देव..

Submitted by Happyanand on 1 October, 2019 - 13:08

मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तु कोंबड्या बकऱ्यांचे नैवद्य देवून मला आपलेसे करू पाहत होता.
मला तर फक्त तुझ्या मनातील भोळा भाव हवा होता.
पण तू अंधश्रद्धेच्या इतका आहारी गेलास .
की स्वतःलाच संपवून बसलास..
तु इतका क्रूर झालास.
की स्वतः मधील देवत्व च विसरून बसलास.
मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तू मला अर्पण करण्या मुक्या प्राण्याला कापत होतास..
कसं सांगू तुला माझा जीव किती तुटत होता.
तु विस्तवावर नाचत होतास मन माझे जळत होत.
माझ्यातल्या मला मारून तु कसा मिळवशिल मला? इतकं साधं तुला कळत नव्हतं.
मी तुझ्या जवळ असूनही तु जगात शोधत बसलास..
मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
मी पाऊस बनुन तुला भिजवत होतो.
मी वारा बनुन तुला स्पर्शत होतो.
मी त्या दगडात ही होतोच रे ज्याला तु शेंदूर फासला होता.
पण त्या दगडावर रक्त उडाले आणि तेव्हाच मी निघून गेलो.
मी मुक्त होतो तु बंधनात शोधत बसलास..
मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users