युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४२

Submitted by मी मधुरा on 10 October, 2019 - 02:13

"भीम, तुझ्या बंधुंना सांग की बाहेरून लाकडे आणू नका सध्यातरी. तू काल आणलेली चार झाडे अजून पडली आहेत पडवीत. ती पुरतील अनेक दिवस."

भीम ओसरीवर बसला होता. त्याच्या हातातल्या तृणपात्याकडे नजर लावून एकाग्रपणे बघत होता. बहुदा कुंतीचे शब्दही त्याच्या कानापर्यंत पोचले नसावेत. त्याची तंद्री भंग करायला हे पुरेसे नसावे.

कुंती मात्र दुपारच्या भोजनाची तयारी करण्यात व्यस्त होती. पुत्रांनी धान्य आणले की ते शिजवण्याकरता आणि अन्न स्वादिष्ट बनवण्याकरता बाकीची तयारी असायला हवी, म्हणून तिची लगबग सुरु होती आणि शक्तीचे काम म्हणल्यावर भीम शिवाय पान हलत नसे. तिने पुन्हा भीमला हाक मारली.

"भीम, थोडे लाकूड कापून आण आत्तासाठी."
काहीच प्रतिसाद नाही आला. तिला आश्चर्य वाटले. ओसरीवर बसलेल्या भीमाला पाहून ती त्याच्या जवळ गेली.
"भीम..... वृकोदरा....." तिने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याची तंद्री तुटली.
"माताश्री..... काही काम होते का?"
"ते तर असतेच भीम."
"सांगा ना माताश्री. लाकूड हवे आहे का? फळे आणायची आहेत? की.... "
"भीम.... तुला आठवण येते आहे ना?" कुंतीने थेट डोळ्यांत बघत त्याला विचारले.
तिने त्याच्या मनातले अचूक ओळखले तसा भीम ओशाळला.

"पण आपली कितीही इच्छा असेल तरी हिडिंबा आणि घटोत्कच मानवी वस्तीत नाही राहू शकत रे."
तिने हळव्या मनाने भीमाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आत निघून गेली. भीमने हातातले तृणपाते कपाळाला टेकवले.
'एका वर्षाचा सहवास आणि आयुष्यभराच्या आठवणी. खरचं हिडिंबा.... तू माझ्या आयुष्यातले सर्वात प्रिय आणि आनंददायी क्षण आहेस. आपला संसार, आपला पुत्र, आपलं प्रेम...... आणि तुझा त्याग.....! तुझा त्याग....? की आपला? पण आपण नक्की कशाचा त्याग केला हिडिंबा? एकमेकांच्या सहवासाचा की सर्वजण ज्याला दुर्मिळ म्हणतात त्या सुखासुखी संसाराचा? खरचं वर्षानंतर असा संसार त्यागणं सोप्प असतं? तेही केवळ शब्द दिला म्हणून? नाही..... निदान माझ्याकरता तरी हे सोप्पे नव्हते.... आणि तुझ्याकरता? नक्कीच नसणार. पण शब्द तुला स्वार्थापेक्षा महत्वाचा वाटला. नाहीतर अडवलं असतंस मला. अधिकार होता तुझा माझ्यावर! नात्याचा.... प्रेमाचा! पण तू स्वतःहून शब्द पाळलास. मला खूप अभिमान आहे तुझा.
घटोत्कच जन्माला आला आणि बघता बघता तरूणावस्थेतल्या देहाचा झाला काही निमिषांत! खरतरं त्याला सुद्धा दानव योनी प्राप्त झाली होती. पण तो मानवी गुणांनी आणि विचारांनी समृद्ध असेल असा विचारही केला नव्हता मी. तुझे गर्भसंस्कार..... तेच होते त्यामागे! बघ हिडिंबा..... सगळंच किती आपलंस करून घेतलंस तू! मानवी जीवनपध्दती, मानवी राहणीमान, आणि माझ्या मनाचा एक कोपरा सुद्धा! तो सदैव तुझ्या आठवणींनी भरलेला असेल, हिडिंबा. तुला त्यात मी सतत जपेन.... अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत! मानव योनीतला हा भीम, दानव योनीतल्या हिडिंबेला कधीच विसरणार नाही. आणि तू? तू विसरू शकशील मला, हिडिंबा? आणि 'नाही'..... तर कशी जगत असशील एकटी? देह दानवी असला तरी मनाने तर तू...... काळजी घे. माझ्या घटोत्कचाची आणि माझ्या प्रिय पत्नीचीही! घेशील ना?" त्याच्या हातून तृणपाते वाऱ्यावर उडून गेले. त्याने डोळ्यांत आलेले पाणी टिपले आणि कुंतीची मदत करायला कुटीत निघून गेला.
___________

"प्रणाम द्वारकाधिश!" द्रुपदने कृष्णाला अभिवादन केले आणि दोघांनी कक्षात प्रवेश केला.
"गोविंद...." द्रौपदी कृष्णाला पाहून जागेवरून उठली. हात जोडून तिने त्याच्याकडे आनंदाने पाहिले.
"अगं.... द्रौपदी? काय सुंदर दिसते आहेस! स्वयंवर जवळ आले की रूप उजळते नै का, दाऊ?"
द्रौपदी गोड लाजली.
"गोविंद, बलराम, मिष्टान्न घ्या." नुकत्याच काढलेल्या लोण्याच्या गोळा आणि बाकी एक ना अनेक पक्वान्न भरून सोन्याच्या दोन थाळ्या घेऊन दास उभे होते.
"नवनित!" कृष्णाने फक्त लोण्याची वाटी हातात घेतली.
"राजन्, दोन थाळ्यांची गरज नाही. एकच पुरे आहे." लोणी खाणाऱ्या कृष्णाच्या लोभस रुपाकडे पाहत बलराम म्हणाला.
"द्रौपदीने खासकरून लोणी का मागवलं हे आत्ता कळलं मला." द्रुपद स्मित करून म्हणाला.
"सुमधुर! उत्तम आहे." कृष्णाने लोणी संपवत प्रतिक्रिया दिली.
बलराम इतर पदार्थ चाखून पाहत होता.
"द्रौपदी, आता बघ.... दाऊ साधारण १ घटिका तरी व्यस्त राहतील पदार्थ चाखण्यात. आणि पदार्थ खाऊन झाला की तो कसा वाटला ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होईल." कृष्णाने कुजबुजत्या स्वरात सांगितले.
"काय? पण कसं?"
"बघत रहा."
बलरामने बुंदीचा लाडू खायला सुरुवात केली आणि चेहऱ्यावर एक हलकं स्मित आलं. नंतर मोदक खाऊन संपवत प्रसन्नपणे बलरामाने अजून एक पदार्थ उचलला. तो तोंडात टाकला आणि त्याचा चेहऱ्यावरचे पूर्ण स्मितच गायब झाले. बलरामाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. कृष्ण खळखळून हसला.
"काय झाले भ्राताश्री बलराम?" द्रौपदीने काळजीने विचारले.
"काही नाही द्रौपदी..... त्यांना हा पदार्थ नविन आहे. आणि तो गोड नाही, याची कल्पना नव्हती त्यांना. हो ना भ्राताश्री?"
बलरामाने काहीतरी चिडून बोलण्याचा प्रयत्न केला पण तोंड भरलेले असल्याने काहीच बोलू शकला नाही.
"मगं? जय्यत तयारी झालेली असणार स्वयंवराची. हो ना द्रौपदी?" द्रौपदीकडे बघत कृष्णाने तिला खोडकर नजरेने विचारले.
"काय हे गोविंद!" तिने नजर झुकवून स्मित केले.
"तुम्ही आलात हे आमचं भाग्य आहे!" द्रुपद म्हणाला.
"पांचाल नरेश, माझ्या या गोड भगिनीच्या स्वयंवराला कसा बरं अनुपस्थित असेन मी?" कृष्ण खांद्यावरचा गुलाबी शेला नीट करत उद्गारला.
"तुम्हाला जे हवं नको आहे ते द्रौपदी स्वयं पाहणार आहे. तेव्हा काही आवश्यकता असल्यास तिला कळवा. आमचे सारे सेवक तुमच्या सेवेस हजर आहेतच." द्रुपदाने रजा घेतली.
_____________

"कर्णा...."
"दुर्योधन..... स्वागत आहे."
"आगत-स्वागत सोड. मी तुला घेऊन जायला आलो आहे. पांचाल नगरीतून आलेली वार्ता ऐकलीस का?"
"कसली वार्ता?"
"अरे, आमंत्रण आलेले आहे स्वयंवराचे."
"पांचाल नगरीतून?"
"हो. इतकं आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे त्यात?"
"दुर्योधन, मी काही अधिक बोललो तर क्षमा करं. पण द्रोणाचार्यांशी वैर असताना त्यांनी हस्तिनापुरास स्वयंवराचे आमंत्रण का दिले?"
"आता वैर कसले? ते तर तेव्हाच संपले जेव्हा पांचालनरेशनी नाक घासून माफी मागितली द्रोणाचार्यांची. आणि द्रोणाचार्यांनीही माफ केलं त्याला..... नाहीतर अर्ध राज्य परत का दिलं असतं त्यांनी द्रुपदला?"
"दुर्योधन, द्रुपद तो व्यक्ती आहे ज्याने द्रोणाचार्य ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना ओळख देणे नाकारले. 'हक्क म्हणून नाही, भिक्षा म्हणून मागं' असं सांगत ज्याने साधे गोधनही मित्रत्वाचा हक्क म्हणून दिले नाही, तो द्रुपद आहे. अर्धे राज्य.... अर्धे राज्य अपमानकारक पराजयामुळे हातातून गेले आहे. आणि आहे ते सुद्धा द्रोणांनी दिलेली भेट आहे. तो द्रुपद हस्तिनापुराशी आणि पर्यायाने त्याला हरवणाऱ्या कौरव आणि द्रोणाचार्यांशी सख्ख जोडण्याचा प्रयत्न का करेल? ज्याला क्षत्रिय असण्याचा इतका गर्व होता त्याने द्रोणांची खरचं मनापासून माफी मागितली असेल हे कश्यावरून?"
दुर्योधनाचे डोके कर्णाच्या बोलण्याचा भार उचलून उचलून पार थकून आणि गोंधळून गेले होते. "तू किती विचार करतोस रे! मी इथे तुला सोबत घेऊन जायला आलो आहे, तुझे हे तर्क-वितर्क ऐकत बसायला नाही."
"पण दुर्योधन....."
"तू काय सुचवायचा प्रयत्न करतो आहेस नक्की? हे बघ, मी जाणारचं आहे स्वयंवरात. मामाश्रींनी सांगितले आहे मला.... पांचाल नरेशची कन्या सुंदर आहे. त्याची कन्या माझी पत्नी बनली की ते अर्धे पांचाल सुद्धा हस्तिनापुरात सामावून घेता येईल."
"पण हे स्वयंवर एक जाळे असू शकते ना, दुर्योधन?"
"म्हणजे?"
"अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून त्याने कौरवांना स्वयंवरास बोलावले असेल तर?"
"काय बोलतो आहेस तू?"
"तिथे स्वयंवरात त्याने मुद्दाम काही अशक्यप्राय पण लावून स्वयंवरात भाग घेणाऱ्या सर्वांचे हसे करायचे ठरवले असेल, आणि म्हणून कौरवांना बोलावले असेल तर?"
"तसं का असेल पण? तुला माहिती आहे ना की जर स्वयंवरात कोणीच जिंकले नाही तर काय होते ते? स्वतःच्या राजकन्येचे स्वयंवर तो कौरवांचा अपमान करण्यात कशाला घालवेल? आणि कौरवांपुढे मागच्या वेळी त्याची काय गत झाली होती हे विसरला नसणार तो. मला तरी नाही वाटत कौरवांचा अपमान द्रुपदाला स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त महत्वाचा असेल."
"पण दुर्योधन....."
"आता काय 'पण' वगैरे? हे बघ, त्यांनी खुद्द द्रोणाचार्य पुत्रालाही आमंत्रित केले आहे त्या स्वयंवरात. अश्वत्थामाही येणार आहे तिकडे. मग तुलाच काय त्रास आहे? चल सोबत."
दुर्योधनाने कर्णाला ओढत महालाच्या बाहेर आणले. सज्ज असलेला रथ उभा पाहून कर्ण चकित झाला. "तू सगळी तयारी करूनच आला आहेस?"
"हो, मग काय!"
"पण मला आमंत्रण नाहीये दुर्योधन."
".....आणि तुझ्या नावाचं वेगळ आमंत्रण हवच्चेय कशाला?"
"दुर्योधन?"
"दुर्योधन आणि कर्ण वेगळे नाहीत, हे माहिती आहे सर्वांना. मग ते वेगवेगळे आमंत्रण देतीलच का? चलं बरं आता."
कर्णाच्या चेहऱ्यावर स्मित आले. दुर्योधनाच्या हातात असतं तर त्याने आपल्यासोबत द्वंद्व करायला का होईना पण अर्जुनाला जिवंत सोडलं असत, असा विचार त्याच्या मनाला आनंद देऊन गेला.
"वृषाली, मी निघालो." त्याने बाहेरूनच हाक देऊन सांगितले आणि रथावर चढून दोघांनी पांचालनगरी कडे कूच केली.
___________
"आज तुम्हीही चला आमच्या सोबत!" ओसरी वर पडलेल्या झाडांची फळे गोळा करताना भीमच्या कानांवर हे वाक्य पडलं आणि त्याने मागे वळून सहदेवाकडे पाहिले.
"मी?"
"हो, तुम्हीच भ्राताश्री."
भीमला आश्चर्यच वाटले. एरवी भिक्षा मागायला आपल्याला कधी सोबत येऊ न देणारे बांधव आज आपल्याला सोबत घ्यायला स्वतःहूनच तयार कसे झाले, हे त्याला कळेना. तो सगळ्यांसोबत चालत सुटला.
नकुलला मागे ओढून त्याने चालण्याचा वेग मंदावला.
"काय रे? या वेळी कसं काय मत बदललं? माझे विशाल उदर आणि देह वगैरे दिसून तुम्हाला मिळणाऱ्या भिक्षेत घट होणार नाही का आता?" खोडकरपणे भीमने विचारलं.
"भ्राताश्री, आज पांचाल महालात स्वयंवर आहे. त्यात सर्वांना मिळणार आहे भोजन. आणि किती तरी दिवसांनी राजवाड्यातले संपूर्ण वाढलेले ताट मिळणार आहे."
"आणि तिथे कोणी आपल्याला ओळखले म्हणजे रे? अर्जुनाने तर युध्दात हरवले होते पांचालनरेशला. आपल्याला पाहिले तर त्यांना समजणार नाही का की लाक्षागृहातून आपण वाचलो आहोत?"
"भ्राताश्री, त्यांनी इतक्या अपमानानंतर हस्तिनापूरास आमंत्रण पाठवले नसेल. त्यामुळे कौरव तिथे नसणार. आणि पांचालनरेशने आपल्याला केवळ एकदाच पाहिले आहे.... तेही युध्दात..... क्षत्रिय वेषात. मग ब्राह्मण वेषात कोण ओळखणार आपल्याला?" पण तरीही शत्रूच्या स्वयंवरात भोजन करायला जायचे म्हणजे परवानगीशिवायेथे देवयानीच्या कक्षात शर्मिष्ठेने जाण्यासारखे! भीम काही बोलणार त्या आधी नकुल म्हणाला, "आणि भ्राताश्री, जर ओळखून हल्ला केलाच, तर तुम्ही आहातचं की सोबत." नकुलने विश्वासाने भीमाकडे पाहिले.
"बरं.... चलं." खांद्यावर हात ठेवून भीम नकुल सोबत इतरांच्या मागे राजमहालाच्या दिशेने चालू लागला.

©मधुरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद किल्ली. Happy पुढचे भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद अजय. Happy अगदी खरे आहे. प्रत्येक पात्र आणि त्याच्या जीवनावर एक वेगळी विस्तीर्ण कथा बनू शकते.
सध्या मी संपूर्ण महाभारत लिहिण्याच्या उद्देशाने लिहिते आहे म्हणून जास्त खोलात जाऊन प्रत्येक पात्र रेखाटू शकेन की नाही माहिती नाही.
पण तुम्ही यावर लिहिलेत तर मला वाचायला खूप आवडेल. तुम्ही रेखाटन छान करालंच. अर्थात, तुम्हाला महाभारताची आवड आहेच आणि सवड मिळाली की त्यावर लिहू शकाल आणि उत्तम लिहालं (लिहिले आहेत) म्हणून सुचवते आहे. घ्या लिहायला 'भीम-हिडिंबा' वर. महाभारत आणि त्यातली पात्र जितके वेळा वाचालं, लिहालं, तितकी जास्त आवडत जातात. भीम आणि हिडिंबा एक उत्तम प्रेम कथा आहे पण दुर्लक्षित राहिली आहे, असे मला वाटते.
त्यात भीम हे अर्जुनापेक्षा जास्त आवडते पात्र आहे माझे. तुम्ही यावर लिहिलेत की महाभारताचा एक हट्टी पंखा म्हणून मी येईनच तुमच्या धाग्यावर. Happy

छान झालाय भाग...
खुपश्या माहीत नसलेल्या गोष्टी कळत आहेत...

धन्यवाद प्रितम! Happy
मीही लिहायला घेताना अनेक गोष्टी बारकाईने वाचल्या. महाभारत नव्याने कळले प्रत्येक मितीतून! Happy

मग काय! दस्तूर खुद्द मन्यानी इच्छा व्यक्त केली होती>> चला कुणालातरी वाचकांची पर्वा आहे म्हणजे. नाहीतर काही लोक असे हरभऱ्याच्या झाडावर चढून बसतात. की त्यांना काही घेणंदेणंच नसतं वाचकांशी. मनाला येईल तेव्हा लिहीत सुटतात, मनाला येईल तेव्हा गायब होतात.
Wink
(sorry 4 अवांतर)

मला माहीत नाही मी लिहू शकेल की, नाही ते...पण प्रयत्न करू शकतो..
पण सध्या सलग निवांत वेळ मिळणं शक्य नाही ....मिळाल्यावर ह्यावर विचार करेन...

श्रध्दा, वाचक आहेत म्हणून लेखकांना किंमत (मान या अर्थाने) आहे. मला तर वाचक आणि त्यांचे प्रतिसाद खूप महत्वाचे वाटतात. Happy

नक्की मन्या! तयारी सुरु आहे. Happy

@अजय: नक्की विचार करा. मी तुम्हाला मेल करते आज किंवा उद्या. एक भन्नाट आयडीया आली आहे. Happy

हाही भाग सुंदर झालाय.

चला कुणालातरी वाचकांची पर्वा आहे म्हणजे. नाहीतर काही लोक असे हरभऱ्याच्या झाडावर चढून बसतात. की त्यांना काही घेणंदेणंच नसतं वाचकांशी. मनाला येईल तेव्हा लिहीत सुटतात, मनाला येईल तेव्हा गायब होतात.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अशा लेखकांना हरबर्याच्या झाडावर उलट टांगून ठेवायला हवे.
Lol

अशा लेखकांना हरबर्याच्या झाडावर उलट टांगून ठेवायला हवे>> बघ सापडलं तुला एखादं तर. लटकायचं कसं ते बघ फक्त बाकी सगळं आम्ही बघून घेउ..
Happy

धन्यवाद अज्ञातवासी.

आणि नको होऊस गायब.
सगळे भाग टाकून झाले की नवीन काही सुचेलच की! Happy

धन्यवाद मधुरा, आणि रियली सॉरी फॉर अवांतर प्रतिसाद!
हा माझा शेवटचा प्रतिसाद. बाकी चर्चा माझ्या विपुत अथवा वा संपर्काद्वारे करू शकतात.

अरे असं कसं.. तुझ्या चाहत्यांचं काय होणार मग..
>>>>
चाहनेवालो का क्या है श्रद्धाजी, आज हम है, कल कोई और होगा चाहने को Happy

अज्ञा, अवांतराला काही हरकत नाही. पण तू माबोवरून जाण्याच्या गप्पा का करतो आहेस हे कळलेले नाही.

असो, याचे उत्तर तू विपु अथवा मेल मध्येही देणार नाहीयेस, याची कल्पना आहे मला...... पण तरीही श्रध्दाशी मी सहमत आहे, की तुझे पंखे तुला मिस करतील.
बाकी निर्णय तुझाच आहे. पण तो विचार करून घे. Happy

मधुरा तुम्हि खुप छान अगदी ओघवत्या भाषेत लिहिताय. मेहेनत तर खुपच घेताय, मग इतक भाबडं
चमत्कार प्रधान का लिहिताय? पात्रांच स्वरूप बदलत विनाकारण.
भीमाला वृकोदर आणी विशाल उदर दोन्ही एकाच वेळी म्हणू न कस चालेल?
<<घटोत्कच जन्माला आला आणि बघता बघता तरूणावस्थेतल्या देहाचा झाला काही निमिषांत! >> हे कुठुन काढल?
दानव योनी हा काय प्राकार आहे? हिडिंबा राक्शस कुळातील (अनार्य) होती. नरभक्शक टोळी मधील होती.
क्रुष्ण स्वयंवरात भाग घ्यायला आला होता. त्याचं आधिच बहीण भाउ अस चित्रण का? एकदा तिचा विवाह झाल्या वर तो नेहेमिच भगिनि भावानी तिच्याशि वागला.
सुन्दर लिखाणात अश चुकांनी रसभंग होतो. आणि त्याचि अमर चित्र कथा होउन बसते.
तूम्ही खरच छान लिहिताय म्हणून सांगावसं वाटल. पटलं नाही तर ignore करा. लिहित रहा मात्र.

शिरीन,

प्रथमत: प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy

१. घटोत्कचाबद्द्ल एकदा गुगलून पहा. अथवा विकिपीडिया पहा. हीच माहिती मिळेल.

२. मुळात कृष्णाला ( यादव कुळाला ) आमंत्रण नव्हतच स्वयंवरात भाग घेण्याचं. केवळ बघायला बोलावले होते द्रौपदीने. आणि कृष्णाने तर कधीही कुठल्याही स्वयंवरात भाग घेतलेला नाहीये. मग द्रौपदीच्या स्वयंवरात भाग घेण्याचा प्रश्नच येत नाही.

३. अजून एक...... कृष्ण सर्व नगरींशी सख्य ठेवण्याच्या प्रयत्न करत होता. आणि त्यातच पांचाल नगरी सुद्धा आली. हस्तिनापुराशी सख्य जोडायलाही त्याने मागे पुढे पाहिले नाही. सांबासोबत म्हणजे स्वतःच्या मुलासोबत त्याने दुर्योधनाच्या मुलीचा विवाह करून दिला होता.

४. दानव = दैत्य = राक्षस (समानार्थी शब्द आहेत.)

५. त्यावेळी भीमाला प्रेमाने वृकोदर म्हणले जायचे. तुम्ही अनेकदा हाका ऐकल्या असतीलच ना? 'सुश्या.... नकटू....पेटू' त्यातला हाक मारण्याचा प्रकार आहे.

६. आणि हो, हिडिंबा नरभक्षक होती. पण टोळी??? हिडिंबा आणि हिडिंब राज्य करत होते त्या जंगलावर!

७. चमत्कार घडलेलेच आहेत महाभारतात. म्हणून इथेही त्यांचा उल्लेख अनिवार्य आहे.

८. बाकी, 'भाबडं' का लिहिताय या विचारलेल्या प्रश्नाचा अर्थच कळलेला नाहीये मला. काय अपेक्षित होतं तुम्हाला?

आणि कृष्णाने तर कधीही कुठल्याही स्वयंवरात भाग घेतलेला नाहीये>>>
कृष्णाने त्याची सहावी पत्नी सत्या स्वयंवरात भाग घेऊन प्राप्त केली

मनिमाऊ,
माझ्या माहितीप्रमाणे कृष्णाच्या मुख्य आठ पत्नी होत्या.
सत्या म्हणून तुम्ही जो उल्लेख केलात तो सत्यभामेबद्दल आहे का?
तर तिची कथा वेगळी आहे.

Satyabhama was the daughter of Yadava King Satrajit, the royal treasurer of Dwaraka, who was the owner of the Syamantaka jewel. Satrajit, who secured the jewel from the sun-god Surya and would not part with it even when Krishna, the king of Dwarka, asked for it saying it would be safe with him. Shortly thereafter, Prasena, the brother of Satrajit went out hunting wearing the jewel but was killed by a lion. Jambavan, known for his role in the Ramayana, killed the lion and gave the jewel to his daughter Jambavati. When Prasena did not return, Satrajit falsely accused Krishna of killing Prasena for the sake of the jewel.

Krishna, in order to remove the stain on his reputation, set out with his men in search of the jewel and found it in Jambavan's cave, with his daughter. Jambavan attacked Krishna thinking him to be an intruder who had come to take away the jewel. They fought each other for 28 days, when Jambavan, whose whole body was terribly weakened from the incisions of Krishna's sword, finally recognised him as Rama and surrendered to the lord.

As repentance for his having fought Krishna, Jambavan gave Krishna the jewel and also his daughter Jambavati in marriage. Krishna returned the jewel to Satrajit, who in turn apologized for his false accusation. He promptly offered to give Krishna the jewel and his three daughters Satyabhama, Vratini and Prasvapini in marriage. Krishna accepted them but refused the jewel.>>>>>>>>>>>>>>>>>> सौजन्य विकिपीडिया.

तुम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याच्या स्रोताचा दुवा द्यालं का? त्यातून काही वेगळे हाती लागले तर अजून काही नवे कळले महाभारताबद्दल याचा आनंदच होईल मला. Happy

सत्यभामा आणि सत्या दोघी भिन्न आहेत. सत्यभामा कृष्णाची तिसरी पत्नी तर सत्या सहावी. कोसल राजकन्या. तिच्या स्वयंवरासाठी एकसाथ सात माजलेल्या बैलाना वठणीवर आणण्याचा प्रण होता. लहानपणापासून हे लीलया करत असलेल्या आपल्या गोपालाने हा पण सहज पूर्ण केला आणि राजकन्या प्राप्त केली.
त्याचप्रमाणे सातवी कृष्णपत्नी मित्रविंदा हि पण स्वयंवरातद्वारे प्राप्त केली.

मनिमाऊ,
कोसलची राजकन्या नग्नजिती (सत्या). तिच्या स्वयंवरात कृष्णाने स्वतःहून भाग नव्हता घेतला. ते एकमेकांवर प्रेम करत होते आणि तिने आधीच त्याला पसंत केले होते. तो भेट द्यायला म्हणून आला होता तेव्हा तिने त्याला तशी विनंती केली. कोसलच्या राजानेही परवानगी दिली. स्वयंवराचा पण कोणीच पूर्ण करू शकले नव्हते म्हणून..... म्हणजे केवळ कोसलचा मान ठेवायचा म्हणून त्याने ते स्वयंवर पुर्ण केले. पण स्वयंवरात भाग घेणे याला म्हणायचे का हा प्रश्न उरतोच.
आणि मित्रविंदाला तर युध्द करून जिंकून घेतले होते कृष्णाने.

बाकी मनिमाऊ, तुझाही कृष्णावर अभ्यास आहे. एखादा छानसा लेख येऊन जाऊ दे की कृष्णावर. Happy

>>>मित्रविंदाला तर युध्द करून जिंकून घेतले होते कृष्णाने.>>>
ते युद्ध मित्रविंदाला कृष्णाने स्वयंवरात जिंकल्यानन्तर झाले होते. जसे द्रौपदी स्वयंवरात पान्डव vs इतर झाले तसेच.

१. घटोत्कचाबद्द्ल एकदा गुगलून पहा. अथवा विकिपीडिया पहा. हीच माहिती मिळेल. >>> मला वाटत्,व्यासांच महाभारत हा जास्त योग्य स्त्रोत पडेल. विकिपीडिया शाळेतल्या मुलांना पण source म्हणून दिलेला चालत नाहि. वाट्टेल ते असत त्यावर.
२. अजून एक...... कृष्ण सर्व नगरींशी सख्य ठेवण्याच्या प्रयत्न करत होता. आणि त्यातच पांचाल नगरी सुद्धा आली. हस्तिनापुराशी सख्य जोडायलाही त्याने मागे पुढे पाहिले नाही.>> अगदि बरोबर
सांबासोबत म्हणजे स्वतःच्या मुलासोबत त्याने दुर्योधनाच्या मुलीचा विवाह करून दिला होता.>>हे इतक सरळ नाहिये. माहीति करून घ्या
३. दानव = दैत्य = राक्षस (समानार्थी शब्द आहेत.) >>> नाही पण वापर ले जातात. माझा अक्शेप योनी ला होता. कुळ जास्त जवळचा शब्द आहे. यक्श, गंधर्व वगैरे योनि आहेत

५. त्यावेळी भीमाला प्रेमाने वृकोदर म्हणले जायचे. तुम्ही अनेकदा हाका ऐकल्या असतीलच ना? 'सुश्या.... नकटू....पेटू' त्यातला हाक मारण्याचा प्रकार आहे. >>> नाही हो, व्रुक म्हणजे लांडगा. त्याच पोट जस आत गेलेल असत तस सपाट पोट,थोडस आत गेलेल पोट body builders च असत. भीम खादाड,जाडा किंवा मठ्ठ नाहिये महाभारतात. त्याच्या जिवावर सगळे तरलेत १० वेळा

६. आणि हो, हिडिंबा नरभक्षक होती. पण टोळी??? हिडिंबा आणि हिडिंब राज्य करत होते त्या जंगलावर!>> त्यांची territory होती. पण या टोळ्याच होत्या. जंगलात राहाणार्या. नगर वसवून शेती करून रहणारे लोक नव्हते.

७. चमत्कार घडलेलेच आहेत महाभारतात. म्हणून इथेही त्यांचा उल्लेख अनिवार्य आहे.>> व्यासांच महाभारत मुळातून वाचा. आमर चित्रकथा
गूगल, विकिपीडिया वचून नाही भागणार. चमत्काराची पुट थोडी खरवड्ली तरी महाभारत सपक होणार नाही.

८. बाकी, 'भाबडं' का लिहिताय या विचारलेल्या प्रश्नाचा अर्थच कळलेला नाहीये मला. >> या सगळ्या मुळे.

Pages