कळाले?

#travel_tips #acting_tips

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन ठीक आहे. पण जो फोटो टाकलाय त्यात चेहर्‍यावरचे भाव अजिबात लोचट नाहीयेत.>>>>>> मी तेच लिहीणार होते. Proud

त्या फोटोतल्या व्यक्तीचे भाव कॉन्स्टिपेशन चे वाटत आहेत.>>>>> Rofl

बापरे! तो वरचा फोटो भयंकर आहे.
आणि हा रडका.
लोचट भावांचे (म्हणजे लोचट भावना चेहर्‍यावर दिसणारे) फोटो नाहीतच का?
शक्ती कपूर च्या चेहर्यावर हपापलेले भाव आहेत. Lol

मस्त लेख! Lol Lol
अज्ञा, ब्रम्हानंदच्या डोळ्यात गयावया करणारा भाव वाटतोय.. लोचट नाही..
2nd photo भारीये! Rofl

शक्ती कपूर च्या चेहर्यावर हपापलेले भाव आहेत. Lol
>>>
अच्छा म्हणजे हपापलेले आणि लोचट हे वेगवेगळे आहे का?

गूगल सर्च ईंजिन हे एक मशीन आहे. जे ईनपुट कराल तेच आऊटपुट. जर मराठी माणसांम्ध्येच लोचट भावाबद्दल कन्फ्यूजन असेल तर् गूगल सर्च निकामी आहे.

एक उपाय आहे. प्रत्येकाने आपल्या चेहरयावर त्याच्या मते असलेले नेमके लोचट भाव आणत एक सेल्फी घ्या आणि ईथे शेअर करा..

एक उपाय आहे. प्रत्येकाने आपल्या चेहरयावर त्याच्या मते असलेले नेमके लोचट भाव आणत एक सेल्फी घ्या आणि ईथे शेअर करा..

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2020 - 07:28
>>>>>>>>>
सुरुवात आपल्यापासून.

सुरुवात आपल्यापासून.
>>>
किमान ५ लोकांनी विनंती केल्याशिवाय मी माझे फोटो शेअर करत नाही. माफ करा पण तत्व आहे.

ब्रह्मानंद माझा एक नंबर आवडता नट आहे. भारतात शरीया कायदा असता तर दंगेखोरांच्या चेहऱ्यावर लोचट भाव पहायला मिळाला असता.

>>>
किमान ५ लोकांनी विनंती केल्याशिवाय मी माझे फोटो शेअर करत नाही. माफ करा पण तत्व आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2020 - 08:03
मीच पाच वेळा request केली तर चालेल का

Pages