मराठी चित्रपट कलाकारांमध्ये उत्तम नर्तक कोणी आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 January, 2020 - 15:17

गेल्या वर्षी मी ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रणवीर सिंगच्या खलीबली गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला होता. वर्षभर माझी ओळख रणवीर सिंग अशी झाली होती. यंदा मी रणबीरच्या बचना ए हसीनो गाण्यावर नृत्य केल्यानंतर ती ओळख बनलीय. पुढच्या वेळी अजून एक झेप घेत आईच्या ईच्छेला मान देत ऋत्विक रोशनच्या गाण्याला हात घालायचा आहे. ऑफिसमध्ये कोणी कौतुकाने आता पुढच्यावेळी काय म्हणून विचारतात तेव्हा मी त्यांना हे सांगतोही. पण त्यातल्या बरयाच जणांनी आता एक मराठी गाण्यावर नाच होऊन जाऊ दे अशी ईच्छा व्यक्त केली.
गंमत म्हणजे मायबोलीवरही अशी ईच्छा व्यक्त झाली आणि डोक्यात विचार आला....

मराठीमध्ये रणवीर, रणबीर, शाहीद. ऋत्विक, प्रभू देवा, टायगर श्रॉफ वा गोविंदा यांच्या तोडीचा कोणी डान्सर आहे का?
बरं ईतक्याही अपेक्षा नको. पण सलमान, शाहरूख, सैफ, अक्षय. जसे नाचतात तसेही कोणी नाचू शकते का?

आजचेच असे नाही तर ईतिहासात जरी डोकावले तरी माझ्या माहितीत तरी एक सचिन पिळगावकर हे सन्माननीय अपवाद वगळता नाचात कोणी आपला ठसा ऊमटवला आहे असे आठवत नाही. आणि त्यांनीही आपल्या कारकिर्दीत नाचाला पुर्ण न्याय दिलाय असे वाटत नाही. मग नाचायचे तरी काय? नाडेवाली चड्डी घालून ढगाला लागली कळं की हातात झाडू घेऊन आश्विनी ये ना...
(ईथे मी काही पट्टीचा डान्सर नाही, कॉपीच करणार आहे. पण ज्याला कॉपी करावे तर तो पट्टीचा नर्तक आणि आपल्या नाचासाठी फेमस असावा ईतकीच ईच्छा आहे)

मराठी मुलींमध्ये माधुरी, उर्मिला गेला बाजार आश्विनी भावेही आजावे माही तेरा म्हणत नाचात आपला ठसा ऊमटवून गेल्या. पण मराठी चित्रपटसृष्टीत वा हिंदीतील मराठी कलाकारांमध्येही कोणी नाचाचा विषय काढता पटकन डोळ्यासमोर येत नाही. मला फार नवीन पोरांची कल्पना नाही. पण स्वप्निल जोशी असो वा अंकुश चौधरी वा आपले चतुरस्त्र अभिनेते सुबोध भावे. सारे नाचात कच्चेच. दिल मे बजी गिटार म्हणत नाचलेला रितेश देशमुख यापलीकडे माझ्या माहितीत काही आढळत नाही. झिंगाटसारखे गाणे बनते मराठीत पण नाच झिंगल्यासारखाच असतो. हिंदी धडकमध्ये मात्र नाचाच्या गाण्यावर व्यवस्थित नाच बसवला जातो. कोंबडी पळालीवर भरत जाधव नाच कमी आणि कॉमेडीच जास्त करतो. त्याच गाण्याचे जेव्हा हिंदीत चिकणी चमेली बनते तेव्हा कतरीना कैफ पडदा जळून जाईल अशी आग लावते. शोधल्यास मराठीत अशी बरीच गाणी सापडतील ज्यांना आपण चांगले नर्तक नसल्याकारणारने न्याय देऊ शकलो नाही. लक्ष्या महेशसारखे चिकीचिकी बूबूम बूम करण्यात वाया घालवली. गेला बाजार एखादा जंपिंग जॅक जितेंद्रही झाल्याचे आढळत नाही.

तरी वासरांत लंगडी गाय शोधायचे झाल्यास कोणते नाव घ्याल? की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचे अंगणच वाकडे आहे?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लक्ष्यान्ंतर महेश कोठारे डॅम ईट यांचे चित्रपट बघणे सोडले आहे.
पण नृत्यावर चित्रपट एबीसीडीप्र्माणे ही आयडीया छान आहे.
प्रभू देवाचा रोल अर्थातच सचिन पिळगावकर यांनाच.
पण डान्सर कोण कोण असतील?
पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव, गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी ????

चित्रपट काढला होता म्हणजे नक्की काय प्रोड्युस केला कि डायरेक्त केला. >>>>>>> डायरेक्ट केला होता.

पण नृत्यावर चित्रपट एबीसीडीप्र्माणे ही आयडीया छान आहे. >>>>>>>>> ++++++++११११११११११ अगदीच एबीसीडीची कॉपी नको पण

वरील हिरोजपैकी कोणीही चालतील. नवीन मुले - मुली असली तर उत्तमच.

गश्मीर, वैभव ,पुष्कर यापैकी कोणीही कोणीही हिरो असला तरी चालेल पण हिरोईन मीच होणार. आधीच सांगते. (खिदळणारी बाहुली).

Light 1 घ्या,
टिपिकल जुन्या हिंदी सिनेमात दाखवायचे तसे, हिरोमाता हिरोला बैंगन का भरता आणि गाजर का हलवा बनवून खाऊ घालते.
तसे आता इथे पण करता येईल, आणी ॲडिशन म्हणून ऋ च्या दुसर्या धाग्यावर " खाऊगल्ली- आजचा मेनू" या धाग्यावर ती पाकृ डकवते.

सुनिधी नाही, उलट तो धागा यायचा होताच म्हणून वातावरण निर्मितीसाठी हा धागा आणि यूट्यूबवर विडिओ अपलोड कसा करावा हे धागे आले. Happy अर्थात यूट्यूब विडिओ अपलोडींगचा प्रॉब्लेम जेन्युईन होता.

सुलू पहिल्या एकदोन पानावरच आहे बघा धागा... विडिओ फोटो सगळे आहे..
बघा आणि झरूर प्रतिसाद द्या..

@ बिपीनचंद्र. कॉपीराईट प्रॉब्लेम

माझ्या नाचाचा विडिओ काय टाकला लोकं बाकी मराठी कलाकारांना विसरूनच गेले >>>>>>> कुठे टाकलाय व्हिडिओ? Uhoh>>>>>अशा नावाचा वेगळा धागा आहे ऋन्मेष चा तिथे आहेत व्हिडिओ

कॉपीराईट वर मात करायचा सर्वात सोपा उपाय -

तुमचा व्हिडीओ म्यूट करुन अपलोड करा. सोबत डिस्क्रिप्शन मध्ये ओरिजिनल म्यूझिक असलेल्या व्हिडीओची लिंक द्या. लोकांना दोन्ही व्हिडीओज् एकाच वेळी प्ले करण्याची सूचना तिथेच लिहा.

तुमच्या सारख्या सुप्प्प्प्पर स्टारने डॅन्स केल्यामुळे त्या ओरिजिनल व्हिडीओचाही उद्धार होऊन त्याच्याही हिट्स वाढतील. कदाचित त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातला काही वाटा तुम्हालाही मिळेल.

पुढची पायरी - शाखा, आखा, सखा त्यांच्या गाण्यावर तुम्ही डॅन्स करुन त्या व्हिडीओत त्यांच्या ओरिजिनल व्हिडीओची लिंक द्यावी म्हणून तुमच्या दारात अ‍ॅडव्हान्स चेक घेऊन उभे राहतील तो दिवस आता फारसा दूर नाही.

Pages