पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15


पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः

१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्‍याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्येक वेळा पोटात कृमी झाले असले तरी पित्त होते. एखादे वाइड स्पेक्ट्रम कृमिनाशक घेऊन पाहावे. अलीकडे आपण इतक्या स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणात राहातो की ही शंकासुद्धा आपल्या मनात येत नाही.
वावडिंग घालून उकळलेले पाणी पिण्यासाठी घ्यावे किंवा विडंगारिष्ट घेत राहावे. ( मागच्या पानांवर कदाचित कोणी हे लिहिलेही असेल )

सूर्यफूल तेल वापरले असता,सुरवातीला ,आंगावर कंड पुढे काही दिवसांनी ,पुरळ/मुरुमे पाटीवर ,केसात व तोंडावर येऊ लागले व पुढे ओठ फुटले , व सूर्यफूल तेलाने होत असावे ,असे लक्षात आल्याने ,तेल बदल केला.तोपर्यंत वर्ष पेक्षा अधिक वेळ गेला.
आता .वरील पित बद्दल वाचल्यावर ,पित ची सर्व लक्षणे असल्याचे जाणवते जशी तहान लागणे ,झोप न येणे.
पण तेल बदलल्यावर खूप फरक पडला आहे पण अजूनही ओठ बरे होत नाहीत व तहान लागणे ,झोप नीट न लागणे ,ही ल्लक्षणे आहेत ,यावर वैद्य काही उपाय सांगतील तर बरे होईल

शेंगदाणा तेल पित्तकारक असते ...... मग बरोबर! मला 4-५ दिवसांपूर्वी5-७ दिवस अँसिदिटीचा त्रास चालू झाला.जेवणात शेंग दाणा तेल वापरत होते

हापूस आंबा गर चिकट असतो. कोणत्याही चिकट पदार्थाने पित्त वाढते. फार पिकलेल्यापेक्षा थोडा आंबट खावा.
रायवळ गावठी आंब्यात पातळ रस आणि रेषा असतात. त्याने पित्त वाढत नाही.

आणि पित्त झाल्यावर घसा कडू जाणवत असल्यास काय करावे माहीत आहे का?
मला पित्तासाठी म्हणून डॉक्टरने जी औषधे दिली त्याने जुलाब होऊन पित्त बाहेर निघत आहे.
जीव नकोसा झाला आहे औषधे घेऊन.
दोन दिवसांपासून घसा कडू लागत आहे म्हणून खायची इच्छा होत नाही आहे.

Pages