माझी आवडती १० पानं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीवर खूपच लिहिलं जातंय, पण नक्की चांगलं काय हे शोधायला खूप अवघड होत चाललंय" या समस्येवर उपाय शोधायचा बरेच दिवसांचा प्रयत्न चालू आहे. सध्या "महिन्याची उत्कृष्ट कविता" ठरवणं हे याच प्रश्नाचं आणखी एक रुप म्हणता येईल.

१) नुसतं प्रत्येक पानावर मतदान घेऊन प्रश्न सुटणार नाही कारण ती एका प्रकारे लोकप्रियता स्पर्धा ठरेल. आणि सगळ्या मायबोलीकराना जे आवडेल ते मला आवडेलच असे नाही. माझी आवड वेगळी असू शकते.

२) मतदान घेतले तरी ते RESET करण्याची सोय हवी. नाहीतर एकच लोकप्रिय कथा/कविता कायमचीच लोकप्रिय राहील. बरं ठराविक कालावधीनंतर RESET केले तर नेहमीच त्याच कालावधीत चांगले काही येईल याची खात्री नाही.

यावर सुचलेला एक उपाय म्हणजे प्रत्येक पानाखाली "माझ्यासाठी आवडते १०" असा दुवा असेल जो वापरून तुम्ही एखादी आवडलेली गोष्ट(कथा/कविता/लेख इत्यादी) तुमच्या आवडत्या १०त नोंदवू शकता.

aawadate_10.jpg

नोंद करण्यासाठी फक्त टिचकी मारायची, बाकी काही नाही. नोंद काढण्यासाठी परत फक्त तिथेच टिचकी मारायची. (Toggle)

ही यादी एखाद्या रांगेसारखी काम करेल. ११ वी नोंद केली कि आपोआप १ली नोंद काढून टाकली जाईल.
त्यामुळे अमुक एका वेळेत मत दिले पाहिजे असे नाही. जेंव्हा जसे जमेल्/वाटेल तशी नोंद करायची.

मायबोलीवरच्या सगळ्यांच्या आवडत्या १० यादीचा आपोआप आढावा घेऊन त्या त्या दिवशी काय लोकप्रिय आहे हे दाखवता येईल. म्हणजे घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर आणि महमद तुघलक तिघांच्या यादीत एकच पान असेल तर ती नोंद वर जाईल पण काळापहाड आणि घंटाकर्ण दोघांच्याच यादीत असले तर ते पान तुलनेने खाली असेल.

जसे जसे लोक नवीन पाने नोंदवतील तशा तशा संपूर्ण मायबोलीवरच्या मुख्य यादीत आपोआप बदल होत जातील. वरील उदा. घाशीराम कोतवालांच्या च्या ११ व्या नोंदीनंतर त्याचे पान १ ला असलेले मत निघून गेले असेल आणि ते पान आपोआप खाली जाईल.

पण माझी आवड जरा वेगळी आहे आणि मला हे माहिती आहे की माझी आवड ही प.पू. प्रांजळेशास्त्री आणि जनरल याह्याखान यांच्या आवडीशी जुळते आहे. मला हे पण माहिती आहे की प.पू. प्रांजळेशास्त्री आणि जनरल याह्याखान उगाचच कुणालाही आवडते १० मधे टाकत नाही. तर मी सगळ्या मायबोलीकरांना काय आवडते या कडे न पाहता फक्त प्रांजळेशास्त्री आणि याह्याखान यांच्याच आवडत्या १० कडे लक्ष देईन. त्यांनी केलेल्या आवडत्या १० च्या नोंदी पाहून मी पटकन ती पाने वाचू शकेन.

या नोंदी प्रत्येक व्यक्तिरेखेच्या पानावर एका नवीन टॅब मधून पाहता येतील.

किंवा तुम्ही योग्य निकष वापरूनच नोंद करता अशी इतरांना खात्री झाली तर तुम्हीही एक "मान्यवर तज्ञ" म्हणून ओळखले जाल. Happy

थोडक्यात एकाच वेळी मायबोलीवर हजारो स्पर्धा चालू असतील. प्रत्येक स्पर्धेत फक्त एकच परीक्षक असेल (मी: प्रत्येक मायबोलीकर) आणि फक्त १० स्पर्धकाना भाग घेता येईल. मी कुणासाठी स्पर्धक तर कुणासाठी परीक्षक असेन. कुठ्ल्या स्पर्धकाना घ्यायचं हे परिक्षक ठरवेल तर कुठल्या परीक्षकाला किती भाव द्यायचा हे स्पर्धक आणि वाचक ठरवतील. म्हणजे माझ्या कवितेकडे कुणी कितीही दुर्लक्ष करो पण महाकवी कालिदास यांनी त्यांच्या आवडते १० त माझी नोंद केली तर मी धन्य होईन. पण काव्यभूषण विभिषण यांच माझ्याशी पटत नाही त्यामुळे ते कुणाला "आवडते १० मधे" नोंदवतात याची मला काडीचीही किंमत नाही. (मी गुप्तपणे त्यांच्या विचारपूशीवर लक्ष ठेवून असतो हे सगळ्यांना माहिती आहेच Happy )

स्पर्धेचा कालावधीपण मी (प्रत्येक मायबोलीकर) ठरवेन. जेंव्हा मला वाचायला वेळ असेल तेंव्हा माझी यादी लवकर बदलेल. जेंव्हा वेळ नसेल तेंव्हा त्याच नोंदी जास्त काळ दिसतील.

यात काही जण त्यांच्या आवडीप्रमाणे Specialization/Super Specialization करू शकतील. उदा. कवडीचुंबक फक्त कवितांना त्यांच्या आवडत्या १० मधे जागा देतात तर झुंजुमुंजु फक्त रात्रिच्या प्रकाशचित्राना आवडत्या १० मधे जागा देतो. कविता आवडणारे कवडीचुंबक यांच्याकडे लक्ष ठेवून असतील तर प्रकाशचित्र आवडणारे झुंजुमुंजु कडे (कधी होणार याची वाट पाहतील).

कुठल्याही पानाखाली "आवडत्या १० त नोंदवा" इथे टिचकी मारून यादीत नोंद करा. तुमची यादी तुमच्या खात्यात (नवीन टॅब वर) दिसेल.

सगळ्या मायबोलीसाठी
http://www.maayboli.com/top20forall
इथे जाऊन सध्या सगळ्यांच्या आवडीचे काय आहे ते पाहता येईल.

जाता जाता: माझे मित्रवर्य प.पू. प्रांजळेशास्त्री ,जनरल याह्याखान, सखाराम बाईंडर, इयत्ता तिसरी आणि महमद तुघलक यांच्या प्रत्येकाच्या खात्यात न जाता फक्त त्यांनी केलेल्या सर्वोत्तम १० नोंदी एकत्र पहायला मिळाल्या तर काय छान होईल नाही? होईल होईल, थोडी कळ काढा तेही होईल Happy

विषय: 
प्रकार: 

निवडक किंवा लक्षवेधी नाव मला पण आवडले. पण मग मसुद्यातलं पहिलच वाक्य "पण नक्की चांगलं काय हे" ह्याचा अर्थ वेगळा होतो. असो, त्याने काही फरक पडत नाही. सध्या तरी मी लालुसारखाच उपयोग करतेय आवडत्या १० चा. म्हणुन तर तिची कोंबडी पहिल्या नंबरावर आहे Proud

मायबोलीवरच्या सगळ्यांच्या एकत्रित निवडक लेखनाचा सारांश पाहण्यासाठी नवीन लेखनविभागातून लिंक दिली आहे. ही लिंक वर "नवीन लेखन -> निवडक मायबोली" इथून पाहता येईल. किंवा थेट इथे पाहता येईल http://www.maayboli.com/top20forall

हा सारांश दर ६ तासाने, त्या त्या वेळेस असलेल्या प्रत्येक मायबोलीकराच्या निवडक दहातून तयार केला जाईल.

धन्यवाद. पण गेले कित्येक दिवस त्या लिस्टमध्ये काहीही फरक पडलेला नाही. Happy

ज्या लोकांनी 'निवडक १०' नोंदवले आहेत त्यांची यादी (सदस्य खात्यात जाणार्‍या लिन्कसह) देता येईल का? कोणी एक जरी लिन्क १० मध्ये नोन्दवली तर त्या व्यक्तीचे नाव यादीत अ‍ॅड होईल, यादी रिकामी केली तर डिलीट होईल. 'निवडक १०' अपडेट केलेल्या तारखेप्रमाणे ती असली तर अजून छान.

>पण गेले कित्येक दिवस त्या लिस्टमध्ये काहीही फरक पडलेला नाही.

सगळ्या मायबोलीकरांचं एकमत होणं थोडं अवघड दिसतंय ! आताच साधारण १००० च्या वर मायबोलीकरानी निवडक दहामधे कुठल्यातरी पानाची नोंद केलीय पण निवडक १० मधे सगळ्यांनाच common असलेली पानं कमी असल्याने त्यात बदल होण्यासाठी वेळ लागतोय. त्यावर एक उपाय म्हणून, सगळ्या मायबोलीवरच्या निवडक नोंदीसाठी २० नोंदी दाखवायची सोय केली आहे.

>ज्या लोकांनी 'निवडक १०' नोंदवले आहेत त्यांची यादी (सदस्य खात्यात जाणार्‍या लिन्कसह) देता येईल का?

असे करण्यात काही अडचणी आहेत आणि इथे वर काही मायबोलीकरांनी त्याबद्दल व्यक्त केलेल्या शंका रास्त आहेत. त्यामुळे असे करण्याऐवजी तुमच्याशी आवडनिवड जुळणार्‍या मायबोलीकरानी नोंद केली की तुम्हाला कसे कळवता येईल याबद्दल प्रयत्न चालू आहेत.

कधीकधी मूळ लिखाण हे एक निमित्त असते आणि त्यावरचा प्रतिसाद विशेष दाद देण्याजोगा .उदा.वर्षूच्या 'सोलमेट' वर अश्विनीमामींचा प्रतिसाद. प्रतिसादाला निवडक १० मधून 'दाद' देता येईल का ?

निवडक १० प्रतिसादाला (ते दिसायला हवेत दर ६ तासांनी. नाही म्हणजे काय?) प्रतिसाद द्यायची सोय करण्यात यावी. Happy
~d

Pages