भारतीय क्रिकेटचा दादा झाला बीसीसीआय अध्यक्ष !

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 October, 2019 - 15:33

लहानपणापासून मला प्रश्न पडायचा की बीसीसीआय या क्रिकेटच्या मंडळाचा अध्यक्ष एखादा क्रिकेटपटू का होत नाही ?
आज उत्तर मिळाले.
त्यासाठी खेळाडू दादा असावा लागतो !

सेहवाग म्हणतो देर है पर अंधेर नही

सचिन म्हणतो दादाने जी भारतीय क्रिकेटची सेवा केलीय त्याला तोड नाही.
तोच ती ईथेही करणार.

लक्ष्मण म्हणतो दादा तू आम्हाला जिंकायला शिकवलेस तुझ्यापेक्षा योग्य व्यक्ती आणखी कोण..

आजी माझी सर्वच खेळाडूंना आनंद झाला आहे.

हर्षा भोगलेचा विडिओ पाहिला. त्याला तर आपला आनंद लपवताही येत नव्हता. क्रिकेटक्षेत्रातील एका सच्च्या माणसाने दुसरयाला दिलेली पावती होती ती.

माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात दिग्गज राजकीय नेते शरद पवारांनीही दादाचे मनापासून अभिनंदन केले आहे.

आमच्या क्रिकेटग्रूपवरील सर्व मित्रांना तर आनंद झालाच आहे. पण माझ्या घरच्यांनाही या बातमीने आनंदी केले आहे. या पोस्टभर तो आनंद विखुरला गेल्याचे आढळल्यास नवल नको.

दादा आला आणि कामालाही लागला. प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारयांचे आयुष्य बदलून टाकायचे आश्वासन त्याने दिलेय.

येत्या २४ ऑक्टोबरला तो निवडसमितीशी मीटींग घेणार आहे. त्यात धोनीबद्दलही निर्णय घेणार आहे. माझे धोनीप्रेम ओळखणारे मित्र यावरून मला मुद्दाम डिवचत आहेत. पण दादावर माझा विश्वास आहे. त्याला एका दिग्गज खेळाडूचा सन्मान कसा करायचा हे ठाऊक आहे.

सध्या सोशलसाईटवर सध्याचे भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि दादाचा किस्सा फिरतोय,

रवी एकदा दादाला डिवचायला म्हणालेला,
Is there a ganguly pavilion or ganguly stand in Eden Garden ?

यावर दादा म्हणाला,
The whole ground belongs to GANGULY !

धिस ईज दादा फॉर यू !
अभिनंदन दादा
नाऊ अखंड बीसीसीआई बी लाँगस टू यू .. चीअर्स !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गांगुली आला तरी श्रीनिवासनची मुलगी, अनुराग ठाकूरचा भाऊ, अमित शहांचा मुलगा असे क्रिकेटशी कणभरही संबंध नसलेले अनेकजण भारतीय क्रिकेट नियामक मंडळात घुसले आहेत. यांच्या पैकी काहीजण सामनानिश्चिती प्रकरणात अडकलेल्यांशी संबंधित आहेत. श्रीनिवासनला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीत पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे गांगुलीला मनाप्रमाणे काम करणे अवघड आहे.

पुरोगामी, तशी वेळ आली तर दादा बाहेर पडेल
मंडळ म्हटले की भ्रष्टाचार आलाच. त्यात ही तर पैश्याची खाण. त्यामुळे तो होणारच होता हे कॉन्संट पकडा. पण आता काही चांगले बदलही निश्चित होतील.

काय सुधारण होईल असे वाटत.
फिक्सिंग बंद होईल.?
योग्य खेळाडू ची संघात निवड होईल?
मंडळाच्या paisyachi लूट होणार नाही?
रोजंदारी वर काम केल्यासारखे वारंवार मॅच चे आयोजन बंद होईल?
नक्की सौरभ काय चांगलं काम करेल आणि बदल घडवून आणेल

वर्ल्डकपनंतर आता धोनीची कारकिर्द काय उरली आहे?
मुळात त्याला सिद्ध करायला आता काय शिल्लक आहे?
आता दादाला फक्त एवढेच बघायचे आहे की त्याला निरोप कसा द्यायचा.
बाकी धोनीने याची त्याची कारकिर्द संपवली असे म्हणताना त्याने आणलेले वर्ल्डकप नाही दिसत का? ते येण्यामागचे कारण धोनीचे धाड्सी निर्णय हेच होते.
असो
धागा दादाचा आहे

धोनीचं काय करायचं हे निवड समिती ठरलेलं.
(निवड समितीत कोण असेल हे गांगुली ठरवेल.)
गांगुली तिथे असेल हे आणखी कोणीतरी ठरवलं.
धोनी उद्या कुठे असेल, हेही तोच ठरवेल.

धोनीने दोन वर्ल्डकप आणले. पण टीममधले युवराज, सेहवाग, गंभीर ज्यांच्या खेळीवर वर्ल्ड कप जिंकले हे दादाने घडवलेले प्लेयर्स होते, म्हणजे झाड लावलं दादाने आणि आयती फळं खायला मिळाली धोनीला.

क्रिकेट मध्ये मिळालेला विजय हा एकत्रित संघातील सर्व खेळाडूंच्या प्रयत्नाचा विजय असतो
त्या मुळे सचिन मुळे मॅच जिंकली,धोनी मुळे मॅच जिंकली अस म्हण्याला काही अर्थ नसतो

धोनी व दादाने एकमेकांचे काही नुकसान केलेले नाही. उलट वेळोवेळी मदतच केली आहे. दादाने २००० च्या दशकाच्या सुरूवातीला आणलेल्या गँग पैकी धोनी हा शेवटचा.

दादाला जेव्हा संघातून काढले तेव्हा धोनी इतका मोठा झालेला नव्हता की त्याचा त्यात काही हात असेल. ते काम मुख्यतः ग्रेग चॅपेलचे. त्यातही दादाबद्दल दुस्वास वगैरे नव्हता. चॅपेल व द्रविड चे टीम बद्दल लॉजिक वेगळे होते व त्यात गांगुली बसत नव्हता. तसेही त्यांची पद्धत भारतीय पार्श्वभूमीवर फारशी टिकली नाही व २००६ च्या द आफ्रिका दौर्‍यात गांगुली संघात परतला.

नंतर दोन वर्षे तो टेस्ट मॅचेस मधे यशस्वी होता. शेवटच्या सिरीजमधेही त्याने शतक मारले होते ऑस्ट्रेलियाविरूद्ध. तेव्हा स्वतःच्या टर्म्स वर तो रिटायर झाला. त्याच्या शेवटच्या मॅच मधे शेवटच्या सेशन मधे धोनीने त्याला सन्मानाने कप्तानपद दिले होते.

गांगुलीची ख्याती पाहता कोणाचे करीयर संपवणे वगैरे असले उद्योग त्याने केले नाहीत, धोनीबद्दलही तो उलट योग्य निर्णयच घेइल. भारतात दिग्गज खेळाडूंना त्यांच्या मानाला साजेशी निवृत्ती देतात. धोनीलाही तशीच मिळायला हवी आणि दादा अध्यक्ष असताना ती नक्कीच मिळेल.

फारएण्ड पुर्ण पोस्टला अनुमोदन !

वर कोणीतरी गंभीरलाही दादाने घडवलेल्यांमध्ये टाकलेय. ते चुकीचे आहे. बाकी पाया दादाने रचला धोनीने कळस चढवला. मी दोघांचा फॅन आहे.

गांगुली मागे एकदा बोलला होता की धोनीनेच त्याला बाहेर काढलं. दादाला एकदा बॅटिंग करायला जायचं होतं तर धोनी बोलला नको जाउ, तुझ्याकडून काय होणार नाही मीच जातो.

दादा ची कारकिर्द फार मोठी नाहीये. ८~९ महीने फक्त. कारण पुढील वर्षी बीसीसीआय ची निवडणूक आहे. सध्या प्रशासका कडून दादा सुत्रे स्विकारेल ते निवडणूक होईपर्यंत. नवीन घटने नुसार ३ वर्षाचा कुलिंग पिरीएड आहे त्यामुळे पुन्हा अध्यक्ष होता येणार नाही ३ वर्ष.

धोनीने षड्यंत्र रचलं नसतं तर दादाने 2019 चा वर्ल्डकप नक्कीच जिंकवला असता. दादा अजून जवान आहे. खूपच लवकर त्याला रिटायरमेंट घ्यायला लावली असं वाटतंय मला.

घरणेशाहिवर टीका करत स्वतःचा पोरगा क्रिकेट क्लबचा चेअरमन केला,

मला तर फार वाईट वाटले, मला वाटले होते शहा पोराला काश्मिरात चार एकर जागा देतील अन एखादी सफरचंद ज्यूसची कम्पनी काढून देतील

पण हाय राम
घराणेशाहीच जिंकली !

या वरच्या फोटोत खुर्चीवर बसलेल्या बाळाला राजकुमार म्हणता येत नाही कारण तो स्वकर्तृत्वाने तिथवर पोचलाय.
बी सी सी आयचे आधी चे अध्यक्ष अनुराग ठाकुर यांचा महिमा वर्णावा तितका थोडाच. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. सिलेक्टर होण्यासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटचा अनुभव असायला हवा म्हणून त्यांनी स्वतःच संघात निवड करून घेतली. डायरेक्ट कर्णधार झाले आणि सामना गमावलाही. पुढे बी सी सी आय चे अध्यक्ष झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अत्यंत मानाने पाय उतार केले.

आता अरुण जेटलींचे सुपुत्र रोहन जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होणार.

पण यांनाही राजकुमार म्हणायचं नाही बर्का.

मध्येच का हा धागा वर आला
असो दादाने मस्त निर्णय घेतले एकूणच. त्याची गरज होती या काळात.

धोनीने षड्यंत्र रचलं नसतं तर दादाने 2019 चा वर्ल्डकप नक्कीच जिंकवला असता.
>>>
दादा धोनी दोघांचा फॅन आहे मी
दादाची २०११ विश्वचषक संघात जागा बनत नव्हती. आयपीएलमध्ये हे सिद्ध झालेच. तो योग्य वेळीच निवृत्त झाला.

सेम सेहवागबाबत त्याचीही जागा २०१५ संघात ब्सत नव्हती. रोहीत शर्माचा उदय झाला होता.