गंध फुलांचा गेला सांगून...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मोग-याचा बेभान करणारा गंध बघ माझ्याकडे म्हणून खुणवायला लागला आणि आपोआप याकडे लक्ष वेधल गेलं. नाजूकरीत्या गुंफलेल्या ह्या टपो-या गज-यांचा मोह टाळणं कठीणच, नाही?

मोठा फोटो इथे पाहा.

धन्यवाद!

विषय: 

सहीsssssssssssss!!!
आयटे.. मोगरा.. माझा वीक पॉईंट..
सुगंध दरवळतोय नुसता.. Happy

छान आहे फोटो Happy

>> आयटे.. मोगरा.. माझा वीक पॉईंट.. >> किर्‍या, आठवणी जागा झाल्या वाटते Wink Proud

मस्तच आहेत ग गजरे. हे असले गजरे फक्त साऊथ कडेच मात्र. आपल्याकडे फुले कमी आणि दोराच जास्त!

ती लाल फुले आबोलीची.

मस्त टवटवीत फोटो!
मला अश्याच टपटपीत कळ्यांच्या सुगंधी हारांची आणि बंगलोरात घरी ' मल्गेऽ' (मल्लिगे) ओरडत ते दाराशी आणणार्‍या 'हुवे आज्जी'ची आठवण झाली. Happy

>>> ते लाल कसलं फुल आहे??? की आजुन काही आहे...>>> योग्या..लाल आणि बंगालुरु म्हटले कि सर्व प्रकार गाजर नसतात रे Proud ती अबोलीची फुले आहेत Happy

चेतन Lol

धन्यवाद सर्वजण Happy
अबोलीची फुले आहेत ती. इथे गर्द केशरी रंगाची अबोली मिळते, ती ही. बाकी काही असल, तरी बंगळुरुला फुलांची चैन मात्र भरपूर करायला मिळते हेच सुख! Happy

वाह! मोगर्‍यांच्या कळ्यांचं टपोरलेपण आणि ताजेपणा काय मस्त टिपला गेलाय फोटोत. मागे एक नुसत्या मोगर्‍याच्या कळ्यांचा पण तुझाच होता ना फोटो?
अबोलीची फुलांचा आपल्याकडचा थोडा फिका केशरी रंगच जास्त नाजूक वाटतो मात्र.

मस्त !! Happy

लाल आणि बंगालुरु म्हटले कि सर्व प्रकार गाजर नसतात रे >>> चेतन, पाणीपुरीत(व जवळ पास सर्व भाज्यात Wink ) गाजरं टाकणारे लोकं काही पण करू शकतात Wink Proud

गर्द केशरी >>> Happy

ये ब्बात! मस्त टिपलाय. पहाताच घमघमाट (हा शब्द आक्ख्या शब्दांच्या दुनियेत फक्त मोगर्‍यासाठीच असावा.) जाणवला. आणि फक्त फुलं दिसतायत. केसात आहेत का दुकानात ते पण कळत नाहीये. Happy

Pages