पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15


पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः

१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्‍याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवजी, धन्यवाद . मी हा उपाय करून बघेन. माझेही डोके दुखायला लागले कि असह्य होते. एक वेळ जळजळ उलटी ठीक आहे पण ती डोकेदुखी नको.

मला त्यांच्या पित्ताशान्तीने व सानाकुल ने पित्त झाल्यावर काही उपयोग होत नहि. त्यातल्या त्यात पित्त उलटल्यावर अविपत्तिकर चुण्राने बरे वाटते .

पित्ताचा त्रास नक्की त्याच्या तीव्रतेसकट डॉक्टर ला सांगता येणं, ते समजणारा डॉक्टर मिळणं, आणि त्यावर योग्य उपाय होणे या मलातरी दैवदुर्लभ गोष्टी वाट्तात. त्यापेकक्षा स्वःताच प्रयोग करणे जास्त चांगलं.<<< अगदि खरय हे, Sad
पुने / मुम्बई मधे यावर उपचार करणारे कोणी नामवन्त वैद्यकिय तज्ञ आहेत का?

अपचनामुळे पित्त होते का? त्यलाच आम्लपित्त असे म्हणतात का? तसे झाल्यास कुठले औषध घ्यावे?
सूतशेखर मात्रा / कामदुधा दोन्ही गोळ्या आम्लपित्ता साठी उपयोगी आहेत का?

अपचन टाळण्यासाठी नियमित कुठली औषधे घ्यावी? गुळवेल सत्व म्हणजे सिरप असते का? ते अपचनासठी उपायकारक आहे का?

हो सूतशेखर आणी कामदुधा या दोन्ही पित्तावर उपयोगी आहेत. पण पित्त होऊ न देणे हा सर्वात चांगला उपाय आहे. शेंगदाणे, काजू, चिंच, शेपू, मेथी व कारले या गोष्टी योग्य प्रमाणात खाव्यात. मधून मधून गुलकंद, आवळा, आवळा मुरांबा हे खाण्यात असावे. कोकमाचे ( आमसूल ) सार वा सरबत अतीशय उत्तम. जागरणे टाळा. जास्त प्रमाणात गोड पण खाऊ नका, त्याने पण मळमळते.

गुळवेल उष्ण असल्याने वैद्यांच्या / तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी.

सर्वात उत्तम झंडु पंचारीष्ट. मी याला १०० % मार्क्स देईन. माझ्या मुलीला कायम खडा व्हायचा, पोट साफ होत नव्हते. आता ती तक्रार पूर्ण गेली, कारण मी तिला झंडु पंचारीष्ट देते. मी याची जाहीरात करत नाहीये, तर अनूभव सांगतेय. दुसरे म्हणजे चहा कॉफी कमी घेणे. पुदिना चटणी कायम आहारात ठेवा. त्या पुदिनहरा गोळ्या घेण्यापेक्षा ही चटणी उत्तम. वेळेवर जेवणे शक्य नसेल तर निदान नाश्ता तरी वेळेत ( सकाळी ८ ते ९ दरम्यान ) करा. उपाशी राहु नका. बाहेरचे खाण्यापेक्षा घरीच केलेले बटाटेवडे, पाणी पुरी, भेळ उत्तम. थोडा वेळ जातो तयारीत पण निदान ते स्वच्छ आणी आरोग्यदायी तरी असते.

वारंवार पित्त, जळजळ होणार्यांसाठी अजून एक उपाय. चहा, कॉफी कमी प्रमाणात घ्यावी हे वर आलेलं आहेच. याचबरोबर, चहा / कॉफी उकळतांना साखर घालू नये. कपात ओतून घेतल्यावर वरून हवी तेव्हढी साखर घालावी. मी हा उपाय गेले ६/७ महिने करतोय; बाकी उपाय बंद झाले पण हा एक आहे अजून. जाणवण्याइतपत फरक नक्कीच पडला आहे. स्वाती ने हा उपाय कुठल्यातरी धाग्यावर सांगीतलेला आहेच बहुतेक...

>>>अपचनामुळे पित्त होते का? त्यलाच आम्लपित्त असे म्हणतात का? तसे झाल्यास कुठले औषध घ्यावे?
सूतशेखर मात्रा / कामदुधा दोन्ही गोळ्या आम्लपित्ता साठी उपयोगी आहेत का?>>>

खाल्लेले अन्न पचून न पचलेले बाहेर टाकण्याची क्रिया वेळेवर आणि पूर्णपणे न झाल्यास त्यातून दोष (आम) निर्माण होतो हे रोगाचे मूळ आहे. हे नष्ट करा. हिरड्याचा काढा, चूर्ण घ्या.
सूतशेखररस,कामदुधारस वगैरे 'रस' शब्द असलेल्या गोळ्या औषधांत पारा असतो. त्या सतत घेऊ नये. तयार काढे घ्यावेत. उदा० अभयारिष्ट.

धन्यवाद रश्मी, योकु, srd !

सूतशेखररस,कामदुधारस वगैरे 'रस' शब्द असलेल्या गोळ्या औषधांत पारा असतो. >> हे माहिती नव्हतं.

हिरड्याचा रस रसशाळेत मिळेल का? अभयारिष्ट घेतल्याने पित्त दोष कमी होईल का?

Srd मला वाटते रस शब्द असलेल्या औषधात पारा असतोच असे नाही तर इतर कुठले धातू (metals) किंवा खनिजं असू शकतात. जसे सुतशेखर रसामध्ये पारा असतो, कामदूध रसामध्ये नसतो. पण त्यात Red Ochre असते म्हणुन रस. अर्थात सावधानीचा इशारा योग्यच अहे.

मला नेहमी पित्ताचा त्रास होतोय, डोक भयंकर दुखतं, त्या नंतर मि कोमट पाणि एक ग्लास पितो आणि बोटाने उलट्या काढतो, तर मला फेसाळ आणि पिवळ्या रंगाची उलटी होते, तोंड माझ कडूलिंबाचा रस पेल्या सारखे कडवट होते.

मि फ्रिज मध्ये ठेवलेले थंड दुध पेलो की मला अर्धा तासाना त्या दुधाचे दह्यात रूपांतर पोटातच होते व माझे पुन्हा डोके दुखायला सुरवात होते. मग मला उलट्या काढून ते सर्व दुध बाहेर काढावे लागते, त्यानंतर मला थोडा आराम भेटतो.

दवाखाने खूप केले, परंतू तेवढ्या पुरता आराम भेटतो, औषध संपली की पुन्हा त्रास सुरू.

आणि एक महत्वाच म्हणजे, हा विषय मि माझ्या या त्रासाला कंटाळून शेवठी सांगतोय...

माझे लग्न होवून ३ वर्ष झाले आहेत. ज्या वेळेस आम्ही पती-पत्नि संबंधात येतो, त्याच्या दुसर्या अथवा तिसर्या दिवसात माझे डोके भयंकर दुखते म्हणजे दुखतेच. मला पुन्हा वर दिल्या प्रमाने उलट्या काढावे लागतात. परंतू माझ्या एवढेच लक्षात आले नाही कि पति-पत्नी संबंधाचा आणि पित्त , डोकेदुखीचा काय संबंध आहे.

खुप आशा ठेवून आज मि माझे प्राँब्लेम मांडलेत, तरी कृपया एक्सपर्टना माझी हात जोडून विनंती, मला यातून काही तरी उपया सांगावा. धन्यवाद.

मला नेहमी पित्ताचा त्रास होतोय, डोक भयंकर दुखतं, त्या नंतर मि कोमट पाणि एक ग्लास पितो आणि बोटाने उलट्या काढतो, तर मला फेसाळ आणि पिवळ्या रंगाची उलटी होते, तोंड माझ कडूलिंबाचा रस पेल्या सारखे कडवट होते.

मि फ्रिज मध्ये ठेवलेले थंड दुध पेलो की मला अर्धा तासाना त्या दुधाचे दह्यात रूपांतर पोटातच होते व माझे पुन्हा डोके दुखायला सुरवात होते. मग मला उलट्या काढून ते सर्व दुध बाहेर काढावे लागते, त्यानंतर मला थोडा आराम भेटतो.

दवाखाने खूप केले, परंतू तेवढ्या पुरता आराम भेटतो, औषध संपली की पुन्हा त्रास सुरू.

आणि एक महत्वाच म्हणजे, हा विषय मि माझ्या या त्रासाला कंटाळून शेवठी सांगतोय...

माझे लग्न होवून ३ वर्ष झाले आहेत. ज्या वेळेस आम्ही पती-पत्नि संबंधात येतो, त्याच्या दुसर्या अथवा तिसर्या दिवसात माझे डोके भयंकर दुखते म्हणजे दुखतेच. मला पुन्हा वर दिल्या प्रमाने उलट्या काढावे लागतात. परंतू माझ्या एवढेच लक्षात आले नाही कि पति-पत्नी संबंधाचा आणि पित्त , डोकेदुखीचा काय संबंध आहे.

खुप आशा ठेवून आज मि माझे प्राँब्लेम मांडलेत, तरी कृपया एक्सपर्टना माझी हात जोडून विनंती, मला यातून काही तरी उपया सांगावा. धन्यवाद.

मला पित्ताचा खूप त्रास व्हायचा. सकाळी ब्रश करतांना उलटी तर ठरलेलीच
उपाय म्हणून आयुर्वैदिक डॉक्टर चा सल्ला घेतला.
त्यांनी सांगितल्या प्रमाणे डाएट / मेडीसिन घेतले.
८ च दिवसात खूप फरक जाणवला.
आता त्रास खूप कमी झाला आहे.

डॉक्टर- प्रसन्न माधव केळकर
स्नेहा हेल्थ सेंटर
ठाणे

समिर जी, मला ही पित्ताचा त्रास आहे. खुप जणान्ना असतो.
खाण्या पिण्याची पथ्य पाळावित. अविपत्तिकर चुर्ण सकाळी उठ्ल्यावर आणि जेवायच्या आधी न चुकता घेत रहा. सातत्याने. २ - ३ महिने तरी घ्या.
पित्त वाधले असे वाट्ले तर दुध न पीता, गूळ खा आण थंड पाणि प्या.
अधुन्मधुन साळि च्या लाह्या खा.

समीर, तुझे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढलेले दिसत आहे. त्यासाठी प्रवाळ पिष्टी , गुळवेल सत्व , कामदुधा ह्या औषधांचा उपयोग होऊ शकेल.

त्रास होणार असे जाणवायला लागले की चंद्रकला १ गोळी, गार दुधाबरोबर घेणे.

पित्तकर, तिखट, तेलकट, शिळे अन्न शक्यतो नको. ईडली, डोसा इ. आंबवलेले टाळावे. सकाळ संध्याकाळ मोरावळा खावा. गुलकंदाचाही खूप फायदा होईल.

पण सगळ्यात जास्त उपयोग वमन आणि विरेचनाचा होणार आहे. ह्यासाठी योग्य वैद्याकडून पंचकर्म उपचार करून घेणे.

गोवर, कांजिण्या, टायफॉईड ह्यासम काही पूर्वी होऊन गेले आहे का?

समिरजी, मला वाटते milk allergy आहे का ते चेक करा....
असल्यास दह्या वत्यिरिक्त काहि दुधाचे पदार्थ घेऊ नका........

त्याच्या दुसर्या अथवा तिसर्या दिवसात माझे डोके भयंकर दुखते म्हणजे दुखतेच.
मला वाटते कि हा post orgasmic illness syndrome चा प्रकार आहे.... गूगल करा

समीर, आश्विनींनी सांगितल्याप्रमाणे आहार घ्या.सकाळी उठल्यावर दाडिमावलेह घेत चला.

डाव्या हाताची मुठ उजव्या काखेत दाबियची (डावी नाकपुडी चालू नसेल तर हा उपाय करावा) आणि डाव्या नाकपुडीने जोरात श्वासोच्छ्वास करायचा याला चंद्रभेदी प्राणायाम म्हणतात.
पित्त शांत होतं.
हा उपाय उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनाही उपयुक्त आहे

हॅलो,
मला गेली 6 ते 7 वर्षांपासून पित्ताचा त्रास आहे, खाण्याचे, जेवणाचे सगळे नियम पाळतो पण काहीच फरक जाणवत नाही, पाणी जरी पिलं तरी पोटात आग होते तसेच जेवण करताना व जेवण झाल्यावर सुद्धा पोटात आग होते, कधी कधी ऍसिड रिप्लक्स चा पण त्रास होतो. कृपया उपाय सुचवावा.

पित्तासाठी ranitidin नावाचं औषध घेतात, त्यात कॅन्सर कारक घटक आहेत अशी बातमी वाचली. खरं आहे का ही बातमी?

Non-veg खाल्याने ~~ त्याचा तिखट रस्सा पाचक रस वाढवतो. शिवाय तेल-पाणी मिश्रण तवंग आणते. त्यावर क्रिया न झाल्याने आणखी पाचक रस पोटात उतरत राहातो.

अन्न पचवण्यासाठी लागणारे पाचक रस १)पोटात अन्न आल्यावरच, २) गरजेपुरतेच येत असतात तेव्हा त्रास नसतो.

वय वाढत जाते, नोकरी धंध्यामुळे खाण्याच्या वेळा अ) योग्य राहात नाहीत, किंवा ब)अनावश्यक पदार्थ पोटात ढकलले जाऊ लागतात आणि 'पित्त' नावाचा त्रास सुरू होतो.

अन्नपदार्थ पचवणारे पाचक रस अधिक उत्पन्न होऊनही त्रास देतात. कमी झाल्यास अपचन होते. जेवढ्यास तेवढेच हवेत. म्हणजे असं की पित्तमारक औषधेही या प्रक्रियेत प्रमाण बिघडवू शकतात.

पित्त होण्याची कारणे टाळणे हे पित्तावरचे औषध घेण्यापेक्षा प्रभावी ठरते.

"ते सगळं ठीक आहे, पण आता काय करू?"
- चिमुट, दोन चिमुट हिरडा चूर्ण प्रत्येक खाण्याच्या वेळी घेऊन पाहा. तीन दिवसांत गुण दिसला पाहिजे. जे अन्न पचलेलं नाही ते चार पाच तासांपुढे पोट, आतड्यात राहणेही त्रास वाढवत असते. ते हिरडा पुढे ढकलून देऊन ड्यामेज कंट्रोल करतो. त्रास संपला की औषधही बंद करायचे आणि शरिरास त्याचे काम करू द्यायचे.

((हिरडा चूर्ण म्हणजे साध्या हिरड्याचे चूर्ण. स्वस्त असते.
सुरवारी हिरडा/ हिरडा-घन/ त्रिफळा गोळ्या/ हिरडा जेली असले उगाचच महागडे केलेले प्रकार नको.))

आत्ताच उलटी कशी करावी हे शोधत असताना हा धागा सापडला. गेले चार-पाच दिवस खाण्याची इच्छा अजिबातच होत नव्हती. अधून मधून ढेकर येत होते. आज उलटीसारखं वाटू लागलं पण होत नव्हती. हे वाचल्यानंतर दोन ग्लास मिठाचं पाणी पिऊन उलटी झाली. पण एकदाच नाही. थांबून थांबून. मात्र अजुनही छातीत जळजळतं आहे. याचा अर्थ अजुन उलटी व्हायला हवी आहे का?
वर सांगितलेला हिरड्याचा उपाय जेवण्याच्या आधी घ्यायचा की नंतर?

non veg नक्कीच पित्त वाढवते , बऱ्याच जणांना दुग्धजन्य पदार्थांनी सुद्धा पित्त / ऍसिडिटी वाढते (दही ताक चीज पनीर बटर etc)
आमसूल हे पित्त कमी करते असे म्हंटले जाते पण माझे पित्त त्याने वाढते

सब्जा सीड्स २-३ मिनिट्स पाण्यात भिजवून लगेच ते पाणी आणि सब्जा घेतल्याने अराम पडतो
ज्येष्ठमध पावडर थोडी घेतल्याने पण अराम पडतो
जास्तच त्रास असेल तेंव्हा अविपत्तिकर चूर्ण घ्या पण नेहमी नको कारण हे उष्ण असते , डाएट ने पित्त कंट्रोल करणे हाच मुख्य उपचार

@सुलेखा - इसबगोल त्रिफळा चूर्ण हे भाजून वैगेरे घ्यायचे कि तसेच ? इसबगोल मध्ये पण काही प्रकार दिसतात एक लक्ष्मी सॅटिसबगोल म्हणून आहे आणि काही थोडे वेगळे texture वाले आहेत , लक्ष्मी इसबगोल चालेल का ?

Pages