विकतचे दुखणे

Submitted by सामो on 15 October, 2019 - 15:12

काही वर्षांपूर्वी, टेक्सासला रहातेवेळी, एके दिवशी, माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. आदल्या शुक्रवारी तिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.

पोटावर सबंध बँडेज बांधले होते.स्कर्ट्वर रक्ताचे डाग दिसत होते. डॉक्टरांनी तिला दिवसा अर्धा तास झोप आणि ५ मिनीटे चालणे असा दिनक्रम सांगीतला होता. बरं एवढच नाही तर रात्रीकरता - अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर प्रिस्क्राइब केल्या होत्या. तरीदेखील उलटीसदृश भावना झाल्यास अजून काही गोळ्या दिल्या होत्या. एक तर झोपेची गोळी अ‍ॅडीक्टीव्ह असते. (अर्थात सर्व गोळ्या नसतीलही अ‍ॅडिक्टिव्ह. नाही तर डॉक्टर कशाला देइल?)
सर्जरीला ३ तास लागले.पोटाला तसेच हिप्सना लहान छिद्रे पाडून चरबी खेचून घेतली जाते. अशी ३ लीटर चरबी काढली. ९८% चरबी + २% रक्त. आता रात्री झोपल्यानंतर हिप्सवर दाब पडून खूप रक्त जात होतं असे ती म्हणाली. तसेच काही आठवडे बरीच सूज रहाणार. मग २-३ महीन्यांनंतर शरीर पूर्ववत होईल. तोपर्यंत इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायची Sad
खर्च = $३५०० + औषधांचा, बँडेजचा खर्च, वारेमाप डोकेदुखी (विकतचे दुखणे) आणि एवढे होऊनही मला ती फार जाड वाटली नाही म्हणून कारण विचारले तर म्हणाली - पोट खूप होते. नंतर रूममेटकडून समजले की तिच्या धाकट्या बहीणीचे लग्न झाले पण तिचे होत नाही म्हणून खूपदा रडते.

खरे पाहता - अमेरीकेत, बॅकेत नोकरीला असलेली मुलगी. तिने जॉबवर लक्ष केंद्रीत करण्यास काहीच हरकत नव्हती. बरे सर्व प्रकारची मुले असतात. तिला अनुरूप मुलगा मिळालाही असता. मुली अशा "डेस्परेट" होऊन शरीराशी खेळ का करतात मला कळत नाही.

जी गोष्ट तिने जिम मध्ये जाऊन स्वप्रयत्नाने साध्य केली असती ती अशी पैसे फेकून, शरीराशी खेळ करून मिळविली तर वाईट मानसिक परीणाम होतच असेल. अर्थात गेलो जिमला झालो बारीक असे काही होत नसते. वजन नियंत्रणाखाली ठेवणं ही एक कॉम्प्लेक्स गोष्ट आहे हे मला तर १००% मान्य आहे. लाइफटाइम सवयी बदलाव्या लागतात शिवाय आपण घेतो ती औषधे आपले हार्मोनल चेंजेस (मग यात पुरुषही आले). मला तरी यात तिचा दोष थोडा आणि "बाह्यसौंदर्याला" अवास्तव महत्व देणार्‍या समाजाचा दोष जास्त वाटतो.

विवाहीत जोडप्यांतही, अनेकदा नवरेदेखील फार अवास्तव अपेक्षा ठेवत असतात. अर्थात अमेरीकेत आहे तितक्या प्रमाणात घटस्फोट वगैरे फट्टकन देत नसतीलही पण प्रेशर असतं खूपदा. बाहेर कॉस्ट्को मध्ये नवरा ओरपत असतो , स्त्री बिचारी काही न घेता त्याला कंपनी देत असते असे दृष्य पाहीलेले आहे. अर्थात याची अनेक कारणे असूही शकतात परंतु असे दृष्य दुर्दैवाने बरेचदा दिसते. यात बायका किती सेल्फ-मोटिव्हेटेड असतात आणि किती दबावाखाली किंवा नवर्‍याची कचकच टाळण्याकरता खात नाहीत ते एक देवच जाणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Too judgemental.
तुम्ही सोयीस्कर रित्या pro life आणि pro choice दोन्ही arguments च्या बाजूने विरोधात बोलत आहात.

Pro choice - मैत्रिणीची केस
Pro life - costco वगैरे मधली उदाहरणे.

Pro life/ pro choice चा स्पेसिफिक significance मला माहित आहे.. इथे फक्त तशाच कात्रीत/सिच्युएशन (ज्याचा निर्णय त्याने घ्यावा की इतरांनी त्यावर भाष्य करू तो थोपवावा) मध्ये असण्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतो आहे.

What's wrong in getting judgemental against unhealthy social pressure?
जर सामाजिक दबाव येत असेल, (हे माझं गृहीतक आहे पण अगदीच बेसलेस नाही) तर तो दबाव चूकीचाच आहे. आता तर रेड कार्पेटवरुन स्त्रिया अनशेव्हन लेग्स दाखवत चालत आहेत. जी मलातरी अतोनात स्वागतार्ह बाब वाटते. रुप आणि सौंदर्य एकंदर चांगले दिसण्याचा दबाव स्त्रियांवरती खूप असतो हे खरे आहे. पूर्वी एकदा २ हवाईसुंदरींची 'लिप्स्टिक न लावल्यामुळे' बडतर्फीची घटना वाचनात आलेली होती. ति देखील अशा प्रकारच्या दबावाचं टोकच आहे.
_________________
हाब, प्रो-लाइफ = कॉस्टको ते नाही कळलं.
प्रो-चॉइस हा नक्की मैत्रिणीचा चॉइस आहे का She gave in/ succumbed to social pressure हा मुद्दा आहे.

बापरे! किती त्रास! ते चरबी काढुन घेण्याची पद्धत जीवावर पण बेतलेली वाचली आहे. त्यामुळे जरा भितीच वाटते. पोट असलेल्या स्त्रियांची लग्न झालेली पाहिली आहेत पण या मुलीला नेमका कोणी भेटला नसावा त्यामुळे लवकरात लवकर पोट कमी करायला हा मार्ग तिने स्विकारला. त्यातुन ‘तिच्या धाकट्या बहीणीचे लग्न झाले पण तिचे होत नाही म्हणून खूपदा रडते’ ही परिस्थिती. वाईट वाटले. तिला लवकर बरे वाटो. आणि यानंतरही व्यायम, आहार नीट ठेवला नाही तर पुन्हा पोट वाढायला वेळ नाही लागणार.
या निमित्ताने नेहमी एक प्रश्न पडतो तो लिहिते. खुप लोक आपल्या जाडीबद्दल, पोटाबद्दल तक्रार करत असतात ‘किती वाढलंय, कमीच होत नाही‘ वगैरे. पण आपले पोट , जाडी वजन वाढु लागले आहे व ते कमी करायलाच हवे हे त्या व्यक्तीच्या वेळेवर का लक्षात येत नसेल की जेणेकरुन ते सावध होऊन उपाय करतील? आटोक्याबाहेर गेल्यावर का लक्षात येत असेल? कारण एका रात्रीत तर हे होत नाही, काही वर्षात हा बदल होतो. (हे कोणालाही नावे ठेवायला नाही लिहिलेले पण असे मनात येते खरे).

दबाव हा अनेकदा स्वतः चीच मतं बरोबर असा आग्रह आजूबाजूच्या लोकांनी केल्या मुळे येतो- त्यामुळे ज्यात आपला प्रत्यक्ष सहभाग नाही त्या गोष्टीविषयी अनाठायी /असंबद्ध ठिकाणी /सल्ला न विचारता टिप्पणी करणं प्रत्येकाने थांबवलं तर सामाजिक दबाव नक्की कमी होईल... जजमेंटल होणं या कारणाने चुकीचं आहे

बाकी कॉस्टको मधले नवरे काय किंवा लिपोसक्षन करणारी बाई काय - त्रयस्थ माणसाला त्याची संपूर्ण पार्श्वभूमी आणि निर्णया मागची अगदी तपशीलवार कारणमीमांसा माहीत नसते... नवरा कुठूनतरी परस्पर आलाय आणि भुकेजला आहे /त्या बाईची ऑर्डर अजून आली नाहीए /तिचं खाऊन झालंय यातली काहीही शक्यता असू शकते..

लिपोसक्षन करायचा सल्ला डॉक्टर सहजी देत नाहीत त्यामुळे तिची काही कारणं असणार

आणि झोपेची गोळी ही कधी कधी गरज असते तिचा लिपोसक्षन शी संबंध असेलच असं नाही.. शिवाय दरवेळी ती व्यसना पर्यंत जाते असं नाही..
मला पण लेख फार एकांगी/केवळ गृहीतकांवर आधारित आणि judgemental वाटला...

>>>अर्थात सर्व गोळ्या नसतीलही अ‍ॅडिक्टिव्ह. नाही तर डॉक्टर कशाला देइल?>>>>
या विधानाशी सहमत

@सुनिधी
>>>>>> त्या व्यक्तीच्या वेळेवर का लक्षात येत नसेल की जेणेकरुन ते सावध होऊन उपाय करतील? आटोक्याबाहेर गेल्यावर का लक्षात येत असेल?>>>>>>> होय बरीच कारणे असू शकतात जसे बिझी असणे, कामातून वेळ न मिळणे, अनुवांशिकता, स्लो मेटॅबोलिझम आणि येस!! हयगय आणि दुर्लक्षही.

@स्नेहमयी
>>>>>>>> त्यामुळे ज्यात आपला प्रत्यक्ष सहभाग नाही त्या गोष्टीविषयी अनाठायी /असंबद्ध ठिकाणी /सल्ला न विचारता टिप्पणी करणं प्रत्येकाने थांबवलं तर सामाजिक दबाव नक्की कमी होईल.>>>>>>हे सत्य आहे.
>>>>>>> नवरा कुठूनतरी परस्पर आलाय आणि भुकेजला आहे /त्या बाईची ऑर्डर अजून आली नाहीए /तिचं खाऊन झालंय यातली काहीही शक्यता असू शकते..>>>>>> ह्म्म्म!!! लिहीताना आपण एका विचारातुन दुसर्‍या विचारात शिरताना मधे काही फ्रेम्स येउन जातात आणि लिहिताना मात्र हे तुटक २ विचारच मांडले जातात. फक्त कॉस्ट्को मधील स्त्रियाच नाही तर पार्टीतही मुली एकच ताट धरुन चिवडत बसलेल्या दिसतात जेणेकरुन ना कोणी आग्रह करेल ना कोणी टोमणा मारेल. असे मी पुरुष कधीच पाहीले नाहीत.पुरुषां वरती हे स्लिम बिम रहाण्याचं भूत नसतं (हे सरसकटीकरण आहे का? Sad ) त्यांच्यावर दबाव नसतो.
>>>> झोपेची गोळी ही कधी कधी गरज असते तिचा लिपोसक्षन शी संबंध असेलच असं नाही>>>>> नाही सांगताना हा मुद्दा तिने सांगीतला होता की (अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर) रात्री लिपोसक्शनच्या संदर्भातच प्रिस्क्राईब केलेल्या आहेत.

भारतात कितीही कुरूप, बेढब शरीराच्या, अति सावळ्या स्त्री/ पुरुषांचे लग्न होतेच होते. अमेरिकेचं नक्की माहित नाही, पण तिकडे जोडीदार परफेक्टच असावा, आपल्या मताप्रमाणे त्यानं वागलं पाहिजे अशा अवास्तव अपेक्षा घटस्फोटांना कारण असावे. इथं भारतात मी पाहिलं आहे, मुलीला सुंदर दिसण्याची कोणतीही बळजबरी घरचे लोक करत नाहीत. पण नॅचरल इंस्टिंक्टने मुली बालपणापासूनच नटण्या, मुरडण्याकडं विशेष लक्ष पुरवितात. मुलांच्या तुलनेत मुलींची अॅक्सेसरीज ची संख्या खूप मोठी असते.

त्या मुलीला लठ्ठ पना मुळे शारीरिक त्रास होत असेल तर सर्जरी करून घेणे ह्याच्या कडे आजार वर उपचार केला ह्याच दृष्टीने बघितलं पाहिजे त्यात काही गैर नाही .
कधी कधी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबून सुध्दा जाडी कमी होत नाही तेव्हा लठ्ठ पना हा आजार मुळे आला असेच ठरवले जाते.
पण सुंदर दिसावे हा एकमेव हेतू असेल तर तिचा निर्णय चुकीचा होता असेच म्हणावे लागेल .
मुलींना आता विचारात बदल करण्याची वेळ आली आहे .
सुंदर दिसलं पाहिजे हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे .
मग सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारची प्रसाधने वापरून स्वतःच्या त्यवचेची हानी होण्या पासून त्यांचं रक्षण होईल .
पुरुष हा कधीच जास्त प्रमाणात अशा गोष्टींच्या नादाला लागत नाही .उत्तम खा ,मस्त व्यायाम करा .शरीर निरोगी ठेवा .
त्व्याचा आपोआप सुंदर आणि नितळ होते.
Makeup केलेल्या चेहऱ्या पेक्षा निरोगी व्यक्तीचा चेहरा म्हणून
किती तरी पटीत सुंदर असतो .
हे आता स्त्री यांनी समजून घेतले पाहिजे

आताच्या मुलीनं मध्ये आणि मुलांमध्ये सुद्धा रुबाबदार पना हवा .
नाजूक साजूक सुंदरता नको .
तारुण्य उत्साहानं ओथंबून वाहील पाहिजे.
बारीक शरीर,आणि शारीरिक कमजोर पना तरुण तरुणी मध्ये नसावा .
पण नेमके उलट आता घडत आहे 0 फिगर च्या हव्यासापायी शरीराची पूर्ण वाट लावून घेतली जात आहे

लबाड कोल्हा.
तुम्ही चुकीचा अर्थ लावला आहे माझ्या पोस्ट चा.
माझ्या दोन्ही पोस्ट अर्थ एका वाक्यात हा आहे की .
निरोगी शरीर आणि उत्तम आरोग्य च तुम्हाला टिकावू सुंदरता देवू शकत .
कृत्रिम प्रसाधने नाही देवू शकत .
निरोगी शरीरात च निरोगी मन असतं आणि असा व्यक्ती कधी विकृत वागत नाही

इतकं सोप्या भाषेत लिहून सुद्धा लबाड कोल्हा समजला नाही .
मला वाटलं myboli वर त म्हणता ताक समजणारे सर्व असतील .
इथे काही अतिशय अडाणी लोक सुद्धा आहेत .

मलाही लेख बर्‍यापैकी जजमेंटल वाटला. लिपोसक्शन ही कॉस्मेटिक सर्जरी समजली जाते ती इंशुरन्सच्या दृष्टीने. मात्र ही सर्जरी आहे याचे भान डॉक्टर्सना असते. त्यांच्या पॅरामिटर्समधे तुम्ही बसत असाल तरच ही सर्जरी केली जाते. तुमच्या मैत्रीणीच्या मैत्रीणीने ही सर्जरी करायचे ठरवले, डॉक्टरांनी मान्यता दिली. सर्जरी नंतर काय त्रास होईल, रिस्क काय वगैरे काउंसेलिंग करतात तसे मैत्रीणीलाही मिळाले असणार. तिने सर्व काही समजून घेवूनच हे पाऊल उचलले आहे तेव्हा तिच्या निर्णयाचा आदर करणे इष्ट. तिला पुढील काळात मदत लागेल तर शक्य झाले तर मदत देवू करावी. लहान बाहिणीचे लग्न झाले आपले अजून होत नाही म्हणून तिला वाईट वाटले , त्यातून तिने हे पाऊल उचलले वगैरे जी काही कारणे असतील ती तिच्यासाठी वॅलिड कारणे. आपण काठावर उभे राहून लिपोसक्शनसाठी कुठले कारण वॅलिड हे कसे ठरवावे. बाह्य सौदर्याला समाज अति महत्व देतो हे खरे पण त्याच जोडीला कॉस्मेटिक समजली जाणारी सर्जरी एखादी व्यक्ती करुन घेणार असेल तर त्याबाबत जजमेंट पास करणेही योग्य नाही. आपल्या बाजूने शक्य तो आधार द्यावा.

स्वाती2 म्हणाल्या तेच, लायपोसक्शन करून घेणे तिची पर्सनल चॉईस आहे. मान्यताप्राप्त डॉक्टर कडून ती करून घेणे कायदेशीर आहे आणि तसे करण्यातले चांगले वाईट तिला माहित आहे/ सांगितले गेले आहे. तिच्या सर्जरीमुळे आपले आयुष्य काडीमात्रही अफेक्ट झालेले नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणे जजमेंट पास करण्यासारखे आहे.

बाहेर कॉस्ट्को मध्ये नवरा ओरपत असतो , स्त्री बिचारी काही न घेता त्याला कंपनी देत असते असे दृष्य पाहीलेले आहे. अर्थात याची अनेक कारणे असूही शकतात परंतु असे दृष्य दुर्दैवाने बरेचदा दिसते>> ती त्या दोघांची लाईफ आहे आणि त्यांची लाईफस्टाईल आहे. पुन्हा त्या लोकांच्या त्या दिवसाबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही त्यावरून बाई दुर्दैवी आहे आणि बाप्या बकासुर आहे असे म्हणणे जजमेंट पास करणे झाले.

सुनिधी
तुमचा मुद्दा लठ्ठपणा = अति खाणे ह्या गृहितकावर अवलंबून आहे का?
असल्यास तो चूक आहे. खाणे हा एक घटक आहे जो कारणीभूत असू शकतो.. बाकी गुणसूत्रे, हार्मोन्स, आर्थिक कौटुंबिक परिस्थिती असे व्यक्तीच्या आवाक्यात नसलेले अनेक घटक ह्यास कारणीभूत असू शकतात. मोजून मापून अगदी सारखाच आहार (क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ़ कॅलरीज) घेणार्‍या आणि अगदी सेम लाईफ स्टाईल असलेल्या दोन पैकी एकच व्यक्ती लठ्ठ होऊ शकते का? तर हो.

स्वाती छान मुद्देसुद मांडलय. हाब आपला मुद्दादेखील लक्षात आला. मी जेंडर संदर्भात खूप दा सिलेक्टिव्ह रीडींग करण्याची चूकी करते - हेसुद्धा आहे.

लग्न जमणार नाही/ बायकोला कमीपणा येईल/बायको दुसर्या पुरुषाकडे आकर्षीत होईल म्हणून टकलावर केस लावणारे पुरुष आणि या अशा ढालगज बायकांच्या सर्जरीज यात सोशल प्रेशर आहे हे कुणीही सांगेल.

>> ढालगज बायकांच्या सर्जरीज>> माझा आक्षेप नोंदवत आहे. कुठल्याही स्त्रीला ढालगज म्हणून जज करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?

+१ केशव तुलसी
________________
वरील सर्वांचे म्हणणे दिसते की हा तिने चोखंदळलेला वैयक्तिक पर्याय आहे. ते मला मान्य आहे परंतु तसा पर्याय हा तिचा स्वेच्छेने आहे का दिखाउ स्वेच्छा आहे. मूळात रुट कॉझ 'समाजाचा दबाव' हा आहे याचा हा उहापोह.

समाजाचा दबाव हा मुद्दा इथे गैर लागू आहे .
सुंदर दिसण्याच्या नादात .
मायकेल जॅक्सन नी किती तरी सर्जरी केल्या आणि अकाली मरण आले .
आणि इथे श्रीदेवी
ही ठळक उदाहरण आहेत .
त्यांना काय समाजानी सांगितलं होत शरीराची सारखी चिरफाड करायला

राजेश माझ्या मते समाजाचा दबाव हा मोठा मुद्दा आहे. लहानपणी जे अपब्रिंगिंग होते त्या वेळेपासून मुलींना नटवले-थटवले जाते. मुलांना रिस्क्स घ्यायला शिकवले जाते. मग ते सुपरहिरोज ची खेळणी देणे असो वा ढाल-तलवार, पुढेही मुलींत रमला तर बायल्या, 'मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा' वगैरे चिडवले जाते. मुलांच्या डोळ्यात अश्रू आले तर त्याला रडूबाई म्हटले जाते. आता बदलत असेल हळूहळू.
पण तो मुलांचा मुद्दा नाही, मुद्दा आहे मुलींचा. पुरुष केसाळ पाय दाखवत फिरु शकतात. मुली नाही. बिनबाह्यांच्या कपड्यात ते काखेत केस ठेउ शकतात, मुली नाही. या झाल्या टोकाच्या केसेस. पण वरती हवाईसुंदरिंचे उदाहरण दिलेले आहेच. मी स्वतः एका पुरुषा च्या तोंडुन ऐकलेल आहे की "हं मग त्यात काय आमच्या ऑफिसात आहेत ना 'ऑफिस फर्निचर' मुली" Sad Sad दॅट वॉज सिक!!!!

दोनेक वर्षांपूर्वी मी एका लायपोसक्शन करणाऱ्या नामांकित तज्ञ डॉक्टरांचं मत वाचलं होतं. ते म्हणाले की या सर्जरीनं सुंदर दिसणं सोडा, पण नितंब, मांड्या अजनच विद्रुप दिसतात. शिवाय शरीराचा फॉर्म बिघडतो.

सामो
मी हेच तर सांगतोय.
स्त्रिया नी आता सजवलेली बाहुली होवून राहू नये .
निसर्गतः ज्या भावना असतात त्या बदलता येत नाहीत .
पण जबरदस्तीने शरीरावर अन्याय करून नाजूक बाहुल्या बनू नये

इतरांबाबत जजमेंट पास करणे फार सोपे आहे. समाजात बाह्य सौदर्याबद्दल प्रेशर असेल तर ते कमी करण्यासाठी आपण स्वतः काही करतो का याचा प्रत्येकानेच प्रामाणिकपणे विचार करावा. आंतरिक सौदर्य महत्वाचे असे नुसते म्हटले जाते पण जितक्या सहजतेने बाह्य सौदर्याची प्रशंसा केली जाते तितक्या सहजतेने आंतरिक सौदर्याची प्रशंसा आपण खरेच करतो का? स्वतः हेअर डाय वापरणे, केस सरळ करुन घेणे म्हणजे टापटिप रहाणे आणि दुसर्‍याने विरळ होणार्‍या केसांवर उपाय करणे म्हणजे बाह्य सौदर्याला अति महत्व असा सोईस्करपणा बर्‍याचदा बघायला मिळतो. मैत्री आहे, नाते आहे तेव्हा त्या व्यक्तीच्या भल्यासाठीच असे म्हणत केस, त्वचा याबाबत न मागता सल्ले देणे टिपण्ण्या करणे सर्रास चालते. लेन्सेस का वापरत नाही? भुवया का कोरत नाही? केस का रंगवत नाही असे प्रश्न विचारण्यापासून ते अगदी शेपवेअर वापरण्याचा सल्ला देताना आपण दुसर्‍याच्या पर्सनल बाबींत नाक खुपसुन त्या व्यक्तीच्या मनाला कुठेतरी असुरक्षित करत आहोत याची बरेचदा लोकांना जाणीवही नसते.
लेखातल्या स्त्री ने सर्जरीचा मार्ग स्विकारला आहे हे माहित आहे म्हणून जजमेंट पास करणे होते . याउलट बरेचदा 'तिने किती छान मेंटेन केले आहे स्वतःला' असे कौतुक होते परंतू ते मेंटेन करणे कॉस्मेटिक सर्जरीतून शक्य झाले आहे हे आपल्याला माहितही नसते.

कृपया हलकं घ्या. पुरुष हा भुंगा/ फुलपाखरू असतो व स्त्री ही फुल असते. भुंगा किंवा फुलपाखराला आकर्षित करण्यासाठी फुलाला चटकदार रंग, आकर्षक आकार, सुवास या गोष्टी अॅडॉप्ट कराव्या लागतात. हेमावैम आहे. कुणी वाद घालू नये. धन्यवाद.

>>>>> असे प्रश्न विचारण्यापासून ते अगदी शेपवेअर वापरण्याचा सल्ला देताना आपण दुसर्‍याच्या पर्सनल बाबींत नाक खुपसुन त्या व्यक्तीच्या मनाला कुठेतरी असुरक्षित करत आहोत याची बरेचदा लोकांना जाणीवही नसते.>>>>> वाह!!! अगदी खरे बोललात.
अपण तर वाट्टेल त्या थराला नाक खुपसत असतो - मग कधी मिळणार (लग्नाचे) लाडू? पासून ते मग कधी मिळणार (बाळाच्या जन्माचे/बारशाचे) पेढे पर्यंत.
साधं ते इंग्रजी सेल्फी गाणं घ्या - शी इज सो शॉर्ट/ हर ड्रेस इज सो टॅकी .... असले टोमणे आहेत त्यात.
गाण्यांचं जाउ द्यात. बुटकेपणा, काळेपणा, शरीराची ठेवण , जाडेपणा बारीकपणा- या सर्वाबद्दल आपली कलुषित नजर आपण बदलत नाही. पहील्यांदा ती व्यक्ती एक माणुस आहे , तिचं एक गर्भश्रीमंत आंतरीक विश्व आहे. आपण फक्त बाह्यरुपाला इतकं अवास्तव महत्व देतोच.
माझी एक मैत्रीण म्हणायची कुरुप किंवा प्लेन जेन मुलीबरोबर शक्यतो सेल्फी काढायची त्यामुळे आपण सुंदर दिसतो. वाह!!!

>>>>>>> निसर्गतः ज्या भावना असतात त्या बदलता येत नाहीत .
पण जबरदस्तीने शरीरावर अन्याय करून नाजूक बाहुल्या बनू नये>>>>> +१००

>>कृपया हलकं घ्या. पुरुष हा भुंगा/ फुलपाखरू असतो व स्त्री ही फुल असते. >>>
.
>>>>>>>>हम शम्मा का सीना रखते हैं
रहते हैं मगर परवानों में >>>>>
या ओळी ऐकल्यात की नाही ? असं काही भुंगा व फूल नसतं. दोन्हींची अदलाबदल माणूस नामक बुद्धीमान आणि गुंतागुंतीचे मनोव्यापार असलेल्या प्राण्यात होउ शकते.

सुंदरतेचे व्याख्या काळानुसार बदलत गेल्या आहेत असे नाही का वाटत.
माणसाचा किंवा
समाजाचा दृष्टिकोन बदलण्ास
खूप सारे फॅक्टर कारणीभूत असतात.
काही वर्षा पूर्वी भरीव बांधा हे सुंदरतेचे
लक्षण होते .
भरीव बांध्याच्या स्त्री ला सुंदर समजल जाई .
पण आता कटकुळ्या बारीक बांध्याची स्त्री सुंदर असते असे आपल्या मनावर बिबवल गेले आहे

ह्म्म!! तसे पहाता ६ अ‍ॅब्स वगैरे पुरुषांचे सौंदर्य मानले जाते परंतु ते कमवावे लागते असा सर्जरीचा शॉर्टकट नसतो. माझा एक मित्र म्हणायचा - अरे ६ अ‍ॅब्स गेले उडत आम्हाला बघा कसा एकच मोठा अ‍ॅब आहे (ढेरी) Happy हाहाहा Lol लव्हड इट!!!

लेख एकांगी वाटला, पण स्वतःच्या शरीराशी खेळ करू नये असा विचार त्यामागे असावा असं वाटलं आणी तो विचार understandable आहे. बाकी बाह्य सौंदर्य, प्रसाधनं वगैरे विषयी काही मतं 'धट्टीकट्टी गरिबी आणी लुळीपांगळी श्रीमंती' छापाची वाटली. प्रेझेंटेबल रहावं माणसानं, त्यात काहीही वाईट नाही. किंबहूना आत्मविश्वासासाठी सुद्धा ती एक गरजेची गोष्ट आहे. बाकी ते beauty lies in the eyes of beholder (beer-holder! Happy ) वगैरे ठीक आहे.

Pages