इंग्रजी गाण्यांची आवड

Submitted by सामो on 29 October, 2019 - 13:54

* ज्योतिषाचे काही उल्लेख आलेले आहेत. ज्यांना त्या विषयात, रस नसेल, त्यांनी ते उल्लेख टाळून बाकी वाचावे व मुख्य म्हणजे धाग्याची गाडी फक्त त्या तीळभर ज्योतिषावरती डिरेल करु नये.
________________________________________________________________
परदेशी स्थाईक होण्याची संधी मिळाल्यामुळे, जशा खूप नातेवाईक, सण,देवळे,पदार्थ, मराठी/हिंदी गाणी अशा आयुष्यातील नानाविध उत्तमोत्तम गोष्टींना मुकले, तश्याच अनेक गोष्टी साध्यही करू शकले. क्षितिजे कशी किती विस्तारली याचा आढावा घेते तेव्हा सर्वात मानाचे स्थान मिळते ते गाण्यांना. भारत सोडला नसता तर इंग्रजी गाण्यांकडे ढुंकुनही पाहिले नसते. कारण कम्फ़र्ट झोन (आश्वस्त परीघ) सोडावासा वाटलाच नसता. मोटिव्हेशनच मिळाले नसते. अमेरिकेत आले तेच अचानक आले. १० दिवसात गाशा गुंडाळला व भारतातून इकडे प्रयाण केले.सीडी /कॅसेट्स घ्यायला ना वेळ मिळाला ना आठवण झाली इतकी घाईगर्दीत आले. एका महिन्याने नवरा व मुलगी आले. पण नव्या नोकरीच्या धामधुमीत त्यांना सांगायलाच वेळ मिळाला नाही की सीडी आणा.
.
नव्यानव्या नोकरीला, रहाणीला, नवलाईला हळूहळू सरावत होतो. घरात अतिशय तुटपुंजे सामान होते .टीव्ही सोडाच पलंग ही नव्हता पण नव्या देशाची, नवलाईची जाम मजा वाटायची. कशाची कमी वाटत नव्हती. आता आठवलं की फार मजा वाटते - आम्ही रात्री Candle light मध्ये रमी खेळायचो. भोवती ३-४ सुगंधी मेणबत्त्या लावून आणि दिवे घालवून. का तर भारतात सुगंधी मेणबत्त्या मी तरी तेव्हा पाहील्या नव्हत्या. सुगंधी मेणबत्त्या ही अपूर्वाई होती. संध्याकाळी मी घरी आले की, फिरायला जायचो, खूप चालायचो कारण टीव्ही नव्हता की कार नव्हती. चिनो/आँटॅरिओ (कॅलिफोर्निया) प्रदुषणही नव्हते. हळूहळू २ दरवाज्याची कार घेतली. पहिल्यांदा तर GPS माहीतच नव्हता. हातात कागदी नकाशा घेउन चक्कर मारायचो. त्या स्वस्तातील स्वस्त्/सेकंडहॅन्ड कारमध्येही बिल्ट इन रेडिओ आला. ज्यावर अर्थात स्थानिक स्टेशन्स / इंग्रजी गाणी लागायची. मग मात्र हिंदी/मराठी गाण्यांची कमतरता भासू लागली. विशेषतः मला. कारण इंग्रजी गाणी फार कर्कश्य वाटत.
.
काही दिवस असेच गाण्यांच्या विरहात /कमतरतेत गेले, मग लवकरच माझ्या लक्षात आले की कमतरता आहे म्हणून हातावर हात धरून बसण्यात point नाही. गाण्यांशिवाय भकासपणा येईल. मग विचार केला इंग्रजी गाणी नाही आवडत हे चोचले ठेवायचेच नाहीत. मुद्दाम त्या गाण्यांची taste Develop करायची. इंग्रजी गाण्यांनी डोकं उठतं म्हणुन नावं ठेवत बसलो तर आपल्यालाच त्रास होणार. त्यापेक्षा इथे जी गाणी मिळतात ती ऐकायची, आवडून घ्यायची. When in Rome... वगैरे वगैरे. पॉप संगीत ऐकता ऐकता आणि बळजबरीने आवडून घेता घेता, कल्पना सुचली की इथेही मृदू (mellow) प्रेमगीते/लोकगीते असतील की. ती का ऐकू नयेत? मग आठवले की आपणही किंचित प्रमाणात का होईना इंग्रजी गाण्यांना expose झालेलो आहोत -
.
हॉस्टेलवरती ऐकलेले brian hyland यांचे Itsy Bitsy Teeny Weeny Yellow Polkadot Bikini आपण हॉस्टेलवरती तासंतास, तबकडी परत परत लावुन ऐकले आहे. या गाण्यातील मिष्किलपणाने आपल्याला अतिशय भुरळ घातलेली आहे. हॉस्टेलवरती एका रात्री खोलीत जागुन, रेडीओवरती Clif Richard यांचे Summer Holiday ऐकले आहे. या गाण्याच्या फ्रेशनेस मुळे आपल्याला फार आवडले होते. परत कधीच ऐकायला मिळालेले. हां नाही म्हणायला शेजारचा टीन एज मुलगा सकाळ संध्याकाळ लावायचा ते Walk Like An Egyptian गाणं सारखं कानावरती आदळत असे. पण यापलिकडे इंग्रजी गाण्याची दुनिया आपण पाहीलीच नाहीये. आणि आपल्याला या दुनियेत initiate करेल असं कोणीही नाही. नवर्‍याला मात्र इंग्रजी गाणी आवडायची/आवडतात. पण त्याची आवड किंचित वेगळी आहे. त्याला दे दणादण /ढाणढाण संगीत आवडते तर आपल्याला एकदम mellow तरी किंवा अर्थपूर्ण तरी, निदान एक गुणावशेष गाण्यात लागतो.
मग एक काम केले - UK/USA चार्टसवरती दशकातली/ त्या त्या वर्षातली अशी टॉप टॉप गाणी शोधू लागले. ऐकल्यावर श्ब्द समजले नाहीत तर (९९% वेळा) लिरिक्स शोधून शोधून ऐकू लागले. कवितांची आवड होतीच तिचाही किंचित उपयोग झाला. पक्क्या कर्क राशीच्या स्वभावानुसार जमविण्याचा छंद लागला. म्हणजे, गाणे ऐकले/विसरले असे नाही. ते टिपून ठेवा. मग मात्र गाणी एकामागोमाग सापडतच गेली. नेटची, याहू, गुगलची कृपा.
.
गाण्यांचा क्रम तर आठवत नाही. पण जशी सुचेल तशी देते. मुलगी ३ वर्षाची होती , तिने एकदा शाळेतून स्काऊटचे एक कविता/गाणे आणले - Kumbaya. त्यातील तत्त्वज्ञान पटकन आवडून गेले. आणि मग हे गाणे शोधले असता काही क्लिप्स मिळाल्या. सगळ्या ऐकल्या. बर्‍याच हौशी गायकांच्या होत्या व फार सुरील्या नव्हत्या. पण एक क्लिप सापडली carole alston या गायिकेने गायलेली. Kumbaya गाणे. या गायिकेच्या साईटवर तिच्या आवाजाचे वर्णन केलेल आहे - "....a voice as dark and sweet as molasses". तंतोतंत खरे आहे. वाढत जाणार्‍या ड्रम्बीटस चा ठेका देखील एकदम आवडून गेला. गायिकेचा चढत जाणारा आवाज व वेगवान होत जाणारे ड्रम्बीटस, चुटक्या/टाळ्या. मग तिची अनेक गाणी ऐकली, एकेका लिंकवरुन ऊडी मारत अन्य आफ्रिकन गायिकांची गाणी Gospel Music ऐकले. तेव्हा Gospel music ची ओळख झाली. आजही सीडी च्या दुकानात या सेक्शनपाशी पावले रेंगाळतात. पुढे Elvis Presley ची या जॉनरमधली गाणी ऐकली. पैकी माझे सर्वात आवडते - Who Am I अतिशय शांतीचा अनुभव येतो हे गाणं ऐकताना. एल्व्हिस यांचेच In my father's house अतिशय सुमधुर गाणे आहे. अर्थही इतका सुंदर आहे. पण हेच गाणं अन्य एका गायकाने गायलेले In my father's house तितकेच सुंदर आहे. हे गाणे कितीदा ऐकले तरी मन भरत नाही. बाकी Elvis Presley यांचा जवाब नाहीच. ते कदाचित Rock and roll करता प्रसिद्ध असतीलही पण मला त्यांचे Gospel Music च सर्वाधिक आवडते - शांत, उन्माद नसलेले.
Mormon लोकांचे Latter_Day_Saint संगीत ऐकताना, I Heard Him Come-Afterglow हे गाणे ऐकले, नंतर झोपायच्या आधी खूप दिवस तेच गाणे ऐकायचे. एका कुष्ठ रोग्याने पहील्यांदा जिजझ क्राइस्ट यांना पाहीले व त्याला काय वाटले ते वर्णन करणारे खूप उत्कट गाणे आहे.
.
नंतर केव्हातरी Country music ची ओळख झाली. निदान मी पहील्यांदा ओढले गेले ते Johnny Cash यांच्या पत्नी June Carter Cash यांनी लिहीलेल्या आणि Johnny Cash यांनी गायलेल्या Ring of Fire या गाण्याने.

Love is a burning thing
And it makes a fiery ring.
Bound by wild desire
I fell into a ring of fire.
.
I fell into a burning ring of fire,
I went down, down, down and the flames went higher
And it burns, burns, burns,
The ring of fire, the ring of fire.

अशा प्रकारे सुरुवात आहे या गाण्याची आणि मग अधिकाधिक रंगत जाते.

The taste of love is sweet
When hearts like ours meet.
I fell for you like a child,
Oh, but the fire went wild.

ओह माय गॉड!! या गाण्यात मला जे प्रेमाबद्दल वाटतं ते शब्दात सापडले, शब्द मिळाले. येस्स हीच प्रेमाची व्याख्या. त्यातला स्ट्रेट फॉर्वर्डपणा तशीच लहान मुलांच्या प्रकृतीतील निष्कपटता. वृश्चिक आणि धनुच्या कुंपणावर बसून तळ्यात की मळ्यात करणार्‍या माझ्या शुक्राला हे फायरी, स्ट्रेट्फॉर्वर्ड, पॅशनेट गाणे न आवडते तरच नवल होते. नंतर हृदयातील सर्वोच्च गायकाचा मान कोणीच घेऊ शकलं नाही. हे गाणं, जॉनी कॅश हे गायक - हेच्च! मग अनेक आले गेले. Frank Sinatra यांना कमी अज्जिबात लेखायचे नाही. त्यांच्या रसिकांच्या मनावर त्यांनी एक काळ अधिराज्य केलच पण "रिंग ऑफ फायर" ची सर कशालाच ना आली ना येणार. जॉनी कॅश यांची अन्य २ सुंदर गाणी ऐकण्यात आली - I walk the line आणि When I first saw your face. पैकी पहीले गाणे अवीट आहेच पण दुसरेही तितकेच मंत्रमुग्ध करणार आहे. स्पेशली दुसर्‍या क्लिपमधील कॅश आनि जून यांचे फोटो. जॉनी कॅश यांची कुंडली शोधून काढली - जॉनी कॅश - मीन सूर्य्/वृश्चिक चंद्र, जुन - सूर्य कर्क. नो वंडर! नो वंडर! ते एक असोच. : )
................. मिपावरील लेख
.
फ्रॅन्क सिनात्रा यांच्या आवाजातील तारुण्य, उत्साह जर कोणी टिपले नाही तरच नवल. त्यांची खूप खूप गाणी ऐकली. You make me feel so young मधील उत्साह्/तारुण्याचा unmistakable वसंत. वा!
Rupert Holmes यांचे Pinacolada हे माझे व नवर्‍याचे अतोनात आवडते गाणे. हे लागलं की आम्ही एकमेकांना कोपर मारतो कारण शोधायला गाणे जरुर ऐका. घासून वापरुन जुने झालेले लग्न आणि त्यातून दोघांनी आपल्यापुरता शोधलेली escape (सुटका) याबद्दलचे अतिशय मिष्किल गाणे. चिरतरुण! ज्या गाण्यांबद्दल मला काही एक जिव्हाळा वाटतो ते गाणे. ; )
नंतर एक गाणे खूप शोधून सापडलेले - Moonstruck या सिनेमातील, Dean Martin या गायकाने गायलेले - That's amore किती गोड, रोमॅन्टिक. अंगावर काटा आणणारे. अजुन एक आवाज अत्यंत मादक्/नशीला असणारी गायिका - Julie London. या गायिकेची गाणीही अशीच अपघाताने सापडली व मनात जाऊन बसली. You go to my head

You go to my head
And you linger like a haunting refrain
And I find you spinning round in my brain
Like the bubbles in a glass of champagne

खरच मद्य पितोय असे वाटावे असा आवाज.
.
अजुन एक गायक आवडतात ते Tony Bennett त्यांचे Fly me to the moon हे गाणे श्रेष्ठच. "Fly" शब्दावर घेतलेली लकेर. या गाण्यात २ चित्रे आहेत एक कवि काय म्हणतो ते अतिशय उपमा व काव्याने ओतप्रोत आणि दुसरे त्याच्या व्यवहारी प्रेयसीसाठी कविने केलेल भाषांतर. दोन्ही मूडस इतके सुंदर पकडले आहेत.
.
अजुनही नवी गाणी सापडत आहेत. थ्रिल वाटते, काळजाचा ठोका चुकतो. प्रवास चालूच आहे.

- तूर्तास समाप्त -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेलिन डियॉन चा आवाज मस्त!! मला एडेले चे वॉटर अंडर ब्रीज, मरून ५ च शुगर, शॉन मेंडिस च call away पण खूप आवडतं. निको and vinz Cha am I wrong pan mast aahe.

छान लेख. बरीच इंग्लिश गाणी आवडतात. भारत सोडला नसता तर फार आवर्जून इंग्लिश गाणी ऐकली नसती आणि इंग्लिश सिनेमे, सिरीजही नसत्या पाहिल्या (बहुतेक).
अडेलचं हे गाणं प्रचंड आवडतं आहे.
https://youtu.be/93dCIYaB4Os

कॅश आणि कार्टरचं एक ड्युएट साँग पण खूप आवडत.. त्याच्या walk the line बरोबरच हे खालचं.. हे Folsom Prison.
When I was just a baby, my mama told me son
always be a good boy, don't ever play with guns
but I shot a man in Reno just to watch him die....

सिनात्रा बेस्ट...
For what is a man, what has he got
If not himself, then he has naught
To say the things he truly feels
And not the words of one who kneels
The record shows I took the blows
And did it my way

डीन मार्टिनचं Let it snow, let it snow नाही लिहिलं का... हे गाणं ऐकलं नाही तर ख्रिस्मस येत नाही त्यावर्षी... Proud

रॉय ऑर्बिसन सुद्धा खूप आवडतो..
I will ride the highway, I am going my way
I leave a story untold

मागे ब्रुनो मार्स आवडायचा आता फारेल विल्यम्स..

मी सुद्धा तुमच्याच बोटीत. मुंबईत असताना बीटल्स, बोनी एम, बी जीज, क्विन, माय्कल जॅक्सन इ. ची गाणी ऐकली जायची. इथे आल्यावर मात्र खजीनाच सापडला. रॉक शी खर्‍या अर्थाने ओळख झाली, आणि त्यातले सगळे वेरिएशन्स आवडायला लागले. अगदि रोलिंग स्टोन, लेड झॅपलिन, एरोस्मिथ ते बान जोवि, गन्स एन रोझेस, निर्वाना, कोल्डप्ले पर्यंत. शिवाय डेली कम्युट मधे रेडियोवर ८०-९०-००-१० ची पॉप गाणी सतत ऐकुन ती सुद्धा आवडायला लागली. Happy असो, या विषयावर लिहावं तितकं कमीच आहे...

छान लिहिलंत. बऱ्याच गाण्यांशी ओळख झाली आणि ती ऐकलीसुध्दा. मला वाटतं कि आपल्यापैकी बरेच जण जे ३-४ भाषा जाणतात त्यांची चैनच आहे कारण आपण वेगवेगळ्या संगीताचा आनंद घेऊ शकतो.

डीन मार्टिनचं Let it snow, let it snow नाही लिहिलं का... हे गाणं ऐकलं नाही तर ख्रिस्मस येत नाही त्यावर्षी... >>> +१११११

पॉल अंका यांचे पापा हे गाणे पण फारच सुरेख आहे.

छान लेख.
मला इंग्रजी गाणी सिनेमा/मालिकांमधून माहीत होतात. सध्या HIMYM, Eyes Wide Shut, Chicago, One Day, गाय रिचीचा Sherlock, Fifty Shades, Sharp Objects वगैरेंची गाणी ऐकते.

Don't give up ऐकले आहे का पीटर ग्रब्रिअलचे? Sippin on fire म्हणून एक आहे ,ते एक छान आहे.

लेख आवडला.

माझा लेटेस्ट हॉट फेव जॉर्ज एझ्रा आहे. काय कमाल आवाज आहे ह्या माणसाचा

त्याचे सगळ्यात पहिले ऐकलेले गाणे आहे
https://www.youtube.com/watch?v=ZS0WvzRVByg

सुरवातीचे शब्द न शब्द अगदी माझ्यासाठीच लिहिले आहेत असे वाटते आहे.
तुम्ही दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करणार..

सर्वांचे आभार. सुचविलेली गाणी ऐकेनच.
_______________________________________________
@ बुन्नु -
एडेलचे वॉटर अंडर ब्रीज - https://www.youtube.com/watch?v=LFT-Fs-A59g ................. आवडले. एडेल चा आवाज आवडतो फार.
मरून ५ चे शुगर - https://www.youtube.com/watch?v=09R8_2nJtjg .................. हे माझे आवडते आहे. विशेषतः त्याचे रियल टाइम चित्रीकरण.
शॉन मेंडिस च call away - https://www.youtube.com/watch?v=BxuY9FET9Y4 ............ वाह!!! मस्तच.
am I wrong - https://www.youtube.com/watch?v=bg1sT4ILG0w ..................... होय ऐकलेले आहे.

@सायो
Adele - Set Fire To The Rain - https://youtu.be/93dCIYaB4Os .......................... वाह!!!

@हाब -
Folsom Prison - https://www.youtube.com/watch?v=s_NLlOiD1Wo ......................... वाह!
डीन मार्टिनचे - Let it Snow! - https://www.youtube.com/watch?v=mN7LW0Y00kE .......................... ओहोहो!!! लव्ह इट!!!!
पॉल अंका चे पापा - https://www.youtube.com/watch?v=unE8E581RMc .................... छान आहे. सॅड आहे.

@केशव तुलसी
पीटर गॅब्रिएल चे - https://www.youtube.com/watch?v=VjEq-r2agqc ......................... अर्थपूर्ण आहे.
sippin fire - https://www.youtube.com/watch?v=KllQ8e9Ae0w - मस्त. कंट्री म्युझिक वाटतय. केशव तुलसी फक्त कंट्री म्युझिक करता एक नवा धागा उघडावा लागेल.
तुम्ही केनी रॉजर्स चे द गँबलर गाणे ऐकलेत की नाही - https://www.youtube.com/watch?v=7hx4gdlfamo

@हर्पेन
Listen to the Man - https://www.youtube.com/watch?v=ZS0WvzRVByg ......................... वाह!!! सुरेख आहे की.
_____________________________________________________________
हाब, जॉनी कॅश च्या मुलीचे - रोझॅन कॅशचे गाणे ऐकले की नाही - Tennessee Flat Top Box - https://www.youtube.com/watch?v=vLwocVPaGsE ....................... या गाण्याआधीच्या तिच्या आठवणी ऐका हाब.

ही काही ओल्ड स्कूल गाणी -

आय विश आय न्यू - https://www.youtube.com/watch?v=FxxCVCsXLWM&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...
वेट फॉर मी जॉनी - https://www.youtube.com/watch?v=QyOwBV20rOw&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...
पीटर पॉल & मेरी यांचे लेमन ट्री - https://www.youtube.com/watch?v=MLhYghzNfII&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...

हे लहान मुलांचे गाणे वाटते -
Peter Paul & Mary - Puff The Magic Dragon - https://www.youtube.com/watch?v=Y7lmAc3LKWM
.
.
.
पण मला कोणीतरी माहीती दिली की पफ द मॅजिक ड्रॅगन म्हणजे - वीड/ हुक्का.

काही धमाल गाणी -

कॉनी फ्रान्सिसची -
लिप्स्टिक ऑन युअर कॉलर - https://www.youtube.com/watch?v=YMlALAaEwfA&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...
स्टुपिड क्युपिड - https://www.youtube.com/watch?v=2kJA8v577W8

डोरीस डे चे -
परहॅप्स परहॅप्स - https://www.youtube.com/watch?v=GUVT1NZtZPo&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...
केसरा सरा - https://www.youtube.com/watch?v=xZbKHDPPrrc

क्या बात है!! ऐकून झाली पण सर्व गाणी.. माझ्या पोस्ट मध्ये रिप्लाय करताना लिंक ऍड केल्या बद्दल धन्यवाद.

इंग्रजी गाण्याच खुळ हे कॉलेज च्या जमान्याचंच . १०-१५ वषर्षापूर्वी जेव्हा M TV आणि चॅनेल V खूप गाणे दाखवायचे तेव्हापासूनच. शेहेनाज चा फर्माईशी प्रोग्रॅम असो का सायरस ब्रॉचा आणि निखिल चिनाप्पा चे माकड चाले असो ते प्रोग्रॅम कधी चुकवले नाहीत. त्यावेळेला बेक स्ट्रीट बोयज, वेंगबॉईझ, ब्रिटनी स्पेअर्स, MJ सगळेच गाणे बघायचो.

@ राज - असो, या विषयावर लिहावं तितकं कमीच आहे... >> अहो मग लिहा कि वेळ काढून. आमच्या हि ज्ञानात भर पडेल थोडी.

जस्टीन टिम्बरलेक आणि ख्रिस स्टेप्लेटोन च, say something पण नक्की एका

>>>>>>>>>>>> जस्टीन टिम्बरलेक आणि ख्रिस स्टेप्लेटोन च, say something पण नक्की एका>>>>>>>>> नक्कीच.
__________________________________________________________

ख्रिसमसच्या गाण्यांची तर एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे ज्यात -
सँटा बेबी,
- https://www.youtube.com/watch?v=d4H-aRDNYSo&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
- https://www.youtube.com/watch?v=JnOLam2AwXY&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
- https://www.youtube.com/watch?v=Ci-ZkaHxYDA&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
- https://www.youtube.com/watch?v=kyQOBHRvmNE&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
- https://www.youtube.com/watch?v=ncVbxe2Ut2c&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
बेबी इट्स कोल्ड आउटसाईड ची
- https://www.youtube.com/watch?v=Rgss7q-nOpc&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
- https://www.youtube.com/watch?v=7MFJ7ie_yGU&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
- https://www.youtube.com/watch?v=ZtoW4aV-CIc&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
- https://www.youtube.com/watch?v=6d-4aOi3AzQ&list=PLo4u5b2-l-fB83gb9Ahz7p...
सगळी व्हर्शन्स अ‍ॅड केलेली आहेत.

सँटा बेबी इतकं टिझींग गाणं आहे कित्येक गायिकांना त्या गाण्याने भुरळ घातलेली आहे. पण अर्था किट चे अगदी पहीले गाणे - https://www.youtube.com/watch?v=Mk_GmhD053E
मस्तच!!

द न्यूजरूम या सीरिज च्या क्लायमॅक्स ला जेफ् डॅनियल्सने पुनर्जीवित केलेलं टॉम टी हॉल चे हे गाणं तर ग्रेट ...

https://www.youtube.com/watch?v=NuVpT1mv5KY

If you love somebody enough, you'll follow wherever they go
That's how I got to Memphis, that's how I got to Memphis

If you love somebody enough, you'll go where your heart wants to go
That's how I got to Memphis, that's how I got to Memphis

I know if you'd seen her, you'd tell me 'cause you are my friend
I've got to find her and find out the trouble she's in

If you tell me that she's not here, I'll follow the trail of her tears
That's how I got to Memphis, that's how I got to Memphis

She would get mad and she used to say, that she'd come back to Memphis someday
That's how I got to Memphis, that's how I got to Memphis

I haven't eaten a bite or slept for three days and nights
That's how I got to Memphis, that's how I got to Memphis

I've got to find her and tell her that I love her so
I'll never rest till I find out why she had to go

Thank you for your precious time, forgive me if I start to cryin'
That's how I got to Memphis, That's how I got to Memphis...

कोल्ड माउन्टेन या अप्रतिम वेस्टर्नपटातील हे गाणे मला प्रचंड भावते ... किंवा काळजाला भिडते ..
ज्यानी मूव्ही पाहिलाय त्याना या गाण्याचं महत्त्व नक्कीच कळेल ...अमेरिकन सिव्हिल वॉर ची दाहकता आणि अमेरिकन समाज ....

https://www.youtube.com/watch?v=BYZ8tCKErso

I wish, I wish my baby was born
And sitting on its papa's knee
And me, poor girl
And me, poor girl, were dead and gone
And the green grass growing o'er my feet
I ain't ahead, nor never will be
Till the sweet apple grows
On a sour apple tree

But still I hope, But still I hope the time will come
When you and I shall be as one

I wish, I wish my love had died
And sent his soul to wander free
Then we might meet where ravens fly
Let our poor bodies rest in peace

The owl, the owl
Is a lonely bird
It chills my heart
With dread and terror
That someone's blood
There on his wing
That someone's blood
There on his feathers.

@मंदार कात्रे - टॉम टी हॉल यांचे गाणे आवडले पण ते कोल्ड माउंटन सिनेमातील गाणे नाही आवडले. फार सिरीअस आहे.
बाय द वे - 'रिव्हर ऑफ नो रिटर्न' या वेस्टर्न सिनेमामध्ये मर्लिन मन्रोने गायलेली सर्वच गाणी इतकी सुरेल आहेत. तो सिनेमा खूप आवडतो मला.

- https://www.youtube.com/watch?v=dLzeHkEQe9g ......................... या गाण्यात शोकाकुल आर्तता आहे.
- https://www.youtube.com/watch?v=raiyHxFrBqA ........ हे लहान मुलांचे गाणे फार आवडते. प्रत्येक सीझन आणि तदनुषंगिक अमेरीकन जीवन येत जाते या गाण्यात.

When Mr South Wind sighs in the pines,
old Mr Winter whimpers and whines.
Down in the meadow, under the snow,
April is teaching green things to grow.
When Mr West Wind howls in a glade,
old Mr Summer nods in the shade.
Down in the meadow, deep in the brook,
catfish are waiting for the hook.
Old Lady Blackbird flirts with the scarecrow,
scarecrow is waving at the moon.
Old Mr Moon makes hearts everywhere go bump, bump,
with the magic of June.
When Mr East Wind shouts over head,
then all the leaves turn yellow and red.
Down in the meadow corn stocks are high
pumpkins are ripe and ready for pie.
Old Lady Blackbird flirts with the scarecrow,
scarecrow's waving at the Moon.
Old Mr Moon makes hearts everywhere go bump-bump
with the magic of June.
When Mr North Wind rolls on the breeze,
old father Christmas trims over trees.
Down in the meadow snow shoftly gleams
earth goes to sleep and smiles in her dreams.

am I wrong >> हे गाणं माझ्यासाठी स्पेशल आहे. मी अमेरिकेत नुकताच आलेलो असताना ड्रायविंग चे धडे घेत होतो. त्या वेळेला हे गाणं रेडिओ वर बऱ्याच वेळेला ऐकायचो. हे गाणं ऐकलं की आजही ती excitement , भीती आणि आलेली मजा आठवते. DL मिळाल्यावर पहिल्यांदा शिकागो ला केलेली लॉन्ग ट्रिप आठवते. एखादा गाणी आणि आठ्वणी असा पण धागा असायला हवा Happy

>>>>> एखादा गाणी आणि आठ्वणी असा पण धागा असायला हवा Happy>>>> Happy येस्स्स.

बेबी बॅश चं "शुग शुग" - https://www.youtube.com/watch?v=6rgStv12dwA
गाणं २००३ मध्ये चालू होतं आम्ही नुकतेच अमेरीकेत आलो होतो. ते गाणं रेडिओवर वाजायचं.
आजही ऐकलं की कॅलिफोर्निया सूर्य आजूबा़जूला तळपू लागतो. अंगावर काटा येतो.

>>>>>>>>>> सुरवातीचे शब्द न शब्द अगदी माझ्यासाठीच लिहिले आहेत असे वाटते आहे.
तुम्ही दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करणार..>>>>>> धन्यवाद चंबू. जरुर!!

हो सामो जी ते वेस्टर्न गीत खूपच सीरियस आहे.

ही माझी आवडती ऑल टाइम हिट्स आहेत , मस्त आहेत

Toni Braxton - Un-Break My Heart
https://www.youtube.com/watch?v=p2Rch6WvPJE

Whitney Houston - Step By Step
https://www.youtube.com/watch?v=sWa5vE4MUpU

Mariah Carey - Always Be My Baby
https://www.youtube.com/watch?v=LfRNRymrv9k

Bryan Adams - (Everything I Do) I Do It For You
https://www.youtube.com/watch?v=Y0pdQU87dc8

Bryan Adams - Summer Of '69
https://www.youtube.com/watch?v=eFjjO_lhf9c

Queen - Radio Ga Ga
https://www.youtube.com/watch?v=azdwsXLmrHE

Eagles - Hotel California
https://www.youtube.com/watch?v=EqPtz5qN7HM

Pages