मराठी चित्रपट कलाकारांमध्ये उत्तम नर्तक कोणी आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 January, 2020 - 15:17

गेल्या वर्षी मी ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रणवीर सिंगच्या खलीबली गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला होता. वर्षभर माझी ओळख रणवीर सिंग अशी झाली होती. यंदा मी रणबीरच्या बचना ए हसीनो गाण्यावर नृत्य केल्यानंतर ती ओळख बनलीय. पुढच्या वेळी अजून एक झेप घेत आईच्या ईच्छेला मान देत ऋत्विक रोशनच्या गाण्याला हात घालायचा आहे. ऑफिसमध्ये कोणी कौतुकाने आता पुढच्यावेळी काय म्हणून विचारतात तेव्हा मी त्यांना हे सांगतोही. पण त्यातल्या बरयाच जणांनी आता एक मराठी गाण्यावर नाच होऊन जाऊ दे अशी ईच्छा व्यक्त केली.
गंमत म्हणजे मायबोलीवरही अशी ईच्छा व्यक्त झाली आणि डोक्यात विचार आला....

मराठीमध्ये रणवीर, रणबीर, शाहीद. ऋत्विक, प्रभू देवा, टायगर श्रॉफ वा गोविंदा यांच्या तोडीचा कोणी डान्सर आहे का?
बरं ईतक्याही अपेक्षा नको. पण सलमान, शाहरूख, सैफ, अक्षय. जसे नाचतात तसेही कोणी नाचू शकते का?

आजचेच असे नाही तर ईतिहासात जरी डोकावले तरी माझ्या माहितीत तरी एक सचिन पिळगावकर हे सन्माननीय अपवाद वगळता नाचात कोणी आपला ठसा ऊमटवला आहे असे आठवत नाही. आणि त्यांनीही आपल्या कारकिर्दीत नाचाला पुर्ण न्याय दिलाय असे वाटत नाही. मग नाचायचे तरी काय? नाडेवाली चड्डी घालून ढगाला लागली कळं की हातात झाडू घेऊन आश्विनी ये ना...
(ईथे मी काही पट्टीचा डान्सर नाही, कॉपीच करणार आहे. पण ज्याला कॉपी करावे तर तो पट्टीचा नर्तक आणि आपल्या नाचासाठी फेमस असावा ईतकीच ईच्छा आहे)

मराठी मुलींमध्ये माधुरी, उर्मिला गेला बाजार आश्विनी भावेही आजावे माही तेरा म्हणत नाचात आपला ठसा ऊमटवून गेल्या. पण मराठी चित्रपटसृष्टीत वा हिंदीतील मराठी कलाकारांमध्येही कोणी नाचाचा विषय काढता पटकन डोळ्यासमोर येत नाही. मला फार नवीन पोरांची कल्पना नाही. पण स्वप्निल जोशी असो वा अंकुश चौधरी वा आपले चतुरस्त्र अभिनेते सुबोध भावे. सारे नाचात कच्चेच. दिल मे बजी गिटार म्हणत नाचलेला रितेश देशमुख यापलीकडे माझ्या माहितीत काही आढळत नाही. झिंगाटसारखे गाणे बनते मराठीत पण नाच झिंगल्यासारखाच असतो. हिंदी धडकमध्ये मात्र नाचाच्या गाण्यावर व्यवस्थित नाच बसवला जातो. कोंबडी पळालीवर भरत जाधव नाच कमी आणि कॉमेडीच जास्त करतो. त्याच गाण्याचे जेव्हा हिंदीत चिकणी चमेली बनते तेव्हा कतरीना कैफ पडदा जळून जाईल अशी आग लावते. शोधल्यास मराठीत अशी बरीच गाणी सापडतील ज्यांना आपण चांगले नर्तक नसल्याकारणारने न्याय देऊ शकलो नाही. लक्ष्या महेशसारखे चिकीचिकी बूबूम बूम करण्यात वाया घालवली. गेला बाजार एखादा जंपिंग जॅक जितेंद्रही झाल्याचे आढळत नाही.

तरी वासरांत लंगडी गाय शोधायचे झाल्यास कोणते नाव घ्याल? की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचे अंगणच वाकडे आहे?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभव तत्ववादी चांगला करतो डान्स. एका अ‍ॅवॉर्ड शो मधे चांगला केला होता गजानना गाण्यावर.
>>>
मी वाट बघत होतो या प्रतिसादाची. मी सुद्धा पाहिलेले त्याला एकदा नाचताना. आणि उत्स्फुर्तपणे सहजतेने नाचत होता. मलाही आवडला तो नाच.

दादा असतील,अशोक सराफ असतील,सचिन असेल,डॉक्टर श्री राम लागू असतील,निळू फुले असतील,कुलदीप पवार असतील,मकरंद असेल, भरत असेल ,नाना असेल,,
आणि ज्यांनी स्टेज शो करून अभिनय मध्ये उतूंग उंची प्राप्त केली आहे ते सर्व
मग परेश रावल असतील,अमरीश पुरी असतील,सदाशिव अमरापूरकर असतील.
नसरुद्दीन शह असतील,किती नाव घेवू.
ह्यांची तुलना शहीद,शाहरुख आणि बाकी लोकांशी कशी होईल.

शहीद,सलमान,ऋतिक,
Etc ह्यांना मराठी समजले आणि तुमचा धागा वाचला तर डोक्यावर हात मारून घेतील.

भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण ढिसाळ आहे. सूर मारून झेल घेणे भारतीयांत अभावानेच आढळते. कोण आहेत भारतात चांगले क्षेत्ररक्षक जरा सांगा बघू

छे ! भारतात सचिन गांगुली सेहवाग लक्ष्मण असे दिग्गज फलंदाज आहेत. त्यांना क्षेत्ररक्षण करायची गरजही नाही. ते आपल्या फलंदाजीवर सामना जिंकवून देऊ शकतात.
ज्यांना फलंदाजी गोलंदाजी जमत नाही ते जाँटी वगैरे माकडऊड्या मारून क्षेत्ररक्षण करतात. सचिन दादा लक्ष्मण यांची तुलना जाँटी र्होडस सारख्याची होऊ तरी शकेल का?

बर्रं !

अहो बोकलत ज्या वयात लोकं काठी घेऊन पाठीत बाक काढून चालतात त्या वयात सचिन पिळगावकरांनी तरुणांना लाजवेल असे नृत्य करत नाच बलियेची स्पर्धा जिंकली होती.

त्यानंतर एकापेक्षा एक स्पर्धेला जज करताना त्यांचे नृत्यासंबंधित अफाट बारकावे आपल्याला थक्क करून सोडतात. याचसाठी ते नृत्याचे महागुरू म्हणून ओळखले जाऊ लागले.

वरचे एखादे मुंबई गाणे फसले म्हणून तेच पकडणे योग्य नाही. अमिताभनेही रामगोपाल वर्मासोबत असे काही चित्रपट दिलेत की तेच घेऊन हाच खरा अमिताभ म्हटले तर ते अगदी असेच होईल. कलाकार माणूस आहे.. कलाकृतीची निवड चुकले. पण कला ईज पर्मनंट Happy

रून्मेष, मराठीतला डांसींग जंपींग जँक व सलमान माझ्यामते तरी सचिन व लक्ष्मीकांत बेर्डेच आहे आणि तसेही तुम्ही वासरात लंगडी गाय विचारले आहे . सचिनचे नाव तु्म्हीच नमूद केले आहे त्यामुळे ते नाव घेतले नव्हते.बाकी आवड आपली आपली ...

एक युक्ति सुचवु का, एका हिन्दि गान्यावर मस्त नाच बसवा आनि मराथी गान्यवर सादर करा
>>>

म्हणजे कसे? हिंदी गाण्यावर प्रॅक्टीस करायची आणि भलतेच मराठी गाणे लाऊन त्या स्टेप्स नाचायच्या. विचार करूनच भंजाळायला होतेय. हे जमू शकते कोणाला?

पुष्कर जोग ?? सिरीअसली.?. मी पाहिले नाही कधी त्याला नाचताना खरेही असेल चांगला नाचत पण बघून नाचणारा वाटत नाही

डान्स शो मध्ये मुल चांगला डान्स करतात
>>>
आमच्याकडे नवरात्र गणपतीलाही पोरं छान नाचतात. काही नाचाच्या क्लासलाही जातत. एक मित्र तर स्वत: नाचाचे क्लास घ्यायचा
तर . मराठी पोरांच्या नाचावर शण्का नाही..
प्रश्न आहे चित्रपट कलाकारांचा...

अमृता खानविलकर.
तिच्याकडे कुठल्याही प्रकारच्या नाचाला लागणारी जाण, कला आणि लय सगळेच आहे असे मला वाटते.

नवीन कलाकार ना एन्ट्री च मिळत नाही.
त्या मुळे टॅलेंट कुजत आहे.
धर्मेंद्र पासून झाडून सर्व स्टार ची पोर पोरी च आल्या चित्रपट सृष्टी मध्ये.
आता हा धंधा ठराविक लोकांची Monopoly jhalay.
दर्जा पूर्ण घसरला आहे.
मराठी मध्ये पण तेच.
मराठी चित्रपट आशय प्रधान असतात नवीन मध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार चित्रपट आले.
भोजपुरी,मदरासी सारखी उघडी नागडी गाणी मराठी मध्ये चालत नाही .
प्रेक्षक सुजाण आहे.

त्या मुळे डान्स पण मर्यादा आहे

एक मराठी गाण्यावर नाच होऊन जाऊ दे अशी ईच्छा व्यक्त केली.
गंमत म्हणजे मायबोलीवरही अशी ईच्छा व्यक्त झाली आणि डोक्यात विचार आला....>>
तुमच्या नृत्याची ध्वनीचित्रफित बघण्याचीपण मा.बो. वर इच्छा व्यक्त होतेय. ती इच्छापण पुर्ण होऊ द्या. (याच्यावर कृपा करुन नवीन धागा मात्र काढु नका.)

>>ती ध्वनिचित्रफीत कधीच बघायला मिळणार नाही.<<
तुम्हाला खरंच वाटलं कि ती क्लिप (अस्तित्वात असेल तर?) बघायला मिळेल? हाउ कॅन यु बी सो नाइव? Proud

Rofl
राज+1

आम्हाला नाचाचा विडिओ बघायचा आहे. पण त्यासाठी वेगळा धागा नको. नाच ही काही ईतकीही महत्वाची गोष्ट नाही की स्वतंत्र धागा काढावा. मराठी लोकांची हिच नाचाकडे बघायची दृष्टी चित्रपटात रिफ्लेक्ट होते आणि नाचाला कोणी तिथेही सिरीअसली घेत नाही. आम्ही उत्तम अभिनय करतो आशयघन चित्रपट काढतो यातच खुश. मुळात आशयघन चित्रपट किती निघतात हे बघायला हवे. आणि हे ईतर भाषांत निघतच नाहीत का हे देखील बघायला हवे.

पुष्कर जोग ?? सिरीअसली.?. मी पाहिले नाही कधी त्याला नाचताना खरेही असेल चांगला नाचत पण बघून नाचणारा वाटत नाही>>चांगला नाचतो तो.
मागच्या आठवड्यात सोनी वर जय जय महाराष्ट्र मध्ये पण त्याने गोंधळ सादर केला होता.
यू ट्यूब वर विडिओ बघा
तो बऱ्याच अवॉर्ड शोस मध्ये पण नाचायचा.

पुष्कर जोगचा चित्रपट आला होता, जबरदस्त नावाचा. महेश कोठारेन्नी काढला होता. त्यात नाचला होता की पुष्की. गाणीही फेमस होती.

मराठीत विविध विषयावर सिनेमे निघतात सो, डान्सवर सुद्दा चित्रपट निघायला हवेत एबीसीडी टाईप ( एनीबडी कॅन डान्स)

Pages