विकतचे दुखणे

Submitted by सामो on 15 October, 2019 - 15:12

काही वर्षांपूर्वी, टेक्सासला रहातेवेळी, एके दिवशी, माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. आदल्या शुक्रवारी तिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.

पोटावर सबंध बँडेज बांधले होते.स्कर्ट्वर रक्ताचे डाग दिसत होते. डॉक्टरांनी तिला दिवसा अर्धा तास झोप आणि ५ मिनीटे चालणे असा दिनक्रम सांगीतला होता. बरं एवढच नाही तर रात्रीकरता - अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर प्रिस्क्राइब केल्या होत्या. तरीदेखील उलटीसदृश भावना झाल्यास अजून काही गोळ्या दिल्या होत्या. एक तर झोपेची गोळी अ‍ॅडीक्टीव्ह असते. (अर्थात सर्व गोळ्या नसतीलही अ‍ॅडिक्टिव्ह. नाही तर डॉक्टर कशाला देइल?)
सर्जरीला ३ तास लागले.पोटाला तसेच हिप्सना लहान छिद्रे पाडून चरबी खेचून घेतली जाते. अशी ३ लीटर चरबी काढली. ९८% चरबी + २% रक्त. आता रात्री झोपल्यानंतर हिप्सवर दाब पडून खूप रक्त जात होतं असे ती म्हणाली. तसेच काही आठवडे बरीच सूज रहाणार. मग २-३ महीन्यांनंतर शरीर पूर्ववत होईल. तोपर्यंत इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायची Sad
खर्च = $३५०० + औषधांचा, बँडेजचा खर्च, वारेमाप डोकेदुखी (विकतचे दुखणे) आणि एवढे होऊनही मला ती फार जाड वाटली नाही म्हणून कारण विचारले तर म्हणाली - पोट खूप होते. नंतर रूममेटकडून समजले की तिच्या धाकट्या बहीणीचे लग्न झाले पण तिचे होत नाही म्हणून खूपदा रडते.

खरे पाहता - अमेरीकेत, बॅकेत नोकरीला असलेली मुलगी. तिने जॉबवर लक्ष केंद्रीत करण्यास काहीच हरकत नव्हती. बरे सर्व प्रकारची मुले असतात. तिला अनुरूप मुलगा मिळालाही असता. मुली अशा "डेस्परेट" होऊन शरीराशी खेळ का करतात मला कळत नाही.

जी गोष्ट तिने जिम मध्ये जाऊन स्वप्रयत्नाने साध्य केली असती ती अशी पैसे फेकून, शरीराशी खेळ करून मिळविली तर वाईट मानसिक परीणाम होतच असेल. अर्थात गेलो जिमला झालो बारीक असे काही होत नसते. वजन नियंत्रणाखाली ठेवणं ही एक कॉम्प्लेक्स गोष्ट आहे हे मला तर १००% मान्य आहे. लाइफटाइम सवयी बदलाव्या लागतात शिवाय आपण घेतो ती औषधे आपले हार्मोनल चेंजेस (मग यात पुरुषही आले). मला तरी यात तिचा दोष थोडा आणि "बाह्यसौंदर्याला" अवास्तव महत्व देणार्‍या समाजाचा दोष जास्त वाटतो.

विवाहीत जोडप्यांतही, अनेकदा नवरेदेखील फार अवास्तव अपेक्षा ठेवत असतात. अर्थात अमेरीकेत आहे तितक्या प्रमाणात घटस्फोट वगैरे फट्टकन देत नसतीलही पण प्रेशर असतं खूपदा. बाहेर कॉस्ट्को मध्ये नवरा ओरपत असतो , स्त्री बिचारी काही न घेता त्याला कंपनी देत असते असे दृष्य पाहीलेले आहे. अर्थात याची अनेक कारणे असूही शकतात परंतु असे दृष्य दुर्दैवाने बरेचदा दिसते. यात बायका किती सेल्फ-मोटिव्हेटेड असतात आणि किती दबावाखाली किंवा नवर्‍याची कचकच टाळण्याकरता खात नाहीत ते एक देवच जाणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@वेका - हा लेख वाचणारच. लेखासाठी धन्यवाद.
@राजेश - अगदी योग्य मुद्दा. मी ते डिंपल कपाडियाने केलेले लायपो ऐकून विचार करत होते. मस्त दिसत की ती वगैरे. पण हे कुल्ल्याला,मांडीला छिद्र वगैरे, रक्त ठिबकत रहातं, गोळ्यांचं कॉकटेल घ्यावं लागतं वगैरे हे डिटेल्स वाचले तेव्हाच ठरवलं हा लेख शेअर करायचा.
@सीमंतिनी Happy

Pages