मुंबई ही ज्या सात बेटांची बनली होती. त्यातील एक बेट अर्धेअधिक माझ्या खापरपणजोबांचे होते. असे आमचे वडिलधारी सांगतात. खरे खोटे ठाऊक नाही. आजची पिढी जशी फारसे डोके न लावता व्हॉटसप मेसेजवर विश्वास ठेवते. तसे थोरामोठ्यांनी सांगितलेल्यावर विश्वास ठेवा. असे आमच्या घरचे संस्कार होते. तर ते एक असो. पुढे भारत स्वतंत्र झाला. संस्थाने विलीन झाली. त्यात आमचीही जायदाद गेली. जे थोडंथोडकं उरले ते पुढच्या पिढीत दहा भावंडांमध्ये वाटले गेले. जे माझ्या आजोबांच्या वाट्याला आले ते पुन्हा आठ भावंडांमध्ये वाटले गेले. तेव्हा ही कॅलेंडर छपाई नॉर्मल समजली जायची. लगेच मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला आम्हाला जबाबदार ठरवायची गरज नाही. आम्ही ईथले भूमीपुत्र आहोत. परप्रांतीय नाही. हक्काच्या जमिनीवर पीक घेत आहोत.
तर ते ही एक असो. आजमितीला आमची मुंबईत तीन घरे आहेत. हे ही नसे थोडके. हम दो हमारे दो करत दोघांना एकेक घर द्यायचे आणि आपल्याला एक ठेवायचे असा माझा भविष्याचा प्लान होता. पण तो आता डळमळीत होताना दिसतोय. कारण मायबोलीवरची चर्चा.
मायबोलीवर आरे वाचवा म्हणणारया बेगडी(!) पर्यावरणभातप्रेमींवर जहरी टिका केली जात आहे. आधी आपली घरे तोडा, मग दुसरयांचा विकासात घाला खोडा. या टिकेने व्यथित होत आरे धागाकर्ता या नात्याने सुरुवात मी आमचेच घर पाडण्यापासून करायचा विचार करत आहे.
आता प्राब्लेम असा आहे. तीन घरांपैकी एक आहे बाबांच्या नावावर, एक आईच्या नावावर तर एक जे मी माझे म्हणू शकतो ते अजून लोन फिटून माझ्या ताब्यात आले नाहीये. त्यामुळे ते चर्चेतून बादच झाले.
तर आता घर पाडण्याआधी मला आईचे वा बाबांचे घर आपल्या नावावर करावे लागणार. कारण पर्यावरणप्रेमी मी आहे, माझे आईबाबा नाहीत.
आता बाबा काही मला त्यांच्या नावाचे घर देतील असे वाटत नाही. कारण अधूनमधून ते सेटमॅक्सवर बागबान बघताना आढळून येतात.
राहिली आई आणि तिचे घर. ते मात्र आईला भावनिक करत ताब्यात घेता येईल. तर आता याच घराला पाडायचा विचार चालू आहे.
तशी या घराचीही रोचक कहाणी आहे. आजोबांनी आपल्या लाडक्या सूनेला म्हणजे माझ्या आईला म्हटले, तुला एक घर बांधून द्यायची ईच्छा आहे. त्यासाठी दोन पर्याय दोन प्लॉट आहेत. एक स्मशानातून जातो. तर एक झाडाझुडुपातून. काय पाडायचे ते तू ठरव.
स्मशानाचे नाव घेताच आईच्या चेहरयावर स्मशानशांतता पसरली. आमच्याकडे देवापेक्षा भूतांवर विश्वास जास्त. तसेच त्यावेळी मी आईच्या पोटात होतो. तिने विचार केला. स्मशान पाडले आणि त्यातलेच एक आपल्या पोटी निपजले तर... तर.... पण शेवटी जे व्हायचे ते होतेच !
तर ते एक असो, आईने ठरवले समशानात राहण्यात काही शान नाही. आपण झाडंझुडपंच साफ करूया. आणि मग त्याजागी एक टुमदार बंगला उभा राहिला. अवघे पंधरावीस वर्षांचे आयुष्य. नंतर विकासाच्या नावावर तो देखील पाडला. आता त्या जागी पंधरा मजली टॉवर उभा आहे. आणि त्यातला दहावा मजला पुर्ण आमचा आहे.
आता प्राब्लेम असा आहे, तोच दहावा मजला पाडायचा आहे. पण अकरापासून वरच्या मजल्यावरचे रहिवाशी याला नकार देत आहेत. कारण त्यांना असे वाटते की आमचा माळा तोडला तर ते सुद्धा तुटतील.
तर आता त्यांना कसे पटवायचे? त्यांचा कसा होकार मिळवायचा? न मिळाल्यास त्यांच्या घराला धक्का न लावता मी माझे घर कसे तोडायचे? आणि माझ्यावरचा बेगडी पर्यावरणभातप्रेमीचा शिक्का कसा खोडायचा?
कृपया मार्गदर्शन करा _./\._
दिवसा ऑक्सिजन मिळेल पण रात्री
दिवसा ऑक्सिजन मिळेल पण रात्री कर्बद्विप्राणील वायूमुळे जीव गुदमरेल ना.
>>>
जबरदस्त अमर निण्याण्णवे ..
कर्बद्विपाणील - कार्बन डाई ऑक्साईड.. मला नव्हता हा शब्द माहीत. ज्ञानात भर पडली. धन्यवाद
शंका रास्त आहे.
पण जंगलातले पशूपक्षी मग कसे जगतात? ॲमेझॉनच्या जंगलात तर रात्री जायलाच नको.
तोच दहावा मजला पाडायचा आहे.
तोच दहावा मजला पाडायचा आहे. पण अकरापासून वरच्या मजल्यावरचे रहिवाशी याला नकार देत आहेत.
>>> नऊ पासुन खालचे तयार आहेत का?
मजला काढून तिथे झाडे
मजला काढून तिथे झाडे लावण्यापेक्षा ती जागा ऑक्सिजन सिलिंडर्स ठेवण्यासाठी छुपा गोदाम बनवा. (ऑक्सिजनचे ब्लॅक मार्केटिंग रॅकेट)
मुंबईमध्ये आरे जाऊन मेट्रो आली रे आली की सगळ्या लोकांना २४ तास ऑक्सिजन सिलिंडर बरोबर घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.
ऑक्सिजन सिलिंडर्सच्या १०का२० विक्रितून तुम्हाला मग बक्कळ नफा मिळेल. मग तुम्ही भुतानमध्ये नाही तर अरबी समुद्रातले एखादे बेट विकत घेऊन तिकडे राहून मुंबईतला धंदा चालवू शकता. शाहरूख, सई, स्वप्नीलला सुद्धा पेईंग गेस्ट ठेवता येईल मग.
मेक्षिकोत मेट्रो आहे की झाडे
मेक्षिकोत मेट्रो आहे की झाडे आहेत ?
नऊ पासुन खालचे तयार आहेत का?
नऊ पासुन खालचे तयार आहेत का?
>>
त्यांना मी नकाराचा अधिकार दिलाच नाही.
शाहरूख, सई, स्वप्नीलला सुद्धा
शाहरूख, सई, स्वप्नीलला सुद्धा पेईंग गेस्ट ठेवता येईल मग.
>>>>
हायझेनबर्ग पोस्ट छान.
या शेवटच्या वाक्यातील माझी परीक्षा घेणारा जटील डाव मी ओळखला.
धाग्यात सई स्वजो शाखा येऊन धागा भरकटणार नाही याची काळजी मी नक्की घेईन
मेक्षिकोत मेट्रो आहे की झाडे
मेक्षिकोत मेट्रो आहे की झाडे आहेत ?
>>>
मेट्रोचे माहीत नाही. झाडे नक्कीच असतील.
घरात मोदी विरुद्ध रागा वाद
घरात मोदी विरुद्ध रागा वाद विवाद स्पर्धा ठेवा - मायबोलिवरिल लोकाऩा आमन्त्रण दया. बघा कशी बिल्डिंग खाली येते ते .
तुमचे सवेदंशिल मन दुखावल्या
तुमचे सवेदंशिल मन दुखावल्या मुळे तुम्ही चूक सुधारून त्याचे प्रयचित घेण्यास तयार झाला आहात.
मन खूप हेलावून गेले तुमच्या सारखी माणसं आता दुर्मिळच .
पण एक लहान सी शंका काही पाठ सोडत नाही .
तुम्ही विकास वादी ,पर्यावरण द्रोही लोकांच्या कळपात तर सामील झाला नाहीत ना?
असली फक्कड युक्ती तुम्ही सुचवली आहे जंगल तोडी वर की बोलायची सोय नाही .
जंगल तोडा आणि दोन चार इमारती मध्ये झाडे लावा झाले संतुलन .
वा वां
तळ टिप
तुम्ही पोस्ट मध्ये १० th फ्लोअर वर असलेल्या घरात झाडे लावायचा उल्लेख केला नाही पण तुमच्या मनात हा विचार आला होता असा उल्लेख तुमच्या कमेंट मध्ये आम्हाला संशोधन केल्यानंतर आढळला आहे
मेक्षिकोत मेट्रो आहे
मेक्षिकोत मेट्रो आहे
https://en.m.wikipedia.org/wiki/Mexico_City_Metro
> तेव्हा ही कॅलेंडर छपाई
> तेव्हा ही कॅलेंडर छपाई नॉर्मल समजली जायची. लगेच मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला आम्हाला जबाबदार ठरवायची गरज नाही. आम्ही ईथले भूमीपुत्र आहोत. परप्रांतीय नाही. हक्काच्या जमिनीवर पीक घेत आहोत. > हे वाचून फिदीफिदी हसू आलं
बाकी चालूद्या.
मेक्षिकोत मेट्रो आहे
मेक्षिकोत मेट्रो आहे
>>>
आणि झाडे?
जंगल तोडा आणि दोन चार इमारती
जंगल तोडा आणि दोन चार इमारती मध्ये झाडे लावा झाले संतुलन .
वा वां
>>>>
काही गल्ल्लत होतेय का?.ईमरतीत झाडे लावा आणि जंगलतोडीला विरोध करायचा अधिकार मिळवा असे हवे ना हे?
हा असेच
हा असेच
पंधराव्या मजल्यावरील लोकांना
पंधराव्या मजल्यावरील लोकांना दहाव्या मजल्यावर शिफ्ट करा. पंधरावा मजला संपूर्ण तुमचा असल्यावर त्याचे सिलींगही तोडून टाका आणि लावा तेथे लाजाळू पासून तुळशी पर्यंतची गगनचुंबी वृक्ष.
धन्यवाद, याच कारणाने मी
धन्यवाद, याच कारणाने मी मुंबईत ऍडमिशन घेतली नाही कॉलेजसाठी! उगाच अस्थमा होऊन जाचा म्हणलं. त्यामुळे आपलं नागपूरच बरं
फक्त तुमचा स्वःताच्या मालकीचा
फक्त तुमचा स्वःताच्या मालकीचा
दहावा मजला पाडायची गरजच काय ?
पुर्ण ईमारतच अश्या जमिनीवर बांधलेली आहे जेथे मुबलक झाडे होती.
आरे मध्ये झाडे आहेत म्हणुन विरोध होत आहे अन म्हणुन मेट्रो कार शेड आरेच्या ऐवजी भिवंडीला शिफ्ट करायचा प्रस्ताव जसा दिला होता त्याप्रमाणे तुमची उभी ईमारत दुसरी कडे शिफ्ट करा हाकानाका !!
रहीवाश्यांची परवानगी मात्र स्वःताच घ्यावी मायबोलीकरांना तसदी देऊ नये .
पंधरावा मजला संपूर्ण तुमचा
पंधरावा मजला संपूर्ण तुमचा असल्यावर त्याचे सिलींगही तोडून टाका
>>>
आपलं सिलींग वरच्याचे फ्लोरींग असते ओ.. आणि टॉप फ्लोअर असल्यास टेरेस !
आणि टेरेसचे महत्व तुम्हाला सांगायलाच नको. लहान मुले पतंग उडवतात, त्यांच्या आया सांडगे वाळत घालतात, बाबा लोक्स दारूची मेहफिल जमवतात तर दादा लोक्स गुटर्रगू करतात.. आणि हे सगळे टाळले तरी गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीचे काय करू?
त्यामुळे आपलं नागपूरच बरं
त्यामुळे आपलं नागपूरच बरं
>>>
मी राहिलोय तिथे ऐन उन्हाळ्यात
पळून आलो तिथून
चालता चालता उन्हाने चक्कर येऊन रस्त्यावर पडलो एकदा. सावलीलाही झाड नव्हते आसपास.
त्याप्रमाणे तुमची उभी ईमारत
त्याप्रमाणे तुमची उभी ईमारत दुसरी कडे शिफ्ट करा हाकानाका !!
>>>
ते मूवर्स ॲण्ड शेकर्सवाले करतील का शिफ्टिंग?
यावरून एक विनोद आठवला. एके
यावरून एक विनोद आठवला. एके ठिकाणी भिंतीवर शेणाच्या गोवरया थापून चिकटवल्या असतात. तिथे चित्रगुप्त येतो आणि विचारात पडतो. यमराज त्याला विचरतोय काय झालं रे? तो म्हणतो, मी विचर करतोय गाईने भिंतीवर चढून गोबर केलेच कसे Happy>>>>>तकदिरवाला सिनेमा मधील प्रसंग आहे हा
ऋन्मेषजी
तकदिरवाला
तकदिरवाला
>>
कर्रेक्ट चित्रपटाचे नाव आठवत नव्हते. दाक्षिणात्य चित्रपटात पाहिले की काय वाटत होते. तसाच होता तो सिनेमा
>>पंधराव्या मजल्यावरील
>>पंधराव्या मजल्यावरील लोकांना दहाव्या मजल्यावर शिफ्ट करा. पंधरावा मजला संपूर्ण तुमचा असल्यावर त्याचे सिलींगही तोडून टाका आणि लावा तेथे लाजाळू पासून तुळशी पर्यंतची गगनचुंबी वृक्ष.>>
आतापर्यंतचा सर्वाधिक प्रॅक्टिकल उपाय आहे हा.
_______________
>>आणि टेरेसचे महत्व तुम्हाला सांगायलाच नको. लहान मुले पतंग उडवतात, त्यांच्या आया सांडगे वाळत घालतात, बाबा लोक्स दारूची मेहफिल जमवतात तर दादा लोक्स गुटर्रगू करतात.. आणि हे सगळे टाळले तरी गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीचे काय करू?>> हाहाहा
आणि हे सगळे टाळले तरी
आणि हे सगळे टाळले तरी गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीचे काय करू?
सिव्हिलवाल्यांना माहीत असायला पाहिजे की पाण्याची टाकी ही सिलींगवर नव्हे तर कॉलम आणि बिमवर बांधतात. सीलिंग तोडल्याने टाकी कोसळणार नाही.
कोनते कोलेज रुन्मेश?
कोनते कोलेज रुन्मेश?
कोणता इयर पासआवुट आहेस?
तुझ्या धाग्यावर विषयान्तर करतोय- माफी असावी.
सीलिंग तोडल्याने टाकी कोसळणार
सीलिंग तोडल्याने टाकी कोसळणार नाही.
>>>>
लगेच कोसळणार नाही. पण रिस्क वाढेल. टेरेसची स्लॅब काढल्याने डायफ्राम ॲक्शन जाईल. टॉपच्या १५ व्या फ्लोअरच्या भिंतीही आपण काढणार आहोत. त्याचेही डेड लोड जाईल. ओवरहेड टाकी आणि १४ फ्लोअरच्या मध्ये सॉफ्ट स्टोरी तयार होईल जी मूळ डिजाईनमध्ये नसेल. जेव्हा भूकंपाचा धक्का बसेल तेव्हा टाकी हलेल आणि पंधरावा मजला घेऊन खाली येईल.
च्रप्स, माफीचा टोमणा नको.
च्रप्स, माफीचा टोमणा नको.
माझ्यावर वालचंद आणि वीजेटीआय हे दोन कॉलेजेस हक्क सांगतात.
पास आऊट मी स्वत:ला समजत नाही. अजूनही नॉट आऊटच खेळतोय
https://www.bobhata.com
https://www.bobhata.com/lifestyle/artist-transplants-300-trees-football-...
वाचा ही बातमी
फूटबॉल मैदानावर झाडे
काही दिवसांपूर्वी फुटबॉलचे मैदान असलेल्या जागेत आता जंगल दिसत. क्लॉस यांनी त्या मैदानात जगभरातील वेगवेगळी झाडे आणून लावली आहेत. क्लॉस म्हणतात की जगाचे लक्ष हवामान बदलसारख्या महत्वाच्या विषयाकडे ओढले जावे म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आहे. हवामानातील हे बदल जर असेच सुरु राहिले तर एके दिवशी झाडे फक्त शोसाठी कुंडीत लावलेली दिसतील.
लगेच कोसळणार नाही. पण रिस्क
लगेच कोसळणार नाही. पण रिस्क वाढेल.
मग तर तुमचे कामंच झाले. ह्या कारणाने इमारत कोसळली तर सगळी जमीन मोकळी होईल ,मग लावा तेथे झाडे
' अमेझॉन ' वरून मागवा हवी तितकी. फक्त ही ' सॉफ्ट स्टोरी ' कुणाला सांगू नका.
(No subject)
Pages