मराठी चित्रपट कलाकारांमध्ये उत्तम नर्तक कोणी आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 January, 2020 - 15:17

गेल्या वर्षी मी ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रणवीर सिंगच्या खलीबली गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला होता. वर्षभर माझी ओळख रणवीर सिंग अशी झाली होती. यंदा मी रणबीरच्या बचना ए हसीनो गाण्यावर नृत्य केल्यानंतर ती ओळख बनलीय. पुढच्या वेळी अजून एक झेप घेत आईच्या ईच्छेला मान देत ऋत्विक रोशनच्या गाण्याला हात घालायचा आहे. ऑफिसमध्ये कोणी कौतुकाने आता पुढच्यावेळी काय म्हणून विचारतात तेव्हा मी त्यांना हे सांगतोही. पण त्यातल्या बरयाच जणांनी आता एक मराठी गाण्यावर नाच होऊन जाऊ दे अशी ईच्छा व्यक्त केली.
गंमत म्हणजे मायबोलीवरही अशी ईच्छा व्यक्त झाली आणि डोक्यात विचार आला....

मराठीमध्ये रणवीर, रणबीर, शाहीद. ऋत्विक, प्रभू देवा, टायगर श्रॉफ वा गोविंदा यांच्या तोडीचा कोणी डान्सर आहे का?
बरं ईतक्याही अपेक्षा नको. पण सलमान, शाहरूख, सैफ, अक्षय. जसे नाचतात तसेही कोणी नाचू शकते का?

आजचेच असे नाही तर ईतिहासात जरी डोकावले तरी माझ्या माहितीत तरी एक सचिन पिळगावकर हे सन्माननीय अपवाद वगळता नाचात कोणी आपला ठसा ऊमटवला आहे असे आठवत नाही. आणि त्यांनीही आपल्या कारकिर्दीत नाचाला पुर्ण न्याय दिलाय असे वाटत नाही. मग नाचायचे तरी काय? नाडेवाली चड्डी घालून ढगाला लागली कळं की हातात झाडू घेऊन आश्विनी ये ना...
(ईथे मी काही पट्टीचा डान्सर नाही, कॉपीच करणार आहे. पण ज्याला कॉपी करावे तर तो पट्टीचा नर्तक आणि आपल्या नाचासाठी फेमस असावा ईतकीच ईच्छा आहे)

मराठी मुलींमध्ये माधुरी, उर्मिला गेला बाजार आश्विनी भावेही आजावे माही तेरा म्हणत नाचात आपला ठसा ऊमटवून गेल्या. पण मराठी चित्रपटसृष्टीत वा हिंदीतील मराठी कलाकारांमध्येही कोणी नाचाचा विषय काढता पटकन डोळ्यासमोर येत नाही. मला फार नवीन पोरांची कल्पना नाही. पण स्वप्निल जोशी असो वा अंकुश चौधरी वा आपले चतुरस्त्र अभिनेते सुबोध भावे. सारे नाचात कच्चेच. दिल मे बजी गिटार म्हणत नाचलेला रितेश देशमुख यापलीकडे माझ्या माहितीत काही आढळत नाही. झिंगाटसारखे गाणे बनते मराठीत पण नाच झिंगल्यासारखाच असतो. हिंदी धडकमध्ये मात्र नाचाच्या गाण्यावर व्यवस्थित नाच बसवला जातो. कोंबडी पळालीवर भरत जाधव नाच कमी आणि कॉमेडीच जास्त करतो. त्याच गाण्याचे जेव्हा हिंदीत चिकणी चमेली बनते तेव्हा कतरीना कैफ पडदा जळून जाईल अशी आग लावते. शोधल्यास मराठीत अशी बरीच गाणी सापडतील ज्यांना आपण चांगले नर्तक नसल्याकारणारने न्याय देऊ शकलो नाही. लक्ष्या महेशसारखे चिकीचिकी बूबूम बूम करण्यात वाया घालवली. गेला बाजार एखादा जंपिंग जॅक जितेंद्रही झाल्याचे आढळत नाही.

तरी वासरांत लंगडी गाय शोधायचे झाल्यास कोणते नाव घ्याल? की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचे अंगणच वाकडे आहे?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळातच, गाणी अन नृत्य ही भारतीय चित्रपटाची देणगी आहे.
परदेशी चित्रपटात हे प्रकार अभावानेच आढळतात.

त्यातल्या त्यात महागुरूंच्या चित्रपटात प्रसंगाला धरून गाणी आणि नृत्य असत. थोडे अजून मागे गेल्यास, गाणी श्रवणीय, प्रसंगानुरूप, अन आशयपुर्ण असत. (धांगडधिंगा नाही).

रच्याकने,
धाग्याचे कारण तुम्हाला या वर्षीचे नाचासाठी मराठी गाणे सुचवायचे हा आहे का? असल्यास, आधी येथे तुनळीवरील /तत्सम संस्थळावरील तुमच्या नृत्याची चलतचित्रणाची टिचकी (पक्षी लिंक) द्यावी. ( लिंकला पर्यायी शब्द सुचवा)

> नाडेवाली चड्डी घालून ढगाला लागली कळं की हातात झाडू घेऊन आश्विनी ये ना... > याच्यासोबतच ते गोमू संगतीनं टाक. एपिक टेरर आहे ते Lol Lol

Biggrin .... मराठीत अशी बरीच गाणी सापडतील ज्यांना आपण चांगले नर्तक नसल्याकारणारने न्याय देऊ शकलो नाही. >> +१०००१
आली ठुमकत नार लचकत तर इतकं कमनशीबी गाणं. पहिल्या वेळेस निळूभाऊ - ते 'बाई,या वाड्यावर' वाले त्यामुळे त्यांनी नाचायची काही अपेक्षाच नको. तर नंतर रिमिक्सला स्वप्नील जोशी! ढोलाने ढेरी लपवत लपवत गातो. पिंजरामधलंच छबीदार छबी मात्र रिमिक्स मध्ये रिडीम झालं हेच त्यातल्या त्यात समाधान.
आणखी सांगायचं तर... जाऊ द्या.. हम बोलेगा तो बोलोगे के .....

सिद्धार्थ जाधव चांगला नाचतो! पण त्याच स्वतःच अस एकही गाण नाचासाठी फेमस नाहीये..
मकरंद अनासपुरेची डान्स स्टाईलपण बेश्ट आहे बघा. ती बघुन नाचायला नाही जमलं तरी कशाप्रकारे नाचु नये. हे तुम्हाला नक्की कळेल.

गूगल किवा यू ट्यूब वर मराठी गाण्यांवर अननोन डान्सर्स ने बसवलेले डान्स बघा. त्यावर डान्स करा उगाच धागा काढून स्पेस का फुकट घालवताय ....
रितेश देशमुख चा आहे की मराठी मूवी.... नवीन मराठी किती एक्टर्स आहेत ते ही चांगले नाचतात... ते ही सर्च करा कधीतरी... वर उल्लेखलेले सर्व अभिनेते फार जुने आहेत आता खुप नवीन अभिनेते आलेत जे बरे नाचूँ शकतात

आला होळीचा सण लै भारी
लै लै वाकडा मिशिच आकडा
आवाज वाढव डीजे
बोलाव माझ्या डीजेला
बेबी ब्रिंग इट ऑन
जवा बघतीस तु माझ्याकड

ही लगेचआठवलेली गाणी. अजुनही आहेत आणि ह्या वर्षात अजुन येतील.
दोनतीन गाणी मिक्स करता येतात.
हिरो हिरोईन कोण नाचतंय त्यापेक्षा गाण्याचे बीट मुझिक बघ.

गश्मीर महाजनी. तो चांगला नाचतो.

नवीन Submitted by एस on 2 January, 2020 - 10:04
>>>>१००

हेच लिहायला आलो होतो
पण आधी येथे तुनळीवरील /तत्सम संस्थळावरील तुमच्या नृत्याची चलतचित्रणाची टिचकी (पक्षी लिंक) द्यावी.>>>१००

ढगाला लागली कळ(मराठी मधील सुपर स्टार दादा कोंडके) आणि अश्विनी ये ना (अशोक सराफ)
ह्यांचा हेटाळणी युक्त उल्लेख केल्या बद्दल ऋन्मेस चा जाहीर निषेध करतो.
भारतीय चित्रपट सृष्टी ला ज्यांनी जन्म दिला तो सुद्धा एका मराठी माणसां नेचं
जुने चित्रपट हे कथेवर अवलंबून असतं, नाच हा काही चित्रपट चा प्राण नसायचा.
त्या काळातील हिंदी
चित्रपट मधील कलाकार सुद्धा बघितले .
तर धर्मेंद्र,राजेश खन्ना,राज कपूर,अशोक कुमार,सुनील दत्त,मनोज कुमार,ह्यांना कुठे नाचता यायचं,
पुरुषांनी नाचणे हेच मान्य नव्हत तेव्हा समाजात.
पण वर उल्लेख केलेले कलाकार हे अतिशय महान कलाकार आहेत.
त्यांना नाच येत नव्हता म्हणून त्यांचे महत्त्व बिलकुल कमी होत नाही.

हे फोल्क्स, क्रिप्या गल्लत करू नका. कुठल्या मराठी गाण्यावर नाचू हा सल्ला मागायला हा धागा नसून त्याचा विचार करताना मराठी चित्रपटसृष्टीत असलेला नर्तकांचा दुष्काळ जाणवला त्यावर धागा आहे.

बाकी मी यंदा बचना ए हसीनो सोबत ढगाला लागली कळ (रिमिक्स - ड्रीमगर्ल) या गाण्यावरही मैत्रीणीसोबत नाचलो. त्यामुळे मराठीत नाचाच्या गाण्यांची कमी आहे असे नाही, तर चांगले नाचणारयांची कमी आहे हा विषय आहे.

त्यांना नाच येत नव्हता म्हणून त्यांचे महत्त्व बिलकुल कमी होत नाही.
>>>>>
हो. मला कोणाचे महत्व कमी करायचेही नाही. नाच ही सुद्धा एक महत्वाची कला आहे. दुर्दैवाने ती मराठी चित्रपटसृष्टी पुरुश्ग कलाकारांमध्ये कमी जाणवते. ईतकेच

ढगाला लागली कळ(मराठी मधील सुपर स्टार दादा कोंडके) आणि अश्विनी ये ना (अशोक सराफ)
ह्यांचा हेटाळणी युक्त उल्लेख केल्या बद्दल ऋन्मेस चा जाहीर निषेध करतो.
>>>>

कलाकार म्हणून ते माझे आवडतेच आहेत.
वरची दोन्ही गाणीही आवडती आहे.
आश्विनी ये ना गाणे तर बघायलाही मजा येते. आजही येते.
पण विषय ईथे वेगळा आहे.

तर चांगले नाचणारयांची कमी आहे हा विषय आहे.

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 2 January, 2020 - 21:23
>>>
राजे, आम्हास्नी बी बघू द्या ना तुम्ही कसे नाचता ते.
देणार ना मग लिंक.

वर जी सुशांत प्रशांत कुशल बद्रिके गश्मीर महाजनी सिद्धार्थ वगैरे नावे आली आहेत त्यांच्या चित्रपटाचे एखाद् दुसरे गाणे बघायला मिळेल का? लोकांनी लक्ष्या वगैरेही नाव घेतलेय...

हो क्षितिज. चांगला नाचलाय आपल्या लक्ष्याचा मुलगा. शाहीद कपूरचे स्लो मोशन वर्जन वाटला काही स्टेप्सना.
चोरीओग्राफी थोडीफार फराह खान टाईप्स वाटली.

हो ऋन्मेष..चांगला नाचलाय तो..आणि यातील काही steps तू replace करू शकतो..happening song आहे हे..यातील काही part use केलास remix मध्ये तरी enjoy करतील लोक्स..

भावना प्रधान चित्रपट,
आशय असलेले चित्रपट ,कथा असलेले चित्रपट ह्या मध्ये डान्स ला जागा पण नसते आणि त्याची गरज पण नसते.
हे सर्व जेव्हा चित्रपट मध्ये नसते तेव्हा माकड उड्या असतात.

हे सर्व जेव्हा चित्रपट मध्ये नसते तेव्हा माकड उड्या असतात.
>>>>
ओके. म्हणजे ऋत्विक शाहीद रणवीर रणबीर हे सारे माकडऊड्या कलाकार आहेत.
वर काही मराठी कलाकारांची नावे अलीत. ते ही आप्ल्यामते माकडऊड्या कलाकार आहेत.
चला पसंद अपनी अपनी आपले आपले मत सादर प्रणाम करून आदर आहे Happy

Pages