(नाट्य शास्त्राचा वर्ग चालू आहे)
प्रश्न: सर, चेहऱ्यावर लोचट भाव कसे आणायचे?
उत्तर: लोचट भाव आणण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लोचट चेहऱ्यांचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी सर्वात उत्तम जागा म्हणजे अमेरिकेतील इम्मिग्रेशन हॉल. अमेरिकेत उतरल्यावर जेव्हा तुम्ही इमिग्रेशन साठी रांगेत उभे असता तेव्हा शांतपणे आजुबाजुला बघा. आता त्या व्यक्तीला बघा जिने तुमच्याच विमानात प्रवास केलाय. हो तीच ती व्यक्ती जीने भारतात सिग्नल तोडलेले असतात. जागोजागी पचापचा थूकलेला असतो. भाऊ नेत्यांमध्ये ज्याची उठबस असते. एअरपोर्ट वरती ज्यांनी रांग तोडलेली असते. आते टाइम कोई कस्टम मे पहचान है क्या? अशी त्यांनी चौकशी केली असते. मुंबईत कस्टम फॉर्म भरताना पेन नाही म्हणून दुसऱ्याचा पेन घेऊन सराईतपणे आपल्याच खिशात ठेवून दिलेला असतो. पॉपकॉर्न खाऊन प्लास्टिक हळुच सीट खाली फेकून दिलं असतं आणि विमानांमध्ये तर विचारूच नका, कॅबिनेट मधल्या इतरांच्या बॅगा काढून तिथं आपले सामान ठेवलेले असते. नको तेवढी फुकट दारू पिलेली असते. छोटे-छोटे वाईन चे सॅम्पल्स आपल्या बॅगेत अलगद टाकलेले असतात. बाथरूम मध्ये गेल्यावर फ्लश करायचं असतं यावर विश्वास नसतो. बाथरूम मधल्या टॉयलेटरीज खिशात भरून आणलेली असतात. एअर होस्टेस ती जर गोरी असेल तर तिच्याबद्दल आपल्या मातृभाषेत ओन्ली फॉर adults कमेंट्स केलेले असतात. सगळे झोपलेले असताना मोठ्यांनी शेअर्स वर बडबड केलेली असते. असे हे कोणालाच न जुमानणारे, ज्याचे निवडणुकीस उभे राहिल्यास चिन्ह 'रान डुक्कर' असू शकते असे हे महाशय जेव्हा अमेरिकेत इमिग्रेशन ऑफिसरच्या समोर दीन पणें उभे राहतात तेव्हा त्यांच्यातली सगळी गुर्मी मस्ती फुग्यातली हवा गेल्यासारखे गेलेली असते. भारतात लायसन नाही म्हणून पोलिसांनी पकडल्यावर याच माणसांनी तिथूनच आमदार-खासदाराना फोन केला असतो पण इथे मात्र त्यांच्या लक्षात येतं की आपलं इकड काहीच चालणार नाहीये आपण अमेरिकेच्या अध्यक्षाला जर फोन केला तर तोही आपल्याला मदत करु शकणार नाहीये.
तेव्हा हा अंगभूत बदमाशी असलेला मनुष्य त्यांच्या परीने एक विशिष्ट विनम्र, पापभिरू, सज्जन वजा गुळमिट चेहरा करण्याचा प्रयत्न करतो कारण त्यांचा एक गैरसमज असतो की पासपोर्ट नसला तरी चालेल पण केवळ या चेहऱ्यावरती कदाचित अमेरिकेत इमिग्रेशन मिळेल.
तर माझ्या अभिनयाच्या विद्यार्थ्यांनो नीट लक्षात घ्या, त्यावेळी या गृहस्थाच्या चेहऱ्यावरती जे अद्भुत भाव असतात त्याला लोचट भाव असे म्हणतात. कळाले?
#travel_tips #acting_tips
लोचट चेहरा म्हणजे प्रेम
लोचट चेहरा म्हणजे प्रेम चोप्रा!!
एकदम बरोबर.
एकदम बरोबर.
(No subject)
(No subject)
वावे, तुम्ही दिलेलं गाण शाहिद
वावे, तुम्ही दिलेलं गाण शाहिद कपुरच्या 'मत मारी'(R..राजकुमार) गाण्यापेक्षा हजारो पटींनी चांगल आहे हो!
वावे, तुम्ही दिलेलं गाण शाहिद
वावे, तुम्ही दिलेलं गाण शाहिद कपुरच्या 'मत मारी'(R..राजकुमार) गाण्यापेक्षा हजारो पटींनी चांगल आहे हो!>>बापरे .. नेमकं काय गीत आहे हे?? आणि याला चाल दिलीये ..`केवळ लोचटपणा आहे हा
ईथली चर्चा वाचून मत मारी
ईथली चर्चा वाचून मत मारी पाहिले. माझीही मत मारी गयी असे झाले. त्यातही भारी म्हणजे ३१ एम व्यूज आहेत त्याला .. लोकांन किती रिकामटेकडा वेळ आहे या देशात... हा एक धाग्याचा विषय आहे खरे तर
Pages