रांगोळीच्या शोधात दशदिशा

Submitted by mi_anu on 6 November, 2019 - 02:58

(लेखनमूल्य बिल्य शोधत असाल तर हे लिखाण वाचू नका.कोण रे ते मागून "तुझ्या कोणत्या लेखात असतं तसं पण.." पुटपुटतंय?)

याची सुरुवात झाली ती 15 दिवसांपूर्वी. तेव्हा मी एक शहाणी,उगीच कोणाशीही न बोलणारी,आपलं काम करणारी,आपले पैसे जपणारी शांत बाई होते.

अचानक गुगल पे ने दिवाळी स्टॅम्प योजना काढली आणि तेव्हापासून मी कोणालाही काहीही मेसेज, पैसे, स्टॅम्प पाठवणारी, काहीही खरेदी करणारी वेडी बाई झाले.

म्हणजे योजना अशी की झुमका, रांगोळी, फुल,आकाश कंदील, दिवा अश्या चित्रांचे प्रत्येकी 1 स्टॅम्प जमा करायचे आणि मग गुगल पे आपल्याला 251 रुपये "फुकट" देणार आणि एका लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायची संधी पण देणार.

हे स्टॅम्प मिळणार कसे?तर रोज जास्तीत जास्त 5 लोक/कंपनी/बिल पे ट्रान्स्फर करायच्या, रोज जास्तीत जास्त 5 वेळा दिवाळी आयटम(लावलेली पणती, प्रकाशमान कंदील) स्कॅन करायचा किंवा रोज जास्तीत जास्त 5 नव्या लोकांना एक स्टॅम्प गिफ्ट करायचा, मग आपल्याला एक स्टॅम्प गिफ्ट मिळतो.

हे सगळे उद्योग करून लगेचच 5 वेगवेगळ्या प्रकारचे 5 स्टॅम्प मिळतील आणि 251 रुपये बक्षीस मिळतील असा एखाद्या अश्राप निरागस माणसाचा गैरसमज असेल.बिझनेस मॉडेल्स अशी बनत नाहीत."3 दिवस 2 रात्री" वाली ट्रिप फुकट केव्हा मिळते?दीड लाखाची मॅग्नेटिक गादी घेतल्यावर किंवा 75000 ची वार्षिक मेम्बरशिप भरून ऑरगॅनिक प्रॉडक्ट विकून आपल्या सारखे सात ग्राहक(कोण ते 'बकरे' म्हणून ओरडतंय मागे?') 75000 रुपये गमवायला लावून.त्यामुळे गुगल पे पण सगळ्यांना भरपूर स्टॅम्प देते.रांगोळी किंवा फुल सोडून.ते आपल्याला फुल 'देण्या'ऐवजी 'बनवत' आहेत अशी सुप्त शंका अनेक जणांच्या मनात येते आहे.पण उपयोग नाही.एकदा एक स्टॅम्प मिळाला की तुमची बाकी 4 स्टॅम्प मिळवायची भूक जागी होते.

माझी पण पाचही स्टॅम्प मिळवायची भूक जागी झाली.मी भक्तीभावाने आजूबाजूच्याना पैसे पाठवू लागले.आधी नवरा, मग इतर नातेवाईक, टाटा स्काय,एअरटेल,जिओ, बीएसएनएल.35 रु किंवा त्यापेक्षा जास्त पाठवल्यास स्टॅम्प मिळतो.त्यामुळे अचानकपणे टाटा स्काय मध्ये रोज 35 रुपये जमा व्हायला लागले.अचानक मोबाईल बिलं पुढच्या महिन्याची आगाऊ भरली जायला लागली.ओला मनी मध्ये पैसे आले.किंडल वर पुस्तकं घेऊन अमेझॉन पे मध्ये गुगल पे वरून पैसे टाकले जाऊ लागले.इतक्या दिशेतून इतक्या दिशेला पैसे गेले आणि आले की हिशोब करून गरगरायला लागले."कार्तिक कॉलिंग कार्तिक" सारखं स्वतःच्या क्रेडिट कार्ड ला पैसे देऊन पण झाले.

रोज हापिसातून घरी आल्यावर देवापुढे दिवा लावावा त्याच उत्कटतेने आणि आस्तिकतेने मी गॅलरीत जाऊन आमचा सोलर कंदील 5 वेळा स्कॅन करू लागले.नवऱ्याला त्याच्या बऱ्याच मित्रांचे गोंधळलेले फोन येऊ लागले."अरे तुझ्या बायको कडून 35 रु मिळाले.कसलं कॉन्ट्री बाकी होतं का?"

आता माझ्या स्टॅम्प व्रताची कीर्ती (मी सगळ्यांना रोज स्टॅम्प देत असल्याने) पंचक्रोशीत पसरली आणि इतर भक्तजन माझ्याकडे रांगोळी आणि फुलांचा स्टॅम्प मागू लागले.रोज गुगल वर टीप येतात: "आज तुमचे मोबाईल बिल गुगल पे ने भरा आणि फुल किंवा रांगोळी स्टॅम्प मिळायची जास्तीत जास्त गॅरंटी!!". अश्या प्रकारे मी 2-3 मोठी बिलं भरून फुलं मिळवली आणि नवऱ्याला आणि एक दोन मित्राना दिली आणि त्यांना रांगोळी ची विनंती केली.

"हाऊ टू गेट रांगोळी स्टॅम्प" असं गुगल केलं असता माझ्या सारखे येडे भक्त भरपूर आहेत आणि त्यातल्या काही जणांनी रांगोळी स्टॅम्प साठी अनोळखी लोकांचे टेलिग्राम ग्रुप बनवले आहेत असं कळलं.व्हॉटसप वर 'जे1 झालं का' आणि 'मयत्री करणार का' वालं स्पॅम नको असल्याने टेलिग्राम गृप चा मोह आवरता घेतला.लोकांनी आवडत्या मुलीला प्रपोज करताना "माझ्याकडे रांगोळी स्टॅम्प आहे" सांगून छाप पाडणाऱ्या मुलांचे विनोद पण बनवले.आता माझ्याकडे 45 आकाश कंदील,50 दिवे, 15 झुमके, 1 फुल आणि 0 रांगोळी आहे.

एकंदर हिशोब आणि अनेक उगीचच जादाची भरलेली आगाऊ बिलं पाहता नवऱ्याच्या मते हा "10 किलो डिटर्जंट वर एक चमचा मोफत" लेव्हल चा सौदा आहे.पण "फुकट" या शब्दाचा मोह भल्या भल्या विश्वामित्राना आवरला नाही.मी तर एक साधा वाल्या कोळी.एखाद्या ड्रॅकुला चावलेल्या माणसाने इतरांचं रक्त पिऊन त्यांना ड्रॅकुलापदाची दीक्षा द्यावी किंवा एखाद्या अमली पदार्थ विकणाऱ्या एजंट ने पाहिलं पाकीट फुकट देऊन लोकांना व्यसन लावावं तसं मी बऱ्याच ऑफर माहीत नसलेल्या भाबड्याजनांना स्टँप जमवायची सवय लावली आहे.

माझ्यापासून सावध राहा!! हा लेख वाचू नका.एखाद्या ड्रॅकुला ने चावलेल्या माणसाला रक्ताची चटक लागावी तशी तुम्हाला पण स्टँप जमवायची आणि 11 नोव्हेंबर पर्यंत रांगोळी साठी जंग जंग पछाडायची सवय लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनु, Lol

माझ्याकडे रांगोळी आणि फूल सोडून बाकी आहेत स्टॅम्प... तुझ्याकडे एकच आहे फूल. नाहीतर मला गिफ्ट कर, म्हटलं असतं. Proud

छानच लेख. मी हे रंगोली स्टँप आहे का वाले मीम्स खूपच वाचले पण त्यामागे हे आहे माहीत नव्हते. तुझ्या विनोदबुद्धी व शैलीस सलाम.

Lol
माझ्याकडे एक फुल, पणती अन दोन कंदील आहे.. कोणीतरी गिफ्ट केलं होतं मग मीही एक गिफ्ट दुसऱ्याला केलं.. हा गेम मला 2 दिवसांपूर्वी कळला!

Lol
अचानक धनलाभ चं अचानक व्यय.
टीट्वेंटीच्या सुपर ओव्हरसारखा फुल्ल ऑफ फोर्स आणि सिक्सेस आणि बोऽल्ड.
---
मयञी

Lol
हे असे काही असते हेच माहित नव्हते!

Lol कालच कळला हा प्रकार. एक मैत्रिण रांगोळी आहे का विचारत होती तेव्हा रंग पण हवेत का विचारल्यावर Happy

ह्या लेखामुळे हा प्रकार नीट वाचला :)आधी का नाही लिहिला Happy नीट गेम खेळता आला असता. रांगोळी काढली होती ती स्कॅन केली असती, आकाशकंदील पण Happy

आता एवढे लक्ष न दिल्यामुळे 251 रुपये जाणार च वाईट वाटतंय!

राजसी, अजून वेळ आहे 11 नोव्हेंबर पर्यंत ☺️☺️
दिवाळी चेच दिवे पाहिजे असं काही नाही, देवापाशी पणती लावून ती पण स्कॅन करता येईल.पावसामुळे पणत्या टिकल्या नाहीत.पण मी भर पावसात आमचा सोलर लॅम्प स्कॅन करते आणि गुगल तो दिवाळी दिवा आहे म्हणून विश्वास ठेवतं.
ता.क.: रांगोळी स्कॅन करून रांगोळी स्टॅम्प मिळत नाही.अनुभवाचे बोल.

तीन स्कॅन मारुन गेल्या दहा मिनिटात मला फूल आणि कंदील मिळालाय Happy आता मला पण फक्त रांगोळी हवी आहे Happy

Lol हे असं काही आहे हे माहितीच नव्हतं. गूगल येडं बनवतंय का काय? रांगोळी स्टॅम्प्स काढले तरी आहेत का त्यांनी नक्की? Proud
तुझं हे स्टॅम्प व्हॅम्पायर व्रत सुफळ संपूर्ण होवो आणि तुला मुदतीच्या आत रांगोळी स्टॅम्प मिळो ही शुभेच्छा!
(ते २५१ मिळाले की पार्टी द्यायला विसरू नकोस Wink )

गुगल sight / कॅमेरा इंटेलिजन्स ला फराळाचे items दिवाळी items असं कळतं नाहीये. तसेच नोट, चांदीच भांड पण कळतं नाहीये !
नवे कपडे, उटणं, तेल try नाही केलं Happy

माझा मस्त tp होतोय Happy

मी डकडक गो वापरत नसल्याने गुगल ला माझ्या जीवनातली बरीच गुपितं माहीत आहेत.त्यापुढे दिवे डाटा फारच क्षुल्लक गोष्ट आहे ☺️☺️
माझे आजचे 5 दिवे संपले पण कोणीतरी अंधार करून चालू गॅस ची ज्योत स्कॅन करून पाहा.बघू किती येडे आहे ते.
राजसी, दिवा स्कॅन करून फुल ही भाग्याची गोष्ट.फुल लोकांना 500 च्या पुढच्या ट्रान्स्फर ला मिळत होतं.
एका कंपनीने "आमचा पिझ्झा ऑर्डर करा आणि गुगल पे करून रांगोळी स्टॅम्प ची शक्यता वाढवा" अशी जाहिरात पण ठेवलीय पानावर.

मस्त लिहिलंय.

लेट मी गेट धिस राईट- सो लोक हा गेम २५१ रुपयांसाठी खेळत आहेत???

हायला, मला हे माहीत नव्हते. आता रांगोळी कशी मिळेल शोधावे लागेल.
पण अतिहव्यास चांगला नाही. आधीच बायकोच्या ऑनलाईन पाडवा (झुमके मुल्य २४९ ) खरेदीवेळी गुगल पे ने घसघशीत ७२३ रू चे स्क्रॅच कार्ड दिलेय.
Screenshot_20191106-222858_Google Pay.jpg

3 फुलं स्टॅम्प
पाथफाईंडर तुम्हाला सुरक्षेसाठी बाऊन्सर ठेवावे लागणार असं दिसतंय ☺️☺️☺️

मी पुणेकर नाही.
@अनु तिन्ही फुले a/c no +IFSC ने पे केल्यावर मिळाले आहेत.
तुम्ही रांगोळी साठी हा प्रयत्न करून बघा
इथे रिझल्ट सांगा Happy

याची सुरुवात झाली ती 15 दिवसांपूर्वी. तेव्हा मी एक शहाणी,उगीच कोणाशीही न बोलणारी,आपलं काम करणारी,आपले पैसे जपणारी शांत बाई होते.>>>
अनु Lol . पुढे ते स्वप्नामध्ये अस लिहायला विसरली आहेस बघ.

☺️☺️
"जगात देव आहे" च्या धर्तीवर-रांगोळी स्टॅम्प खरोखर आहे.काही जणांना क्रेड वरून क्रेडिट कार्ड बिल पे केल्यावर मिळालं आहे.
पण भोचकपणा भारी त्या क्रेड वाल्यांच्या अंगी.इतक्या परमिशन मागतात(कॅमेरा वापरू, मेसेज करू,क्रेडिट स्कोर चेक करू वगैरे) की मी न वापरता अनइन्स्टल केलं.)

Pages