माझी आवडती १० पानं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीवर खूपच लिहिलं जातंय, पण नक्की चांगलं काय हे शोधायला खूप अवघड होत चाललंय" या समस्येवर उपाय शोधायचा बरेच दिवसांचा प्रयत्न चालू आहे. सध्या "महिन्याची उत्कृष्ट कविता" ठरवणं हे याच प्रश्नाचं आणखी एक रुप म्हणता येईल.

१) नुसतं प्रत्येक पानावर मतदान घेऊन प्रश्न सुटणार नाही कारण ती एका प्रकारे लोकप्रियता स्पर्धा ठरेल. आणि सगळ्या मायबोलीकराना जे आवडेल ते मला आवडेलच असे नाही. माझी आवड वेगळी असू शकते.

२) मतदान घेतले तरी ते RESET करण्याची सोय हवी. नाहीतर एकच लोकप्रिय कथा/कविता कायमचीच लोकप्रिय राहील. बरं ठराविक कालावधीनंतर RESET केले तर नेहमीच त्याच कालावधीत चांगले काही येईल याची खात्री नाही.

यावर सुचलेला एक उपाय म्हणजे प्रत्येक पानाखाली "माझ्यासाठी आवडते १०" असा दुवा असेल जो वापरून तुम्ही एखादी आवडलेली गोष्ट(कथा/कविता/लेख इत्यादी) तुमच्या आवडत्या १०त नोंदवू शकता.

aawadate_10.jpg

नोंद करण्यासाठी फक्त टिचकी मारायची, बाकी काही नाही. नोंद काढण्यासाठी परत फक्त तिथेच टिचकी मारायची. (Toggle)

ही यादी एखाद्या रांगेसारखी काम करेल. ११ वी नोंद केली कि आपोआप १ली नोंद काढून टाकली जाईल.
त्यामुळे अमुक एका वेळेत मत दिले पाहिजे असे नाही. जेंव्हा जसे जमेल्/वाटेल तशी नोंद करायची.

मायबोलीवरच्या सगळ्यांच्या आवडत्या १० यादीचा आपोआप आढावा घेऊन त्या त्या दिवशी काय लोकप्रिय आहे हे दाखवता येईल. म्हणजे घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर आणि महमद तुघलक तिघांच्या यादीत एकच पान असेल तर ती नोंद वर जाईल पण काळापहाड आणि घंटाकर्ण दोघांच्याच यादीत असले तर ते पान तुलनेने खाली असेल.

जसे जसे लोक नवीन पाने नोंदवतील तशा तशा संपूर्ण मायबोलीवरच्या मुख्य यादीत आपोआप बदल होत जातील. वरील उदा. घाशीराम कोतवालांच्या च्या ११ व्या नोंदीनंतर त्याचे पान १ ला असलेले मत निघून गेले असेल आणि ते पान आपोआप खाली जाईल.

पण माझी आवड जरा वेगळी आहे आणि मला हे माहिती आहे की माझी आवड ही प.पू. प्रांजळेशास्त्री आणि जनरल याह्याखान यांच्या आवडीशी जुळते आहे. मला हे पण माहिती आहे की प.पू. प्रांजळेशास्त्री आणि जनरल याह्याखान उगाचच कुणालाही आवडते १० मधे टाकत नाही. तर मी सगळ्या मायबोलीकरांना काय आवडते या कडे न पाहता फक्त प्रांजळेशास्त्री आणि याह्याखान यांच्याच आवडत्या १० कडे लक्ष देईन. त्यांनी केलेल्या आवडत्या १० च्या नोंदी पाहून मी पटकन ती पाने वाचू शकेन.

या नोंदी प्रत्येक व्यक्तिरेखेच्या पानावर एका नवीन टॅब मधून पाहता येतील.

किंवा तुम्ही योग्य निकष वापरूनच नोंद करता अशी इतरांना खात्री झाली तर तुम्हीही एक "मान्यवर तज्ञ" म्हणून ओळखले जाल. Happy

थोडक्यात एकाच वेळी मायबोलीवर हजारो स्पर्धा चालू असतील. प्रत्येक स्पर्धेत फक्त एकच परीक्षक असेल (मी: प्रत्येक मायबोलीकर) आणि फक्त १० स्पर्धकाना भाग घेता येईल. मी कुणासाठी स्पर्धक तर कुणासाठी परीक्षक असेन. कुठ्ल्या स्पर्धकाना घ्यायचं हे परिक्षक ठरवेल तर कुठल्या परीक्षकाला किती भाव द्यायचा हे स्पर्धक आणि वाचक ठरवतील. म्हणजे माझ्या कवितेकडे कुणी कितीही दुर्लक्ष करो पण महाकवी कालिदास यांनी त्यांच्या आवडते १० त माझी नोंद केली तर मी धन्य होईन. पण काव्यभूषण विभिषण यांच माझ्याशी पटत नाही त्यामुळे ते कुणाला "आवडते १० मधे" नोंदवतात याची मला काडीचीही किंमत नाही. (मी गुप्तपणे त्यांच्या विचारपूशीवर लक्ष ठेवून असतो हे सगळ्यांना माहिती आहेच Happy )

स्पर्धेचा कालावधीपण मी (प्रत्येक मायबोलीकर) ठरवेन. जेंव्हा मला वाचायला वेळ असेल तेंव्हा माझी यादी लवकर बदलेल. जेंव्हा वेळ नसेल तेंव्हा त्याच नोंदी जास्त काळ दिसतील.

यात काही जण त्यांच्या आवडीप्रमाणे Specialization/Super Specialization करू शकतील. उदा. कवडीचुंबक फक्त कवितांना त्यांच्या आवडत्या १० मधे जागा देतात तर झुंजुमुंजु फक्त रात्रिच्या प्रकाशचित्राना आवडत्या १० मधे जागा देतो. कविता आवडणारे कवडीचुंबक यांच्याकडे लक्ष ठेवून असतील तर प्रकाशचित्र आवडणारे झुंजुमुंजु कडे (कधी होणार याची वाट पाहतील).

कुठल्याही पानाखाली "आवडत्या १० त नोंदवा" इथे टिचकी मारून यादीत नोंद करा. तुमची यादी तुमच्या खात्यात (नवीन टॅब वर) दिसेल.

सगळ्या मायबोलीसाठी
http://www.maayboli.com/top20forall
इथे जाऊन सध्या सगळ्यांच्या आवडीचे काय आहे ते पाहता येईल.

जाता जाता: माझे मित्रवर्य प.पू. प्रांजळेशास्त्री ,जनरल याह्याखान, सखाराम बाईंडर, इयत्ता तिसरी आणि महमद तुघलक यांच्या प्रत्येकाच्या खात्यात न जाता फक्त त्यांनी केलेल्या सर्वोत्तम १० नोंदी एकत्र पहायला मिळाल्या तर काय छान होईल नाही? होईल होईल, थोडी कळ काढा तेही होईल Happy

विषय: 
प्रकार: 

सही!

ड्राफ्ट झकास झालाय!

पण दोन नोंदी एकाच पानाच्या का दिसताहेत? ग्रूप आणि पान दोन्ही एकाच वेळी सिलेक्ट होतय.

एक प्रश्न - वेगवेगळ्या शहरांची, गावांची पाने यात टाकावीत का? त्यातून फारसा फायदा होईल असे वाटत नाही. त्यात एखादा वाचण्याजोगा मजकूर आला म्हणून ते जर १० मधे टाकले तर इतर तेथे जाउन वाचेपर्यंत तो बहुधा वाहून गेलेला असेल. म्हणजे एकूणच न-वाहती पाने यात असावीत का?

तसेच दिवाळी अंकांच्या लेखांखाली ही सुविधा असेल का?

अभिनंदन अ‍ॅडमीन टीम , खुपच स्तुत्य उपक्रम . ही खर्‍या अर्थाने माबो करांची कसोटी आहे . Happy
BTW : उजव्याबाजुच्या काही उत्तान जाहीरातींवर काही उपाय करता येईल, नाही एकट्याने बघायला काही नाही हो पण ऑफीस मधे बघताना थोडसं संकोचल्या सारखं होतं . Proud

ट्युलीप,
पण दोन नोंदी एकाच पानाच्या का दिसताहेत?>> हे आता दुरुस्त केले आहे.

फारेंड
दिवाळी अंक हा वेगळा उपक्रम असल्याने तिथे ही सुविधा नसेल.
काही मायबोलीकरांना वाहती पानेच त्यांच्या आवडत्या १० मध्ये ठेवायची असू शकतात. त्यामुळे ही सुविधा सर्व पानांवर आहे.

अरे कुठल्या जमान्यात आहात?
प्रांजळे हे आडनाव आणि शास्त्री ही उपाधी/पदवी आहे ती स्त्रीला का लागू पडू नये. प.पू. प्रांजळेशास्त्री या स्त्री का नसाव्यात? शास्त्रीचं स्त्रीलिंग काय? आणि जनरल याह्याखान यांचं पूर्णनाव जनरल मलिका याह्याखान असू शकतं की ! आणि कवडीचुंबक हे पुरुषाचं नाव कशावरून?
दिवे घ्या Happy !

>>>> आता एकेमेकांच्या सदस्यत्वात अधिकृतपणे डोकावता येईल Lol
ही खरी कायदेविषयक "सजगता" Wink Lol मानल पाहिजे! हे मला सुचलच नव्हतं

व्वा व्वा मस्त कल्पना लढविली आहे..

"क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे" ह्या उक्तिचा प्रत्यय दिला प्रशासकांनी.. ऑगस्ट महिन्याची सर्वोत्तम कविता बीबी वर उठलेल्या सर्व प्रश्नांना कॄतीतून उत्तर देऊन Happy

ह्याने बरेचसे जुने प्रश्न सुटणार असले तरी काही नवे प्रश्न उभे राहतील.. ते काळच्या ओघात लक्षात येतीलही पण सद्ध्या तरी सर्वमान्य तोडगा निघालाय असे वाटते..

प्रशासकांचे हार्दिक अभिनंदन

सुरेख कल्पना !
फ्लिकरवर फेवरेट करायची सोय आहे तशी सोय येथे व्हावी असे मी सुचवायचे म्हणत होते, पण आधीच तुमच्या कामाच्या पसा-यात आपण आपली यादी वाढवायची कशी असा संकोच वाटला. पण छान हे छानच झाले. मनापासून अभिनंदन अन धन्यवाद !

इंटरेस्टिंग..!! असंच काहीसं पाहिजे होतं, पण ते काय- ते कळत नव्हतं. धन्यवद अ‍ॅडमिन्-टीम. Happy

ड्राफ्ट झकास जमला आहे. उदाहरणे देऊन सांगितल्यामुळे लगेच कळलं अन पटलंही. Happy

कितीही जुन्या लेखनाला आपण आवडत्या १० मध्ये सामील करू शकतो का? उदाहरणार्थ, मला समजा चिनूक्सचे सखाराम बाईंडर अन तेंडूलकरांवरचे दोन लेख समाविष्ट करयचे आहेत, पण तिथे हा 'आवडत्या १०त नोंदवा' चा चेक-बॉक्स दिसत नाही.

कितीही जुने लेखन तुम्ही तुमच्या आवडत्या यादीत टाकू शकता. लेखाच्या शेवटी कानोकानीच्या वर चेकबॉक्स आहे की.

Pages