पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15


पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः

१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्‍याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सुद्धा पित्ताच खूप त्रास होतो. जर बाहेरगवी गेले की झाले पित्त. पित्त झाले कि माझे डोके, मान खूप दुखते. vegeterian असल्यामुळे बाहेर गेले कि ते bread वगेरे शिवाय काहि option बर्‍याचदा मिळत नाहि. त्याने माझे पित्त अजुन वाढते.
गेले काहि दिवस मी pepcid acid reducer try केल्या जर बरे वाटते.. नाहितर मी कुठलिहि औषधे घेतलि तरि मला पित्तासाठि फ़ायदा व्हायचा नाहि.

माझी पित्त प्रक्रुती आहे, त्यामुळे पित्ताचा त्रास तर होतच असतो. पण जर पथ्ये पाळली तर पित्त आटोक्यात ठेवता येते. मला पुढील गोष्टीं चा फ़ायदा झाला.
१. चहा , कॉफ़ी संपूर्ण बंद.
२. मेथी, वांग संपुर्ण बंद
३. शक्यतो जगरण नाही, झाल्यास, झोपतना १/२ कप गार दुध. सुतशेखर १ गोळी.
४. कमित कमी ४ वेळा आहार. झोपायच्या आधी कमित कमी ३ तास जेवण.
५. शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो
६. आवळा सुपरी, मोरावळा, गुलकंद
७. उपासाला जास्त प्रमाणात फ़लाहार. आणि इतर पदार्थ कमी.
८. आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाउन पित्त वाढत नाही अस लक्शात आलय.

ही पथ्ये पाळल्या मुळे त्रास बराच कमी झाला आहे. वरचे वर होणारा त्रास अता सधारण 3-4 महिन्याने होतो.

१. vanila icecream ने खुप बर वाटत. जरा त्रास होतोय अस वाटल कि लगेच IceCream
२. सुतशेखर, Gelucil, हे तर आहेच
३. नाहिच बर वाटल तर, ३-४ ग्लास कोमट पाण्यात मीठ घालुन प्यायच व उलटी काढायची. एकदा पित्त पडुन गेल कि बर वाटत. ( किमान 3-4 महिने तरी )

सकाळी दुध, जिलबी खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो.
Homeapathy मधील Nux Vomika चा सुद्धा मला चांगला फ़ायदा झाला आहे.

Acidity ला english मधे heart burns म्हणतात.

माणसा, पित्ताचे जळजळीत कढ घशात येतात त्याला heart burns म्हणतात. Heartburn is characterised by a deeply placed, burning pain in the chest behind the sternum. Acidity ने वेगवेगळे त्रास होउ शकतात. जसे पोटात दुखणे, घशात जळजळणे, उलट्या होणे, इ इ

माणसा काहीही काय थाप मारतोस. Happy
acidity वाढली की heartburn होते जेव्हा ते acid घशात येते तेव्हा.
esophagus lining can not bear hcl from stomach where stomach lining is capable of taking that "hcl" due to mucous lining inside the stomach.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. मे महिन्यात केलेल्या वमनामध्ये माझं खुप पित्त पडलं.

नमस्कार,

मला गेले काही दिवस गिळायला त्रास होतो. त्यावर काही उपाय आहे का?

धन्यवाद.

त्यावर काही उपाय आहे का?<<< आधी कधी ऍसिड रिफ्लक्स्चा त्रास व्हायचा का? घशात जळजळ वगैरे? डॉक्टरला दाखवा.

गिळायला त्रास होतो ते पित्तामुळे की कफामुळे ते आधी पाहायला पाहिजे.
जळजळ होते की घसा दुखतो आहे? सर्दी इ. आहे का?
जनरली कफामुळे घसा दुखतो त्यावर अडुळसा काढा, ज्येष्ठमध, हळद यांचा उपयोग होतो.

घशात जळजळ वगैरे नाही. जेव्हा आवंढा गिळतो तेव्हा त्रास म्हणजे असे अडकल्यासारखे वाटते. दुखत वगैरे नाही.

सर्दी नाही. थोडा खोकला येतो.
खुप मसालेदार वगैरे खाल्ले तर थोडीफार जळजळ होते पण इन जनरल नाही. आधी कधी आसिड रिफ्लक्ष चा त्रास नाही झाला.
मला पोलन आलर्जीचा त्रास होतो. क्लारिटीन डी घेत होतो.

हळदीचे दूध चालेल का?

डॉक्टरकडे जायचा उपाय आहेच पण आधी घरगुती काही उपायाने कमी झाले तर पहायचे आहे.

ज्येष्ठमध असेल तर त्याचा काढा करून गुळण्या कर आणि झोपताना हळदीचे दुध घेऊन बघ. साधारण आठवडाभर करून पाहा.

डॉक्टर्कडे गेलो. इन्फेक्शन झाले आहे गळ्याला. आन्टीबायोटीक दिले आहे.

मला अन्गावर रशेस उठतात. हा त्रास मला गेले चार वर्ष होतो आहे. पुण्याला असताना सहकारनगर च्या एका डॉक्टरान्कडुन आयुर्वेदिक औषध घेत होते एक वर्ष. त्यानी मला शीतपित्त असल्याचे निदान केले होते. अणि रक्तदोशन्तक घ्यायला सन्गितले होते. पण त्याने विशेष फ़रक पडला नहिये. आता गेली २ वर्ष मी अमेरिकेत आहे. अनि दर ३ दिवसानी सेट्रिझिन हायड्रोक्लोराइड ची ५ एम. जी. ची गोली घेते आहे. कोणी मला या वर उपाय सान्गू शकेल का?

अजून नवीन धागा नाही म्हणून इथेच विचारते. कोरफडीचा गर कसा काढायचा? सगळा वापरला नाही गेला तर फ्रिजमधे राहतो का?

हे इथे विचारावे की नाही माहित नाही. गेली ३-४ वर्षे मला युरीन इन्फेक्शनचा त्रास होतो आहे. साधारण दर ४-५ महिन्यानी जळजळतरी होतेच. २दा खूप जास्त आणि २दा कमी तीव्रतेचा त्रास झाला. मी पाणी खूप पिते. चहा-कॉफी कमी घेते. बाकी कसले आजार नाहीत. यासाठी काय करता येईल?

नविन मायबोलीवरचा हा धागा सापडायला बराच उशिर झाला.

>>चिऊ, कोरफडीचा गर काढणं खूप सोप्पं आहे. पान जाड असतं त्यामूळे एका बाजूने कापून, हाताने, किंवा सुरीने खरवडून काढता येईल. >>>

उत्सुकता - बेटर तुम्ही एखाद्या तज्ञाना दाखवा...

मला स्वतःला बर्‍याच वर्षांपासून डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास आहे. भरपूर डॉक्टर आणि औषधं घेऊनही फायदा झाला नाही. सगळ्याच डॉक्टरांनी वेगवेगळं निदान केलं. चश्मा, विविध पदार्थ टाळणे, सुरू करणे सर्व केलं.

मुख्य फायदा हा मला आगळ आणि योगाने झाला. पहाटे रिकाम्यापोटी (सहन होईल आणि सहज प्यायले जाईल इतपत) कढत पाण्यात एक मोठा चमचा आगळ घालून प्यायले आणि बरोबरीने योगासनं केली. असं मी सलग ३ महिने केलं पण त्याचा फायदा मला लाँग टर्म झाला. पित्त आणि डोकेदुखी अगदी पूर्णपणे नाही पन ८०% गेलीच आहे. अजुनही कडक उन्हात, किंवा खूप प्रकाश, मोठा आवाज मला सहन होत नाही. त्रास होतोच, पण तीव्रता कमी आहे.

बरोबरीने मी बाहेरचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळते, एक रसिक नी सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी मी ही पाळते, म्हणजे आंबवलेले पदार्थ, चहा कॉफी कमी इ.
पण जेव्हा त्रास होतो तेव्हा आईस्क्रिम मात्रं खात नाही त्याने जास्ती वाढतो त्रास.

खरंतर अशा वेळी आपल्याला जे खावंसं वाटतं ते खावं. माझ्या काकूला पण त्रास होता, अशा वेळी ती ब्रेड भाजून त्यावर फक्त तिखट लावायची आणि तिच्या फ्रिजमध्ये एक फुलपात्रं भरून पाणी (बर्फ) तयार असायचं, त्यावर पाणी घालून ती ते चिल्ड पाणी प्यायची, आणि तिला बरं वाटायचं. मला ते फार विचित्र आणि पित्त कमी करण्यापेक्षा वाढवणारं वाटायचं पण तीला ते बरं वाटायचं.

मलापण खुप त्रास होतो ऍसिडीटीचा. कालच खुप डो़कं दुखत होते आणि पोटात पण कसेतरी होत होते रात्री खुपवेळ झोपच येत नव्हती. काही सुचत नव्हते पण तशीच पडुन राहिले मग कधितरी झोप लागली.
वमन करुन माझा त्रास कमी झाला आहे पण कधितरी पित्त झाले ना मग पाणी पण पोटात रहात नाही सारख्या उलट्या होतात.

डोकेदुखीवर काही उपाय असेल तर सांगाल का? मला डोकेदुखी अजिबात सहन होत नाही.

मी योगा शिकवतो म्हणून मी हे लिहितं आहे शिवाय हा बीबी देखील योगाशी संबंधित आहे.

पित्त दोन प्रकारचे असतात.
१) चवीला आंबट लागणारे पित्त
२) चवीला कडूजार लागणारे पित्त

जेंव्हा आपण आजारी असतो, तापानी फणफणलेले असतो तेंव्हा आपल्याला उलट्या होतात. त्या उलट्यांची चव कितीतरी आंबट असते. अशा प्रकारे उलट्या होणे ही आपली नैसर्गिक क्षमता झाली. आपले शरिर पित्त वाढले की ते आपोआप बाहेर फेकते.

आपल्या शरिरात अन्न गेले की त्याचे पित्तात रुपांतर होते. खास करून शिळे अन्न, खूप तेलकट, मसालेदार जेवन घेतले असेल तर पित्त वाढायला लागते. हे वाढलेले पित्त आंबट पित्त असते.

आंबट पित्त हे पोटात असते. ते सहज बाहेर पडू शकते.

कडू पित्त, हे कशापासून निर्माण होते माहिती नाही. पण इतके माहिती आहे की कडू पित्त हे पोटाच्या सर्वात तळाशी असते. ते फेसाळ आणि शेवळी रंगांचे असते. कधी जर कडूनिंबाचा पाला खाल्ला असेल तर तशीच चव कडू पित्ताची असते. हे पित्त बाहेर पडले की शरिर अगदी पिसाप्रमाणे हलके वाटायला लागते. डोक्याला जलद गतीने आराम वाटायला लागतो.

योगामधे कपाळ आणि डोके शुद्ध करण्यासाठी कपालभाती आहे.

नासिका शुद्ध करण्यासाठी जलनेती आहे.

डोळे स्वच्छ करण्यासाठी नैत्रस्नान आहे.

तसेच पोट स्वच्छ करण्यासाठी आहे - वमन किंवा जलधौती.

जलधौती केली की शरिरातील आंबट पित्त लगेच बाहेर पडून जाते. कारण ते पोटाच्या तळाशी साचलेले नसते. हे आंबट पित्त बाहेर पाडायला फार प्रयास करावा लागतं नाही. पण ते तसेच जर शरिरात ठेवले तर त्याचा शरिराला आणि मनाला देखील त्रास होतोच होतो.

आता ही वमनाची क्रिया सांगतो -

७ ते ८ ग्लास पाणी उकळून कोमट होऊ द्यावे. पाणी उकळतानाच त्यात पाव चमच मीठ टाकावे. जर समुद्र मीठ असेल तर ते सर्वात उत्तम. पाणी उकळायला जर वेळ नसेल तर कोमट पण अगदीच कोमट नाही हं.. इतके गरम करावे. जितके जास्त गरम पाणी आपण पिऊ शकू तेवढे जास्त बरे. पण अतिशयोक्ती करू नये.

तर हे उकळवून कोमट झालेले पाणी पिताना, हमुमानासना मधी बसावे. असे बसले की पिटाची पिशवी जास्त जागा निर्माण करते. मग त्या आसनामधे जास्त पाणी पिऊ शकतो. हे पाणी पिताना नाहणीच्या अगदी जवळ बसावे. एकदा ७ ग्लास पाणी पिऊन, पुढे एक घाटही पाणे पिणे शक्य होत असेल तर लगेच नाहणीत जाऊन, दोन पायात खांद्या इतके अंतर ठेवून, कमरेत नाभीपर्यंत वाकून आणि पडजिभेला उजव्या हाताची मधली ३ बोटे स्पर्श करतील इतके आत घालून पिलेले पाणी ओकून टाकावे. ही ओकण्याची क्रिया आपोआप होते. कारण तुम्ही ज्या पद्धतीने आत उभे आहात आणि तुमची बोटे पडजिभेला लागलेली आहेत, आणि पोट पाण्यानी डच्च भरलेले आहे, तेंव्हा पाणी एक दोन उलट्यात बाहेर येते आणि त्यासोबत साठलेले पित्तही. कधीकधी पित्त जास्त असेल तर आणखी एक वेळा ही क्रिया केली तरी हरकत नाही. उलटी करणे/होणे ही अत्यंत सहज क्रिया आहे. पोटातील घाण बाहेर टाकण्याचा सर्वात चांगला आणि सोपा पर्याय. काही जण घाबरतात.. त्यान्ना हे कसे सांगावे की पोटातून काही अवयव बाहेर येत नाही. आपले शरीर आतून मजबूत बनलेले असते. त्याला तसेच मजबूत राहू देणे ही आपली जबाबदारी असते. म्हणून मग योगशास्त्रात अशा क्रिया सांगातल्या आहेत. ही क्रिया करण्यासाठी योगा माहिती असण्याची/करण्याची गरज नाही.

तुम्ही तुमच्या अवती भवतीचा निसर्ग न्याहळत असाल तर, तुम्हाला कळेल की मांजर कुत्रा, हे दिसणारे प्राणी, आजारी पडले की गवत खातात आणि मग त्यांना लगेच उलटी होते. पण प्राण्यांना हे गवत निवडता येत. इतकी त्यांची बुद्धी याबाबतीत तीक्ष्ण असते. स्वामी विवेकानंद म्हणतात, माणसांपेक्षा प्राण्यांमधे intution power जास्त असतो. असो..

तर या बाबतीत आणखी काही प्रश्न असतील तर मला इथे विचारा अथवा विचारपूस करा.

वर्षा,
माझं ही असंच आहे. रूटीन पेक्षा वेगळं काहीही केलं किंवा घडलं की सगळ्यात आधी माझं डोकं दुखतं आणि उलट्या होतात. आणि मला ही डोकेदुखी अज्जिबात सहन होत नाही. मला सरळ इंजेक्शन च घ्यावे लागते. जनरली मी डायक्लोफिनॅक किंवा डायनापर घेते. बाकी कोणतेही उपाय मला लागू पडत नाहीत. Sad
पण तुम्ही जर का डोकेदुखी कमी करणार्‍या गोळ्या घेत असाल तर त्या आधी antacid जरूर घ्या. त्याने बराच फरक पडतो.

बी,
तुम्ही खूपच चांगली माहीती दिली आहे. धन्यवाद! मी थोड्याफार फरकाने हीच पद्धत अवलंबते. कारण पित्त झाले की बहुतेक लोकांना आपोआप उलटी होते, पण मला होत नाही, मुद्दाम करावी लागते. मग मी २ तांबे साधं पाणीच पिते आणि तुम्ही सांगितले आहे तशीच उलटी करण्याचा प्रयत्न करते. आणि उलटी केली की बरं वाटतं सुद्धा. एकदा मी वाट पाहीली की आपोआप उलटी होते का याची. पण २ दिवस डोकेदुखी आणि पोटात मळमळ घेऊन होते, शेवटी दवाखान्यातच जावं लागलं.
Sad
बी तुम्हाला काय वाटतं, मला आपोआप उलटी का होत नसेल? यामागे काही प्रकृती कारण असेल का?

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

एक चमचाभर चांगल्या प्रतीचा मोरावळा खाल्ल्यासही लगेच फरक पडतो.

दक्षिणा, शरिरात पित्त साचलं की उलटी होतेच असं नाही. पण ताप वगैरे आला की उलटी होते. तू साधं पाणी नको पिऊस, मी जसे वर सांगितले की पाणी कोमट करून पी आणि हमुमानासान मधे बसून पाणी पी. तू पद्धतीनूसार वमन करत नाहीस असे मला दिसतेच आहे. तसे कर आणि मग परिणाम बघ.

डोकेदुखी वर आणखी एक उपाय म्हणजे कपालभाती आणि उज्जेयी. भिंतीचा आधार घेऊन शीर्षासन केला तर मेंदूला आणखी फायदा होतो.

मलापण एक गोळी दिली आहे डॉक्टरांनी, नाव अत्ता आठवत नाहिय. त्याने थोडा फरक पडतो. मला मायग्रेनचा पण त्रास होतो कधितरी, त्यच्यावर "मायग्रेनील" घेते. घरचे ओरडतात की सारख्या गोळ्या घेउ नकोस म्हणुन.

दक्षिणा, मलापण उलटी होत नाही. कधितरी इतक्या उलट्या होतात की मी पाणी पण पिउ शकत नाही.

अश्विनी, मी जमेल तेवढे पथ्य पाळायचा प्रयत्न करते. मला वांग, मेथी खाल्ले की त्रास होतोच त्यामुळे ते मी टाळते. एकदा तर मी दडपे पोहे खाल्ले होते आणि नंतर मग खुप त्रास झाला. डॉक्टर म्हणाले की पोहे आणि खोबरे एकत्र खाल्ले की त्रास होतो, तेव्हापासुन मी पोहे पण आवडत असुनही थोडेच खाते.

बी, मी कपालभाती करत होते, तेव्हा मी बारीक होते पण पोटाचा घेर जास्त होता तो कमी करण्यासाठी करत होते, पण माझ्या पोटात दुखायचे आणि मी जाड पण झाले म्हणुन मी ते बंद केले.

हो, वमन तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाही करत मी. पण आता करीन त्रास झाला की. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केलं तर जास्ती आराम पडेल असं वाटतंय.
असो.. उज्जेयी म्हणजे काय? सविस्तार सांगाल का?

दडपे पोहे, चिवडा खाल्ला की मला पण त्रास होतो. हे मात्र मला माहीती नव्हत की पोहे आणी नारळ एकत्र खाल्ल की त्रास होतो.

दक्षिणा, केंव्हापासून अहो जाहो करायला लागलीस. तू चं म्हण.

उज्जेयी करताना घोरताना जसा आवाज होतो तसा आवाज काढला की घशाला घर्षण जाणविते. त्यामुळे शरिरातील cough पातळ होतो आणि तो बाहेर पडण्यास मदत होते. उज्जेयीचे तीन प्रकार आहेत. तुला हा प्रकार वाचून कळणारच नाही. त्यासाठी प्रात्यक्षिकच हवे.

अभय निनावे
मला ढेकरा चा खुप त्रास होतो. दिवसभर ढेकरा (उचक्या प्रमाणे)सुरु असतात.पोट साफ होत नाही. सुस्त वाट्ते. ५ वर्षा पासुन हा त्रास आहे. एलोपथी/आयु उपचार केले.५-६ दिवस आराम रहातो. पुन्हा त्रास सुरु होतो.क्रुपया काहि इलाज सान्गा.

अभय आपण जेवणानंतर लगेच झोपता का?
तस असेल तर आधी ते थांबवा, किमान एक तास झोपायच नाही.
जेवणापुर्वी आल्याच्या तुकड्याला थोड मीठ लावुन खा.
आणि जेवणात सकाळी ताक असुद्या,
तुमचे प्रोब्लेम्स बंद होतील,
एवढ करुनही जर त्रास थांबला नाही तर मग औषध सुरु करावी लगतील.

वसंत

बी
अतिशय सुंदर माहिती!!! धन्यवाद!!!
अशीच info देत रहा!!!

चहा कमी पिणे, रोज थोडेतरी चालणे आणि प्राणायाम यामुळे सध्या माझे पित्त आटोकयात आहे!!!

Pages