स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला टेंबेस्वामींनी लिहिलेली श्रीद्त्तभाव्सुधारस स्तोत्र आणि चक्षुषोपनिषद ही स्त्रोत्रं हवी आहेत.
कोणाकडे लिंक आहे का?

पाण्डुरङ्ग स्मरण
समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं
जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् ।
तरुणतुलसिमालाकन्धरं कञ्जनेत्रं
सदयधवलहासं विट्ठलं चिन्तयामि ॥

पुण्डरीकाक्ष स्तोत्र

नमस्ते पुण्डरीकाक्ष नमस्ते मधुसूदन ।
नमस्ते सर्व लोकेश नमस्ते तिग्मचक्रिणे ॥

विश्वमूर्तिं महाबाहुं वरदं सर्वतेजसम् ।
नमामि पुण्डरीकाक्षं विद्याऽविद्यात्मकं विभुम् ॥

आदिदेवं महादेवं वेदवेदाङ्गपारगम् ।
गम्भीरं सर्वदेवानां नमस्ये वारिजेक्षणम् ॥

सहस्रशीर्षणं देवं सहस्राक्षं महाभुजम् ।
जगत्संव्याप्य तिष्ठन्तं नमस्ये परमेश्वरम् ॥

शरण्यं शरणं देवं विष्णुं जिष्णुं सनातनम् ।
नीलमेघप्रतीकाशं नमस्ये चक्रपाणिनम् ॥

शुद्धं सर्वगतं नित्यं व्योमरूपं सनातनम् ।
भावाभावविनिर्मुक्तं नमस्ये सर्वगं हरिम् ॥

नान्यत्किञ्चित्प्रपश्यामि व्यतिरिक्तं त्वयाच्युत ।
त्वन्मयं च प्रपश्यामि सर्वमेतच्चराचरम् ॥

इति मोक्षप्रद श्रीपुण्डरीकाक्ष स्तोत्र सम्पूर्णम्

कधी मनावर मळभ असेल, तर केव्हाही या धाग्यावरती यावं. अमृतमय वांड्मय आहे!!! अतिशय आवडता धागा आहे माझा. बरेचदा कोणतंही पान उघडते व वाचत बसते. फक्त स्तोत्रे नाहीत तर सदस्यांचे अनुभव, विचार, गप्पाही मस्त आहेत. अश्विनी व सर्वच धागा-भागधारकांचे आभार.

सामो तुम्ही खूप वर्षांपासून माबोवर वाचनमात्र असाव्यात असे वाटते. मग लेखिका म्हणून इकडे यायला उशीर का केला तुम्ही?

विस्कॉन्सिनमधील आमच्या खेड्यात फक्त आमची फॅमिली आणि एक अजुन एक मुलगी - एवढेच भारतिय होतो. तेव्हा मैत्री फुलण्याचे चान्सेसच नव्हते.
आता न्यु जर्सीत, एवढे मराठी लोकं पाहूनआनंदमिश्रित आश्चर्याचा धक्का बसला, खरं तर माबोवरती एक आऊटलेट + मैत्रिणी मिळाव्या या २ हेतूंनी मी आले.
कोणीतरी म्हणालेलं - माबोवरती एस्टॅब्लि श वगैरे काही नसतं. १० लेख टाकले की कोणी नेहरु होत नाही.
एस्टॅब्लिश म्हणण्याचा माझा हेतू हा होता की मला इथे मैत्रिणी मिळतील, कोणि मैत्रीचा हात पुढे करेल. ५० शी जवळ आलेल्या माझ्यासारख्या सद्स्या भेटतील.
असो - अश्विनी, अवांतराबद्दल क्षमस्व. हा स्तोत्रांचा धागा आहे. तेव्हा इथेच थांबते.

अवांतर झालेच आहे तर तुम्ही ऐसीवर होतात ना? कृपया राग मानू नका. पण भारतीय सोडून इतरांशी मैत्री होऊ शकते ना. की तिकडची लोकं मैत्री करत नाहीत?

मला काही स्तोत्रं - आरत्या ऐकायला आवडतात .. पण स्वतःहून एखादं स्तोत्रं म्हणावं अशी इच्छा होत नाही .. मागे एकदा वाईट काळ चालू असताना रामरक्षा पठण 3 - 4 महिने केलं होतं , दिवसातून एकदा बऱ्यापैकी मनोभावे वगैरे .. अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत तेव्हापासून विश्वास उडाला .. बाह्य परिस्थितीत बदल जाऊच द्या - माझा स्वतःचा स्वभाव फार तामसी स्वार्थी होता ( बहुतेक अजूनही स्वार्थी आहे , तामसी पणा थोडा कमी झाला आहे ) तो बदलून सात्विक , निःस्वार्थी , दयाळू , प्रेमळ वगैरे वगैरे व्हावा अशी प्रार्थना केली होती ... पण कणभरही सात्विकपणा आला नाही आणि घडायच्या त्या चूका हातून घडल्याच ... त्यामुळे स्तोत्र पठणावरून किंवा एकूणच प्रार्थनेवरून पूर्णच विश्वास उडाला... बरं करायचीच झाली तर आपल्याला जवळपास न समजणाऱ्या भाषेत कशाला करायची असंही वाटतं , तक्रार , मागणी , आभार , मनोगत जे काही असेल ते मराठीतून मनात बोललं तरी पोहोचेल त्याच्यापर्यंत असं वाटतं तेव्हा स्तोत्रं म्हणण्यात इंटरेस्ट राहिला नाही . दोन वेगवेगळे विचारप्रवाह ऐकून माहीत आहेत - पहिलं मनात मनोभावे बोललं तरी देवापर्यंत पोहोचतं आणि दुसरा एक ठराविक अध्यात्मिक लेव्हल असल्याशिवाय तुम्ही देवाशी संपर्क साधू शकत नाही , हे बहुधा ब्रह्माकुमारीच्या कुठल्यातरी इंटरव्ह्यूत ऐकलं आहे .. खरं काय असेल देवच जाणे पण मला पहिला विचार अधिक पसंत आहे - मनोभावे बोललेलं पोहोचत असेल हा ... मनातलं सगळं सांगायला आउटलेट तरी मिळतं पण तो प्रार्थना वगैरे ऐकतो यावर फार विश्वास उरलेला नाही ... कर्मफळात तो कितपत हस्तक्षेप करत असेल याबद्दल शंका वाटते .... कारण अत्यंत वाईट घटना ज्या काही लोकांसोबत घडतात किंवा ज्या अत्यंत भयानक वाईट परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागतं ती जर कर्मफळं मानली तर त्यात तो हस्तक्षेप करत नाही इतका न्यायप्रिय किंवा कठोर म्हटला तर आपल्या तुलनेने क्षुल्लक संकटात तो मदत करून हस्तक्षेप करेल हे लॉजीकला सोडून वाटतं ... फारतर मनोबल देत असेल ..... आणि बाय चान्स दुसरी गोष्ट खरी असेल तर मराठीत बोला किंवा संस्कृतमध्ये काय फरक पडतो ... जोवर मनाची विशिष्ट पातळी नसेल तोवर ... कदाचित स्तोत्रं काहीजणांना ती पातळी गाठायला मदत करून हा संपर्क सुलभ करतंही असतील .. पण मला तो अनुभव आला नाही ..

ज्यांच्या बाह्य परिस्थितीत किंवा मनोबलात भर पडण्याच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळाले असतील ते लोक लकी म्हणायला हवेत ....

मागे कोल्हटकर यांनी (बहुतेक) या स्तोत्राचा उल्लेख केलेला होता. मस्त स्तोत्र आहे -
गोकुळातील दही-दूध-लोण्याची चोरी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा चोर, गोपिकांची वस्त्रे पळविण्यात तरबेज असा चोर, अनेकानेक जन्मांतरीची पापे चोरून नेणारा चोर अशा चोरांच्या शिरोमणी चोरास माझा नमस्कार असो…….. अशा आशयाचे हे स्तोत्र आहे
________________________________________________

व्रजे प्रसिद्धं नवनीत चौरं | गोपान्गनानां च दुकूल चौरं ||
अनेक जन्मार्जित पाप चौरं | चौराग्रगण्यं पुरुषं नमामि |१|
श्री राधिकाय हृदयस्य चौरं | नवाम्बुद श्यामल कान्ति चौरं ||
पदाश्रितानां च समस्त चौरं | चौराग्रगण्यं पुरुषं नमामि |२|
अकिन्चनी कृत्य पदाश्रितां यः | करोति भिक्षुं पथि गेह हीनम् ||
केनापिऽहो भीषण चौर इद्र | दृष्टा श्रुतो वा न जगत त्रयेपि |३|
यदीय नामापि हरति अशेषं | गिरि प्रसारान अपि पाप राषिन ||
आश्चर्य रूपो ननु चौर इद्र | दृष्टा श्रुतो वा न मया कदापि |४|̣
धनं च मानं च तथेन्द्रियाणि | प्राणांश च हृत्वा मम सर्वं एव ||
पलायसे कुत्र धृतोऽदय चौर | त्वं भक्ति दाम्नासि मया निरुद्धः |५|
छिनत्सि घोरं यम पाश बन्धं | भिनत्सि भीमं भव पाश बन्धं |
छिनत्सि सर्वस्य समस्त बन्धं | नैवात्मनो भक्त कृतं तु बन्धं |६|
मन-मानसे तामस राशि घोरे | कारागृहे दुःख मये निबद्धः ||
लभस्व हे चौर हरे चिराय स्व चौर्य दोशोचितं एव दण्डं |७|
कारागृहे वस सदा हृदये मदीये | मद-भक्ति-पाश-दृढ -बन्धन-निश्चलः सन ||
त्वां कृष्ण हे ! प्रलय-कोटि-शतान्तरेऽपि | सर्वस्य चौर हृदयान न हि मोचयामि |८|

आणि बृहद्स्तोत्र रत्नाकर मध्ये हे यमुनाष्टक मिळाले. हेच बालाजी तांबे यांच्या 'फेमिनाइन बॅलन्स' सीडीत आहे-

श्री गणेशाय नम:
कृपापारावारां तपनतनयां तापशमनीं मुरारीप्रेयस्यां भवभयदवां भक्तीवरदां|
विजयज्जालामुक्तां श्रियमपि सुखाप्ते परिदिनं सदा धीरो नूनं भजति यमुनां नित्यफलदां|| १||
मधुवनचारिणी भास्करवाहीनी जान्हवीसंगिनी सिंधुसुते मधुरिपुभूषिणी माधवतोषीणी गोकुलभीतीविनाशकृते|
जगदघमोचनी मानसदायिनी केशवकेलिनिनादगते जय यमुने जय भीती निवारिणी संकटनाशिनी पावय माम||२||
अयि मधुरे मधुमोदविलासिनी शैलविहारिणी वेगभरे परिजनपालिनी दुष्टनिषूदिनी वांछितकामविलासधरे|
वज्रपुरवासिजनार्जितपातकहारिणी विश्वजनोद्धरिके जय यमुने जय भीती निवारिणी संकटनाशिनी पावय माम||३||
अतिविपदम्बुधिमग्नजनं भवतापशताकुलमानसकं गतिमतीहीनमशेषभयाकुलमागतपादसरोजयुगम|
ऋणभयभीतीमनिष्कृतीपातककोटीशतायतपुंजतरम जय यमुने जय भीती निवारिणी संकटनाशिनी पावय माम||४||
नवजलड्युतीकोटिलसत्तनुहेममयाभररंजितके तडिदवहेलिपदांचलचंचलशोभितपीतसुचैलधरे|
मणीमयभूषणचित्रपटासनरंजितगंजितभानुकरे जय यमुने जय भीती निवारिणी संकटनाशिनी पावय माम||५||
शुभपुलिनेमधुमत्तयदूभ्द्वरासमहोत्सवकेलिभरे उच्च्कुलाचलराजितमौक्तिकहारमयाभररोदसिके|
नवमणीकोटिकभास्करकंचुकीशोभिततारकहारयुते जय यमुने जय भीती निवारिणी संकटनाशिनी पावय माम||६||
करिवरमौक्तिकनासिकभूषण्वातचमत्कृतचंचलके मुखकमलामलसौरभचंचलमत्तमधुव्रतलोचनिके|
मणीगणकुंडललोलपरिस्फुरदाकुलगण्डयुगामलके जय यमुने जय भीती निवारिणी संकटनाशिनी पावय माम||७||
कलरवनुपूरहेममयाचितपादसरोरुहसारुणिके धिमीधिमीधिमीधिमीतालविनोदितमानसमंजुलपादगते|
तवपदपंकजमाश्रितमानवचित्तसदाखिलतापहरे जय यमुने जय भीती निवारिणी संकटनाशिनी पावय माम||८||
भवत्तापांभोधौ निपतितजनो दुर्गतियुतो यदि स्तौति प्रात: प्रतिदिनमनन्याश्रयतयाह्रयाहेषै: कामं करकुसुमपुंजरविरतां सदा भोक्ता भोगान्मरणसमये याति हरिताम|| इति श्रीमतपरिहंसपरिव्राजकाचार्यश्रीमत्शंकराचार्यविरचितं यमुनाष्टकं संपूर्णम्||

BrahmaChaitnya Gondavalekar Maharaj has created this beautiful RamPatha in Marathi.
रामपाठ
॥ श्रीगणेशायनमः ॥
ॐ नमोजी सद्गुरुनाथा । तुझे चरणीं ठेविला माथा ।
पूर्ण करी मनोरथा । विनन्ति माझी परिसावी ॥ १ ॥
रामपाठाचा उच्चार । मम हृदयीं, करी उद्धार ।
हेंचि मागणें वारंवार । तुजलागीं दयाळा ॥ २ ॥
व्यास वाल्मिक नारदमुनि । शुकसनकादिक ज्याचे ध्यानीं ।
तो श्रीराम चापपाणि । मम वाणी वदो का ॥ ३ ॥
अयोध्यावासी नगरजन । रामासी भजती अनुदिन ।
तो कौसल्यानन्दन । मम हृदयीं वसावा ॥ ४ ॥
सद्गुरु म्हणे ऊठ लवलाहीं । ज्ञानदीपाचे प्रकाश पाहीं ।
वस्तु आपुली शोधूनि घेई । मग पावसी निजसुखा ॥ ५ ॥
सद्गुरु राजवैद्य पूर्ण । रामनामाचें रसायन ।
स्वहस्तें मम मुखी पाजून । केले सावध स्वरुपीं ॥ ६ ॥
नेत्रीं घातलें बोधांजन । भवरोग काढिला मुळींहून ।
मूर्ति दाविली सगुण । तें रुप वर्णिलें न जाय ॥ ७ ॥
चतुर्भुज मेघश्याम सांवळा । कांसे पीताम्बर पिवळा ।
गळां वैजयन्तीमाळा । मुक्ताहार डोलती ॥ ८ ॥
अंगीं चंदनाची उटी । केशर कस्तुरी लल्लाटीं ।
अमूल्य रत्नें शोभती मुकुटीं । कर्णी कुण्डलें तळपती ॥ ९ ॥
क्षुद्र घंटा वाजती कटीं । दशांगुलीं मुद्रिकांची दाटी ।
बाहुभूषणें शोभती मनगटी । सुवर्णपादुका चरणकमलीं ॥ १० ॥
शंख चक्र चाप बाण । वरद हस्त उदार वदन ।
विशाळ भाळ आकर्णनयन । ऐसा भगवान् देखिला ॥ ११ ॥
गुप्त ठेविलें निर्गुण । प्रकट केलें स्वरुप सगुण ।
श्रीराम अवतार घेऊन । धर्म स्थापिला स्वहस्तें ॥ १२ ॥
अयोध्या पुण्यपावन नगरी । तेथें श्रीराम राज्य करी ।
तपोनिधि महाक्षेत्री । सिंहासनीं विराजे ॥ १३ ॥
शेषें धरिलें छत्र । भरतशत्रुघ्न करिती चामर ।
भक्त प्रार्थिती वारंवार । जयजयकारें गर्जती ॥ १४ ॥
नळ नीळ जाम्बुवन्त । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ।
निरिच्छ वायु-सुत । सदा निमग्न रामरुपीं ॥ १५ ॥
वसिष्ठ विश्वामित्र ऋषि । दत्त दिगंबर तापसी ।
ब्रह्मचारी कित्येक संन्यासी । रामनामीं लुब्धले ॥ १६ ॥
रामनाम हृदयीं धरुन । ध्यानीं बैसले योगीजन ।
यम इंद्र अग्नि वरुण । पंचवदन तप करी ॥ १७ ॥
रामनामाची अपरिमित शक्ति । शेषाची वर्णितां खुंटली मती ।
वेदाची न चले गति । शास्त्रें लज्जित बैसलीं ॥ १८ ॥
अनन्त अवतारांचा महिमा । तोहि रामनामीं तुळेना ।
ऐशिया रामाच्या सद्गुणा । मी मानव काय वर्णू ॥ १९ ॥
रामीं रंगलें त्रिभुवन । जडमूढ काष्ठ पाषाण ।
घटमठांत सर्वांत परिपूर्ण । त्याहून वेगळा राहिला ॥ २० ॥
पिण्डब्रह्माण्डाची रचना । तूं निर्मिली रघुनन्दना ।
जगव्यापका आत्मारामा । शोधितां ठायीं न पडे कोठे ॥ २१ ॥
तुझे स्वरुपाची व्हावी प्राप्ति । यालागीं कित्येक तप करिती ॥
कित्येक पंचाग्निधूम्रपान साधिती । तयांसी अंत न लागे तुझा ॥ २२ ॥
तेथें मी अज्ञान मूढमति । करु नेणें तुझी भक्ति ।
परी संतमुखें ऐकिली कीर्ति । शरणागतां उद्धरीं तूं ॥ २३ ॥
माझ्या भाग्यासी नाहीं मिती । तूं भेटलासी जगज्योति ।
आतां कळेल तैशा रीती । उद्धारगति करीं माझी ॥ २४ ॥
तुझे ब्रीदाचें महिमान । कित्येक उद्धरिले पापीजन ।
विरोधभक्तिने रावण । वैकुण्ठपदी पावविला ॥ २५ ॥
सात्त्विक भक्त थोर थोर । तुलसीदास कमाल कबीर ।
रामदास वायुकुमर । त्यांचा किंकर मज करीं ॥ २६ ॥
मी न मागे धनसंपत्ति । मज न लागे वैकुण्ठप्राप्ति ।
परी तुझ्या भक्तांची संगति । मज घडो सर्वदा ॥ २७ ॥
कोट्यनुकोटि जन्म घेईन । करीन तुझे पादसेवन ।
अवतारलीला मुखानें गाईन । ऐसें मज देई सर्वथा ॥ २८ ॥
तुझ्या अवतारलीला बहुत । व्यास बोलिले संस्कृत ।
तें अज्ञानासी न होय प्राप्त । यास्तव प्राकृत वर्णिलें ॥ २९ ॥
सद्गुरुनें निर्मिला हा ग्रन्थ । रामपाठ केवळ अमृत ।
श्रवणद्वारें पाजूनि यथार्थ । तृप्त केले भक्तजन ॥ ३० ॥
ज्यासि वैकुण्ठपदाची गोडी । त्यानें रामपाठ भजावा आवडी ।

स्तोत्रं,प्रार्थना देवापर्यंत पोचतात की नाही ते मला ठाऊक नाही पण अंतर्मनाचं कंडिशनिंग फार चांगले होते. जी काही असुरक्षिततेची भावना, अनिश्चितता, हरण्याची भीती आत दडून बसलेली असते. ती जाऊन एक आत्मविश्र्वासाची भावना निर्माण होते. ईश्वराला आपला मानलं की मन म्हणतं ईश्वर सुध्दा मला आपला मानतो. जे घडतं ते ईश्वराच्या इच्छेने घडते हे मनानं स्विकारलं की चिंता, काळजी, राग सतावत नाहीत.

मला माझ्या आजारात, रामरक्षा पठण चा अजिबात उपयोग होत नसे. औषधे चालू होतीच पण मी स्तोत्रेदेखील ट्राय करत होते. तेव्हा 'अमोघ शिवकवच' सूट होण्याचा अनुभव आला मात्र. योगायोग देखील असेल का काय नकळे. पण मला ते म्हटले की जरा बरे वाटे. आय हॅव्ह नो आयडीया व्हाय सो.

इथे युट्यूब लिंक देणं ओके आहे ना ? मला ऐकायला आवडणाऱ्या स्तोत्रांपैकी हा एक व्हिडिओ .. छोट्या छोट्या मुलींनी सुरात सूर मिसळून एक अक्षर चुकू न देता हे एवढं मोठं स्तोत्र गायलं आहे ..

https://youtu.be/Np28O3Y_P2o

हा एक - या देवी सर्वभूतेषु https://youtu.be/ZXKRZrn1OTo

शंकर महादेवन यांनी गायलेलं कालभैरवाष्टक स्तोत्रही कानाला गोड वाटतं ... https://youtu.be/GiVzj7yJH1U

रुद्राष्टकम स्तोत्र , ह्या व्हिडीओतलं ऑल टाईम फेव्हरेट आहे - https://youtu.be/jj4xsFPModI

>> छोट्या छोट्या मुलींनी सुरात सूर मिसळून एक अक्षर चुकू न देता हे एवढं मोठं स्तोत्र गायलं आहे ..>> कुलभूषण पै यांच्या ग्रुपचा व्हिडीओ दिसतो आहे. मी तर त्यांचा चॅनलच सब्स्क्राईब केलेला आहे. त्यामधील, एक बालगायिका, सूर्यगायत्रीचा आवाज, भाव, सर्वच सादरीकरण अप्रतिम आहे.

सिद्धीलक्ष्मी स्तोत्रम ..

https://youtu.be/zdu1ZiQHxL4

शिवतांडव स्तोत्र पूर्वी शंकर महादेवन यांनी म्हटलेलं आवडायचं पण हे https://youtu.be/Y2mGR59BcaY ऐकल्यापासून ते फार कर्कश वाटू लागलं ... दुसरंही कुठलं ह्याच्यापेक्षा आवडलं नाही .. असतीलही अधिक चांगली पण हे कानांना गोड लागलं .

https://greenmesg.org/stotras/shiva/kalabhairava_ashtakam.php

ह्या साईटवर बऱ्याच संस्कृत स्तोत्रांचे ढोबळ इंग्रजी अर्थ दिलेले आहेत , फार वर्णन केलेलं नाही , जेवढ्यास तेवढं शब्दशः शॉर्ट भाषांतर आहे ... कालभैरवाष्टक स्तोत्रातली ही ओळ आणि तिचा अर्थ मला खूप आवडतो ..

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं - Salutations to Sri Kalabhairava) Whose Loud Terrific Laughter Shatters the Continuity of the Sheath of Creation (delusion of our mind) of the Lotus-Born Brahma from the Primeval Egg

शंकर मोठ्याने हसत आहेत आणि आपलं सगळं अज्ञान ( who am I टाईपचे सगळे प्रश्न ) विरघळून जाऊन आत्मरूपाची स्मृती जागृत होते आहे .. सगळे मोह - डिझायर्स कापरासारखे जळून जात आहेत , भौतिक सुख - माया ही किती क्षणभंगुर आणि आत्मरूपाचं ज्ञान झाल्यावर निर्माण होणाऱ्या चिदानंदाशी तुलना करता किती अनाकर्षक आहे ह्याचा लख्ख बोध होतो आहे आणि इतका काळ आपण ह्या मायामोहाच्या जाळ्यात अडकून षड्रिपूंच्या दलदलीत कसे अडकून राहिलो , कसल्या नश्वर गोष्टींचे मोह धरले , क्रोध - द्वेष - कुणाला त्रास उपद्रव देणे अशा अत्यंत मूर्ख गोष्टींमध्ये मनाची शक्ती व्यर्थ घालवली , भौतिक सुखांमागे वेड्यासारखे धावलो , कसल्या निरर्थक गोष्टींसाठी शोक केला , ह्याचं अनिवार आश्चर्य वाटत आहे ... आणि तुमची ही अवस्था पाहूनच की काय महादेव आणखी मोठ्याने हसत आहेत असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं ...

कल्पनाविलास आहे पण खूप छान वाटतं ऐकताना ..

पीठमध्ये जगन्माता भक्तानां वरदा स्थिता
तस्या वामे महादेवी रेणुका भक्तवत्सला

_________________

महालक्ष्मीचे घेता दर्शन| सर्व पातकांचे होय निरसन|
कोल्हापुरीचे जे अधिष्ठान|तत्समान महीमा दोहींचा||
स्तवने तोषिली जगन्माता|वरप्रदान वोपी तत्वता|
जे जे वांछी तत्वता|ते अभिष्ट फल विपश्चिता देतसे||

______________________

धन्योSहं कृतपुण्योSहं कृतार्थ तवदर्शनात|
प्रपन्नं पाही मां देवी सर्वापत्तीविनाशिनी||
अद्य मे सुदिनं मातर्घ मे सफलं जनु|
तपोSपी सफलं मेSद्य देवी त्वत्पाददर्शनात||

______________________

पीठं कोल्लापुरं नाम देवीनां प्रीतीवर्धनम|
महालक्ष्मीसनाथस्तु भैरवस्तत्र नायक:||
यस्य पूर्वे महालक्ष्मी, स्थिता कोल्ला च दक्षीणे|
कंकाली पश्चिमे देवी, महाकाली तथोत्तरे||
एता पीठेन सहिता: सिद्धराजसरोवरे|
पीठं दृष्टं समायाता, देवीनां समये तदा||

__________________________________

देव दैत्य मुकुटांच्या ज्योती| जयाते नीरांजन करीती|
त्या देवी तुझे चरणांप्रति|मंगल व्हावया नमितसे||

____________

नमस्ते जगद्धात्री सदब्रह्मरुपे
नमस्ते हरोपेन्द्रधात्रादि वंदे|
नमस्ते प्रपनैष्ट्दानैकदक्षे
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||१||

विधी कृत्तीवासा, हरिर्विश्वमेतत
सृजत्यत्ति पातिती यत्ततप्रसिद्धम|
कृपालोकनादेव ते शक्तिरुपे
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||२||

त्वया मायया व्याप्तमेततसमस्तम
ढ्रुतं लीलया देवि कुक्षौ हि विश्वम|
स्थितं बुद्धीरुपेण सर्वत्र जन्तौ
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशि||

जया भक्तीवर्गा हि लक्ष्यंते एते
त्वयात्र प्रकामं कृपापूर्णदृष्ट्या|
अतो गीयसे देवि लक्ष्मीरिती त्वम|
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशि||४||

पुनरवाक्पटुत्वादिहीना हि मूका
नरैस्तेर्निकामं खलु प्रघ्यर्से यत्|
विजेष्टाप्त्वयं तच्च मूकांबिका त्वम
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||५||

यदद्वैतरुपात्परब्रह्मणस्त्वम्
समुत्थापुनर्विश्वलीलोद्यमस्था|
तदाहुर्जनास्त्वां हीं गौरिं कुमारीम|
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||६||

हरीशादिदेहोत्थ तेजोमयप्र -
स्फुरच्चक्रराजाख्यलिंगस्वरुपे|
महायोगीकोलर्षिहृत्पद्मगेहे
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||७||

नम: शंखचक्राभयाभीष्ठस्ते
नमस्ते अंबिके गौरी पद्मासनस्थे|
नम: स्वर्णवर्णे प्रसन्ने शरण्ये
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||८||

इदं स्तोत्ररत्नम कृतं सर्वदैवम
हृदि त्वां समाधाय लक्ष्म्यष्टकं य:|
पठेन्नित्यमेष व्रजत्याषु लक्ष्मीम|
सुविद्यां च सत्यं भवत्या: प्रसीदात||९||

इति श्रीमुक्तांबास्तवकं अमलं य: प्रतिदिनम
नरो भक्त्या युक्त: पठति हृदि कृत्वा भगवतीम|
सुविद्यामैश्वर्य बहुलमिह लब्ध्वापि विबुधै
सूपूज्य: सायुज्यं व्रजति हि महेश्या पुनरयम्||१०||

गोकर्णाद्दक्षिणे भागे दशयोजनमात्रके|
सह्याद्रे दक्षीने नाम्ना कोल्लापुरं श्रुतम्||
स्वर्णरेखांकितं लिंगम नास्ति नास्ति जगत्त्रये|
वामभागाधिकं लिंगं न भूतं न भविष्यति||

स्त्रीकोल्लापुरवरेश्वर्यै स्त्रीमहालक्ष्म्यै नम:
हारीतकुलसंभूतरविदेवत्रिदंडिन:
तुष्टा कोल्लापुर्रद्देवी महालक्ष्मीरिहागता||
लक्ष्मीमहात्म्यं मंगलं महाश्री महालक्ष्म्यै नम:||

श्रुणुध्व मुनय: सर्वे श्रीदेवीचरितं शुभम|
यस्य स्मरणमात्रेण नृणां मुक्ती: प्रजायते||

पाहि देवी जगन्मात: पाही श्रीबनशंकरी|
पाही पद्मप्रिये पद्मे, पाहि श्रीसर्वमंगले||

इति स्तुत्वां महादेविं त्रिगुणां वनशंकरीम|
महाकाल्यादिरुपेण तृष्टावाथ पृथक पृथक||

श्रीगणेशं च बटुकं क्षेत्रपालं च भक्तित"|
प्रणम्य द्वारपालांश्च रंगमंडपमागत:||
गर्भागारं प्रविष्याम्बां सर्व अमंगलहारिणीम|
प्रणनाम सपत्नीक: साष्टांग वनशंकरीम||
महाकालि महालक्ष्मि महापूर्वसरस्वति|
अकारादिक्षकारांतमातृरुपिणी पाहि माम||

तत्रैका ह्युत्तरे भागे काशी भागीरथीतटे\
पंचगंगातटे दक्षे करवीरपुरीतरा||

करवीराभिधं क्षेत्रं महाराष्ट्रेषु वर्तते|
काशीतो महीमा यस्य श्रूयते हि यवाधिक:||
संद्न्या दक्षीणकाशीति प्राप्ता तेन महीयसी|
तत्र गच्चे मुने शीघ्रं चित्तं ते शांतीमेष्यति||

मातर्नमामि कमले कमलायताक्षि|
श्रीविष्णूःरुत्कमलवासिनी विश्वमात:||
क्षीरोदजे कमलकोमलगर्भगौरी|
लक्ष्मी प्रसीद सतता नमतां शरण्ये||
त्वंश्रीरुपेंद्रसदने भुवनैकमातर|
ज्योत्स्नासि चंद्रमसि चंद्रमनोहरास्ये|
सूर्ये प्रभासि च जगतित्रये प्रभासि|
लक्ष्मी प्रसीद सतता नमतां शरण्ये||
त्वं जातवेदसि सदा दहनात्मशक्तीर|
वेधास्त्वया जगदिदं सकलं विदध्यात||
विश्वंभराsपी बिभ्रुयादखिलं भवत्या|
लक्ष्मी प्रसीद सतत< नमता शरण्ये||

हे मंगलाचरण अतिशय मनोहर आहे. ज्ञानेश्वरी व गुरुचरित्रातील मंगलाचरणांनंतर हे पहीले मंगलाचरण जे इतके सुंदर आहे.
ज्ञानमोदक पोथीतील मंगलाचरण

||श्रीगणेशाय नमः||
जयजय श्रीगणनायका| मंगळमूर्ती विनायका|धर्मार्थकाममोक्षदायका|नमो तुज||१||
सिद्धीबुद्धीपति सर्वोत्तमा|स्वभक्तकामकल्पद्रुमा|चिंतामणि अनंतधामा|नमोतुज||२||
एकदंता लंबोदरा|भालचंद्रा मोरेश्वरा| ढुंढीराजा विश्वंभरा|नमोतुज||३||
सकळविघ्नसंकटनाशना|हेरंबा तापत्रयनिवारणा|अनन्यनिजभक्तसंरक्षणा|नमो तुज||४||
जयजय विद्याप्रकाशका|जयजय अज्ञाननाशका|अनंतकोटीब्रह्मांडनायका|नमो तुज||५||
तूचि रेणुका कुळदेवता|गणेशा तूचि नागाईमाता|तूचि गोसावी नामेपिता|नमो तुज||६||
तूचि सद्गुरुरुप गणेशा|स्वामीगोपाळाश्रमवेशा|सद्चिदानंदास्वप्रकाशा|नमो तुज||७||
सद्गुरुगणेशापरात्परा|सद्गुरुगणेशानिर्वीकारा|सद्गुरुगणेशासर्वार्थधरा|नमो तुज||८||
सद्गुरुगुणेशानिर्गुणा|सद्गुरुगणेशासगुणा|सद्गुरुगणेशाचैतन्यघना|नमो तुज||९||
सद्गुरुगणेशानिरुपमा|सद्गुरुगणेशानि:सीमा|सद्गुरुरुपाअनामा|नमो तुज||१०||
सद्गुरुगणेशाअचला|सद्गुरुगणेशा अमला|सद्गुरुगणेशागोपाला|नमो तुज||११||
भक्ततारावया गणपती|धरीली गोपाळाश्रमा आकृती|आता मजला हेची गमती|अवयव||१२||
प्रसन्नतातेचि शुंडा सरळ|ज्ञानविज्ञान गंडस्थळयुग्म|लुब्ध होती मुमुक्षु अलिकुळ|तये ठाई||१३||
अखंड निजात्मश्रवण|निगमागम द्वाराकर्ण|तेचि तुझे दोन्ही कर्ण विराजती||१४||
शुद्धबोधाचा तीक्ष्ण बहुत|कैसा झळकतो एकदंत|सहजसुख अखंडीत|डुल्लसी तू||१५||
सद्चिदानंदपणे|सकळविश्व हे देखणे|तेचि अभेदत्वेपूर्ण|तीन्ही नेत्र||१६ ||
चिदावकाश अपार|अंतःकरण तदाकार|तेचि तुझे लंब उदर|| विस्तारिले||१७||
त्यावरी अत्यंत सुंदर|सोहंभावाचा फणीवर|कैसा शोभेनिरंतर|सहजची||१८||
चतुर्विध आश्रमप्रचंड|हेचि चारी भुजादंड|यथाविधी जे अखंड विराजिती||१९||
सन्मार्गाचा पाश|सद्भावाचा अंकुश|ऐसी आयुधे विशेष धरिसी तू||२०||
तृप्त कराया सकळिक|जे आपले भक्तलोक|घेतला ब्रह्मानंदमोदक|निजहस्ती||२१||
प्रपंच परमार्थ जाण|हे तुझे दोन्ही चरण|उभयाऐक्यत्वे चालणे घडे तुज||२२||
जवळी भुक्ती आणि मुक्ती|त्याच सिद्धी बुद्धी शोभिती|अभयवरदा गणपती|गुरुवर्या||२३||
स्वानुभावाचा उंदीर|त्यावरी बैससी निरंतर|अंगी निरहंकार सिंदुर|घवघवीत||२४||
कैसे वैराग्याचे वसन|दिव्य झळके विराजमान्|तैसी अनेक भूषणे|कायवर्णु||२५||
शुद्धसत्वाचा मुकुट|सत्कर्म रत्न लखलखाट|स्वप्रकाश निश्चयाचा प्रकट|भाळीं चंद्र||२६||
सुखदु:ख समान|तिची कुंडले शोभायमान|पुरुषार्थाची कंकणे चौहस्ती||२७||
शमदमादिषटक|तेचि षटकोणपदक|नवविधारत्नाची अमोलिक|माळागळा||२८||
कटी शोभे मेखळा थोर|पायी वाजती स्तवनाकार|भक्तभावाच्या सुंदर|घागरीया||२९||
मैत्रीकरुणामुदिता|आणि उपेक्षा भगवंता|ऐशा शुभवासना तत्वता|मुद्रिका त्या||३०||
अमानित्वादि साधने|तीची नानापरी सुमने|सत्कीर्ती कस्तुरी संपूर्ण|मघमगी||३१||
कवळजे सर्वाधिष्ठान|पूर्ण सुखाचेसदन|तेथे क्रीडसि निशीदिन|समरसे||३२||
सन्निधान कामधेनु उन्मनी|अचिंत्यबोध चिंतामणी|निर्विकल्प तो अंगणी कल्पवॄक्ष||३३|
क्रोधादिदैत्य संहारीसी|जन्ममृत्यादि विघ्ने हरसी|संशयसंकटाते निवारीसी|क्षणमात्रे||३४||
जेव्हा तुझी कृपा होय|तेव्हा अज्ञान दैन्य जाय|मुक्तीलक्ष्मी घरा येइ|अनायासी||३५||
ऐसा तू सद्गुरुमंगळधामा|बोलवेना तुझा महीमा|गणेशगोपाळाश्रमा|नमो तुज||३६||
ऐसी करिता स्तुती|तेणे संतोषला गणपती|प्रसन्नमंगळमूर्ति सद्गुरुरुपे||३७||
कृपेने मस्तकी हात ठेविला|म्हणे आता करावे ग्रंथाला|तुझा माझा जो संवाद झाला|तोची बोलावा||३८||
जो करीशील तू ग्रंथ|तो होइल परोपकारार्थ|हे माझे वाक्य नव्हे व्यर्थ|निश्चयेसी||३९||
ऐसा देउनी पूर्ण वर|बुद्धीत प्रवेशला गणेश्वर|बोलवी नाना शब्दद्धीतवाग्देवता||४०||
त्याचा प्रसाद लाधता|द्वैत भ्रांति गेली आता|जनी वनी पहाता| गजानन||४१||
विश्वी विश्वात्मा एक असता|श्रोता वक्ता अनुमोदिता|नंदकाअणिस्तविता|भेदकैचा||४२||
ज्ञानमोदकग्रंथ मिषे|गुरु आणि शिष्यवेशे|स्वये प्रकट केला गणेशे|आपला महीमा||४३||
केवळ ब्रह्मानंदसागरी|स्फुरली वाग्देवतालहरी|हे अभिन्नत्वेनिर्धारी|जाणती संत||४४||
गणेशगोसावीनंदन संवाद|जेथे उपनिषदर्थविशद|परिसताजोडेपरमानंद|श्रोतयांसी||४५||
येथुन संपले मंगळाचरण्|जे बोलविले गजानने|तेचि बोललागोसावीनंदन|यथामती||४५६||
इति श्रीज्ञानमोदकग्रंथे|गणेशगोसावीनंदनसंवादे मंगलाचरणनिरुपणं नाम प्प्रथमोध्यायः||
श्रीगजाननार्पणमस्तु||

हे अष्टलक्ष्मी स्तोत्र मला आवडले आहे. व्हिज्युअल्स अप्रतिम, नंतर रिपीट होतात. ऐकायलाही सुरेख. यातली लक्ष्मीही /दुर्गा कणखर व बुद्धिमान वाटते त्यामुळे फारच आवडले.
Album Scared chants of Mahalaxmi
https://youtu.be/xA0XAFvQtdM

हे इथे दिलेले असेलही नक्की माहिती नाही पण श्रवणभक्ती साठी लिंक दिली आहे.

अश्विनी तुम्ही दिलेलं स्तोत्र ऐकायला खुप छान आहे. पण त्यातली लक्ष्मी मला मॉडेलसारखी वाटते. अर्थात हेमावैम.

याच स्तोत्राचे दुसरे वर्जन खाली देतेय. हे मला फार आवडतं. बहूतेक साधना सरगमचा आवाज आहे.

https://youtu.be/rPTkADPWWTI

Pages