विकतचे दुखणे

Submitted by सामो on 15 October, 2019 - 15:12

काही वर्षांपूर्वी, टेक्सासला रहातेवेळी, एके दिवशी, माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. आदल्या शुक्रवारी तिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.

पोटावर सबंध बँडेज बांधले होते.स्कर्ट्वर रक्ताचे डाग दिसत होते. डॉक्टरांनी तिला दिवसा अर्धा तास झोप आणि ५ मिनीटे चालणे असा दिनक्रम सांगीतला होता. बरं एवढच नाही तर रात्रीकरता - अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर प्रिस्क्राइब केल्या होत्या. तरीदेखील उलटीसदृश भावना झाल्यास अजून काही गोळ्या दिल्या होत्या. एक तर झोपेची गोळी अ‍ॅडीक्टीव्ह असते. (अर्थात सर्व गोळ्या नसतीलही अ‍ॅडिक्टिव्ह. नाही तर डॉक्टर कशाला देइल?)
सर्जरीला ३ तास लागले.पोटाला तसेच हिप्सना लहान छिद्रे पाडून चरबी खेचून घेतली जाते. अशी ३ लीटर चरबी काढली. ९८% चरबी + २% रक्त. आता रात्री झोपल्यानंतर हिप्सवर दाब पडून खूप रक्त जात होतं असे ती म्हणाली. तसेच काही आठवडे बरीच सूज रहाणार. मग २-३ महीन्यांनंतर शरीर पूर्ववत होईल. तोपर्यंत इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायची Sad
खर्च = $३५०० + औषधांचा, बँडेजचा खर्च, वारेमाप डोकेदुखी (विकतचे दुखणे) आणि एवढे होऊनही मला ती फार जाड वाटली नाही म्हणून कारण विचारले तर म्हणाली - पोट खूप होते. नंतर रूममेटकडून समजले की तिच्या धाकट्या बहीणीचे लग्न झाले पण तिचे होत नाही म्हणून खूपदा रडते.

खरे पाहता - अमेरीकेत, बॅकेत नोकरीला असलेली मुलगी. तिने जॉबवर लक्ष केंद्रीत करण्यास काहीच हरकत नव्हती. बरे सर्व प्रकारची मुले असतात. तिला अनुरूप मुलगा मिळालाही असता. मुली अशा "डेस्परेट" होऊन शरीराशी खेळ का करतात मला कळत नाही.

जी गोष्ट तिने जिम मध्ये जाऊन स्वप्रयत्नाने साध्य केली असती ती अशी पैसे फेकून, शरीराशी खेळ करून मिळविली तर वाईट मानसिक परीणाम होतच असेल. अर्थात गेलो जिमला झालो बारीक असे काही होत नसते. वजन नियंत्रणाखाली ठेवणं ही एक कॉम्प्लेक्स गोष्ट आहे हे मला तर १००% मान्य आहे. लाइफटाइम सवयी बदलाव्या लागतात शिवाय आपण घेतो ती औषधे आपले हार्मोनल चेंजेस (मग यात पुरुषही आले). मला तरी यात तिचा दोष थोडा आणि "बाह्यसौंदर्याला" अवास्तव महत्व देणार्‍या समाजाचा दोष जास्त वाटतो.

विवाहीत जोडप्यांतही, अनेकदा नवरेदेखील फार अवास्तव अपेक्षा ठेवत असतात. अर्थात अमेरीकेत आहे तितक्या प्रमाणात घटस्फोट वगैरे फट्टकन देत नसतीलही पण प्रेशर असतं खूपदा. बाहेर कॉस्ट्को मध्ये नवरा ओरपत असतो , स्त्री बिचारी काही न घेता त्याला कंपनी देत असते असे दृष्य पाहीलेले आहे. अर्थात याची अनेक कारणे असूही शकतात परंतु असे दृष्य दुर्दैवाने बरेचदा दिसते. यात बायका किती सेल्फ-मोटिव्हेटेड असतात आणि किती दबावाखाली किंवा नवर्‍याची कचकच टाळण्याकरता खात नाहीत ते एक देवच जाणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>> बाकी बाह्य सौंदर्य, प्रसाधनं वगैरे विषयी काही मतं 'धट्टीकट्टी गरिबी आणी लुळीपांगळी श्रीमंती' छापाची वाटली. प्रेझेंटेबल रहावं माणसानं, त्यात काहीही वाईट नाही. किंबहूना आत्मविश्वासासाठी सुद्धा ती एक गरजेची गोष्ट आहे. >>>>> Happy Happy Happy

सकाळी हा लेख वाचला. माझ्या एक नातलग स्त्रीने, बारीक होण्यासाठी स्लीव सर्जरी करून घेतली आहे. त्यामुळे असेल की काय माहित नाही,पण वरच्या लेखातले मुद्दे मला पटले.मला इतकेच वाटले की सामोला,त्या मैत्रिणीची परिस्थिती पाहून उत्स्फूर्तपणे आलेले विचार आहेत.

बायको दुसर्या पुरुषाकडे आकर्षीत होईल म्हणून टकलावर केस लावणारे पुरुष आणि या अशा ढालगज बायकांच्या सर्जरीज यात सोशल प्रेशर आहे हे कुणीही सांगेल.>>>>>>>> आपण सुरेख/तरूण दिसावं म्हणून हे प्रकार करत नसतील असं वाटते का? हर्ष भोगले,अमिताभ बच्चन यांच्या पर्सनॅलिटीत किती सुरेख फरक पडलाय! ढालगज म्हणून एखाद्या बाईला म्हणायचा अधिकार कोणी दिलाय?

>>>>>>>> आपण सुरेख/तरूण दिसावं म्हणून हे प्रकार करत नसतील असं वाटते का?>>>>> येस असू शकते. आरशात आपण सुरेख दिसलो की केवढा छान जातो दिवस Happy याउलट कधी मरगळलेलो असतो, थकलेले, चिडलेले असतो, हार्मोनल अप्डाउन्स मुळे चेहरा निस्तेज होतो - तो दिवस जरा यथातथाच जातो Happy
>>>>>>>>>> मला इतकेच वाटले की सामोला,त्या मैत्रिणीची परिस्थिती पाहून उत्स्फूर्तपणे आलेले विचार आहेत.>>>>>>>> +१००

स्लीव्ह सर्जरी म्हणजे दंडावरील अतिरिक्त चरबी काढतात का ग?

स्लीव्ह सर्जरी म्हणजे दंडावरील अतिरिक्त चरबी काढतात का ग?>>>> नाही. पोटाचा काही भाग कापतात की जेणेकरून तुम्ही थोडसेच खाऊ शकता.जास्त खाताच येत नाही. सर्जरीनंतर वर्ष दीड वर्षांनी तुम्ही बारीक होता.अर्थात हा कालावधी माझ्या नातलग स्त्रीबाबत सांगितला होता.

धन्यवाद देवकी. माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीने काहीतरी पोटात आतडे आवळणरी का कायशी ट्युब बसवली आहे. एकदमच स्लिम झाली ती. बरीच (खूपच) जाड होती. त्या ट्युबमुळे खाणं जातच नाही म्हणे. अगदी थोडं खावं लागतं.

बॅरिऍट्रिक सर्जरीबद्दल बोलताय का तुम्ही. आमच्या ऑफिस मधला शिपाई मला सांगत होता की जयश्री तोडकर या प्रसिद्ध डॉक्टर कडून त्याने त्याच्या मुलाची ही सर्जरी करून घेतली. मुलगा दहावीला का काय होता पण खूप जाड होता. तर तो मला सांगत होता की मी पण ती शस्त्रक्रिया करून घ्यावी, पण मी काही या फंदात पडले नाही.
लायपोसाठी त्या आधी चौकशी करायला गेले होते तेव्हा डॉक्टरने करू नका असा सल्ला दिला. नुसता सल्ला नाही तर नकारच दिला आणि वरून म्हणाले काही डिटेल्स कळवा (ब्लड टेस्ट वगैरेचे), मग मी डाएट लिहून देतो. त्यामुळे लायपो कोणीही उठून करू शकतो असे नसावे पण परत त्यातही माल प्रॅक्टिस असेल तर माहित नाही.

>>>> बॅरिऍट्रिक सर्जरीबद्दल बोलताय का तुम्ही>>>> हां अगदी बरोबर तेच नाव आहे. आता आठवलं.
>>>>>>>लायपो कोणीही उठून करू शकतो असे नसावे पण परत त्यातही माल प्रॅक्टिस असेल तर माहित नाही.>>>>> ओह्ह्ह हे माहीत नव्हते.

४' ११' उंची असल्याने माझ्या अंगावर जाडी पट्टकन दिसून येते. शिवाय खाण्याची भयानक आवड. व्यायामाला वेळ किंवा तेवढी उर्जा नसणे. यातून मी सुद्धा ओबीस गटात मोडते. पण मी औषधे, लायपो अन्य सर्जरीच्या फंदात पडले नाहीये. पण साधारण लोकांच्या सौंदर्याबद्दलच्या अपेक्षा, दृष्टीकोन
नीट माहीत आहेत. मला हे त्रासदायक प्रेशर घरच्यांकडून टँजिअएबली जाणवलेले आहे.

माझ्या एका फ्रेंडने ही सर्जरी केली. आधी मस्त गोल गुटगुटीत, चकाकणारी तुकतुकीत त्वचा. खरंच मस्त दिसायची. आम्ही तिला लाडवलेलं बाळ म्हणून चिडवायचो.
पण तीन महिन्यापूर्वीच तिला बघितलं, आणि अक्षरशः वाईट वाटलं. एकतर स्किन एकदम सुरकुतलेली, गाल ओघाळलले आणि पूर्ण रयाच गेलेली.
सो, व्यायाम, फिरणं इ. खूप हार्ड वर्क असेल, तरीही इट विल पे ऑफ वेरी वेल.

>>>>>>>>> सो, व्यायाम, फिरणं इ. खूप हार्ड वर्क असेल, तरीही इट विल पे ऑफ वेरी वेल.>>>>>>> १००% खरय. व्यायामाने मानसिक आरोग्य खूप सुधारते अनुभव आहे. जास्त उर्जा असते, उत्साह असतो, मनावर मळभ येत नाही, झोप अति असेल तर कमी होते. टवटवीत वाटतं.

हरणीया च्या शस्त्रक्रियेची 10 वर्षाची मुदत असते म्हणजे 10 वर्षांनी जाळी खराब होते .अशी प्रत्येक उपायची मुदत असते .
आता चरबी काढून body shape मध्ये केली म्हणजे परत चरबी साठणारच नाही ह्याची काही हमी नाही .
माणसाच्या जीवास धोका निर्माण होत असेल तर शस्त्रक्रिया करून उपाययोजना करणे हेच फक्त योग्य आहे .
पण जीव धोक्यात घालून सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करणे मला तरी अयोग्य वाटत .
प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे ज्यांनी त्यांनी हवा तसा घ्यावा.
शिशु पना पासून कुमार अवस्थे पर्यंत आणि पुढे तरुण पना मध्ये चुकीचा आहार आणि व्यायाम चा अभाव .
व्यसन चा विळखा ह्या सर्वांचा परिणाम म्हणून वजन वाढणे,स्थूलपणा
येणे ,विविध आजारांनी शरीर ग्रसाने हे सर्व प्रकार होतात .
त्या मधून ताबडतोप सुटका होण्यासाठी मग
शास्त्र क्रियेचे उपाय केले जातात .
इथे सुद्धा रिझल्ट ताबडतोप हवा असा स्वार्थ असतो .
आणि कष्ट न करता हे सर्व घडले पाहिजे हा आग्रह असतो.
Kg किंवा बालवाडी मधील मुलांचे tipin बॉक्स जंक फूड नी भरलेले असतात .
2 मिन मॅगी नंतर काय काय प्रताप करते .
लठ्ठ पना येण्यास बराच वर्षाच्या चुकीच्या सवयी जबाबदार असतात .
लगेच काही होत नाही
शरीर खूप सहनशील असते .
आपल्या प्रत्येक चुका सुधारून शरीर मधील अवयव शरीर निरोगी ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करतात ही निसर्गाची देणगी च आहे .
जनुक जबाबदार असतात पण त्याच्या वर
मेहनतीने मात करता येते.
सर्वात जास्त आपल्या सवयी,व्यसन जबाबदार असतात शरीर रोग ग्रस्त,बेडफ होण्या मध्ये

पण जीव धोक्यात घालून सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करणे मला तरी विकृत पणाच वाटतो .
<<<<<

पैश्यासाठी जीव धोक्यात घालणारे लाखोंनी दिसतील आसपास. त्यांना काय म्हणाल?
निव्वळ छंदासाठी म्हणूनही जीव घालणारे साहसी वेडे असतात.
मुंबईच्या लोकलला लटकून जीव धोक्यात घालणारयांकडे खरेच दुसरा पर्यायच नसतो का आयुष्य जगायचा?
तर आपण का ठरवावे कोणाची प्रायोरीटी काय आहे?
मनुष्यस्वभावाला अनुसरून ठरवले तरी थेट विकृत म्हणने जरा जास्तच वाटते.
आणि शेवटी आपण सगळे तरी काय करतो, सौंदर्य बघूनच भुलतो ना? मग त्याच सौंदर्याला कोण प्रयोरीटी बनवत असेल तर विकृत नक्की कोणाला म्हणावे? सौंदर्याची डिमांड करणारयांना की सौंदर्याचा सप्लाय करणारयांना?

आम्ही तिला लाडवलेलं बाळ म्हणून चिडवायचो.
^^^

याच कारणासाठी तर नाही ना सर्जरी केली?
शंका तुमच्या चिडवण्याच्या हेतूवर नाही पण पुढे लग्नाच्या बाजारात हिच इमेज मार्केट डाऊन करते.

>>>>>>>>>>>> मनुष्यस्वभावाला अनुसरून ठरवले तरी थेट विकृत म्हणने जरा जास्तच वाटते.>>>>>
+१
विकृती हा योग्य शब्द नाही तो फार टोकाची डिसलाइक दर्शवितो. हां त्या लोकांबरोबर आपण असहमत आहोत, आपल्याला त्यांची कीव वाटते, त्यांच्या निर्णयाचे आश्चर्य वाटते वगैरे gamut of emotions ठीक वाटतात.
>>>>> शेवटी आपण सगळे तरी काय करतो, सौंदर्य बघूनच भुलतो ना?>>> खरे आहे knee-jerk reaction भुलण्याचीच असते. पण मग विवेकाने निर्णय घ्यावे लागतात.

हायझेनबर्ग,
तुमचा मुद्दा लठ्ठपणा = अति खाणे ह्या गृहितकावर अवलंबून आहे का? >> नाही. आजारपणामुळे वगैरे जाडी येते अशांना नाही. पण आजारपण नसते, सुखवस्तु असतात, नोकरी करुन/न करुन वेळही असतो अशा व्यक्तींना शरीर झपाट्याने बदलतंय व त्याने नसलेले आजार शरिरात घुसु नयेत याकरता हालचाल करायला हवी हे बहुतेकदा उशीरा लक्षात आलेले पाहिले.

सामो, वेळ काढावा लागतो व्यायामाला. विचार करुन पहाल, कसा वेळ काढता येईल व सध्या असे काय आहे ज्यामुळे वेळ नाही. (जर व्यायाम सुरु केला नसेल तर). उर्जा कमी याचे पण कारण वेगळे असेल. दिवसभराचे खाणे नीट उर्जा देणारे नसेल हे नेहमीचे कारण (आजाराशिवाय).

बाकी आपण छान दिसावे असे वाटणे चुकिचे नाही पण त्याकरता स्वतःला किती त्रास द्यावा हा कळीचा मुद्दा.

>>> सध्या असे काय आहे ज्यामुळे वेळ नाही. (जर व्यायाम सुरु केला नसेल तर). उर्जा कमी याचे पण कारण वेगळे असेल.>>> हाहाहा वेळ आहे गं. आळस!!! Sad हां उर्जा कमी पडतेय ते मी डाएटिशिअन कडे जाउन विचारुन आले आहे. कर्बोदके एकदमच सोडली होती किंवा अतिनगण्य होती पण आता गाडी रुळावर आणायचा प्रयत्न आहे.

थोडे अवांतर.
आता माहितीचा विस्फोट झालेला आहे.
पंचतारांकित हॉटेल मध्ये नुकताच गावा वरून आलेला व्यक्ती जसा बावरून जातो तसे सर्वसामान्य जनता ह्या माहितीच्या जंगलात बावरून गेलेली आहे.
आरोग्य विषयक माहिती ही संतुलित,आणि प्रमाणित केलेली च असावी असा दंडक लागू करण्याची वेळ आली आहे .
त्याच साधं उदाहरण देतो.
प्रमाणात केलेलं मदिरा पान हे आरोग्य स हितकारक असते असे त्याच कौतुक ऐकून कोण्ही रोज प्रमाणात मदिरा पान करायला सूरावत केली की काही दिवसांनी.
सावधान
प्रमाणित मदिरा पान तुमचा जीव घेवू शकत अशी बातमी झळकते आणि विचारांचा गोंधळ उडवून देते.
चांगल्या आरोग्य साठी व्यायाम करा अश्या सल्ल्याचा भडिमार केला जातो पण किती आणि कोणता व्यायाम करा हे सांगत नाहीत.
मग गोंधळलेला आरोग्य प्रेमी 4 = 4 तास व्यायाम करतो आणि स्नायूंचे दुखणे गिफ्ट मध्ये मिळवतो .
तसेच पथ्ये काय पाळावीत,कोणता आहार आरोग्य दायक ,कोणता हानिकारक ह्या विषयी उलटी Sulati माहिती वाचून ऐकून नेमके उलटा आहार घेतला जातो .
डॉक्टर बदला की सल्ले पण बदलता .
असा पण अनुभव खूप लोकांना आला असेल

सामो ... लेखाचा विषय चिंतलसील आहे. म्हणून लिहितेय. नाहीतर माझ्या मताला तसं फारसं महत्व नाहीच.
माणसाचं जीवन म्हणजे मनोव्यापार आणि तो समाजमानाशी निगडित असल्याने समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाही. शरीर हे मनोव्यापाराचं साधन असतं . म्हणून तर... आपण भूक नाही, झोप येत नाही .. असं म्हणतो.तद्वतच कित्येकदा शरीरासाठी केल्या जाणाऱ्या कित्येक गोष्टी हे मनावरचे उपाय असतात
एक उदाहरण सांगायचंय.... माझ्या जवळच्या नात्यातला एक मुलगा. त्याचा शरीरावर (चेहरा सोडून) २५/३० गाठी होत्या. काही अगदी लिंबाएवढ्या मोठ्या. त्याने सर्व प्रकारच्या पॅथींचे उपचार घेऊनही त्या गेल्या नाहीत. त्याचा परिणाम असा झाला कि तो कोणात मिसळेनास झाला. घरी कोणीही यायचं असेल तर तो माझ्याकडे येई. मी त्याला समजावयाचे कि... लोकांना दुसऱ्याकडे बघायला अजिबात वेळ नसतो. आपणच अनुभवांमुळे त्यांच्या नजरेतून स्वतःकडे पहात असतो. पण तुम्ही त्यांना कुतुहल वाटावं असं काही केलंत तर ते लक्ष देतात.... त्याच्या गाठी दर्शनीय नसल्यामुळे मी असं म्हणत होते.... पण शेवटी त्याच जळतं त्यालाच कळतं हेही खरंच!... माझ्या सांगण्याचा फारसा फायदा झाला नाही.
त्याने लग्न करतांना व्यंग असलेल्या मुलीशी करायचं ठरवलं ... कोड असलेली, पुनर्विवाहीत मुलींना घरातून नकार होता. शारीरिक व्यंग चालणार होतं. मला मात्र त्याच्यात उपकारकर्त्याची भावना दिसत होती. म्हणून त्याच्यासारखंच दर्शनी व्यंग नसलेली मुलगी त्याने करावी असं माझं मत होतं. .. त्याने हाताला दोन बोटं नसलेली आणि मानेत दोष असलेली मुलगी ठरवली (नेटवरून). तिच्यापासून काहीही लपवायचा प्रश्नच नव्हता. तरीही लग्न ठरल्यावर त्याने लायपो करून हातापायावरच्या गाठी काढून घेतल्या. कारण सांगितलं की त्या चरबीच्याच आहेत हे तिला कळावं हा हेतू आहे.
आता लग्न झाल्यावर दोघं कुठे गेली कि तिचं व्यंग दिसतं तेव्हा लोक तिला ... त्याने व्यंग असलेली मुलगी का केली असं विचारतात. सांगितलं तर त्याचं व्यंग उघड होतं, जे त्याला आवडत नाही. नाही सांगितलं तर तो महान ठरतो जे तिला पटत नाही . परिणामी तो तिच्यासोबत जायचं टाळतो.
त्याच्या दुनियेत तो मस्त आहे. एमटेक करायचं राहिलं होतं ते केलं. एक मुलगा आहे. सामाजिक, आर्थिक स्थैर्य आहे. (आधीच्या तुलनेत)...
मला आपलं वाटतं स्वतः स्वतःला (आतून बाहेरून) आहे तसं स्विकारण्याच्या /नाकारण्याच्या प्रक्रियेतून अश्या गोष्टी घडतात. मानसिक गोंधळ असतो. विचारांची स्पष्टता नसते. त्यात आणि समाजाला बदलणं शक्य नसतंच....

@ सामो, रूजुता दिवेकर किंवा जगन्नाथ दिक्षित यांची वजन उतरवण्याची पुस्तके किंवा व्हिडिओज तिथे लोकप्रिय नाहीत असे वाटते.

लायपोसाठी त्या आधी चौकशी करायला गेले होते तेव्हा डॉक्टरने करू नका असा सल्ला दिला. नुसता सल्ला नाही तर नकारच दिला >>>> चांगले डॉक्टर आहेत.बरेच वर्षांपूर्वी,मीही वेटलॉससाठी प्रोटीनपावडरीबद्दल डॉ.ना विचारले होते.त्यावेळी तेही असेच म्हणाले होते की अजिबात घेऊ नका.किडनीवर वगैरे परिणाम होतो.

बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी आणि लिपोसक्शन या दोन प्रकारात वरवर बघता जरी फॅट कमी करणे हा उद्देश असला तरी या पद्धती मूळात वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात.
शरीराच्या ठराविक भागात चिवट फॅट आहे जी व्यायाम वगैरे उपायांनी हलायला तयार नाही आणि व्यक्ती ओबिज नाही अशावेळी लिपोसक्शन करतात. यात वजन वाढण्याची कारणे शोधून ती हटवणे हा प्रकार नाही कारण व्यक्ती ओबिज नाही. प्रॉब्लेम एरीआ , जसे की पोट, मांड्या यावरील चरबी लिपोसक्शनने घालवल्यावर व्यायाम आणि आहार नियंत्रण करुन तो भाग मेंटेन करावा लागतो. थोडक्यात या शस्त्रक्रियेसाठी व्यक्ती मुळात हेल्दी हवी आणि नंतरही नियमित आहार नियंत्रण , व्यायाम आवश्यक!
व्यक्ती ओबिज असेल तर वजन कमी करण्याचा दीर्घकालीन उपाय म्हणून बॅरिअ‍ॅक्ट्रिक सर्जरीकडे बघतात. व्यायाम, आहार वगैरे उपाय करुनही काही वेळा वजन नियंत्रण करणे कठीण जाते. जाड माणूस हा आळशी आहे, त्याचा तोंडावर ताबा नाही असे नेहमीच नसते. अशा वेळी योग्य प्रकारची बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी उपयोगी पडते. आमच्या मित्राची अशी सर्जरी झाली आहे. हा आमचा मित्र इमर्जन्सी मेडीकल टेक्निशियन म्हणून ट्रेन्ड आहे आणि गरज पडेल तेव्हा स्वयंसेवक म्हणून ते काम करतो. थोडक्यात वैद्यकीय बाबींबाबत तो अनभिज्ञ नाही. जवळ जवळ वर्षभर विचार करणे, वेगवेगळ्या टेस्ट्स देणे वगैरे करुन ही सर्जरी झाली. सर्जरी नंतर त्याचे डायबेटिससाठी औषध घ्यावे लागे ते थांबले. जोडीला व्यायाम आणि आहारावर नियंत्रण हे आहेच. इतरही पथ्यं आहेत. उदा. यिस्ट घातलेला ब्रेड खाता येत नाही वगैरे.

@राजेश - उत्तम प्रतिसाद
@मानसी - काय विचित्र गोष्ट आहे नाही! यावर एक कथा लिहू शकाल. बर्‍याच भावना आणि गुंतागुंत आहे.
@सतिश - ऑनलाइन असतीलही. पण मी नुकतीच न्यु जर्सीत आलेय त्यापूर्वी ज्या गावात होते तिथे एकटे भारतिय कुटुंब होतो आम्ही. आणि एक मराठी मुलगी त्यामुळे विशेष 'In the know' नव्हते.
@देवकी - बापरे!!! शरीराशी खेळ दिसतोय.
@स्वाती - हां कदाचित जाडे लोक लायपो करु शकत असतील पण लठ्ठ (मॉर्बिडली ओबीस) करता बॅरिअ‍ॅट्रिक सुटेबल असेल.
@ अनु - ओह!! तो होता खरा मॉर्बिडली ओबीस.

परिणामी तो तिच्यासोबत जायचं टाळतो. >> Sad त्याने तिला व्यंग असताना लग्न का केले असे भोचक प्रश्न आले तर अशा चक्रम लोकांना खरं व्यावहारिक कारण सांगायची गरज आहे का? विचारलं तर आहोत तसे एकमेकांना आवडलो, अजूनही आवडतो एवढं पुरेसं नाही का? "मी तिला भेटायला गेलो, तिने वरण भात वाढला. इतका छान की त्या वरण भातापुढे बाकी काही दिसलं नाही... या आमच्याकडे जेवायला" अशी एखादी साधी सरळ गोष्ट ठेवणीत नाही का..... ती चक्रम माणसं प्रश्न विचारून त्यांच्या त्यांच्या संसारात रमली नि इथे हे दोघे एकमेकां बरोबर जायचं टाळतात. इतकं सगळं कॉप्लिकेट करायची गरज आहे का?

@सीमंतिनी
>>>>>> ती चक्रम माणसं प्रश्न विचारून त्यांच्या त्यांच्या संसारात रमली नि इथे हे दोघे एकमेकां बरोबर जायचं टाळतात. इतकं सगळं कॉप्लिकेट करायची गरज आहे का?>>>> छान बोललीस. हे असं मला सुचत नाही ! Sad म्हणु माबोवर छान वाटतं. नवीन विचार करायचे प्रकार तरी वाचायला मिळतात.

मलाही नाही सुचायचं कारण आपण दुसर्‍याला सुखी करतील अशी उत्तरे द्यायला सरावलेलो असतो. सगळ्यांना काही ना काही कमतरता असते. पण आपण आपली सांगितली की समोरचा मदत करतोच असे नाही. हिच्यापेक्षा आपण कमी दु:खी म्हणून सुखी होवून निघून जातो. एकदा ह्या फालतूच्या प्रश्नांना उत्तर देवून मी एकच माणूस सुखी करू शकणार असेल तर तो माणूस मी का असू नये? असा फालतू प्रश्न मला पडला. मग सगळं आपसूक सुचायला लागलं Wink

सर्व काही प्रयत्न करून लठ्ठ पना कमी होत नसेल .
तर शेवटचा उपाय म्हणून bariatric सर्जरी चा मार्ग निवडला जावा.
प्रयत्न करून वजन कमी होत असेल तर सर्जरी चा मार्ग टाळणेच उत्तम .
Bariatric सर्जरी म्हणजे थोडक्यात तुमच्या जठराची size कमी केली जाते .
जठर कापून किंवा band लावून .
त्या मुळे भूक लागण्याची भावना जे हार्मोन्स निर्माण करते ते कमजोर होत आणि भूक लागत नाही आणि आणि व्यक्ती कमी खाते .
किंवा जठराचा आकार कमी झाल्या मुळे खूप कमी जागा अन्न साठी उपलब्ध होते.
सर्जरी आली की तोटे पण येतात .
सर्वच काही गोड गोड घडत नाही .
जीवनसत्व आणि क्षार ची कमी शरीरात निर्माण होते त्या मुळे बाहेरून व्हिटॅमिन chya गोळ्या घाव्या लागतात.
योग्य पोषण तत्व न मिळाल्यामुळे शरीर निस्तेज होवू शकत.
असे खूप सारे नकारात्मक पॉइंट सुधा असतात .
त्या मुळे काहीच पर्याय उपलब्ध नसेल तर शेवटचा उपाय म्हणुच सर्जरी चा मार्ग निवडणे हे उत्तम

Pages