दशक कथा!

Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29

एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.

आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?

काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!

उदाहरणार्थ,

१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!

२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!

३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.

टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट अज्ञातवासी Biggrin

मायबोली पाहून:
ये टिपापा टिपापा क्या है? ये टिपापा टिपापा?

१. गाढवा तुझा किती सुरेल आवाज, उंटा तुझा किती सुंदर चेहरा.

२. हे योग्य नाही हत्ती म्हणाला, कोल्हेकुई सुरू झाली ट्रोल ट्रोल!

दशक पहिल्यांदाच लिहितोय, जमल्यात का ते सांगा.

तो गेला.
हाकलल त्याला.
मग आता बदला घे.
सुरुवात झालीये.

२. हे योग्य नाही हत्ती म्हणाला, कोल्हेकुई सुरू झाली ट्रोल ट्रोल!>>>>>हर्पेन, किती खोडसाळपणा Lol

धन्यवाद मी_मधुरा, आणि सस्मित , पहिलाच प्रयत्न आहे; काही चुकलं असेल तर माफ करा. फारतर खोडकरपणा म्हणा; हा खोडसाळपणा नक्कीच नाही.

खोडकरपणा निष्पाप निरागस निर्हेतुक असतो.
खोडसाळपणा बहुतेक वेळा त्रास द्यायच्या हेतूने असतो.
बहुतेक असंच काहीतरी असावे. Proud

ओके.

हर्पेन,
चूक काय त्यात? ज्यांचे खरे ट्रोलिंग झाले नाही त्यांच्यावर हे तू लिहिलेले असणार असे गृहीत धरले आहे मी.

बाकी खरे काय झाले ते ज्याचे त्याला माहित आहेच. Happy

एक दशक-

काही लांडगे काही कोल्हे काही कुत्रेसुद्धा होते, कळप मात्र मेंढरांचा!

एक दशक!

मी शब्द चालवले, तिने अश्रू,
अश्रू जिंकले, शब्द चालवणारी गेली.

कोणीतरी आले ट्रोलिंग म्हणले, विषय वाढला.....
वाढतच गेला.... वाढतच गेला.....

तिसरा दोघांच्या भांडणात पडला.
शेवटी भांडणच काय नाते पण संपवले.

Pages