घर पाडायचेय सल्ला हवाय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2019 - 02:40

मुंबई ही ज्या सात बेटांची बनली होती. त्यातील एक बेट अर्धेअधिक माझ्या खापरपणजोबांचे होते. असे आमचे वडिलधारी सांगतात. खरे खोटे ठाऊक नाही. आजची पिढी जशी फारसे डोके न लावता व्हॉटसप मेसेजवर विश्वास ठेवते. तसे थोरामोठ्यांनी सांगितलेल्यावर विश्वास ठेवा. असे आमच्या घरचे संस्कार होते. तर ते एक असो. पुढे भारत स्वतंत्र झाला. संस्थाने विलीन झाली. त्यात आमचीही जायदाद गेली. जे थोडंथोडकं उरले ते पुढच्या पिढीत दहा भावंडांमध्ये वाटले गेले. जे माझ्या आजोबांच्या वाट्याला आले ते पुन्हा आठ भावंडांमध्ये वाटले गेले. तेव्हा ही कॅलेंडर छपाई नॉर्मल समजली जायची. लगेच मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला आम्हाला जबाबदार ठरवायची गरज नाही. आम्ही ईथले भूमीपुत्र आहोत. परप्रांतीय नाही. हक्काच्या जमिनीवर पीक घेत आहोत.

तर ते ही एक असो. आजमितीला आमची मुंबईत तीन घरे आहेत. हे ही नसे थोडके. हम दो हमारे दो करत दोघांना एकेक घर द्यायचे आणि आपल्याला एक ठेवायचे असा माझा भविष्याचा प्लान होता. पण तो आता डळमळीत होताना दिसतोय. कारण मायबोलीवरची चर्चा.

मायबोलीवर आरे वाचवा म्हणणारया बेगडी(!) पर्यावरणभातप्रेमींवर जहरी टिका केली जात आहे. आधी आपली घरे तोडा, मग दुसरयांचा विकासात घाला खोडा. या टिकेने व्यथित होत आरे धागाकर्ता या नात्याने सुरुवात मी आमचेच घर पाडण्यापासून करायचा विचार करत आहे.

आता प्राब्लेम असा आहे. तीन घरांपैकी एक आहे बाबांच्या नावावर, एक आईच्या नावावर तर एक जे मी माझे म्हणू शकतो ते अजून लोन फिटून माझ्या ताब्यात आले नाहीये. त्यामुळे ते चर्चेतून बादच झाले.

तर आता घर पाडण्याआधी मला आईचे वा बाबांचे घर आपल्या नावावर करावे लागणार. कारण पर्यावरणप्रेमी मी आहे, माझे आईबाबा नाहीत.
आता बाबा काही मला त्यांच्या नावाचे घर देतील असे वाटत नाही. कारण अधूनमधून ते सेटमॅक्सवर बागबान बघताना आढळून येतात.

राहिली आई आणि तिचे घर. ते मात्र आईला भावनिक करत ताब्यात घेता येईल. तर आता याच घराला पाडायचा विचार चालू आहे.

तशी या घराचीही रोचक कहाणी आहे. आजोबांनी आपल्या लाडक्या सूनेला म्हणजे माझ्या आईला म्हटले, तुला एक घर बांधून द्यायची ईच्छा आहे. त्यासाठी दोन पर्याय दोन प्लॉट आहेत. एक स्मशानातून जातो. तर एक झाडाझुडुपातून. काय पाडायचे ते तू ठरव.
स्मशानाचे नाव घेताच आईच्या चेहरयावर स्मशानशांतता पसरली. आमच्याकडे देवापेक्षा भूतांवर विश्वास जास्त. तसेच त्यावेळी मी आईच्या पोटात होतो. तिने विचार केला. स्मशान पाडले आणि त्यातलेच एक आपल्या पोटी निपजले तर... तर.... पण शेवटी जे व्हायचे ते होतेच !

तर ते एक असो, आईने ठरवले समशानात राहण्यात काही शान नाही. आपण झाडंझुडपंच साफ करूया. आणि मग त्याजागी एक टुमदार बंगला उभा राहिला. अवघे पंधरावीस वर्षांचे आयुष्य. नंतर विकासाच्या नावावर तो देखील पाडला. आता त्या जागी पंधरा मजली टॉवर उभा आहे. आणि त्यातला दहावा मजला पुर्ण आमचा आहे.

आता प्राब्लेम असा आहे, तोच दहावा मजला पाडायचा आहे. पण अकरापासून वरच्या मजल्यावरचे रहिवाशी याला नकार देत आहेत. कारण त्यांना असे वाटते की आमचा माळा तोडला तर ते सुद्धा तुटतील.

तर आता त्यांना कसे पटवायचे? त्यांचा कसा होकार मिळवायचा? न मिळाल्यास त्यांच्या घराला धक्का न लावता मी माझे घर कसे तोडायचे? आणि माझ्यावरचा बेगडी पर्यावरणभातप्रेमीचा शिक्का कसा खोडायचा?
कृपया मार्गदर्शन करा _./\._

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी मी जरा विचारात होतो काय झालंय तुला म्हणून पण फाजीलपणा सुरु झाला म्हणजे सगळं व्यवस्थित आहे म्हणायचे Wink
>>
करेक्ट!!!

मुंबईला पाण्याच्या टाकीवर फूटबॉल मैदान बसेल इतके मोठे गार्डन असतानाही लोकं आपल्याच अंगणातील झाडे तोडायला मागेपुढे पाहत नाही. तुम्ही जमिनीवर झाडं लावा किंवा टाकीवर, विकासाच्या आड आल्यास पहिली कुऱ्हाड त्यांच्यावरच. जनजागृती वगैरे सब झुट हैं.

मुंबईला पाण्याच्या टाकीवर फूटबॉल मैदान बसेल इतके मोठे गार्डन असतानाही...
>>>

माझगावचा डोंगर, डीकयार्ड रोड का?
सध्या ही पोस्ट मी तिच्या पायथ्याशी बसून लिहितोय... काय योगायोग Happy

वोह येस्स हँगिंग गार्डन..
हे पण आणि ते पण..
मी ईथे फोटोशेअर केले तर चालतील का..
माझे येणे जणे राहतेच ईथे

मग तर तुमचे कामंच झाले. ह्या कारणाने इमारत कोसळली तर सगळी जमीन मोकळी होईल ,मग लावा तेथे झाडे
>>>>

माणसं मारायचा हा ऊपाय पटत नाही

इमारतीचा विकास तुम्ही केला असेल आणि
टेरेसचा विकास हक्क तुमच्याकडे असल्यास ,टेरेस गार्डन करू शकता . कार्बन क्रेडिट घ्या, त्यानंतर संपूर्ण इमारत इको फ्रेंडली करा,त्याचेही कार्बन क्रेडिट घ्या. क्रेडिट विकून एखादा प्लॉट घ्या आणि तेथे १००% झाडेच लावा. तुमची सगळी खंत मिटून जाईल. त्याचे फोटो जरूर टाका.

अवांतरबद्दल क्षमस्व पण अगदीच राहवलं नाही म्हणून विचारतोय...

<<<<च्रप्स, माफीचा टोमणा नको.
माझ्यावर वालचंद आणि वीजेटीआय हे दोन कॉलेजेस हक्क सांगतात.
पास आऊट मी स्वत:ला समजत नाही. अजूनही नॉट आऊटच खेळतोय >>>>

वालचंद काॅलेज तर सांगलीला आहे ना...आणि तुम्ही मागे एकदा सांगितलेलं की, तुमच शिक्षण मुंबईतच झालयं म्हणून...

जे काही बालवाडीपासूनचे २३ वर्षांचे शिक्षण झाले त्यापैकी २२ वर्षे मुंबईत होतो तर तसे बोलू शकतो ना...

टेरेसचा विकास हक्क तुमच्याकडे असल्यास ,टेरेस गार्डन करू शकता . कार्बन क्रेडिट घ्या, त्यानंतर संपूर्ण इमारत इको फ्रेंडली करा,त्याचेही कार्बन क्रेडिट घ्या. क्रेडिट विकून एखादा प्लॉट घ्या आणि तेथे १००% झाडेच लावा. तुमची सगळी खंत मिटून जाईल. त्याचे फोटो जरूर टाका. >> आग्या तुम्हाला कार्बन क्रेडिट्स प्रोसेसबद्दल चांगली माहिती आहे असे दिसते. ह्याच्या डोमेस्टिक वापराच्या प्रोसेसबद्दल जमल्यास सविस्तर माहिती वेगळ्या धाग्यात लिहाल का?

हायला, तिकडे याच्या गणपती च्या धाग्यावर भाऊ सुधारले वाटले म्हणून हात जोडले मी. अन आता या धाग्यावर बघतो तर .....
जाऊ द्या, भाऊ जुने ७\१२ काढा तुमच्या पणजोबांच्या काळातले आणि पुराव्यानिशी शाबित करून द्या कसे बाकीचे अतिक्रमीत आहेत ते. (वाटल्यास त्या NRC वाद्यांची मदत घ्या आसाम सारखी, आणखी मदत लागल्यास दादरच्या पार्कालाही जाऊन या)
मग काय सब ही भुमी ऋ की. एका बेटाचे मालक हवी तेवढी झाडे लावा. हाकानाका.

आज पेपरात आले आहे डोंगरीतील एक दहा मजली इमारत सोमवारी पाड णार आहे. ती तुमचीच का? वीकेंड घर बांधणी प्रकल्प दिसतोय. ९०
घरांतले लोक बेघर होतील असे आले आहे. तुमच्याकडॅ पर्यायी सोय आहे. इतरांचे काय? तिसर्‍या फ्लॅटात काही सोय होइल तर बघा. पुण्या मिळेल.

मस्तच रुन्मेष, आता जरा अजून tp धागे काढ बाबा,बरेच दिवस तुझे काहीही पण एक no करमणूक करणारे धागे,तुझी अतिशय हजरजबाबी उत्तरे वाचली नव्हती

आज पेपरात आले आहे डोंगरीतील एक दहा मजली इमारत सोमवारी पाड णार आहे. ती तुमचीच का?
>>>

सोमवारी असेल तर ती आमची असणे शक्यच नाही. आई पाडू देणार नाही. साधे केस कापू देत नाही.

पण माहितीबद्दल धन्यवाद कशी पाडतात हे बघू शकतो. जर घरच्या घरी पाडणे शक्य असेल तर उगाच खर्च नको.

@ झुलेलाल,
देवाने मला वरचा मजला दिलाय.
वरच्या मजल्याचा विचार न करून कसे चालेन Happy

@ आदू धन्यवाद Happy
परत आलोय ते पुन्हा थोडा वेळ मिळू लागल्याने. कितपत अन कुठवर मिळतो ते बघूया...

घर पाडले की नाही अजून ?

Submitted by BLACKCAT on 6 October, 2019 - 16:57

>>>

या धाग्यावरचा प्रश्न या धाग्यावरच विचारा. तिथे नको.

अहो शांत माणूस, असे दणादण माझे जुने धागे वर काढू नका प्लीज. मला उत्तरे द्यावी लागतात _/\_
बाकी हा धागा वर काढला छान वाटले. पुन्हा धागा आणि प्रतिसाद वाचायला आवडले.

Pages