दशक कथा!

Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29

एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.

आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?

काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!

उदाहरणार्थ,

१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!

२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!

३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.

टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच मस्त!!

महाभारत कोणामुळे घडलं?
दुर्जन लोकांच्या हव्यासामुळे आणि
सज्जन लोकांच्या मौनामुळे!!

मधुरा वाह!

कित्ती धागे काढू?
काय करू बाबा, ती लक्षच देत नाही...

(ट्रोलर्सला समर्पित)

मला सामो यांची ही कथा सगळ्यात जास्त भावली.

काल युसुफने मियांनी आवडीने बीफ खाल्ले,,,,,,,,, शेवटचे. जय हिंद.
Submitted by सामो on 22 September, 2019 - 12:14

विशेषतः त्यातल्या शेवटच्या दोन शब्दांनी कथेला एक वेगळंच परिमाण मिळालंय.

महाभारत कोणामुळे घडलं?
गणपती शाळेत गेल्यामुळे आणि
व्यास न गेल्यामुळे Wink

महाभारत कोणामुळे घडलं?
द्रौपदीने जीन्स न घातल्यामुळे
गांधारीने भलत्याचेच वाढवल्यामुळे Wink

Lol

महाभारत ग्रंथ गणपतीने लिहीला. व्यासांना झरझर लिहीणारा लेखक (कारकून) हवा होता. ब्रह्मदेवाने गणपतीची ह्या कामासाठी प्रशस्ति केली (रेकमेंड) होती. गणपती नसता तर व्यासांचे हे खंडकाव्य विरून गेले असते.

अज्ञातवासी Biggrin

हो अक्कु Happy

लेखणी तुटली गणपती बाप्पांच्या वेगामुळे. त्यांनी सरळ एक दात तोडला स्वतःचा आणि लिहून पूर्ण केले. Happy

मस्त योगिता!

मी तिच्यासाठी पैसे उधळेन. पण 'स्वतःचे' असे कुठे म्हणालो मी?

अज्ञा Biggrin

तो पुढच्या प्रवासाला निघाला,पण त्यांच शरीर जमिनीवर निपचित पडलेलं...

मस्त ग मन्या! Happy

"माझा फोटो?"
"घे!"
अरे? आरशात दिसतो तो कोण आहे मग?

मस्तच Happy

ती बेभान होऊन नाचली..आणि शेवटी त्या सावळ्यातच एकरुप झाली...

आहाहा! मस्त!

"सांग राधे, कुठे नाहीये मी?"
ती हसून म्हणाली, "माझ्या नशिबी!"

टीप: सोशल मिडियावर या आशयाचे वाचले होते, त्यावरूनच प्रेरित होऊन लिहिले आहे.

अरे जमायला लागलं की मला पण..

सासरच्यांनी तिला तेवढी मोकळीक दिलेली.. पण घरच्या सर्व जबाबदार्या लादुन ..

"कोणी आहे का?"
"या आत"
मोकळ्या घराला नव सावज मिळालं.

मन्या, Rofl मस्तच!!

"कशासाठी हे?"
"TRP!"
"पण तुला काय?"
"पैसे..."
"कोण देतं?"
.
.
.
.
"अ‍ॅडमिन!"
___________
ह घ्या!

मस्त लिहिताय सगळे.......

"'ही' पहिली की दुसरी?"
"तिसरी!"
"अरे गाढवा वेलांटी बद्दल विचारतेय."

Pages