माझी आवडती १० पानं
मायबोलीवर खूपच लिहिलं जातंय, पण नक्की चांगलं काय हे शोधायला खूप अवघड होत चाललंय" या समस्येवर उपाय शोधायचा बरेच दिवसांचा प्रयत्न चालू आहे. सध्या "महिन्याची उत्कृष्ट कविता" ठरवणं हे याच प्रश्नाचं आणखी एक रुप म्हणता येईल.
१) नुसतं प्रत्येक पानावर मतदान घेऊन प्रश्न सुटणार नाही कारण ती एका प्रकारे लोकप्रियता स्पर्धा ठरेल. आणि सगळ्या मायबोलीकराना जे आवडेल ते मला आवडेलच असे नाही. माझी आवड वेगळी असू शकते.
२) मतदान घेतले तरी ते RESET करण्याची सोय हवी. नाहीतर एकच लोकप्रिय कथा/कविता कायमचीच लोकप्रिय राहील. बरं ठराविक कालावधीनंतर RESET केले तर नेहमीच त्याच कालावधीत चांगले काही येईल याची खात्री नाही.
यावर सुचलेला एक उपाय म्हणजे प्रत्येक पानाखाली "माझ्यासाठी आवडते १०" असा दुवा असेल जो वापरून तुम्ही एखादी आवडलेली गोष्ट(कथा/कविता/लेख इत्यादी) तुमच्या आवडत्या १०त नोंदवू शकता.
नोंद करण्यासाठी फक्त टिचकी मारायची, बाकी काही नाही. नोंद काढण्यासाठी परत फक्त तिथेच टिचकी मारायची. (Toggle)
ही यादी एखाद्या रांगेसारखी काम करेल. ११ वी नोंद केली कि आपोआप १ली नोंद काढून टाकली जाईल.
त्यामुळे अमुक एका वेळेत मत दिले पाहिजे असे नाही. जेंव्हा जसे जमेल्/वाटेल तशी नोंद करायची.
मायबोलीवरच्या सगळ्यांच्या आवडत्या १० यादीचा आपोआप आढावा घेऊन त्या त्या दिवशी काय लोकप्रिय आहे हे दाखवता येईल. म्हणजे घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर आणि महमद तुघलक तिघांच्या यादीत एकच पान असेल तर ती नोंद वर जाईल पण काळापहाड आणि घंटाकर्ण दोघांच्याच यादीत असले तर ते पान तुलनेने खाली असेल.
जसे जसे लोक नवीन पाने नोंदवतील तशा तशा संपूर्ण मायबोलीवरच्या मुख्य यादीत आपोआप बदल होत जातील. वरील उदा. घाशीराम कोतवालांच्या च्या ११ व्या नोंदीनंतर त्याचे पान १ ला असलेले मत निघून गेले असेल आणि ते पान आपोआप खाली जाईल.
पण माझी आवड जरा वेगळी आहे आणि मला हे माहिती आहे की माझी आवड ही प.पू. प्रांजळेशास्त्री आणि जनरल याह्याखान यांच्या आवडीशी जुळते आहे. मला हे पण माहिती आहे की प.पू. प्रांजळेशास्त्री आणि जनरल याह्याखान उगाचच कुणालाही आवडते १० मधे टाकत नाही. तर मी सगळ्या मायबोलीकरांना काय आवडते या कडे न पाहता फक्त प्रांजळेशास्त्री आणि याह्याखान यांच्याच आवडत्या १० कडे लक्ष देईन. त्यांनी केलेल्या आवडत्या १० च्या नोंदी पाहून मी पटकन ती पाने वाचू शकेन.
या नोंदी प्रत्येक व्यक्तिरेखेच्या पानावर एका नवीन टॅब मधून पाहता येतील.
किंवा तुम्ही योग्य निकष वापरूनच नोंद करता अशी इतरांना खात्री झाली तर तुम्हीही एक "मान्यवर तज्ञ" म्हणून ओळखले जाल.
थोडक्यात एकाच वेळी मायबोलीवर हजारो स्पर्धा चालू असतील. प्रत्येक स्पर्धेत फक्त एकच परीक्षक असेल (मी: प्रत्येक मायबोलीकर) आणि फक्त १० स्पर्धकाना भाग घेता येईल. मी कुणासाठी स्पर्धक तर कुणासाठी परीक्षक असेन. कुठ्ल्या स्पर्धकाना घ्यायचं हे परिक्षक ठरवेल तर कुठल्या परीक्षकाला किती भाव द्यायचा हे स्पर्धक आणि वाचक ठरवतील. म्हणजे माझ्या कवितेकडे कुणी कितीही दुर्लक्ष करो पण महाकवी कालिदास यांनी त्यांच्या आवडते १० त माझी नोंद केली तर मी धन्य होईन. पण काव्यभूषण विभिषण यांच माझ्याशी पटत नाही त्यामुळे ते कुणाला "आवडते १० मधे" नोंदवतात याची मला काडीचीही किंमत नाही. (मी गुप्तपणे त्यांच्या विचारपूशीवर लक्ष ठेवून असतो हे सगळ्यांना माहिती आहेच )
स्पर्धेचा कालावधीपण मी (प्रत्येक मायबोलीकर) ठरवेन. जेंव्हा मला वाचायला वेळ असेल तेंव्हा माझी यादी लवकर बदलेल. जेंव्हा वेळ नसेल तेंव्हा त्याच नोंदी जास्त काळ दिसतील.
यात काही जण त्यांच्या आवडीप्रमाणे Specialization/Super Specialization करू शकतील. उदा. कवडीचुंबक फक्त कवितांना त्यांच्या आवडत्या १० मधे जागा देतात तर झुंजुमुंजु फक्त रात्रिच्या प्रकाशचित्राना आवडत्या १० मधे जागा देतो. कविता आवडणारे कवडीचुंबक यांच्याकडे लक्ष ठेवून असतील तर प्रकाशचित्र आवडणारे झुंजुमुंजु कडे (कधी होणार याची वाट पाहतील).
कुठल्याही पानाखाली "आवडत्या १० त नोंदवा" इथे टिचकी मारून यादीत नोंद करा. तुमची यादी तुमच्या खात्यात (नवीन टॅब वर) दिसेल.
सगळ्या मायबोलीसाठी
http://www.maayboli.com/top20forall
इथे जाऊन सध्या सगळ्यांच्या आवडीचे काय आहे ते पाहता येईल.
जाता जाता: माझे मित्रवर्य प.पू. प्रांजळेशास्त्री ,जनरल याह्याखान, सखाराम बाईंडर, इयत्ता तिसरी आणि महमद तुघलक यांच्या प्रत्येकाच्या खात्यात न जाता फक्त त्यांनी केलेल्या सर्वोत्तम १० नोंदी एकत्र पहायला मिळाल्या तर काय छान होईल नाही? होईल होईल, थोडी कळ काढा तेही होईल
अॅडमिन, मी पुन्हा प्रयत्न
अॅडमिन, मी पुन्हा प्रयत्न केला, शिवाय पान 'रिफ्रेश' करूनही बघितले. तो चेकबॉक्स दिसला नाही.
http://www.maayboli.com/node/9146 या पानावर
पुस्तक रंगभूमी व्यक्तिमत्व साहित्य कमला बेबी श्री. विजय तेंडुलकर श्रीमती लालन सारंग सखाराम बाइंडर
या 'टॅग्ज'नंतर थेट कानोकानीचीच लिंक दिसतेय.
अख्ख्या मायबोलीची 'आवडती दहा
अख्ख्या मायबोलीची 'आवडती दहा पानं' बघायचा दुवा (http://www.maayboli.com/top10forall) हे पान सोडून आणखी कोठे आहे? तो दुवा वरच्या पट्टीवर ( जिथे रंगीबेरेंगी, मदतपुस्तिका वगैरे दुवे आहेत तिथे ) देता येईल का?
साजिरा, मला पण दिसतोय तो पर्याय तिथे. तुम्ही कोणता ब्राऊझर वापरता आहात? मी IE 6.0.
त्या टॅग्ज नंतर नाहीचे..
त्या टॅग्ज नंतर नाहीचे.. त्याच ओळीत आधी चेकबॉक्स आणि नंतर हे टॅग्ज आहेत.

माझ्याकडे IE7.
साज्या, चाळिशी आली काय?
नाय, नाय. चाळिशीचे नाव काढू
नाय, नाय. चाळिशीचे नाव काढू नका हो अजून. (लई गोष्टी करायच्या बाकी आहेत.)
दिसले दिसले. 'टॅग्ज' कमी झाल्यानंतर दिसले.
>>>> सगळ्या मायबोलीसाठी >>>>
>>>> सगळ्या मायबोलीसाठी
>>>> http://www.maayboli.com/top10forall
>>>> इथे जाऊन सध्या सगळ्यांच्या आवडीचे काय आहे ते पाहता येईल.
ते कळ्ळ, पण ते कुणाकुणाच्या आवडीच आहे ते एकत्रितपणे दिसू शकेल काय?

उदा थोतान्डाला पाच जणान्नी निवडलय, ते पाच कोण हे कस काय कळणार?
अन इथे केवळ दहापेक्षा जास्त इन्ट्रीज चालू शकतील की!
अॅडमिन.. एकदम मस्त सोय..
अॅडमिन.. एकदम मस्त सोय.. एकाच दगडात बरेच पक्षी मारले गेले....
मायबोलीचा अधिकृत टीआरपी मस्त
मायबोलीचा अधिकृत टीआरपी
मस्त आहे. वापरायला पण सोपे.
एक चांगली सुविधा निर्माण झाली
एक चांगली सुविधा निर्माण झाली आता
आपल्या कुठल्या लिखाणाला कुणी
आपल्या कुठल्या लिखाणाला कुणी टाकलंच असेल आवडत्या १० मधे तर ते कोणी टाकलंय ते आपल्याला समजतं का?
नाय. घाशीराम कोतवाल, सखाराम
नाय.
घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, महमद तुघलक, काळापहाड, घंटाकर्ण, प.पू. प्रांजळेशास्त्री, जनरल याह्याखान, महाकवी कालिदास, काव्यभूषण विभिषण, कवडीचुंबक, झुंजुमुंजु.. इत्यादींपैकी कुणीतरी असेल असं समजायचं.
(कसली भारी नावे आहेत..!!)
कुणाकुणामुळे आपण 'ओव्हरऑल आवडत्या १०' मध्ये आलो- याचा थोडा अंदाज घेता येईल ना. त्यांच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे त्यांच्या 'व्यक्तिगत आवडत्या १०' मध्ये जाऊन. पण बरीच प्रोफाईल्स बघावी लागतील. (अन त्यांच्या आवडत्या १०त नसलो, तर निराशाही पदरी पडेल.
)
मी गुप्तपणे त्यांच्या विचारपूशीवर लक्ष ठेवून असतो हे सगळ्यांना माहिती आहेच >> हे आणखी भारी!
नाय? मग समजेल का?
नाय?
मग समजेल का?
हे आवडते १० चे पान
हे आवडते १० चे पान मुखपृष्ठावर आले तर उत्तम होईल.. म्हणजे तिथेच टिचकी मारली की १० पॉप्युलर लिंक्स कळतील..
सह्ही! आवडलं ही टॉप १० यादी
सह्ही! आवडलं
ही टॉप १० यादी ११व्या आवडत्या लेख/काव्या नंतर चेंज होणार ? हिस्टरीत वगैरे सेव्ह नाही का करता येणार? आणि सर्चसाठी / आणि इन जनरलच ड्रॉप डाऊन बॉक्स वगैरे करता येतील काय? कॅटॅगिरीसकट... डिटेलमध्ये नंतर लिहितो
हूं ...म्हणजे इथे आता टोळी
हूं ...म्हणजे इथे आता टोळी युद्धाला सुरुवात होणार तर....
छान छान.
छान छान.
मस्त सुविधा. सगळा मसुदा पण
मस्त सुविधा. सगळा मसुदा पण मस्त आहे.
अभिनंदन! अॅडमिन टीम... क्या
अभिनंदन! अॅडमिन टीम... क्या बात है! जबरी म्हणजे जबरी आवडली ही कल्पना.
तरिच म्हण्ते हा काय नवीन टॅग
तरिच म्हण्ते हा काय नवीन टॅग दिसतोय? झकास आहे कल्पना. पण मग हि यादी किती दिवसांनी बदलायची?
आयला???? हूडा? तुझ टोळी युद्ध
आयला????

हूडा? तुझ टोळी युद्ध चालतय इथे
पण माझ कम्पुविश्लेषण नाही चालत, अस का बर????
अबुने चप्पल दाखविलेली चालते......... पण....
चांगली कल्पना आहे. मसुदाही
चांगली कल्पना आहे. मसुदाही मस्त.
हे असेच काहीतरी टण्या बेडेकर
हे असेच काहीतरी टण्या बेडेकर यांनी पण सुरु केले होते ना? गुलमोहर म्हणून? त्याचे काय झाले?
<<९०% टक्के नावडत्या व्यक्तींच्या याद्यांमधे मीच टॉपर असेन.>>
असे नका म्हणू हो! कैच्च्या कैच्च!
लिहीलेले आवडले नाही म्हणजे व्यक्तीच वाईट कशी होईल? तेव्हढे इथे बर्याच जणांना कळत असावे असे समजायला मला जागा आहे.
फार तर एखाद दोन लोक म्हणतील, विशेषतः भेटेन, भेटेन म्हणून सांगून ज्यांना भेटला नाहीत ते लोक!

असे नका म्हणू हो! कैच्च्या
असे नका म्हणू हो! कैच्च्या कैच्च!
<<<
पुन्हा मुसंबा बईंनी पोस्ट बदललं वाटतं
नाही रे मिलिंदा, ते नीधपची
नाही रे मिलिंदा, ते नीधपची समजूत काढतायत.
<पां.शा.> मागच्या पानावर आहे तिची पोस्ट! यांनी सग्गळ्या वाचल्या म्हणजे!
एक छोटीसी सूचना करावीशी
एक छोटीसी सूचना करावीशी वाटते.
मायबोली उघडल्याबरोबर कुठेतरी आवडत्या दहा (Top Ten) चा उल्लेख असावा; जिथे टिचकी मारल्यावर त्या वेळेचे टॉप टेन ची लिंक दिसेल. वर कुणीतरी ही सूचना दिलीच आहे.
<<<आपल्या कुठल्या लिखाणाला कुणी टाकलंच असेल आवडत्या १० मधे तर ते कोणी टाकलंय ते आपल्याला समजतं का?>>> पण तसे झाले तर कंपू तयार व्हायला मदत होईल. त्यामुळे नावे कळायलाच नकोत.
धन्यवाद.
शरद
१) सध्या आवडत्या १० च्या
१) सध्या आवडत्या १० च्या सोयीचा उपयोग संख्याशास्त्राच्या दृष्टीने पुरेशा मायबोलीकरांनी करायला सुरुवात केली नाही (आतापर्यंत ३०० मायबोलीकरानी वापर करायला सुरुवात केली आहे)
२) त्या एकाच पानावर खूप ताण येऊ नये म्हणून काही उपाय करणे चालू आहे
म्हणून ते दिसेल असे केले नाही काही दिवसात नक्की करायचा विचार आहे.
अॅडमिन टीम : मला हे आवडते १०
अॅडमिन टीम : मला हे आवडते १० नाव थोडे खटकले. मुख्यतः जर का रोजच्या रोज ही यादी अपडेट व्हावी हा तुमचा उद्देश असेल तर रोज इतके साहित्य हितगुजवर आले तरी ते "पुर्णपणे" आवडतेच असे नाही.
शिवाय प्रोफाईल मधे ते "हवा हवाई यांची आवड" या टायटल सकट दिसते त्यामुळे मला जे साहित्य "पुर्णपणे" आवडले तेच माझ्या प्रोफाईल मधे असेल याची मी निवड करतांना काळजी घेतली. आणि त्यामुळे रोजच्या रोज ही यादी अपडेट होईल का याची शंका वाटते.
उलट याचे नाव निवडक १० असेल आणि मायबोलीकरांची निवड तर जास्त योग्य होईल असे वाटते.
प्रत्येकाने यादी रोज अपडेट
प्रत्येकाने यादी रोज अपडेट करणे अपेक्षीत नाही. किंवा प्रत्येकाला जमेल तेंव्हा, जमेल तसे हे करता यावे हा हेतू त्यामागे आहे. नाहीतर हे एक काम होईन बसेल आणि त्याचा वापर आणि उपयुक्तता कमी होईल.
त्यामुळे तुम्ही घेतलेला अर्थ आणि वापर योग्य आहे. संख्याशास्त्राच्या नियमांनुसार आपोआप यादी बदलायला सुरुवात होते आहे. आणि रोज ती बदलली जावीच असा उद्देश नाही. काही काळ चांगले वाचण्यासारखे लेखन लिहिलेच गेले नाही तर ती ठप्प राहील आणि त्यात काही गैर नाही.
तुम्ही सुचवलेले "निवडक १०" नाव पण छान आहे. इतराचे यावर काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
हह ला अनुमोदन आवडते या पेक्षा
हह ला अनुमोदन
आवडते या पेक्षा "लक्षवेधी" किन्वा "लक्षवेधक" किन्वा "माझे आकर्षण" अशा अर्थाचे काही चालू शकेल
अशी गरज नाही की आवडले, पण महत्वाचे वाटले म्हणुन निवडले! जसे की माझ्या दहा मधे स्वच्छतागृहासन्दर्भाने नीधपाचा लेख घेतलाहे!
हे १० नोंदवताना प्रत्येकाने
हे १० नोंदवताना प्रत्येकाने सगळे साहित्य वाचले असेलच असे नाही. तसंच प्रत्येकजण याचा वेगवेगळ्या अर्थाने उपयोग करु शकतो. कोणी स्वतःचेच साहित्य लिस्ट मध्ये टाकेल (का नको?) कोणी खूप जुने आवडलेले टाकेल, कोणी सध्याचे आवडते ते टाकेल. मी दुर्लक्षित राहिलेले पण वाचण्याजोगे, आवडलेल्या रेसिपीज, लोकांना माहिती असावी असा बीबी (सध्या डीसी जीटीजी चा) अशी लिस्ट केली आहे. तेव्हा हे प्रत्येकावर अवलंबून आहे. माझ्यासाठी ते 'वाचण्याजोगे १०' आहेत. मग त्या लिस्टचं नाव काहीही असो.
)
(लोकांनी त्यात काय टाकलंय यावरुन 'तुमचा चॉइस फडतूस दिसतो' अशी कोणी नावं ठेवणार नाही.
'निवडक १०' किंवा 'लक्षवेधी १०' ही नावे मला आवडली.
(लिंबू 'माझे आकर्षण' म्हणजे काय?? असले काही नको हां..
)
अजिबात नको.. ९०% टक्के
अजिबात नको.. ९०% टक्के नावडत्या व्यक्तींच्या याद्यांमधे मीच टॉपर असेन.
>>
असंच नाही, काही तुम्हाला स्पर्धा भरपूर आहे इथे...
Pages