पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15

लंपन.. जमोप्या म्हणतो तसेच हा मायग्रीन आहे... मी याच प्रकाराचा फार जुना नमुना आहे.
यात डोकेदुखीचे चक्र साधारणपणे ठरलेले असते... त्रास सुरू झाला की मी 'माय्ग्रानील' नावाची गोळी हेतो. किमान आठ तास डोकेदुखी बंद होते. कडक कॉफी हा सुद्धा एक उपाय लागू पडतो. ५-६ महिन्यात एकदा तरी 'क्लासिकल मायग्रेन' चा त्रास होतोच.पएकूणच मायग्रेन हा प्रकार गंमतीदार असतो

दोन्ही व्ह्यु आहेत. काही जणांच्या मते चहा कॉफीने उलटी होण्याची शक्यता असते. म्हणून नको... काही लोकांच्या मते त्याने डोके दुखी थांबते. म्हणून घ्यावे.. तुम्ही ट्रायल घेउन बघा तुम्हाला काय सूट होते ते. मायग्रानिल टेब्लेटमध्येही कॅफीन असते.

मायग्रेन कितीही तीव्र असले तरी त्यावर पेनकिलर घेणे टाळा. पेनकिलर वारंवार घेण्याचे इतर भीषण दुष्परिणाम आहेत (उदा. अल्सर).

मला पूर्वी अतिशय डोकेदुखी व्हायची. उजेड सहन व्हायचा नाही. थंडी वाजायची व घामही यायचा.. एकदमच.. मळमळणे व पोट बिघडण्याचे फिलिंग एकदम यायचे. आय मिन हे सर्व प्रकार एकदम. Uhoh खूप अंधार करून झोपल्यावर किंवा उलटी झालीच तर बरे वाटायचे. (उलटी आपोआप व्हायची नाही, मी मुद्दाम केली पण नाही) त्यामुळे कम्प्लसरी ३-४ तास मिनिमम झोप हवी. (एकदा डोके थांबायला कॉम्बिफ्लॅम घेतली तर आधीची हालत बरी असे झाले! Sad )
आजकाल असे होण्याचे प्रमाण जर्रा कमी झाले आहे.. पण झालेच तर वाट लागते. पिल्लूमुळे झोप काढणे किंवा एकंदरीत काहीच शक्य होत नाही. हे मायग्रेनच आहे का? मला माय्ग्रेन किंवा पित्त वाटते. काहीतरी नक्कीच खाण्याशी रिलेटेड आहे. पण नीट ट्रॅक करता येत नाहीये. पोहे जास्त खाल्ले तर डोकेदुखी हमखास. असं काही होऊ शकतं का?? Uhoh (पोहे खूप आवडतात Proud )

माझी मुलगी १४ वर्षाची आहे गेले १५ दिवस तिला उलटी चा त्रास सुरु आहे सगळे रीपोर्ट नोर्मल आहेत कधितरी उलटी व्हायच्या आधी डोक दुखते कधीतरी नंतर , खुप दुखते डोक त्यवेळेस, थोड्यावेळाने बरे वाटते , उलटी व्हायला लागली को पाणी ही नाही रहात तिच्या पोटात , घश्याशी कडुकडु येते म्हण्ते ,हे सगळ काय असाव.? मला खुप टेन्शन येतय काल परवा बर्‍यापैकी बरी होती ती ,आज दुपार पासुन पुन्हा उलट्या व्ह्यायला लागल्यात, आयुर्वेदिक उपचार सुरु आहेत डॉ. नी सुतशेखर वटी आणि कामसुधा वटी अस काहिस दिल आहे, इतक्या लहान मुलीला पित्त होत का ? आणि तेहि इतक्या प्रमाणात? मला स्वतःला असा त्रस कधी नाहि झाला त्यमुळे जास्त भिती वाटते , कृपया मार्गदर्शन करावे

जागरण सुरु आहेत का?
मला दहावीच्या अभ्यासाच्यावेळी असं व्हायचं

खाण्यात गुलकंद, शहाळ्याचं पाणी, तुरीच्या ऐवजी मूगडाळ/ धना-जिरा पूड असं आई द्यायची. जास्त त्रास असेल तर तुमच्या नेहमीच्या डॉ. ना दाखवून घ्या..एस ओ एस म्हणून औषधंही घेतलीत मी.

आमच्या सासरेबुवांचा उपाय पित्त होत असेल तर जेवल्या नंतर बऱ्यापैकी गुळ खावा पित्ताचा त्रास कमी होतो
स्वानुभव Happy

आणखी एक उन्हामुळे पित्ताचा व युरीन ला होणारी जळजळ हा त्रास होणार्यानी शुद्ध जिरे पूड करून बाहेर जाताना, एक चमचा जिरेपूड व साखर पाण्यातून घ्यावी .

थंड, मुलीला कोकम सरबत प्यायला द्या. कोकम पाण्यात भिजत घालून दिवसातून २/३ वेळा तरी सरबत द्या. विकतच नको. शेन्गदाणे, चहा अजिबात नको. मला जर खूप वेळ काही खाल्ले नाहि, पोट रिकामे असेल तर पित्ताचा असाच त्रास होतो. पोट रिकामे न ठेवता वेळच्या वेळी नाश्ता, जेवण वैगरे द्या. थन्ड वॅनीला आईस क्रीम ने पण बरे वाटेल.

सकाळी काही न खाता आधी मोरावळा खावा.
ब-याचदा रात्रीचे जागरण . अवेळी जेवण , उन्हात फिरणे यामुळे पित्त होते. तुरीच्या डाळीने पण पित्त होते . मुगाची डाळ चांगली . वन्हीला आईस्क्रीम खाल्ल्याने पण पित्त कमी होते.
स्वानुभवावरुन सांगते. बाकी डॉकचा सल्लाच योग्य.

थंड
कोल्हापूरात एक उपाय करतात. पहाटे उठून (४.५/५ ला) दोन पेढे खायचे आणि एक ग्लास पाणि प्यायचं. हळूहळू पित्ताचा त्रास कमी होतो म्हणे. Uhoh खखोदेजा.

तिला पाणी भरपूर प्यायला लाव, तूरडाळ्/शेवगा/तिखट्/मीठ्/मसाला यांचं प्रमाण वगैरे कमी कर आहारातलं.
ताक, दूध, शहाळं, कोकम सरबत, कलिंगड असे भरपूर पाणि असणारे पदार्थ तिला वारंवार देत जा.
आणि साईड बाय साईड आयुर्वेदिक उपाय कर, त्याने प्रचंड फायदा होतो.
मला झालेला आहे. मी सलग ३ महिने आगळ (कोकमचं कॉन्स्न्ट्रेशन) सहन होईल इतक्या ग्लासभर गरम पाण्यात घालून सकाळी प्यायची, उठल्या उठल्या.
आणि त्या नंतर योगा करायची. माझा पित्ताचा त्रास ८०-९०% कमी झालाय.

डॉ ना दाखवले, तिच डोक प्रचंड दुखते , कानात मधेच खुप आवाज येतो,च्क्कर , उलटी , सिटीस्कन पसुन सगळे रीपोर्ट नोर्मल आलेत , मायग्रेन सांगीतले आहे , मला खुप टेन्शन आलेय काय करावे? सुचत नाहि ओषधां सोबत काहि घरगुती उपाय करवेत तर तेहि माहित नाहित , Sad

थंड दक्षिणाने लिहीलेले पण एकदम बरोबर आहेच आणी डॉ. नी दिलेल्या कामदुधा व सूतशेखर पण एकदम बरोबर. मला पण पित्ताचा अतीशय त्रास होतो, आणी खायला थोडा जरी उशीर झाला की सहन होत नाही, डोके प्रचंड दुखते. त्यामुळे उठल्यावर दूध घेण्या आधी तिला चमचाभर मोरावळा खायला द्या, डॉ नी मला तेच सांगीतले ( आयुर्वेदीक डॉ. ).

सध्या तूर डाळ पूर्ण बंद करुन मुगाची डाळ वापरा. शेवगा, तूर, मसूर, शेंगदाणे, काजू याने फार पित्त होते. कोकम सरबत मस्तच.

थंड, तिच्या मनावर अभ्यासाचे, परीक्षेचे काही प्रेशर नाही ना, शाळेतल्या कुणा शिक्षकांची भिती वाटतेय का, मित्रमैत्रिणींपैकी कुणी बुली करत नाहीये ना हे ही बघा. मानसिक स्ट्रेसमुळे सुद्धा अशी लक्षणं दिसू शकतात.

अगोला पुर्ण अनुमोदन. थंड त्या द्रुष्टीकोनातून एकदा मुलिशी मोकळेपणाने बोलून तिला काही अडचण आहे का ते ही समजावून घे.
ठराविक वयापर्यंत आपल्याला ईमोशनल लँग्वेज नसते त्यामुळे स्ट्रेस आला की बॉडी या ना त्या मार्गाने रिअ‍ॅक्ट होते. (ब्रेनचे कंडिशनिंग तसे झालेले असते) त्यामुळे हे महत्वाचं आहे. तु ते नक्की कर.

>>थंड, तिच्या मनावर अभ्यासाचे, परीक्षेचे काही प्रेशर नाही ना, शाळेतल्या कुणा शिक्षकांची भिती वाटतेय का, मित्रमैत्रिणींपैकी कुणी बुली करत नाहीये ना हे ही बघा. मानसिक स्ट्रेसमुळे सुद्धा अशी लक्षणं दिसू शकतात>><< +१

मुलगी कुठे घाबरलेली नाही ना? कुणाशी भांडण वगैरे. (नुसता अंदाज घ्या).

दही , ब्रेड, बोर्नविटा वगैरे बंद करावे.

दूधी व मूगडाळ उकडून घोटून त्यात धणा-जीरं पूड घालून प्यायचे सकाळी दात घासल्यावर. अतिशय जालिम उपाय आहे. मुलांचे पित्त बरं होते आठवडाभर दिले तर.

मुलगी लहान असेल तर खूप कोकम आगळ देवू नये.
जर्दाळू चघळावे जेवायच्या आधी.
केमिकल फ्री गूळ व थोडीशी चिमटी लवंग ,सूंठ(अगदी बारीकशीच) जेवणाआधी व नंतर तोंडात ठेवून चघळावी.

गेल्या आठवड्यापासून सर्दी-खोकल्यासाठी काढे घेणं चालू आहे. थंडी सुरु झाल्यापासून भाज्यांमधलं आलं-लसणाचं प्रमाण पण वाढलंय. आणि गेले २-३ दिवस रोज थोडंसं कोवळ्या बांबूचं लोणचं खात होते. (हे खूप उष्ण असतं असं म्हणतात) काल संध्याकाळी अचानक खूप जळजळायला लागलं. थंड दुध प्यायल्यावर तात्पुरतं बरं वाटलं पण आज परत अ‍ॅसिडीटी जाणवतेय. एरवी कधीही अ‍ॅसीडीटीचा त्रास होत नाही. काय उपाय करावा?

अल्पना दूधाचा इलाज तात्पुरता असला तरी दूध २-३ दा घ्यायला हरकत नाही. पण वर लिहील्याप्रमाणे कोकम सरबत किंवा जिरवणी ( १०- १२ आमसुले पाण्यात उकळवुन मग गाळल्यावर त्यात मीठ, साखर आणी कोथिंबीर घालावी ते प्यावे ) घेऊन बघ.

सध्या आवळ्याचा सिझन जोरात आहे. मोरावळा खा उपाशीपोटी. चहा, कॉफी, तेलकट, मसालेदार पदार्थ कमी कर सध्या बरे वाटेपर्यंत. दिवाळीचा फराळ पचायला खूप जड असतो. आणी शक्य असेल तर एक दिवस लंघन कर. पोट हलके झाले की बर वाटेल.

वॅनीला आईस क्रीम - मस्तच! नवीन आयडीया मिळालीय! आता पित्त झालं की प्रयोग! आतापर्यंत दूध असायचं...

माझी तशी कफ प्रकृती आहे पण मला अधून मधून पित्ताचा त्रास व्हायचा . एका मित्राच्या सल्ल्याने रोज सकाळी उपाशीपोटी पतंजलीचा आवळा ज्युस आणि कोरफड ज्युस एकत्र करुन दोन्ही मिळून साधारण ५० मिली घेते वर अर्धा पेला गरम पाणी पिते. अर्धा तास काहीच खात नाही. यावर विशेष काही पथ्य पाळत नाही.
साधारण ३ ते ४ दिवसांनी पोट थोडे नरम येईल, लुजमोशन सुरु झाले की पुढचे दोन दिवस घ्यायचे नाही, मग पुन्हा सुरु करायचे. यामुळे आतडी स्वच्छ होऊन पोट व्यवस्थीत साफ होते.
वरुन गरम पाणी पिणे मस्ट कारण कोरफड थंड प्रकृतीची असल्याने कफ वाढण्याची शक्यता आहे. प्रकृतीप्रमाणे डोस कमी करू शकता. खात्रीचा उपाय कारण स्वानुभव. Happy

सारिका, तुम्ही हे आवळा + कोरफड रस रोज घेता की पित्ताचा त्रास होतो तेंव्हा घेता?
रोज घेत असाल तर दर ३-४ दिवसांनी लूजमोका??

अपर्णा, मी पित्ताचा त्रास झाला तेव्हापासुन सलग ७ दिवस घेतले परत २ दिवस गॅप घेऊन ३ दिवस पुन्हा २ दिवस गॅप असा क्रम आहे. व्हीटॅमीन सी च्या जादा सेवनाने लुमो होतात. आवळ्यात ते असते. प्रथम ३ ते ४ दिवस घ्यायला हरकत नाही सुट झाले तर पुढे सुरु ठेवता येईल.

माझे पोट बिघडल्यासारखे वाटते आहे. सकाळी खाल्लेले उलटुन पडले. दिवसभर घसा व छातित जळजळते आहे. अविपत्तिकर चुर्ण घेतले २दा. आहार काय घेउ? मी २४ विक प्रेगनन्ट आहे. काय उपाय चालतिल?

Pages